विमलाबाई गरवारे प्रशाला

Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11

विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, अजूनही दिसत नाहीयेत Sad कदाचित माझ्या ऑफिसच्या मशीनवरून काही प्रॉब्लेम येत असेल. घरी जाऊन बघीन आता. hopefully तिथे दिसतील!

Teacherssvg.jpg

These are recent pictures of our teachers.
from left to right -- 1st row- godbole, savnoor, prabhune, namjoshi, sahastrabudhe.
2nd row-- sahastabudhe, namjoshi, sohoni, smita joshi.
3rd row -- anawalikar, mone ,rama joshi, pachkudve.
Center-- Gavade sir. He is 89 and still very active.

हा आधीचाच फोटो नवीन format मधे टाकलाय.

Thanks Happy हा फोटो मस्त दिसतोय. एकदम nostalgic वाटलं सगळ्यांना बघून Happy नामजोशी बाई अजूनही तशाच दिसतात !

काल मधली सुट्टी मधे आपली शाळा होती असं कळलं...सलील गरवारेचा आहे म्हणजे आपली शाळा दाखवणार हे माहित होतं... पण नेमका कालचाच एपिसोड चुकला... Uhoh तूनळीवर शोधकार्य चालू आहे Happy

डॉ. प्र. ल. गावडे यांना 'जीवनगौरव पुरस्कार'

पुणे - शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे नुकताच "शिक्षण जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेच्या 153 व्या वर्धापनदिन समारंभात निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले व जम्मू-काश्‍मीरमधील हिंदू एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख अवतार कृष्ण रैना यांच्या हस्ते डॉ. गावडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी मुलींच्या भावे स्कूलमधील नवीन सभागृहाचे "डॉ. प्र. ल. गावडे सभागृह' असे नामकरण करण्यात आले.

डॉ. गावडे म्हणाले, 'शिक्षक आणि शिक्षण संस्था विद्यार्थी घडविण्याचे काम करतात. हेच विद्यार्थी पुढे त्या शिक्षकाची आणि संस्थेची ओळख ठरतात. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यातून चांगला माणूस घडविण्याचे काम मला करता आले. हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे.'' डॉ. यशवंत वाघमारे, रवींद्र वंजारवाडकर, संजय इनामदार, राजीव सहस्रबुद्धे उपस्थित होते.

शिक्षकांबद्दल असे अनुदार उद्गार काढणा-यांनी इतर धाग्यांवर जाऊन मानभावीपणे पोस्टी संपादीत करण्याचे अनाहूत सल्ले द्यावेत यापेक्षा जास्त साळसूदपणा काय असणार आणखी ? करावा तितका निषेध थोडाच आहे.

ओह वाईट झालं, श्रद्धांजली
आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला होता ना ह्यांना, मुद्दाम शेवटच्या तुकडीचा वर्ग मागून घ्यायच्या त्याच ना?

केतकर बाईंना श्रद्धांजली
आम्हालाही नव्हत्या त्या

अनंतचतुर्दशीला शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी न्यायचे. दगडू हलवाई, मंडई आणि आणखी एका मंडळासमोर मुले रात्रभर दिंडी खेळायची. फार कडक होते. त्यांच्या हातचा मार अनेकांनी खाल्लेला होता. नेव्हीची बॅच घ्यायचे. गणित शिकवायचे.

शाळेत शिकवण्या व्यतिरिक्त अनेक उपक्रमांमधे मनापासून सहभागी होणारे सर.
शाळेत १-२रुपयात वगैरे सिनेमा दाखवायचे त्यामागेही ह्यांचेच संयोजन असायचे.

"विमला बाई गरवारे" शाळेचे 'गाड्गीळ' सर माहीत आहेत का?
त्यांचे काल निधन झाल्यची बातमी मला मिळाली.
(बातमी खरी- खोटी माहीत नाही).
शाळेत त्यांचा खुप दरारा होता.

Pages