जिम्नॅस्टिक (रिओ ऑलिंपिक्स)

Submitted by Filmy on 8 August, 2016 - 05:36

रिओ ऑलिंपिक्समधल्या जिम्नॅस्टिक बद्दल चर्चा करण्यासाठी..

मंजूडी | 25 April, 2016 - 12:32
येस!
दीपामुळे भारतीय जिम्नॅस्टीक्स जगतात एकदम भारी वातावरण आहे.

उदय८२ | 7 August, 2016 - 11:06
एका जिम्नॅस्टचा लँड करताना पायच मोडला.::अरेरे: भयानक रित्या तुटला आहे.

जाई. | 7 August, 2016 - 11:14
बापरे Sad

जाई. | 7 August, 2016 - 11:32
दीपा कर्माकरने जिम्नॅटिक्स मध्ये सुवर्णपदक जिंकलं हे खरं आहे का ? फेसबुकवर एकाने शेअर केलीये बातमी . पण बाकी कुठेच दिसली नाहीये Uhoh आता काय करायचं

उदय८२ | 7 August, 2016 - 11:41
नाही. बातमी खोटी आहे
अन्यथा ऑलंपिकच्या ऑफिशल पेज वर डिक्लेअर झाले असते

जाई. | 7 August, 2016 - 11:45
हो ना. मी पाहिलं तिथे . असा काहीच उल्लेख नाही

हिम्सकूल | 7 August, 2016 - 12:41
लेडिज जिमनॅस्टीक्स अजुन सुरुच झाले नाहीये तर दिपा कर्माकरला गोल्ड कसे मिळेल.. बातमी बघून निदान ऑलिपिकची साईट तरी चेक करावी की..

भाऊ नमसकर | 7 August, 2016 - 21:10
भारताच्या महिला हॉकी संघाने जापानला छान लढत दिली; दोन गोल्सने पिछाडीवर असूनही २-२ असा सामना अनिर्णित ठेवून एक पॉइंट मिळवला. जपान व विशेषतः भारताची गोलकीपर [सविता] या दोघानीही गोलकिपींगचं उत्तम प्रदर्शन घडवलं. महिला संघाला पुढच्या कठीण सामन्यांसाठी शुभेच्छा.
दिपा कर्माकार आज रात्री १०.५५ वाजतां आपली कमाल दाखवेल, असं आत्ता हॉकी समालोचकाने सांगितलं. पहाणं आलंच !

पराग | 7 August, 2016 - 23:29
Deepa karmakar ne changla score kelay..
15 mins madhe women archery chi quarter final ahe. Russia cha viruddha. Keeping fingers crossed!!

भरत. | 7 August, 2016 - 23:48
http://m.sportskeeda.com/live/rio-2016-womens-artistic-gymnastics-qualif...
दीपानी व्हॉल्ट्समधये सहावा रँक मिळवून फायनलसाठी क्वालिफाय केलंय म्हणे. पण सगळ्या जिम्नास्ट्सची ही फेरी पूर्ण झाली का? रँक फायनल का? अन इव्हन बार्स सध्या ३८ वी.

रिओची वेबसाइट भारीये.

Rio 2016 : जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला
http://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/rio-2016-olympics-dipa-k...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालची व्हॉल्टची फायनल जबरी झाली. दिपाला एक्झिक्युशनमधे थोडे गुण कमी मिळाले असं वाटलं..

दिपा करते तोच प्रकार अजून एका प्लेयरने पण केला होता, चुसोविताना ओस्काना - पण तिचे लँडींग चुकले आणि ती रोल ओव्हर झाली.. सगळ्यात वयस्कर खेळाडू होती ती.

Deepa really gave her best ....we are proud of you deepa..

Produnova हा प्रकार फक्त पाहिला होता, त्यांस Produnova म्हणतात हे माहित नव्हते. दिपा कर्माकर ह्यांच्या कामगिरी मुळे हा काय प्रकार आहे ते गुगाळुन पाहिले.

Produnova
From Wikipedia, the free encyclopedia

The Produnova is an artistic gymnastics vault consisting of a front handspring onto the vaulting horse and two front somersaults off. The vault currently has a 8.0 D-score,and is considered the hardest vault performed in women's artistic gymnastics. It is named after Yelena Produnova of Russia, who was the first person to complete it successfully in 1999.

Gymnasts who have successfully completed the Produnova

Yelena Produnova (RUS)]
Yamilet Peña (DOM)
Fadwa Mahmoud (EGY)
Oksana Chusovitina (UZB)
Dipa Karmakar (IND)

साभार : विकीपिडीया

Produnova हा प्रकार यशस्वी पणे पुर्ण करणारी ती पाचवी महिला आहे. एक भारतीय म्हणुन तिचा फार अभिमान वाटत आहे.

तिच्या पुढ्च्या कारकिर्दीस खुप शुभेच्छा.

Pages