फ्लॅट नंबर १५६

Submitted by Abhishek Sawant on 17 July, 2016 - 02:37

प्लॉट नंबर- १५६
“आले आलेSSS ” अविरहत पणे वाजणार्‍या बेलमुळे कंटाळून लता अक्षरशः ओरडलीच. कारण बेल वाजवणारा तश्याच पद्धतीने वाघ मागे लागल्यासारखा सतत बेल वाजवत होता. त्या ऊच्चभ्रू वसाहतीत असा मॅनरलेस माणूस कोण आहे याचं तीला आश्चर्य वाटलं. हात पुसत पुसत तिने दरवाजा ऊघडला तर समोर प्लम्बर होता, वैतागलेल्या नजरेनेच त्याच्याकडे पाहिले.
सॉरी मॅडम ये काम करके दुसरे जगह पे जाना है इसीलिये- कदाचीत त्याला कळालं असाव आपल्या सततच्या बेल वाजविन्यामुळे ही वैतागलेली आहे.
थोड्या वेळापुर्वी जयनेच त्याला कॉल करुन बोलावले होते. त्याने मॅसेज दिला आणि तो ऑफिसला निघून गेला, त्यानंतर आता त्यांचा माणूस आला होता.
जय हा एक ऊच्चशिक्षीत तरूण, फार्मसी मध्ये पीएचडी करुन एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनी मध्ये रीसर्च अँड डेवलोपमेंट मध्ये तो कार्यरत होता. लता पण तशी चांगलीच शिकलेली. फक्त आठ महिन्यांपुर्वी लग्न झालेलं. कंपनीचा आर & डी प्लांट बैंगलोर शहराबाहेर होता म्हणून ते दोघे बाहेर एका सोसायटीमध्ये रहात होते. केएचबी कॉलोनी,- एक हायप्रोफाइल कॉलोनी जिथे क्लास वन ऑफीसर्स रहात होते. अश्या या कॉलोनीत येत्या काही दिवसात हादरवुन सोडणार्‍या घटना घडणार होत्या हे कोणाच्या मनातही नसेल.
तर झाले असे की बाथरुम जवळच्या बेसीन ला येणार्‍या पाण्याला अतिशय घाण दुर्गंधी सुटली होती. जयने सगळे चेक करून पाहिले काही सापडलेच नाही, गच्चीवरची टाकी किंवा आजूबाजुला काहितरी मरून पडले आहे का ते चेक केले पण काहीच सापडले नाही. हे घर म्हणजे खूप चांगला मोठा असा बंगला नसला तरी प्रशस्त असा टू बीएचके प्लाट होता. तश्या कॉलोनीमध्ये असले घर म्हणजे थोडं मध्यमवर्गीय वाटावे असावे असेच होते पण दोन माणसांसाठी असे किती मोठे घर लागणार म्हणून जयने हे घर निवडले. घराच्या पुढे मस्त ऐसपैस बाग बगीचा होता, त्यात वेगवेगळ्या प्रकारची टुमदार झाडे लावलेली होती व पार्कींग साठी पण मोठी जागा होती, तळघर पण होते ज्याचा सा‍हजिकच स्टोअर रूम म्हणून वापर केला जाऊ शकत होता. शिवाय मागे पण ओपन स्पेस होता तिथे एक जुनाट पिंपळाचे झाड होते, कित्येक वर्ष ते झाड तग धरून होते काय माहीती पण अगदीच जीर्ण झाले. ते झाड एकच त्या घराची शोभा घालवत होते, असे वाटत होते की त्या झाडाने घरावर अतीक्रमण केले आहे. घर बघतानाच जयने ठरवले की थोड्याच दिवसात हे झाड इथून काढून टाकायचे.
तसही हे घर त्याला खूपच महाग पडले होते पण कॉलोनीमधील शांतता आणि चांगले लोक बघून त्त्याने पैशाचा विचार केला नाही. शिवाय घरही अगदी प्रशिस्त होते, खिडक्या भरपूर असल्याने स्वच्छ सुर्यप्रकाश आत येत असे.
