भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋजुता दिवेकरांच्या पुस्तकात तरी नक्कीच दूध आणि साखर विरूद्ध असल्याचा उल्लेख नाहीये.
साखर दुधात घालायची गरज नाही किंवा साखरेमुळे दुधाचे पोषण पुरेसे मिळत नाही हा मुद्दा सगळेच मांडतात. ते वेगळे.

दूध + साखर हे विरुद्धान्न आहे असे प्रसिद्ध आहारतज्ञांच्या पुस्तकात वाचलेय. (डॉ. मालती कारवारकर

ऋतुजा या फिल्डमध्ये काय शिकलीय मला माहित नाही पण कारवारकर बाईनी या फिल्डमधले शिक्षण घेतलेले आहे. त्या चुकीचे काही सांगणार नाहीत हे एक. आणि विरुद्धान्न ही कंसेप्ट आयुर्वेदात आहे. कारवारकर बाई परदेशी संशोधनाचा आधार जास्त घेतात. त्यात अर्थात चुकीचे काहीच नाही. आपल्या इथे फारसे संशोधन झालेले नाहीय. मी सध्या त्यांचे जंक फुड की स्वस्थ्य सौंदर्य वाचतेय. त्यात काही रेफेरेन्स सापडतो का पाहते.

विरुद्धान्न आहे की नाही ते माहीत नाही पण अस्सल गुळात लोह आणि मॅग्नेशीअम असते. लोहाबरोबर कॅल्शिअम असलेले पदार्थ खाल्ले असता शरीराची लोह शोषून घेण्याची क्षमता कमी होते. म्हणून बहुदा दूध आणि गुळ एकत्र खात नसावेत.

पण दूधपोह्यात गुळाऐवजी साखर घातली तर कोस्मिक लहरी मिळत नाहीत Wink

साधना तुम्ही जे पुस्तक वाचताय ते मी वाचलेले नाही. पण त्यातही कदाचित रेफरन्स मिळु शकेल.
डॉ. कारवारकरांनी विरुद्धाशनं असा शब्द वापरलाय आणि त्यात ऐकीव ऐवजी आधुनिक विरुद्धा्शनं वापरा असं सांगुन तूप साखर, दूध साखर अशी काही उदाहरणं दिली आहेत.
तसेच रिफाइन्ड साखर टाळा त्यामुळे कॅल्शीयमला तोटा होतो, आणि काही ठिकाणी दूधात अशी साखर शक्यतो टाळावी असे उल्लेख आहेत. नेमकी वाक्य आठवत नाहीत.

नीधप, ऋतुजा दिवेकरांच्या पुस्तकात विरुद्धान्न अथवा विरुद्ध असल्याचा उल्लेख नाही हे बरोबर. मी एकंदरीत टाळण्याच्या अर्थातून लिहित होतो. एक दोन ठिकाणी टाळण्याबाबत लिहीलेले आठवतेय. तसेच झोपे बाबत लिहिताना त्यासाठी रात्री साखरे शिवाय दूध घेण्याचा सल्ला आहे.

स्नानाचे महत्व
स्नान म्हणजे शरिराची शुद्धि करणे.
सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खावु पिउ नये
जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे,
तितके महत्व हे स्नानाला आहे.
अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे.
ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6.
मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8.
राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10.
प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12.
त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.
ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ.
ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते.
शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते.
मनात नकारात्मक विचार येत नाही.
आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो.
नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते.
6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते.
ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो.
सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो.
पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही.
फक्त मनुष्य सर्व बाबतीत समप्रमाणात असतो.
सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ति मिळते.
राक्षसांची अंघोळ 8 ते10 ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो.
मत्सर लोभ जास्त मनुष्यात येतो.
दैविक शक्ति फार कमी मिळते.
शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात.
अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो.
कामात उत्साह नसतो.
आळशीपणा काम करतांना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिड़चिड़ा होतो.
प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12
ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते.
काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपुन राहणे, खुप खाणे. त्यामुळे असिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात.
मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही.
तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वतावर ताबा राहत नाही.
तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे. तरच त्याची शक्ति मिळेल.
म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे.
स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले तर काही हरकत नाही पण स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे. तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर मग आजारांना आमंत्रण.
कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते.
म्हणून स्नान देवपूजा ह्यां कर्माना पण तितकेच महत्त्व आहे.

<< शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात. >>

हे कुठून उपटलं आंघोळीत?

