फात थाय (Pad Thai )

Submitted by वर्षू. on 11 August, 2016 - 01:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

थायलँड च्या सहलीला प्राथमिकता देणार्‍या भारतीयांची संख्या बरीच वाढलीये हल्ली आणी त्यामुळे भारतात ही थाय जेवण लोकप्रिय झाले आहे. इथे थाय जेवण बनवण्याकरता लागणारे जिन्नस सहज उपलब्ध असल्याने अस्सल चवीचे थाय फूड घरीच करता येते.
तर आता या डिश करता लागणारे साहित्य जमवू
१) १/३ कप फिश सॉस( फिश सॉस आवडत नसल्यास कोणताही डार्क सोया सॉस चालेल)
२) अर्धा कप साखर किंवा पाम शुगर
३) अर्धा कप चिंचेचा घट्ट कोळ
४) ४,६ लसणाच्या कळ्या वाटलेल्या
५) ४ औंस वाळक्या राईस स्टिक्स ( भारतात रिअल थाय या ब्रँड चे पॅक मिळते)

६)२ टेबल स्पून तेल
७) १ कप उभे पातळ काप केलेला कांदा
८) दीड कप बोनलेस चिकन च्या पातळ स्लाईसेस
९) १ अंड
१०) १ कप गाजराचे आगपेटीच्या काड्यांसारखे केलेले पातळ काप
११) १ कप कांद्या च्या पातीचे अर्धा इन्च लांबीचे तिरके काप
१२) १ कप हिरव्या मुगाचे लांब स्प्राऊट्स
१३) १ कप उभी ,पण बारीक चिरलेली पाक छॉय ची पाने
१४) १ कप भाजलेल्या दाण्यांची भरड पूड
१५) लिंबाच्या फोडी
१६) ५,६ लसणी च्या पाकळ्या चिरून

क्रमवार पाककृती: 

१- एका लहान पातेल्यात फिश सॉस किंवा डार्क सोया सॉस , लसणाची पेस्ट, चिंचेचा कोळ आणी साखर एकत्र मिसळून उकळत ठेवा. साखर संपूर्ण विरघळली पाहिजे. गॅस बंद करा. थोडा तिखटपणा आवडत असल्यास थाय मिरच्यांची पूड अ‍ॅड करा.
२) नूडल्स ना ४,५ मिनिटे उकळा. लगेच चाळणीत घालून थंड पाण्याखालून काढा. नूडल्स शिजवताना पार शिजवू नयेत. थोडे कच्चेच हवेत. नंतर परतताना ते शिजले जातात.
३) एक टेबल स्पून एका पसरट कढईत तापत ठेवा. त्यात चिकन चे पीसेस घालून हाय फ्लेम वर परता. चिकन ५,६ मिनिटात शिजेल. ते वेगळ्या बोल्मधे काढून ठेवा.
४) त्याच कढईत उरलेले १ टेबलस्पून तेल गरम करा.त्यात लसणाचे काप लाल होईस्तो परता. लाल होत आले कि त्यावर कांद्याच्या स्लाईसेस परता. आता तयार करून ठेवलेले सोया सॉस मिक्शचर घाला . थोडे परतल्यावर लगेच नूडल्स आणी चिकन परता. नीत परतल्यावर कढईच्या एका बाजूला सारून उरलेल्या जागेत एक अंड फोडून घाला. ते भरभर परतल्यावर त्यावर चिरलेल्या भाज्या घालून हाय फ्लेम वर एक, दोन मिनिटे
परता.
वरून कोथिंबीर आणी भाजक्या शेंगदाण्याचे भरड कूट शिवरून गरम फात थाय सर्व करा.