घरात शिरल्यावर प्लंबर ने डायरेक्ट कुठे प्रॉब्लेम आहे असे विचारले लता ने या इकडे म्हणून बाथरुमचा रस्ता दाखवला आणि ती किचन कडे निघून गेली. प्लंबर पहिला गच्चीवर जाऊन पाण्याच्या टाकीमध्ये पाहु लागला. टाकीवर घरामागच्या झाडाच्या फांध्या आल्या होत्या. त्या दूर करायच्या प्रयत्न तो करू लागला पण फांद्या मोठ्या आणि सुकलेल्या असल्याने त्या लवकर हटवता येइनात पण त्याच्या असे लक्षात आले की भर पावसाळ्यात या झाडाच्या फक्त घराजवळचाच भाग वाळलेला कसा, म्हणजे घराजवळच्या भागावर पालवीच फूटली नव्हती. त्याला आश्चर्य वाटले तरीपण त्याकडे दुर्लक्ष करून तो टाकीचे झाकण थोडस तरी उघडतय का याचा विचार करू लागला. पंधरा वीस मिनीटांच्या प्रयत्नानंतर त्याला ते झाकन थोडस ऊघडता आले, त्यातून त्याने डोकवून पाहिले तर आत फक्त पाणी होते आणि कोणताही घाण वास त्याला आला नव्हता. त्याने कनेक्शन बंद केले व तो खाली गेला.
त्याने बेसीन जवळचे नळ खोलून त्यात काही अडकलेय का ते बघितले पण तेथेही काही सापडले नाही आणि आता तेथून दुर्गंधी सुद्धा येत नव्हती. मग त्याने सगळं व्यवस्थीत लावायला सुरुवात केली. तेव्हडयात अचानक त्याच्या कानाजवळ कोणीतरी जोरात ओरडल्याचा आवाज आला तसा तो जाम दचकला, इकडे तिकडे पाहू लागला तर बाथरुमच्या दाराशी तो एकटाच होता. तो आणखी काही ऐकु येतय का पाहू लागला तर फक्त कुकरच्या शिट्टीचा आणी बाहेरून जाणार्‍या एखाद दुसर्‍या गाड्यांचे आवाज सोडले तर बाकिचे काहीच त्याला ऐकु आले नाही. तो कितीतरी वेळ तसाच स्तब्द बसून राहीला आणि मग त्याला पुसटसा एका मुलीचा हसण्याचा आवाज आला, जेमतेम ८-१० वर्षांची असावी ती आवाज इतका घुमत होता की एखाद्या मोकळ्या हॉल मध्ये ती मुलगी असावी असे वाटत होते. तो आणखी एकाग्र होऊन ऐकणार इतक्यात परत त्याच्या कानाशी मोठ्याने ओरडण्याचा आवाज यावेळी तर त्याला ऑरडताना तोंडातून बाहेर पाडणार्‍या गरम वार्‍याची देखील जाणीव झाली.
आता मात्र त्याला तेथे एक सेकंदही थांबणे अवघड झाले, पटपट आपले साहीत्य ऊचलुन बॅगेत भरले आणि हॉल मध्ये येऊन त्याने लताला हाक दिली, मॅडम काम हो गया है आणि तो तिथून पळून गेला.
त्याच्या हाकेने भांबावलेली लता बाहेर आली, तेव्हढ्यात तो दार आपटून निघून गेला होता. त्याने दुरूस्ती केलीये की नाही पाहण्यास ती बेसीन कडे गेली आणि नळ चालू केला तर त्यातून लालसर काळपट खुपच घट्ट असा पेस्ट सारखा असा पदार्थ बाहेर येऊ लागला त्याला खूप दुर्गंधी सुटली होती. लता ला तर मळमळायलाच झालं त्या पदार्थाने आता बेसीन भरला होता आणि तो आता फरशीवर सांडत होता. तीला आता वातावरणात कमालीची ऊष्णता जाणवू लागली. तीला असे वाटू लागले आजूबाजूला कोणीतरी वावरत आहे असे तीला जाणवू लागले. भितीने घामाच्या धारा लागल्या, अंगावरची कपडे घामाने भिजली. तो वास आणि जवळपास कोणीतरी असल्याचा भास जसजसा तीक्ष्ण झाला तशी ती मागे वळली आणि आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि दार लोटून दिले.
जय आला तेव्हा तीने रडत जाऊन त्याला मिठीच मारली, जयही घाबरला काय झाले असावे त्याच्या मनात शंकांनी काहूर माजवले होते. त्याने तीला शांत बसायला सांगीतले आणि किचन मध्ये पाणी आणण्यासाठी तो जाऊ लागला, ते पाहून लता कावरीबावरी झाली. त्याला तिकडे जाऊ देईना, शेवटी तीला समजावून तो तिला पाणी पाजलं, पाणी पिल्यानंतर ती नॉर्मल झाली. तीने घडलेला व्रुतांत जयला सांगितला. जयने बाथरूम मध्ये जाऊन पाहिले तेथे काहीच नव्हते. प्लंबरने वरून कनेक्शन बंद केले होते.