दुध गुळ पोहे माहिताय ग.. दुध+गुळ पण ठीक पण गरम दुधात नक्की नासेलच. हे मी इतके खात्रीपुर्वक का सांगते माहित आहे का? कारण मागे आम्ही लहान असताना आईने गुळाचा पाक सात वेळा गाळून (कारण आता लक्षात नाही) बाटलीत तो भरून थेवला होता, आम्हाला कोमट दुधात घालून प्याय्ला. एक दिवस दुध जरा गरमच होते, तर लग्गेच नासले.. Happy

हळदीचे कुंकू
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,
एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर ऑफिसर ने विचार केला ऐवी तेवी बायको मरनार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आनन्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळ सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळ त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात ती बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशर पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अबसॉरब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-६ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४

मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8. <<<
यावरून असे म्हणावेसे वाटते की यंदाच्या पाणीटंचाईने - शनिवार असो की रविवार - आम्हाला माणसात आणले.

Consumption of PEPSI after consuming POLO MENTOS leads to instant death as this mixture turns into cynide poison.Don't drink Pesi/Cola after eating polo mentos. plz pass this information to as many people as possible specially children.

नासामधले शास्त्रज्ञ डॉ हर्मन हेसेन्जर यांनी केलेल्या संशोधना नुसार दुधात युरेनियम, स्कँडेनेव्हियम, फर्मियम ही मूलद्रव्ये असल्याने नियमित दूध घेतल्याने त्यातल्या लहरींमुळे समोरच्या व्य्क्तीच्या प्राणकोषाशी फ्रिक्वेन्सी ट्यून होऊन समोरच्या शी वैचारिक सुसंवाद चांगला होतो.

चिनी चहात दूध नसते पण आपल्या पूर्वजांना दुधाचे हे गुणध र्म माहीत असल्याने त्यांनी भेटायला अलेल्या माणसाण्ना दूध घातलेला चहा देण्यास सुरुवात केली. बिनदुधाचा चहा तसा निरुपयो गीच असतो...

आंघोळीची वेळ a.m की p.m ??

म्हणजे माझा भाउ , बरेच दा सन्ध्याकाळी ५ वाजता वगैरे आंघोळ करायचा .
मग ती ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणायची .
मावशी उगाचच त्याच्या नावाने आरडाओरडा करायची

Uhoh

नासामधले शास्त्रज्ञ डॉ हर्मन हेसेन्जर यांनी केलेल्या
संशोधना नुसार दुधात युरेनियम, स्कँडेनेव्हियम, फर्मियम ही
मूलद्रव्ये असल्याने नियमित दूध घेतल्याने त्यातल्या लहरींमुळे
समोरच्या व्य्क्तीच्या प्राणकोषाशी फ्रिक्वेन्सी ट्यून होऊन
समोरच्या शी वैचारिक सुसंवाद चांगला होतो.>>>>>>>>>> क्कीत्ती आपले पुर्वज हुश्शार!!!!! सुहागरातच्या दिवशी दूध प्यायची प्रथा त्यामुळेच त्यांनी पाडली असावी. डायरेक्ट प्राणकोशाशी मिलन!!! ट्युनिंग ट्युनिंग.

एका फॉर्वर्डमध्ये - झोपताना डोके मफलरने गुंडाळणे, टिव्ही बघत जेवणे इ. मुळे मेंदूला हानी पोचते (ब्रेन डॅमेजींग हॅबिट्स) असे होते.

यात खरेच तथ्य आहे का?

एका फॉर्वर्डमध्ये - झोपताना डोके मफलरने गुंडाळणे, टिव्ही बघत जेवणे इ. मुळे मेंदूला हानी पोचते (ब्रेन डॅमेजींग हॅबिट्स) असे होते.

झोपतानाचे माहित नाही पण काही लोकांना कायम मफलरात डोके गुंडाळलेले पाहिलेले कोणे एके काळी, मेंदूच्या हानीबद्दल ज्याची जशी पार्टी आहे तशी मते आहेत. मी विरुद्ध पार्टीत असल्याने हानीबद्दल सहमत.