आवडत असल्यास फात थाय वर लिंबू पिळून घ्या.

https://goo.gl/photos/EAuGAzLmq88FQAG2A

https://goo.gl/photos/2JPijSFdrUByBVg89

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांकरता पोटभरीचे
अधिक टिपा: 

१) चिकन ऐवजी प्रॉन्स घेऊ शकता
२) नूडल्स थंड पाण्यातून काढून पूर्ण निथळले कि १ चहाचा चमचा तेल लावून ठेवा, म्हंजे नूडल्स चिकटत नाहीत.
३) मला गाजराचा गोडपणा आवडत नसल्याने मी पाक छॉय घेतले आहे.
४) सॉस मधे मी फिश सॉस ऐवजी सोया सॉस वापरलेय आणी साखर अजिबात घातली नाहीये. Happy
५) चिंचेचा कोळ पुरेसा आंबटपणा आणतो या डिश ला, तरी आवडत असल्यास वरून लिंबू पिळून घ्यावे.

माहितीचा स्रोत: 
वर्षोन्वर्षे थायलँड मधे काढल्या चा परिणाम..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसेपी मस्त, याचा योग्य उच्चार सांगितल्याबद्दल लैच धन्यवाद. आम्ही काय तर पड थाय, पाड थाय म्हणायचो Lol

पिकासा वेब अल्बम बंद झाल्यामुळे फोटो अपलोड करण्यात अडचण येत आहे.. दिलेल्या लिंक वर क्लिक केले तरच दिसत आहेत फोटोज Sad
हेल्प समबडी!!! Happy

अग.. आधी बर्‍याच लिहिल्या आहेत .. पाककृती विषयानुसार या लिंक वर जाऊन पाहा
आणी हो, वेज वर्जन हवे असल्यास पनीर चा उपयोग करा

मस्त..
आमच्याकडे रताळ्याच्या मिळतात नूडल्स त्याचे करता येते. ( शुद्ध शाकाहारी व्हर्जन Wink )
स्फोटोसाठी फ्लीकर वर अकाऊंट उघड, तिथून पिकासा सारख्याच लिंक्स देता येतात. नॅव्हीगेशन थोडे वेगळे आहे, पण जमते Happy

बापरे आता पर्रत फ्लिकर????
वर्षू मस्तय रेस्पी. वेज वरजन् चा विचार आहे.

दक्षी,..मूळ रेस्पीत आहे ना . साखर... तुझ्याकरताये.. Wink
वेज वर्जन ही करता येईल तुला पनीर घालून.. हाकानाका...
मी कुठे घातलीये..

वर्षू, हे फाड थाई एकदम फाडु आहे ग..... (माझ्या उच्चारांकडे दुर्लक्ष कर, मी उगीचच ....)

रच्याकने, मलेशियाला काय खायचे याबरोबर तुझ्याकडुन काय घ्याय्चे याच्या टिप्सही मी घेणार आहे. तुझ्या रेसिपी एकदम फाडू असल्या तरी रेसिपीतले जिन्नस इथे ज्या भावाने मिळतात ते भाव खिसा फाडणारे असतात. त्यापेक्षा थोडे तिथुनच आणुन काही दिवस तुझ्या रेसिपींचा आनंद घेईन.

हो अमा.. माझी लेक फिश सॉस च्या बिना खात नाही.. एन्हांस होते टेस्ट फिश सॉस मुळे (म्हणे Wink )

साधना..( उच्चाराकडे दुर्लक्ष केलंय बरं.. Biggrin )ऑलरेडी तुझ्या धाग्यावर मलेशिअन फूड्स ची लिस्ट दिलीये.. हां कुकिंग करता लागत असणारे इन्ग्रेडिएंट्स ची सूचि तिकडेच देते..

फाड थाई >> खिखि ... पण pad चा उच्चार फात करतात तर स्पेलिंग असे का केले काय की. उगाच आम्ही पामरं गोंधळतो मग.

सुनिधी Lol

कधीतरी इंग्लिश चायनीज उच्चार लिहीन.. उदाहरणार्थ- ते लोक्स D ला त, तर Q ला छ्वी असं वाचतात..

P चा उच्चार मात्र नेहमी फ असाच. Happy