जय जेव्हा कनेक्शन चालू करण्यासाठी गच्चीवर गेला तेव्हा त्याला जाणवले की वारा नसूनही झाडाची सळसळ वाढत होती, जणू काही तिथे वादळच सुटले आहे. जस काही तो त्या झाडाचा आक्रोश होता काहीतरी अद्रुश्य शक्ती त्या झाडाला हेलकावून टाकत होती. जयने जाणूनबुजून दुर्लक्ष केले त्याने कनेक्शन चालू केले आणि तो खाली आला. त्याने नळ चालू करून बघीतला व्यवस्थीत पाणी येत्त होते लताला पण त्याने समजावून सांगितले की तो तिचा भास असेल वैगेरे वैगेरे. आणि घरातले वातावरण शांत झाले.
असेच तीन चार दिवस शांततेत गेल्यानंतर एका रात्री लता ऊशिरापर्यंत टीवी वरील मालिका पहात बसली होती. जय थकव्या मुळे बेडरूम मध्ये जाऊन झोपला होता, घरातले बहुतेक लाईटस बंद होते. लताला कुणीतरी दारावर थाप मारल्यासारखा आवाज आला. तिने पहिल्यांदा दुर्लक्ष केले. तो आवाज अर्ध्या तासानंतर परत ऐकू आला. यावेळी जरा जोरातच, तीने घड्याळाकडे नजर टाकली साडे अकरा वाजत आले होते.आत्ता कोण असेल ती विचार करू लागली. तसा तीला परावाचा प्रसंग आठवला तिच्या अंगावर सर्रकन काटाच आला. तिने टीवी बंद केला आणि बेडरूम कडे जाऊ लागली. जाताना तिला जाणवले कोणीतरी तिच्या समोरून गेले, त्याच्या हवेच्या झोतामुळे तिची साडी किंचीतशी हलली. तिने सरळ रूमकडे धूम ठोकली आणि दार व्यवस्थीत बंद करून बेड मध्ये शिरली.
आज सकाळी लता जरा ऊशीराच ऊठली, तोपर्यंत जय ऊठून आवरत होता, आज तिच डोकं जरा जडच होतं. मनावरची मरगळ झटकून तीने कामाला सूरूवात केली. काल रात्रीची गोष्ट मुददामून जयला सांगितली नाही, तो तिला लेक्चर देत बसला असता मनाचे भास वैगेरे. आता मात्र तीने यावर ऊपाय करण्याचे मनाशी पक्के केले होते.
आज तिने सगळे आवरून करून, देवपुजा केली, तळघर सोडून सगळे घर झाडून घेतले. तळघरात जायची तिला हिम्मत झाली नाही. एकतर तळघरात पुरेसा प्रकाश नव्हता, एकच साठ वॉल्ट चा बल्ब तिथे लावलेला असायचा, तो पण खुप आधीच्या काळचा होता. आणि दुसरे म्हणजे अडगळिच्या खूप वस्तू तिथे पसरलेल्या होत्या. देवपुजा केल्यानंतर अगरबत्ती सगळ्या घरभर फीरवली, त्याच्या सुगंध संपूर्ण घरात दरवळू लागला तेव्हा कुठे तिला फ्रेश वाटू लागले. तो दिवस शांततेत गेला, रात्री दोन तीन वेळेला दचकुन उठण्याचे प्रकार सोडले तर फारसे काही घडले नाही. पण ते ही आता नेहमीचेच झाले होते. लता नवीण घर बघण्यासाठी जयला वारंवार आग्रह करत होती. पण हे घर घेण्यातच त्याची पुर्ण सेवींग्स कामी आली होती आणि कंपनी मध्ये ऑडीट चालू असल्याने कामाचा ताण भरपुर होता. म्हणून तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता त्याच्या मनातही आले नसेल या घरात त्याच्यासोबत किती अघटीत घटना घडणार होत्या.
दुसर्‍यादिवशी सकाळी ऊठल्यानंतर लता जेव्हा अंघोळीला गेली तेव्हा तिला जाणवले की तिच्या अंगावर लालसर चत्त्या ऊठल्या होत्या. गळ्यावर, मानेवर, पोटावर वैगेरे सगळीकडे, कोणीतरी आवळल्यासारखे व्रण. ती घाबरली जयला दाखवले आणि आपल्याला येणार्‍या अनुभवांबद्दल पण सांगीतले. जयच आपलं नेहमीचंच विज्ञान तर्कबुद्धी. स्कीन अलर्जी झाली असेल हे क्रीम लाव ते क्रीम लाव, तुला भास होतायेत कुणाला तरी सोबतीला घे. अशी उत्तरं ऐकुन तिला कंटाळा आला होता.
