Submitted by दिनेश. on 17 July, 2016 - 13:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आठ दहा जणांना पुरेल
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपरीक पदार्थ आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच दिसतेय . तिकडे एवढ्या
मस्तच दिसतेय . तिकडे एवढ्या खटाटोपाची भाजी केलीत कमाल आहे . मानलं तुम्हाला,
खूप मस्तं! इथे फ्रोज़न भाज्या
खूप मस्तं!
इथे फ्रोज़न भाज्या मिळतात उँधीयो मिक्स म्हणून. त्यात muthiya पण असतात. मी त्याचंच उँधीयो बनवते. सोपं पडतं ते.
पण ofcourse ताज्या भाज्यांची मजाच और असते.
भारीच. खुप आवडता प्रकार, पण
भारीच.
खुप आवडता प्रकार, पण खटाटोप वाटतो त्यामुळे करत नाही कधी. मला सर्वात जास्त बडोद्याला लग्नात खाल्लाय बरेच वेळा तो उंधियो भारी आवडतो. मराठी लग्नात पण आवर्जुन असतो.
इथे विकत आणतो क्वचित पण ती चव नाही.
>>> ऊंधीयु / ऊंधीयो वर चर्चा
>>>
ऊंधीयु / ऊंधीयो वर चर्चा झाल्याचे आठवतेय, पण इथे थेट कृती कुणी लिहिल्याचे दिसले नाही... म्हणून..>> आहे, आहे. प्रतिसादातले दोन फोटो बघून भाजी टेम्प्टींगही दिसतेय आणि बघून खावीशीही वाटतेय.
http://www.maayboli.com/node/5764
उंधियो खरंच खूप खटपट करायला
उंधियो खरंच खूप खटपट करायला लावणारी भाजी आहे... आणी ते फोटो व कृतीतून दिसतच आहे..
पेशंस के लिये ___/\___
छान
छान
वा खूपच छान. मला खटाटोपाचे
वा खूपच छान. मला खटाटोपाचे काही वाटत नाही पण हे सर्व साहित्य एकाच फेरीत संपवणे शक्य नाही. फ्रिजमधे कुठलीही भाजी फार दिवस साठवून ठेवणे मला आवडत नाही. आज आणली की उद्याला ती संपली पाहिजे. इथे अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. मग त्या कधी खायच्या. मला तर सतराशे साठ प्रकार दिसतात इथे भाज्यांचे रोज एक खाल्ली तरी सगळ्या भाज्या ट्राय करायला वर्ष लागेल. म्हणून तर सिंगापुर सोडवत नाही इथे नको इतके मिळते
मला ते मेथीचे गोळे फार आवडले.
मला ते मेथीचे गोळे फार आवडले. मी तेच खाल्ले असते.
मस्त रेस्पी आणि फोटो .
मस्त रेस्पी आणि फोटो . माझ्या ऑफीसातले गुजराती कलीग आणतात हा उंधियों . वेगळीच चव लागते .
दिनेशदा , जिलेबी फाफडा नाही बरं . टिपिकल गुज्जू उच्चारात जलेबी अने फाफडा
गुजराती कढीची रेस्पी आहे का इथे. ? एका मैत्रिणीकडे खाल्ली होती . भारी लागते ती कढी
हे सगळं नेहमीप्रमाणेच छान.
हे सगळं नेहमीप्रमाणेच छान. उत्तम तयारी आणि सादरीकरण.
पण मला एक बेसिकच शंका आहे दिनेश, विचारतेच.
कुठल्या तरी अडनिड्या, खबदाडीतल्या, तुम्हाला लागणा-या बहुतेक वस्तू क्वचितच मिळणा-या देशात बसून हे सगळे आटेपिटे का करत बसता तुम्ही
भारतात, त्याहूनही पुण्यात ( ) सगळं काही मिळतं, इकडे या, तुमच्या आणि आमच्याही पोटापाण्याची सोय होईल. मी तुम्हाला १०० % खात्री (हवं तर स्टँप पेपरवर लिहूनही) देते
बापरेSSS एव्हढा खटाटोप असतो
बापरेSSS एव्हढा खटाटोप असतो उंधियो बनवायला. माझे गुजराती मित्र भरपुर आहेत आणि त्यांच्याकडे उंधियो बनवला की घरात एक डबा येतोच. यापुढे त्या गृहिणाला कराव्या लागणार्या मेहनतीची जाण ठेवून विशेष धन्यवाद द्यायला विसरणार नाही. बाकी फोटो एकदम तोंपासु...........
मस्तच दिसतेय . तिकडे एवढ्या
मस्तच दिसतेय . तिकडे एवढ्या खटाटोपाची भाजी केलीत कमाल आहे . मानलं तुम्हाला,>>>>+१११११
केवळ लाळगाळू पाककृती ....
सईला संपूर्ण अनुमोदन ....
सईला संपूर्ण अनुमोदन ....
दिनेशदा, __/\__ सई,
दिनेशदा, __/\__
सई, दिनेशदांना किती वेळा सांगितल तरी त्याचा काही फायदा नाही.
सहीच !!! नक्की करणार.
सहीच !!! नक्की करणार.
