खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मोनिका नेमकी कोणापासून प्रेग्नेंट आहे. <<
मोनिकाने हे क्लियर केले दुसऱ्या भागात विक्रांतसमोर. तिचा एक बॉयफ्रेंड होता, एका पार्टीत ते एकत्र होते, तिने ड्रिंक्स घेतले आणि खुप चढली तिला, त्यामुळे नक्की काय घडले, हे तिला काहीच आठवत नाहीये, शिवाय तिचे पिरियड्स इररेग्युलर असल्याने तिला अशी काहीच शंका आली नाही.

एका भागात तिची आज्जी काळजी व्यक्त करतांना दाखवली आहे, की आपली मोनिका अशी मुलगी आहे, उशिरापर्यंत बाहेर फिरणारी, पार्टी करणारी, रागीट, कोणी काही जाब विचारलेला ही तिला चालत नाही, कशी निभावून नेणार आहे ही सासरी?
पण ज्या पद्धतीने ती त्या कजाग आज्जेसासूला हँडल करतेय, ते पाहता, चांगलीच निभावून नेईल, असे दिसतेय, आणि पसंत आहे मुलगी मालिकेप्रमाणेच ह्या मालिकेचा दिग्दर्शकही तिचं काम सोपं करतांना दिसतोय, तिच्या समोर फॅमिली सीक्रेट्स ओपन करतांना दाखवून.

खरेच ...शर्वरीचे ड्रेसेस, छोटंसं मंगळसूत्र,, चेहेर्‍यावरचं सदा स्माईल...सगळं च मस्त. समर अजिंक्य व तिची जोडी छान दिसत्ये.
हा विक्रांत सदैव गंभीर.....आणि हिरॉईन आक्रस्ताळी...
प्रेक्षकांनी बिचार्‍यांनी चार आनंदाचे क्षण बघायचे तरी कुठे?

परवाचा भाग बघितला .
जास्त लॉजिक लावायच नाही हे मान्य करूनही किती चुका .

मॉनिका परवाच घरी आली आहे ना , तिचे कुठले कपडे यानी धोब्याकडे/ईस्त्रिला दिले ?
गीता म्हणते , ही दोघ अजून घरी आली म्हणून मला जेवणाच काही ठरवता येत नाहे . म्हणजे जेवण मोजून मापून बनवतात . मग ती मोहन ला का विचारते , तु कुठे चाललाय्स तयार होउन ? म्हण्जे तो जाणार हे तिला माहित नसत?
बर, तो म्हणतो , मी घरात सगळ्याना वाढदिवसाला जातोय सांगितल आहे , मग त्यावेळी गीता कुठे होती? तिला माहित नाही का?

गीता , मॉनिकाला आपल्या प्रेग्न्सीची कथा सांगते . नंतर म्हणते , ए बाई , तु असं लपवू नकोस हं काही. अगं माझ्यावेळी परिस्थिती वेगळी होती. विक्रांत शिकत होता. तेन्व्हा डॉ. झाला नव्हता .. म्हणजे ???? विक्रांतच्या शिकण्याचा आणि हीच्या बाळाचा सम्बंध काय ? उगाचच काहीही कारण सांगायची.

ही दोघ साडेसातला घरी येतात . मोहन नौ वाजता घराबाहेर जातो . त्यानंतर गीता आणि मॉनिका खीर बनवतात .
नक्की जेवतात किती वाजता ही लोक ?

जरा माझी शंका दूर करा...
एका भागात विक्रांत तिला क्लियर सांगतो की तु साडेतीन महिन्यांची प्रेग्नंट आहेस. म्हणजेच गर्भ १२ आठवड्यांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे तिच्या एकटीच्या निर्णयावर तो टर्मिनेट करता येत नाही. इथपर्यंत बरोबर? (कायदे कानून लक्षात घेऊन इतका तरी शहाणपणा(?) झी ने दाखवलाय)

असो, मग जर पिरियड्स इर्रेग्युलर असतील तर फारतर उशिरा येतील.. पण येतील ना? प्रेग्नंट असलेली बाई, ते पण साडेतीन महिन्यांची तिचे पिरियड्स कमीत कमी २ महिने तर येणारच नाहीत. मग शंका नको यायला? इथे घोळ नाही का? मॉनिकाने 'माझे मेन्सेस अनियमित आहेत' हे कारण फुटकळ वाटत नाही का? Uhoh

फॅमिली सिक्रेट्स कोणती?>> शर्वरीचा नवरा बाहेर जातांना, बहुतेक पार्टीला जातांना घरच्यांपासून म्हणजे आई पासून लपवतो, ड्रिंक घ्यायचं लपवायचं असतं बहुतेक.. फक्त बायकोला सांगून जातो, त्यांचा संवाद मोनिका ऐकते. नंतर या गोष्टीचा काहीतरी उपयोग करेल ती.. हे सिक्रेट म्हणायचं होतं.

शिवाय मोनिकाचे सासरे पण रात्री अपरात्री कुठेतरी जात असतात, ते त्यांच्या बायकोला माहिती असतं, पण त्यांच्या आईला नाही, हे पण सिक्रेट एक दिवस मोनिका ला समजेल, असं सगळं गोळा करुन त्याची ढाल करेल ती बहुतेक एक दिवस. बहुतेक तिची pregnancy reveal झाल्यावर... दळवी लोक सुद्धा कसे सद्गुणांचे पुतळे नाहीत वगैरे बोलायला, किंवा ज्यांचे सीक्रेट्स आहेत, त्यांना ब्लॅकमेल करायला...

