मुबांगा रिसॉर्ट, अंगोला

Submitted by दिनेश. on 20 July, 2016 - 05:00

आफ्रिका असा सरसकट शब्द आपण वापरत असलो तरी हा फार मोठा खंड आहे आणि त्यात तितकीच विविधताही आहे. त्यातही पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका ( हे दोन्ही सब सहारन भाग असले तरी ) मधेही खुप फरक आहे.

पूर्व आफ्रिकेत म्हणजे केनया, टांझानिया आणि युगांडा मधे पूर्वापार पर्यटक जात आहे, त्यामूळे त्यांना मिळणार्या
सोयी तर उत्तम आहेतच शिवाय स्थानिक लोकांना पण पर्यटकांची सवय आहे. त्या मानाने पश्चिम आफ्रिकेत
या सोयी तितक्याश्या उपलब्ध नाहीत.

आता आता कुठे या देशात पर्यटक यायला लागले आहेत.

केनयात असताना, या सुखसोयी असल्याने माझे भरपूर भटकणे झाले. शिवाय तिथला भारतीय प्रभाव हा एक
मह्त्वाचा घटक आहे. म्हणजे कुठल्याही मोठ्या गावात गेलात तर तिथे किमान एक तरी देऊळ आणि गुरुद्वारा
असणारच. तिथली देवळे हि खर्या अर्थाने देवालये आहेत, कारण आलेल्या अतिथीचे मनापासून स्वागत तर होतेच
शिवाय जेवणाचीच नव्हे तर राहण्याचीही सोय होऊ शकते. आणि तीसुद्धा विनामोबदला. अशी देवळे आणि
गुरुद्वारे आम्हाला फार आधाराची वाटत.

केनयात ( आणि बाकिच्या पूर्व आफ्रिकन देशात ) भाषेचा प्रश्न येत नाही आणि वाहतुकीच्या सोयीदेखील बर्‍या
आहेत.

इथे अंगोलात आल्यापासून माझे भटकणे फारच कमी ( जवळ जवळ नसल्यातच ) झाले. इथे सुंदर निसर्गाची
वानवा आहे असे नाही, पण तो मी फक्त विमानातूनच बघत आलोय ( मी वेगवेगळ्या विमानकंपन्यांच्या विमानाने
इथे आलोय हे तर आहेच, पण एमिरेटसचे विमानही प्रत्येकवेळी वेगवेगळ्या रुटवरुन येते ) अनेक जलाशय, नद्या
दिसतात पण नवल म्हणजे मानवी वस्ती दिसत नाही.

तर गेल्या आठवड्यात असेच एक धाडस केले. आम्ही काही मित्र मिळून एका तळ्याकाठी सहलीला गेलो होतो.
तिथे रिसॉर्ट आहे हे माहित होते, पण त्याचे दर काय आहेत, आणि खाण्याची काय सोय आहे त्याची नेमकि
माहिती नव्हती ( आमच्या गटात दोघे जण शाकाहारी ), म्हणून जेवणाची सोय आमची आम्हीच केली होती.

आधी तिथे आदल्या रात्री जाऊन रहायचा प्लान होता, पण त्याचे बुकिंग मिळाले नाही.

पण तिथे गेल्यावर सुखद धक्का बसला. केनयातील रिसॉर्टचे एक स्टँडर्ड आहे ( त्या जागेतले ब्रिटीशकालीन
फर्निचर, राहण्याची व इतर सोय ) अगदी तसेच आम्हाला या मबुंगा रिसॉर्ट मधे दिसले.
तळ्याकाठी अनेक हट्स होत्या आणि त्यातील सोयी उत्तम होत्या. मूळात त्यांची बांधणी आणि डिझाईनही उत्तम होते.
आतमधे गेल्यावर रेस्टॉरंट मधे जाणे अनिवार्य होते, त्यामूळे तिथे फक्त पेयपान केले. मग त्या तळ्याच्या किनारीच
असलेल्या दुसर्या एका निवांत ठिकाणी जाऊन आमचे जेवण जेवलो.

अगदी शेवटचे काही किलोमीटर्स सोडले तर रस्ता उत्तम होता. गुगल वर शोधतच गेलो होतो ( पाट्या नव्हत्या )
परीसर अगदी रम्य होता. पण पूल सोडला तर फार काही आकर्षणे नव्हती. काही हरणे मुक्तपणे फिरत
होती. ( ही जात नव्हे पण एका वेगळ्या जातीची, मोठ्या शिंगांची हरणे, हि अंगोलाची राष्ट्रीय प्राणी आहेत.)

इथले पक्षी मला बुजरे वाटले. त्यामूळे फोटो नीट काढता आले नाहीत. ( केनयातले पक्षी धटींगण आहेत. चक्क फोटो काढण्यासाठी पुढे पुढे करतात. ) लुआंडाच्या परीसरात बाओबाब म्हणजेच गोरखचिंचेची असंख्य झाडे आहेत. तिथेही होतीच.

मला कौतूक वाटले ते रिसॉर्टच्या परिसरात जोपासलेल्या भाजीच्या मळ्याचे. इथली जमीन सुपीक आहेच आणि
पाणीही मुबलक त्यामूळे भाजीपाला, लावला तर उत्तम होऊ शकतो. मला वाटतं त्या रिसॉर्टची गरज भागेल
एवढा भाजीपाला तिथे नक्कीच पिकत असेल.