दिनेश, सईचे म्हणणे मनावर
दिनेश, सईचे म्हणणे मनावर घ्याच पण फक्त तुम्ही मुंबईचे आहात हे कायम ध्यानात ठेवा
उन्धीयो सग़ळ्यात आवडता
उन्धीयो सग़ळ्यात आवडता प्रकार... छान एकदम सविस्तर पा.कृ....
आणि फोटो पाहुन भुक लागलीये..
आभार सर्वांचे... माधव, सई,
आभार सर्वांचे...
माधव, सई, आरती. नक्की...
मुंबई-पुणे-मुंबई.... अशी सेवा पण चालू करीन म्हणतोय !
हो दिनेशदा, आमचापण विचार करा.
हो दिनेशदा, आमचापण विचार करा. डोंबिवलीहून मुंबईला येईन मी खास त्यासाठी.
माधव, आरती, उम्मीद पे दुनिया
माधव, आरती, उम्मीद पे दुनिया कायम है
दिनेशदा, इतके मस्त ऊंधीयो चे
दिनेशदा, इतके मस्त ऊंधीयो चे फोटो बघून रहावले नाही आणि आज लिमिटेड भाज्या वापरुन ऊंधीयो केलाच.:-)
वाटणामध्ये मी थोडे ओले मटार आणि घेवड्याच्या शेंगा सुद्धा घेते. सुरती पापडी आणि पातीचा लसून आता मिळणे शक्य नाही. या भाजीत घेवडा, रताळे, कच्ची केळी, कोनफळ, वांगी आणि मेथीच्या मुठीया एवढ्याच भाज्या घातल्या. थंडीतल्या सारखी सांग्रसंगीत नाही झाली तरी ही चव छान झाली. धन्यवाद.
फोटो मोबाईल ने सकाळी ऑफीस चा ड्बा भरताना घाईघाईत काढला. भाजी प्रत्यक्षात टेम्टिंग दिसत होती:-)
या भाजीची आणखी एक खासियत
या भाजीची आणखी एक खासियत म्हणजे हिचा प्रत्येक घास वेगळ्या चवीचा आणि पोताचा लागतो. - हे तुमचे वर्णन फार आवडले.
मस्त उंधियो ! ही भाजी किंचीत गोडसरच असते ना? फार झणझणीत -मसालेदार नसते!
यम्मी...करुन बघणार.आवडता
यम्मी...करुन बघणार.आवडता पदार्थ आहे.
दिनेशदा, सर्व फोटो मस्त ! (चव
दिनेशदा,
सर्व फोटो मस्त ! (चव मात्र खाल्याशिवाय कळणार नाही !)
तिकडे को थींबीर कशी मिळ ते ?
आमच्या गेल्या आठवड्यात ५ रू ला ३ पेंढ्या असा दर होता,आवक खुप असल्यामुळे दर कोसळला.
सामी, मला पण असेच होते..
सामी, मला पण असेच होते.. एखादा पदार्थ करायचा म्हणजे करायचाच.. मस्त जमलीय ती.
आंबट गोड.. ही भाजी गोडसर नसते. यात गूळ वगैरे नाही घालत. रताळी, केळी यामूळे गोड चव आली तरच आणि तेवढीच..
अनिल... ती फोटोतली कोथिंबीरीची जुडी बघतोस ना, ती इथे १२५ रुपयांना ! कापलेली फ्रोझन असते ती २५० रुपयांना पाव किलो, पण तिला अजिबातच चव नसते. इथल्या किमतीची भारतातल्या बाजारभावांशी तुलनाच होऊ शकत नाही. असा माल घेणारे ग्राहक फारच कमी ( स्थानिक लोक घेत नाहीत ) त्यामूळे असे चढे भाव असावेत.
मी अजून उंधीयो हा प्रकार
मी अजून उंधीयो हा प्रकार एकदाही खाल्ला नाहीये.
त्यामुळे समजा मी केलाच तर बरोबर झाला होता की नाही हे सुद्धा कळणार नाही.
तरीपण एकदा करून पाहिन.
मस्त दिसतोय उंधियो. दिनेशजी
मस्त दिसतोय उंधियो. दिनेशजी तुम्ही एवढे खटाटोप करता हेच खूप आहे. दर हिवाळ्यात त्या घर बांधणार्या माकडासारखे मी उंधियो करायचे ठरवते पण वेळ होत नाही.
साती, बीनधास्त उंधियो करुन बघ. पण करतांना सढळ हाताने तेल वापर तरच टेस्ट येईल. निदान एखादा पदार्थ तरी कॅलरीजचा विचार न करता खावा. आणी उंधियो २ दिवस पण आरामात टिकतो आणी शिळा असला तरी मस्त लागतो.
साती, डिसेंबर ते फेब्रुवारी
साती, डिसेंबर ते फेब्रुवारी मधे गुजराथ मधे जायला हवे अस्सल चव चाखायला !
रश्मी, सध्या मी कितीही तेल
रश्मी,
सध्या मी कितीही तेल खाऊ शकत्येय!
पण मी शिजवलेल्या उंधीयोची चव अस्सल किंवा तिच्या जवळपासची आहे की नाही हेच कळणार नाही.
ती उंधीयो की तो उंधियो?
ती उंधीयो की तो उंधियो?
Pages