थाई स्टाईल ग्रीन व्हेजीटेबल करी

Submitted by दिनेश. on 1 August, 2016 - 15:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
प्रयोग !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे सिंगापुरमधे थाई ग्रीनकरी फार फार प्रसिद्ध आहे पण त्यात चिकन वगैरे असते म्हणून मी खात नाही. पण स्तुती फार ऐकली आहे. मी ही कृती करणारचं आहे. ह्यात तेल घालतात का? मी ऐकले आहे की नारळाचे दुध असल्यामुळे तेलाची गरज नाही. तुम्ही बारकी वांगी का नाही घातली ती तर अग्रगण्य आहे ग्रीनकरीमधे.

मला फार अप्रुप वाटले की तुमच्याकडे सोयाबीनच्या ताज्या शेंगा मिळतात. मी जपानला गेलो होतो तेंव्हा तिथे ह्या शेंगा मिठाच्या पाण्यात उकळून फ्लाईट मधे दिल्या होत्या. मी परवाच आणल्यात विकत. नंतर मागाहून माहिती पडले की ह्याच सोयाबीनच्या शेंगा. अकोल्याला आमच्या भागात सोयाबीनचे पिक उदंड आहे.

रच्याक्याने, दिनेशदा -- लाल मिरीची काही आगळी चव येते का? शिवाय लाल मिरी फार उष्ण असतात का? अजून दोन प्रश्न -- पिंपळ्याचा उपयोग कसा केला? भाजून वाटले की तसेच वाटले?
इतके विचारले तर अजून एक अवांतरः मी मेथीचे दोन वाट्या दाणे मोड आणलेत पण ते फार उष्ण असतात का? मला उष्ण गोष्टी फार लवकर बाधतात. मी म्हणजे अगदी थंडा मसाला Happy

Happy अर्रे आलं,हळद्,जिरं या इन्ग्रेडिएंट्स मुळे थाय ग्रीन करीचं इंडियन वर्जन तयार झालंय..

रंग मात्र परफेक्ट आलाय.. मस्त!!!

बेसिल लीव्ज ही दोन प्रकारच्या मिळतात थायलँड मधे. होली आणी स्वीट . कोणत्या रेसिपी करता होली तर कोणत्या रेसिपी करता स्वीट बेसिल वापरायचे त्याची तंत्रे ही आहेत.. Happy
भारतात आता सर्वच इन्ग्रेडिएंट्स मिळतात त्यामुळे ऑथेंटिक चवीचे बनवता येतं थाय फूड.
फिश सॉस वगळून अर्थातच Wink ( मलाही अजिबात त्याचा वास सहन होत नाही)

आभार सर्वांचे,

हर्ट,
ती वांगी इथे नाही मिळत. आमच्या कंपनीत दोन थाई इंजिनीयर आले होते, ते सारखे तक्रार करायचे कि त्यांच्या चवीचे इथे काहीच मिळत नाही. या भाजीत तेल अगदी थोडे घातले तरी चालते, आणि तसाही भाजीवर तेलाचा तवंग आलेला मला आवडत नाही. नारळाच्या दूधाने सर्वच मसाले जरा सौम्य होतात.

लाल मिरी म्हणजे आपली नेहमीचीच मिरी. ती पिकली कि लाल होते आणि ती सालासकट वाळवतात. आपली नेहमीची काळी मिरी असते ती वरचे साल काढलेली आणि पांढरी मिरी, म्हणजे त्यातला मगज. पांढरी मिरी सर्वात जास्त तिखट असते. पिंपळी कडकडीत वाळलेली होती, ती तशीच घेतली वाटणात. भारतात मिरच्या येण्यापुर्वी, तिखट पणा साठी लसूण, मिरी, पिंपळी , आले वापरत असत.

हर्ट, मेथी उष्ण पडत असेल तर कमी खा. आपले शरीर आपल्या ओळखीचे असते. त्यामूळे आपणच काळजी घ्यायला हवी. पण हा प्रकार तूला नक्की आवडेल.

मी होली आणि स्वीट बासिल दोन्ही नावे ऐकली आहेत. पण कधी विचार केला नाही हे दोन वेगळे प्रकार आहेत बेसिलचे.

थाई अन्न फार तिखट असते. त्यांचे तॉम याम सुप एकदाच प्यायलो आणि हा हु करायला लागतो इतके तिखटजाळ होते.

मस्तच रेसिपी.

आपण चिनी पदार्थांचे जसे भारतीयीकरण करुन टाकलेय तसेच या पदार्थांच्या बाबतीतही घडेल असे वाटतेय.>>

बर्यापैकी होत आहेत. अमेरिकेत आमच्या गावात, made in india च्या थाई फुड पॅक ला Singapore/ Thailand मधुन येणार्या फुड पॅक पेक्षा जास्त डिमांड आहे. made in india च्या थाई फुड मध्ये indian मसाल्याचा टच असल्याने चवीला चांगल्या लागतात.