रस्त्याची कल्पना यावी म्हणून काही रस्त्याचे फोटो देतोय, पण यापैकी बरीच जमीन हि पडीक आहे. ( शेती
वगैरे होत नाही. )

तर हे तिथले फोटो....

1 आमच्या कॉलनीतली कण्हेर

2 जास्वंद

3 पेरुचा केक ( आणि माझा मित्र )

४) जाताना वाटेत

5 जाताना वाटेत

6

7 रिसॉर्ट वरची शेती

8 रिसॉर्ट परीसर

9 बाओबाब

10 झोपडी !!

११ पांढरी लिली

12 ) हरण ( अशी ७/८ होती तिथे )

13 निवडुंगाची फुले आणि त्यावरचा किडा

14) तळ्याकाठचे घर

15 गोरख चिंच

16 तिथला परीसर

17 घर, हि घरे भाड्याने मिळतात. रिसॉर्टचाच भाग आहेत. आत सर्व सुखसोयी आहेत

18 हे तिथले पाळीव पक्षी

आणि हे त्याचे पिस

19 निवांत जागा

20 ही पण निवांत जागा

21 तळ्याच्या काठावरची बाके

22 तळे ( आम्हाला त्या वेळा गाठता आल्या नाहीत पण इथला सुर्योदय आणि सुर्यास्त सुंदर दिसत असावा )

23 तळे

24 इथे सुगरणीसारखे घरटे बांधणारा एक पिवळा पक्षी असतो. त्याचे घरटे सुबक आकाराचे नसते आणि तो गवतही वेगळेच वापरतो. Cape Weaver ( सौजन्य : इंद्रा )

हा तो पक्षी...

25 आफ्रिकन आर्ट

26 एक वेगळे फळ.. झाड आणि पाने पेरुच्या सारखी असली, तरी वेगळे फळ होते हे

27 निळे रानफूल

28) मोठ्या डोळ्यांचा एक पक्षी ( नाव सांगेना !!! ) Senegal Thick-knee ( सौजन्य ; ईन्द्रा )

29 वेगळीच पांढरी फुले, ज्या पाकळ्या वाटताहेत, तिच फुले आहेत.

30 गवताच्या पातीवरच्या मुनिया.. तरी यावर चौथा भिडू येऊन बसतो, मग पाते वाकते, मग सगळे भुर्र उडून जातात.. त्यांचा आवडता खेळ.

31 सुकलेले बोंड

32 केसाळ फुले

33 हा पण एक वेगळाच पक्षी ( आकाराने चिमणी एवढाच होता. पाठ लालसर तपकिरी होती ) Barn Swallow ( सौजन्य : ईन्द्रा

34 गवताचा तूरा

35 रिकामा ग्लास ( जाणकारांना एवढे पुरे !!! )

36 तळ्यातली होडी.

37 एका काटेरी झाडावरच्या मुनिया

38 तळ्याकाठच्या होड्या

39 जांभळट गुलाबी फुले

40 तळ्याकाठचा तूरा

41 केसाळ गोंडा

42 तोच तूरा, वरुन

43 हा छोटा निळा पक्षी इथे सगळीकडे दिसतो. याला बघून मला निंबुडा निंबुडा गाण्याची आठवण येते नेहमी.
Blue Waxbill ( सौजन्य : ईन्द्रा )

44 या वाटेने आम्ही गेलो होतो ( तिथे एक निवांत जागा होती, तिथेच जेवलो वगैरे )

45 परतीचा रस्ता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
छान सफर झाली तेही घरी (मिरज मध्ये) बसुन..आनंद वाटला.
सगळे फोटो खास आलेत.
त्यात ४ था फोटो तर आपल्याकडच्या शिवारातलाच एक वाटला,६ आणि ७,४४ देखील भारतीयच वाटला.
घरटे मात्र आपल्या कडची सुगरणी सारखे नाही.

आभार सर्वांचे ..

खरेच तिथला निवांत पणा आणि शांतता, अवर्णनीय आहे. पक्ष्यांचेही आवाज नाहीत. पाण्यावरही तरंग नाहीत, आमच्या ग्रुपमधला एक जण म्हणाला, रात्री आलो असतो तर काय करायचे हा प्र्श्नच होता.... मी म्हणालो... अरे काहिही करायचे नाही.. त्यासाठीच तर यायचे इथे.

वर्षू.. गेम मीट साठी नैरोबी जवळ कार्निव्होर नावाचे रिसॉर्ट आहे... झेब्रा, हरण, जिराफ, मगर, शहामृग सगळे आहेत तिथे... मेनू कार्डावर !!!!

ती हरणे बहुदा तशीच असावीत, खुप चपळ होती. जरा जवळ गेलो, कि सुसाट पळत जायची.

फोटो चांगले आहेत. जागा चांगली वाटते. मध्येच तो ग्लासाचा फोटो द्यायचं प्रयोजन कळलं नाही. (आणि उगाच दाताखाली खडा आल्याप्रमाणे वाटतं)

निळा पक्षी मस्त Happy

त्या हरणांना जनरली अँटेलोप म्हणतात असं डिस्कव्हरीवर वगैरे उल्लेख झाल्याचं वाटतं.

Pages