काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मुझसे भी अ‍ॅक्टिंग कोई करवाता
काश मुझे कोई थंडाक्का न कहता

२. ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहीये
अ‍ॅक्टिंग आये ना आये, नकल करनी चाहीये

३. मेरा नाssssssम है गवरी
प्यारसे लोग मुझे थंडाक्का कहते है
तुम्हारा नाम क्या है, बधीर, मडकी याssssssss शिवकी नवरी...

४. आजा आजा मै हूं प्यार तेरा, अल्ला अल्ला इन्कार तेरा
ओ आजा आ आ आजा

आजा आजा देऊ का मार तुला, जमेल कधी अग अभिनय तुला
होsssओ आ आ आजा आ आ आजा

५. बाबुजी जरा धीरे चलो, गवरी खडी यहां गवरी खडी
चेहेरेपें ना कोई सिकन, अ‍ॅक्टिंग नही ये करती कभी

:हहगलो::

रश्मी Rofl

रश्मी हाहा ही गाणि वाचुन देखिल त्या गवरीच्या चेहर्‍यावरील रेष नाही हलायची. +१२३

काल हि शिरेल बघताना माझी ६ वर्षाची लेक गवरीसारखा थंड चेहरा करुन म्हणाली ' हि गौरी सारखी अशीच काय बघते, तिला समजत नाही का शिवला ती आवडते ते' Proud (पण मी टेन्शनमध्ये की माझ्या लेकीला या वयात अभिनयाची जाण आहे त्याचे कौतुक करु की इतक्यायच तिला हे आवडणं वैगरे प्रकरण कळायला लागले त्याची चिंता Proud )

रश्मी Rofl

रविवारी romantic date चा महाबोअर एक तास ठेवला आहे हि झिरमी(गवरी) कसला कपाळ romance करणार आहे Uhoh ...उगाचच आपलं काहीतरी

झीच्या फेसबुक पेजवर ह्या सिरीयलच्या पोस्टच्या खाली कोणीतरी लिहिलंय की गौरीला अभिनेत्री कोणी केलं, तोंडावरची माशी हलत नाही, तिच्यापेक्षा शिवसाठी स्थळ म्हणून मुलगी आलीय ती चांगली आहे. हे वाचून त्या गौरीला (सायली) फार राग आलाय बहुतेक तिचा रिप्लाय आहे त्याखाली Thank u for ur advice.

नशीब वाचायला तरी येते ती मग लक्षात घ्यावं की बरेच जण नावे ठेवतायेत, आधीच्या पोस्टवर पण काही कमेंट्स आहेत तिच्या मख्ख असण्याचा, मीपण टाकलीय तिथे. एवढं वाचून सुधारणा होणार नसेल तर काय.

प्रेमात पडलेले शिव आणि गौरी किती गोड दिसतातना? ह्या पोस्टखाली आपल्या भगवतीने पण लिहिलंय शिव दिसतो गवरी नाही :D. मी like केली तिची कमेंट.

चांगला अभिनय असा ठरवून करता आला असता तर आणखी काय हवं होतं?
नायिकेच्या वडिलांचं आजारपण हा मराठी मालिकांचा आणखी एक लसावि. जान्हवीपित्याचे गुढघे. इथे बीपी. आणखीही एक मालिका होती जीत नायिका वडिलांना बरं वाटल्याशिवाय लग्न करणार नव्हती.

नाही ग निधि, मीच सोडली ना सिरीयल बघायची त्यापेक्षा आणि तसंच लिहिलेलं, एकीने मागे गौरीला अभिनय येत नाही लिहिलं होतं त्या पोस्टखाली की खरं आहे हिच्यामुळे मी मालिका सोडली बघायची असं. आता मी पोस्ट वाचायला जाते कधीतरी फक्त. बऱ्याच जणांना आवडत नाही तिचा अभिनय आणि ते कळवतायेत झी ला.

हो उत्तम उंची आणि अभिनयही. माझी आवडती अभिनेत्री आहे ती. पण ती आता मुवित येणार आहे महेश मांजरेकरांच्या फु मधे ज्यात परशा आणि सत्या मांजरेकर आहेत. त्यात ती बहुतेक सत्याबरोबर आहे. तिच्या फेसबुकवर फोटो टाकलाय सत्याने co-star म्हणून. त्यामुळे ती नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी असावी. (अवांतरासाठी सॉरी).

Pages