गजानन ते टीव्हीमुळे असेल. बागी- एक योद्धा छाप पिक्चर्स, विविध झूम व कॅमेरा जिटर्स वाल्या सिरीयल्स पाहिल्याने Happy

आज माणूस अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे , त्याला एक मुख्य कारण म्हणजे देशी गाई आणि बैल हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत , महाराष्ट्रात गोहत्त्या बंदी लागु झाली आहे
पण संपूर्ण देशभर ती लागु व्हावी ह्याची मागणी करावी लागते असे देशाचे दुर्दैव आहे
जर्सी पशूचे प्रस्थ इतके वाढण्याचे कारण म्हणजे पूर्वी संदेश दळण वळणाचे मार्ग इतके सहज उपलब्ध नव्हते , त्यामुळे गिर जातीच्या गाई भारताच्या सर्व प्रांतात कशा पोचतील हे करणे आता जितके सोपे होईल तितके पूर्वीच्या काळी शक्य नव्हते, आणि समाजात एक गैरसमज असा होता / अजूनही अज्ञानामुळे काहींचा आहे गैरसमज कि देशी गाय फक्त २-३ लिटर दूध देते आणि जर्सी ३० लिटर दूध देते , देशी गाईंपैकी ३-४ अशा जाती आहेत त्या आपल्या गाईसुद्धा २५-३० लिटर दूध देतात. फक्त भारतीय जातीच्या देशी गाई ह्या A2 दूध देतात , आणि जर्सी पशु A1 दूध देतात
जे आरोग्याला हानिकारक आहे असे शास्त्रज्ञाचें मत आहे, देशी गाय भले २-३ लिटर दूध देत असेल पण ते अमृत आहे कारण त्यात सोन्याचा अंश आहे असे संशोधनात आढळले आहे,
जर्सी पशुंच्या दुधात सोन्याचा अंश आणि बाकी पोषक तत्व नसतात जी देशी गाईच्या दुधात असतात. आणि जर्सी पशु / प्राणी जर २५-३० लिटर दूध देत असेल तरीही ते जेव्हा पचनक्रियेत पोचतं तेव्हा काही आरोग्याला हानिकारक असे काही रसायन निर्माण होतात असे संशोधनातून आढळले आहे , एकीकडे ब्राझील सारख्या परदेशात निवडक दणकट भारतीय वळु / बैल आणि
निवडक भारतीय गाईची आयात करून A2 दूध कसे वाढेल हे तिथले लोक पाहत आहेत
त्यांनी आपल्या गाई विकत घेऊन त्यांची संख्या वाढविली आहे , आणि आपल्या सरकारचे
धोरण मात्र ह्याच्या अगदी विरुद्ध आहे इथल्या सरकारच्या संकेत स्थळावरच जर्सी पशु
कसे वाढवायचे ह्याचीच माहिती पाहायला मिळते , देशी गायीच्या संरक्षणासाठी कोणतीही योजना सरकारी संकेत स्थळावर दिसत नाही, तिथले लोक जर्सी गाईचे A1 दूध पितच नाहीत असे
तिकडे हवा पसरली आहे असे म्हटले जाते , आता इकडे भारतात सुद्धा बरेच जणांनी ज्यांना मधुमेह, रक्तदाब आहे त्यांनी जर्सीचे A1 दूध प्यायचे सोडल्यावर त्यांचे त्या आजाराचे प्रमाण कमी झाले आहे , असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे, जर्सी हि गाय नसून गायीसारखा दिसणारा एक वेगळा पशु आहे , त्यामुळे त्याला ''जर्सी गाय'' हा शब्द प्रयोग वापरू नये त्याला जर्सी पशु
असेच सर्व भारतीयांनी म्हणायला सुरुवात करावी , ''जर्सी गाय'' हा फसवा शब्द प्रयोग
वापरल्यामुळे काय झाले कि समाजाच्या हे लक्षांतच आले नाही कि देशी गाय नष्ट होत आहे
''जर्सी'' ह्या शब्दाला ''गाय'' हा शब्द जोडून एक प्रकारे सरकारने हि योजना लोकांच्या / समाजाच्या गळी बेमालूमपणे उतरवली असे आता जाणवते. प्रत्यक्षात भारतीय लोकांनी तरी
हे चांगलेच लक्षात ठेवायला पाहिजे कि गाय म्हणजे फक्त भारतीय वंशाचीच देशी गाय ,
आणि विदेशी जर्सी म्हणजे एक वेगळाच गायीसारखा भासणारा पशु आहे.
सोबत जोडलेल्या ध्वनीचित्रफिती पाहाव्या.
https://www.youtube.com/watch?v=VeiiGwNySN0
https://www.youtube.com/watch?v=yqMLtY_LQG4
https://www.youtube.com/watch?v=-5rXamYqPjM
https://www.youtube.com/watch?v=Voo6H6Gfar0
https://www.youtube.com/watch?v=-NtI8jb75kc
https://www.youtube.com/watch?v=_tQQZ-hynrM
धन्यवाद,
कवी / लेखक - सुरेश पित्रे , ठाणे

Pages