एकटी

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 August, 2016 - 10:37

वाहून गेले गाव सारे वाचलेली एकटी
माझ्या घराची भिंत ओली त्रासलेली एकटी

उद्विग्न करणाऱ्या प्रथांचा भार होता सोबती
ती एकटी होती कुठे जी वाटलेली एकटी ?

कोणासही थारा नको देवूस तू हृदयामधे
उद्ध्वस्त करते रान ठिणगी पेटलेली एकटी

प्रत्येक वळणावर सुखाच्या बिलगली ताज़ी व्यथा
माझ्याचसाठी फ़क्त जी खोळंबलेली एकटी

सूर्यास्त झाल्यावर नव्याने, आठवत बसशील तू
ती कालची पणती तुझ्यास्तव जागलेली एकटी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>उद्विग्न करणाऱ्या प्रथांचा भार होता सोबती
ती एकटी होती कुठे जी वाटलेली एकटी ?

कोणासही थारा नको देवूस तू हृदयामधे
उद्ध्वस्त करते रान ठिणगी पेटलेली एकटी

प्रत्येक वळणावर सुखाच्या बिलगली ताज़ी व्यथा
माझ्याचसाठी फ़क्त जी खोळंबलेली एकटी

सूर्यास्त झाल्यावर नव्याने, आठवत बसशील तू
ती कालची पणती तुझ्यास्तव जागलेली एकटी<<<<

एक से एक! गायनानुकुल!

वाह् वा वा...बहोत खूब!
मतला जबरदस्त!

>>>सूर्यास्त झाल्यावर नव्याने, 'पेटवत' बसशील तू
ती कालची पणती तुझ्यास्तव जागलेली एकटी<<<<मी असा वाचून पाहिला हा शेर

अरेच्चा होय की, एका शब्दाने केवढा फरक पडतोय !

धन्यवाद सत्यजित आपले आवडली सुचवणी .

धन्यवाद बेफिजी !

सुप्रिया