त्याच रात्री काच तुटण्याच्या आवाजाने दोघांनाही जग आली, बहुतेक दुसरी बेडरूम जी घराच्या मागच्या बाजूला होती, तिथल्या खिडकी ची काच फुटली असावी. दोघे तिथे जाऊन पाहू लागले तेव्हा त्याना दिसले की, मागच्या झाडाची फांदी काच तोडून घरात घुसली होती. वार्‍यामुळे ती फांदी अशी हालत होती की जणू तिला कोणी धरून हालवत आहे. जयला क्षणभर भीती वाटली पण तो त्यातून सावरला, आणि ती फांदी मोडून काढण्याचा प्रयत्न करू लागला. फांदी मोडली तेव्हा त्यातून एक काळा लालसर घट्ट असा पदार्थ बाहेर पडू लागला आणि खूप घाण वास सूटला. तो द्रव पदार्थ हळूहळू खिडकीच्या गजांवरून टपकत टपकत रूम भर पसरू लागला. त्यांनी रूममधून बाहेर पडण्याचे ठरवले. जयने बेडरूम बाहेरून लॉक केली आणि दोघे आपल्या बेडरूम मध्ये आले.
आता जयला प्रकरणाची गंभीरता जाणवायला लागली होती. लतातर शुन्न्यात नजर लावून बसली होती. जयने आपला लॅपटॉप घेतला आणि गूगलवर स्वतःचाच अ‍ॅड्रेस्स सर्च मारला. तेव्हड्यात लताच्या किंचाळीने त्याचे लक्ष वेधले गेलं. ती बेड वर ऊभी राहून अक्षरशः नाचत होती. दरवाज्याच्या खालच्या फटीतून तो द्रव पदार्थ शिरून फरशीवर पसरू लागला होता. जय त्याच्याकडे पाहत असताना आणखी एका अबनॉर्मल गोष्टीने त्याचे लक्ष वेधून घेतले.
लताच्या चेहर्‍यावर आता भितीचा आता लवलेशही नव्हता, ऊलट चेहरा आता भावनाशुन्य झाला होता, डोळे बेडरूमच्या वरच्या कोपर्‍यात रोखून धरलेला. तिकडे पाहताच जायला आणखी एक जबरदस्त धक्का बसला, एक १०-१२ वर्षांची मुलगी वरच्या कोपर्‍यात भिंतीला पाय लावून बसली होती, तिचा चेहरा अगदीच निर्जीव वाटत होता, अंगावरील फ्रॉक रक्ताने भिजलेला होता, ती मुलगी एकसारखी मान फिरवत होती. इकडे लता ही आता मुलीकडे बघून हसू लागली मध्येच ती रडायची, ओरडायची. वार्‍याचा जोरही आता वाढला होता, घरामागच्या झाडाची सळसळ आता खूपच वाढली होती. काही वेळ तसाच गेला.
लता आता बेडवरून खाली ऊतरून फरशीवर मांडी घालून बसली होती, आणि ती तो द्रव पदार्थ हातात घेऊन कवटाळत होती. आतामात्र जयला या सगळ्याची किळस आली, त्याने एक आर्त हाक लताला मारली. त्यासरशी लता त्याच्याकडे पाहू लागली, तिच्या चेहर्‍यावरील दुखाची जागा आता रागाने घेतली होती. ती मुलगीही आता भेसुर रडू लागली आणि तिने क्षणार्धात जयवर झेप घेतली होती, त्याला काही कळायच्या आत तो जमिनीवर होता आणि लता त्याचा गळा आवळत होती. तिची तिक्ष्ण नखं त्याच्या गळ्यात चाकूसारखी घुसत होती. दोन मिनीटं सलग जय तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्यामध्ये जबरदस्त ताकद संचारली होती. त्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडत होते अखेरीस त्याची प्राणज्योत मालवली. त्याची धडपड थांबली होती.
सकाळ झाली तेव्हा लता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, जयचा निश्प्राण देह तिच्या शेजारीच पडला होता. लॅपटॉप वर गुगल सर्च मध्ये, " प्लॉट नंबर १५६, के.एच.बी. कॉलोनी, उल्हासनगर, बॅंगलोर" यासाठी सर्च रिझल्टस झळकत होते. पहिलीच लिंक होती. “मर्डर मिसट्री सॉल्वड अ‍ॅट के.एच.बी. कॉलोनी, ऊल्हासनगर ... "

