चला काड्या करूया :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 July, 2016 - 12:22

मैत्रीणीचे कोडे!

गर्लफ्रेंड असूनही जिच्यात जीव अडकला, अश्या एका मैत्रीणीचा काल मेसेज येऊन धडकला.
व्हॉटसपवर आव्हान देत तिने एक कोडे घातले होते, सोडवल्यास मोह पडावा असे एक बक्षीस ठेवले होते.
पण मी जे उत्तर दिले ते तिला रुचले नाही, आणि तिने जे मला उत्तर सांगितले ते मला पचले नाही.
तर जे तिने मला घातले,तेच कोडे खाली देतो, आणि जरा मायबोलीकरांच्याही बुद्धीची चाचणी घेतो.

IMG-20160714-WA0001.jpg

वेगवेगळी उत्तर येऊद्यात, मग तिने सांगितलेले उत्तर आणि त्यावरची माझी शंकाही विचारतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोरपंखीस , तसं तर ८११०८ ही पण संख्या होऊ शकते, त्या दुसर्‍या शून्यातील दोन काड्या काढून पहिल्या पाच ला जोडायच्या. Wink

रंगासेठ | 15 July, 2016 - 22:11 नवीन
मोरपंखीस , तसं तर ८११०८ ही पण संख्या होऊ शकते, त्या दुसर्‍या शून्यातील दोन काड्या काढून पहिल्या पाच ला जोडायच्या.

हो पण

5,11,108 हा अकडा मोठा आहे ना...
81,108 या पेक्षा...

Happy

८१११११८

पहिल्या शून्यातून दोन काड्या काढून पहिल्या पाचाचे आठ केले. दुसर्‍या शून्याच्या दोन काड्या काढून त्याचा अजून एक बनवला. पहिल्या शून्याच्या उभ्या काड्यांचे १ आणि १ + दोन काड्यांपासून बनवलेला १ + दुसर्‍या शून्याच्या उभ्या काड्यांचे १ आणि १ असे ऐकून पाच १. पुढे मागे ८ आणि ८

Lol

... कोड अस आहे...

१) फक्त २ काड्या कढाता येतात
२) नवीन तयार होणारा आकडा सगळ्यात मोठा हवा..

मग ५,११,१०८ हि मोठी संख्या आहे....

ऋन्मेऽऽष तुच कर न्याव बाबा...!!! Lol

श्री | 15 July, 2016 - 22:26 नवीन
असामी जीत गया , ये आता ते गोड बक्षीस कुठलं होतं ते सांग ..

श्री ..अरे मी दिलय की ते उत्तर.. ५,११,१०८ Sad

रात्री हुशार किडे जागत असतात, सकाळी कोडे टाकायला हवे होते Happy

मी देखील पटकन दोन काड्या काढून त्यांचा एक बनवायचा असे तिला म्हणालो, उदाहरणादाखल तसे एक उत्तर दिले मात्र त्या दोन काड्या शून्यातून न काढता शेवटच्या आठ मधून काढल्याने पाच आकडी संख्या झालेली.
अश्या कोड्यांमध्ये जास्त विचार करू तसतसे उत्तर सुधारत जाते, पण त्यानंतर मी जास्त विचार नव्हता केला, कारण मैत्रीणीने जे उत्तर दिले ते बघून चक्रावलोच.

मोरपंखी यांनी दिलेले उत्तर सर्वाधिक असले तरी ते त्यापेक्षाही भारी होते Proud

तुम्हा सर्व हुशार लोकांना तिचे उत्तर काय होते ते गेस करायलाही एक संधी देतो..

चालवा चालवा... डोके चालवा.. उपवासाला डोके चालत नसेल तर रात्री बारानंतर चालवा

पांचशेचा क्युब - ५००^३

शेवटच्या आठातल्या दोन काड्या काढुन /\ अश्या ठेव और बनादे उसके दिमागका दहि...

शेवटच्या आठ चे तीन करून उचललेल्या दोन काड्या फॅक्टोरिअयल (!) म्हणून वापरल्या तर ती अजून मोठी संख्या होईल (५००३!) . एक काडी मोडावी लागेल नि अर्धवट वापरावी लागेल म्हणजे पूर्ण दोन काड्या न वापरताही अजून मोठी संख्या झाली Wink

पांचशेचा क्युब - ५००^३
>>>
हे तर इक्वेशन झाले ना...!!

कोड तर एक संख्या अपेक्षित करतेय..

Pages