दक्षे, ती कारणं फुटकळच आहेत. स्टोरी योग्य ट्रॅकवर चालली आहे. उगाच फुटकळ खोड्य काढू नकोस Proud

मोनिकाने आता जबरदस्त पाऊल उचललं आहे. मोनिका बेजबाबदार दाखवली आहे आणि अभिज्ञा ती व्यक्तिरेखा योग्य रितीने उभी करत आहे.

तो विक्रांत वेडपट आहे. उगाच स्वतःच्या आणि मोनिकाच्या कुटुंबाला काय वाटेल याचा विचार करत राहिलाय. डॉक्टरलोक एवलोकैमोशनल थोडीच असतात Wink पेशाप्रमाणे प्रॅक्टिकल असायला पाहिजे त्यांनी, एक घाव दोन तुकडे! फसवणुकीला हीच शिक्षा योग्य!

खरंय मंजूडी! आणी मोहन असं चोरी छिपे कुठे जातो..? प्यायला...? का ही ही...!!! आणि तो खिरीचा शॉट मागाहून घुसडलेला वाटला....फीलर म्हणून काही सीन्स शूट करुन ठेवतात ना त्यातला...!!

एकदोन भाग पाहणे झाले या मालिकेचे. सुरुवातीलाच लय थ्रिलर ओतलाय मालिकेत. बायको चक्क तीन महिन्यांची प्रेग्नंट! कल्पना करूनही हसायला येते.
जान्हवीच्या वेळी नऊ महिन्याचे दिड वर्षे केलेले. इथे सुरुवातीलाच तीन महिने एका दमात खात सहा महिनेच शिल्लक ठेवलेत हीच काय ती समाधानाची बाब.
तरी जान्हवीची आई ईथेही असल्याने ती काही हे सहजासहजी होऊ देणार नाही. असतो एकेकाचा पायगुण.
बाकी का रे दुरावाच्या साईड प्रसादला प्रमोशन देत ईथे सेंटरला आरती ओवाळायला आणले हे एक बरे झाले. मला त्या मालिकेत बरेचदा जय पेक्षा तोच बघणेबल वाटायचा.
अधूनमधून आईच्या कृपेने सिरीअल बघणे होणारच. तरी सर्व कळ्या सुखरूप खुलूदे हीच श्री चरणी प्रार्थना Happy

Rofl

तरी जान्हवीची आई ईथेही असल्याने ती काही हे सहजासहजी होऊ देणार नाही. असतो एकेकाचा पायगुण.>>> Rofl

मोठी बहिण आणि पुतण्या डॉक्टर असताना हा मोहन प्यायला रात्री अपरात्री बाहेर कसा जातो? मागे तो विक्रांतचा मामा घराबाहेर बहुदा राखुंडी का तंबाखूने दात घासताना दाखवला होता.
घरात डॉक्टर असेल तर घरातल्या इतरांना मद्यपान आणि तंबाखूसारखी व्यसने नसतात असा माझा (गैर) समज होता.

मामा घराबाहेर बहुदा राखुंडी का तंबाखूने दात घासताना दाखवला होता>>> हो ना, हे आजीला कस काय चालत? जेव्हा बघाव तेव्हा ती शिस्त एके शिस्त करत असते.

तरी जान्हवीची आई ईथेही असल्याने ती काही हे सहजासहजी होऊ देणार नाही. असतो एकेकाचा पायगुण.> हाहा
खरे आहे..तिला पाहून मला शशीकलाबाईंचीच आठवण येते...दुस-या कुठल्या रोल मधे तिची कल्पनाच करता येत नाही...

>>>मोठी बहिण आणि पुतण्या डॉक्टर असताना हा मोहन प्यायला रात्री अपरात्री बाहेर कसा जातो?
काय संबंध आहे ते कळले नाही Happy हा हॉस्पिटल ऐवजी लिकर स्टोर अस्तं तर हे वाकय समजले असते Proud

य संबंध आहे ते कळले नाही स्मित हा हॉस्पिटल ऐवजी लिकर स्टोर अस्तं तर हे वाकय समजले असते>>> Biggrin

मॅक्सुवा तू भी ग्रेट है! इथल्या प्रतिक्रियांचा संबंध शोधतोस??

या सिरियल मध्ये काहीच घडत नाही. अतिशय संथ. काल काय घडलं ? असं कुणी विचारलं तर काय डोंबल सांगायचं? Uhoh तरिपण सांगते.

मॉनिकाने झोपेच्या २ गोळ्या घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला, विक्रांतने तो हाणून पाडला.
आज्जीने २-४ शिस्तिचे धडे दिले. सगळ्यांनी लग्नाचे २-४ फोटो पाहून बालिश कटकटी केल्या...
झाला एपिसोड. Angry

झी चा पैसा वाया चाललाय.

हनिमून ला गेले की नाही दोघजणं ?
उद्या सकाळी , उद्या सकाळी करत होते २ एपिसोड पासून , उगवला का दिवस ?
यान्च्या टाईमलाईन्च फारच लफड आहे

आता हा डिलिव्हरी वाला डॉगदरबाबू असल्याने २-४ दिवस/आठवडे मागे-पुढे व्ह्यायचंच Biggrin

<< झी चा पैसा वाया चाललाय.>> अनेक मार्गानी झी मिळवेल हो तो परत; पण आमच्या वाया गेलेल्या वेळेचं काय ! Wink

या मालिकेत लोकं घडाघडा बोलताना दाखवली आहेत.
विक्रांतने मोनिकाला काल सही सुनावलं. मजा आली बघायला.

Pages