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मानिनी, स्वस्ति पुढच्या वेळी अजून चांगली भयकथा पोस्ट करेन...शेवट कळला नाही .गूगल सर्च मारल्यावर असे कळते की त्या घरात आधी एक खून झालेला असतो

ठीक वाटली.. शेवट अर्धवट वाटला.. पण मर्डर झालेला असतो कळलं पण जय आणि लताशी त्याचा काय संबंध असतो?

त्या खूनात मेलेली मुलगी भूत होते...हो शेवट चांगला होऊ शकला असता..पण मला टिपीकल भयकथेसारखा शेवट करायचा नव्हता...सो

ती मुलगी मुलगी भूत होते समजलं पण तुम्हाला प्रश्न नाही समजला..
"पण मर्डर झालेला असतो कळलं पण जय आणि लताशी त्याचा काय संबंध असतो? " ???????
ह्या दाम्पत्यावर कशाला राग.. लॉजिक काय?

मला ही शेवट झेपला नाही.
ती मुलगी भुत होती,पन ती भुत कशी झाली,दोघांना का मारल वगैरे काही कळलच नाही.
बरं भुत असल्यामुळे तीने माणसांना मारल एवढच सध्या कळतय.

अहो त्या घरात राहणार्‍या प्रत्येकाला ते भूत त्रास देणार ना...>> अरे बापरे, भुतांची असली तत्व माहीत नव्हती.. हा नवीनच उलगडा झाला.. आणि मर्डर मिस्टरी सॉल्व झाली तरीही असं... हार्श Happy

ती लहान मुलगी भूत होऊन मारते हे ठिक, पण मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह्ड असं का दिसत होतं गुगल वर? >>>> तेच तर . म्हणूनच मलाही कळली नाही कथा .

तो काळसर पदार्थ त्याचा काय रेलेव्हन्स आहे? झाडाचा संदर्भ कोणत्या गोष्टीशी आहे? ती मुलगी झाडावर रहात असते का आणि ते झाड तोडाणार असतात म्हणून तिला राग येतो असे काही आहे का?

क्षमस्व पण अत्यंत सुमार कथा. नमनालाच घडाभर तेल टाकून / जाळून कथे चा अंत एकदमच सुमार केलाय. मी अमि बरोबर सहमत.

कोणत्याच लिंक्स लागत नाहीये...

प्रामाणिकपणे सांगायचे तर मलाही शेवट काल नीटसा कळलाच नाही. कारण त्या मर्डर मिस्ट्री सॉल्व्हने आणखी काहीतरी भलतेच अर्थ लागत होते. म्हणून कालच कथा वाचली होती तरीही आपल्याला कळले नाही हे लपवायला चौकशी केली नाही Proud
आज मात्र एवढे प्रतिसाद बघून कोणाला काय कळलेय हे बघायला डोकावलो तर बरेच जण निघाले माझ्यासारखेच, त्यामुळे वरच्या कथा कळली नाही, शेवट जमला नाही या प्रतिसादांना अनुमोदन देतो.. फक्त हे प्रतिसाद नकारात्मक घेऊ नका, भयकथा म्हणजे नुसते शेवटच नसतो तर ओवरऑल कंटेट पेक्षाही महत्वाची असते ती वातावरणनिर्मिती. ती आणखी आणखी प्रभावी होऊ लागताच शेवट आपसूकच सुचत जातील. पुढील लेखनास शुभेच्छा Happy

मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह मुळे असे वाटते कि जय त्या मुलीच्या खूनात कुठेतरी सहभागी होता नि म्हणून त्याचा सूड घेतला गेला.

Pages