चोर दरवाजाने राजगड ......

Submitted by महेश मते on 10 July, 2016 - 03:49

खूप वर्षानंतर राजगडाला चोर दरवाजाने जाण्याचा योग आला तो ही ह्या वर्षातला पहिला मान्सून ट्रेक.
बुधवारी सकाळी सकाळी आम्ही आठ शिलेदार राजगडाकडे पुण्यावरून मार्गस्थ झालो.पुण्यावरून नसरापूर मार्गे आम्ही राजगड पायथ्याचे गुंजवणे गाव गाठले. वाटेत चहा साठी फक्त एक छोटा थांबा झाला.
सकाळी वातावरण खूपच सुंदर होते पावसाला अजून सुरवात झाली नव्हती पण सगळीकडे धुके होते.चोरदरवाज्याच्या रस्त्याने दिसणारी सुवेळा माची अजून पूर्ण धुक्यातच होती. आम्ही पहिल्या टप्यावर पोहचेपर्यंत पाऊसाने सुरवात केली आणि आजचा दिवस मस्त भिजण्याचा आनंद मिळणार ह्यावर शिक्कामोर्तब झाले.
पावसाचा आणि आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही सर्व जण चोर दरवाज्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलो.शेवटच्या आवघड टप्प्यावर रेलिंग लावले आहेत ज्यामुळे सर्वात आवघड टप्पा पार करण्यास खूपच मदत झाली.पावसामुळे हा टप्पा खूपच शेवाळलेला असल्याने थोडा सावकाशच हा टप्पा चढलेला चांगले. चोर दरवाजाने वर आल्यानंतर तिथे थोडी फोटोग्राफी झाली. चोर दरवाजाने समोर आले की पाहिले दिसते ते पदमवती टाके, टाके पूर्ण धुक्याने आच्छादलेले होते आणि पाणी खूपच स्वच्छ दिसत होते. टाक्याच्या बाजूने जो रस्ता पद्मावती देवी च्या मंदिराकडे जातो त्या रस्त्याने आम्ही मंदिरात गेलो.राजगडावर जर रात्री मुक्काम करायचा असेलच तर हे एकमेवा ठिकाण. मंदिराच्या गाभाऱ्यातील देवीची मूर्ती खूपच सुबक आहे. देवीचे दर्शन घेतले आणि मग शेजारच्या रामेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. देवदर्शन झाल्यानंतर पोटात कावळे कोकत होते ते शांत करणे आलेच. पाऊस थोडा उघडलेला होता म्हणून मंदिराच्या बाहेरच्या पटांगणातच बसून सर्व लोकांनी घरून आणलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला आणि मावळे सज्ज झाले ते बालेकिल्ल्यावर चढण्यासाठी.

बालेकिल्ला ...
राजगडाचा बाल्लेकिल्ला खूपच वैशिष्टयपूर्ण आहे ह्याचे कारण म्हणजे राजगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची जी 1400 मीटर. राजगडाच्या बालेकिल्ल्याला जायचे असेल तर सुवेळा माचीकडे जाणाऱ्या मार्गावरून एक रस्ता जातो. हा रस्ता आज धुक्याने झाकलेला होता. थोडे चालल्यानंतर आम्ही जिथून चढ चालू होतो तिथे पोहचलो.चोर दरवाज्याचा जो सर्वात अवघड टप्पा म्हटले होते त्यापेक्षाही अवघड असा हा टप्पा. थोडी चढाई झाल्यानंतर रेलिंग चालू होते आणि आपोआप तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात की हे रेलिंग इथे नसते तर पावसाळ्यात बालेकिल्ला चढणे अशक्य आहे. रेलिंग ने मदत होते तरीही बाल्लेकिल्ला चढण अवघड आहे आणि उताराने त्याहीपेक्षा अवघड. अवघड चढण चढल्यानंतर दर्शन होते ते बालेकिल्याच्या महादरवाज्याचे. दरवाज्याच्या समोर दिसते ती खोलात खोल दारी. दरवजातून वर गेलो आणि वरील पठारावरच्या शिलाक अवशेष बघितले. धुक्याने जरी फोटोग्राफीचा उस्साह कमी केला असला तरी वातावरण धुंद करणारे होते.महादरवाजाताच थोडी फोटोग्राफी झाली आणि मग आम्ही अक्षरशः बसत बसत बालेकिल्ल्याची चढण उतरली.बालेकिल्ला उतरल्या नंतर परत पद्मावती माचीवरच्या सादर गाठली जिथून सुवेळा माचीवर रस्ता जातो.

सुवेळा माची .
ह्या माचीला असलेली तटबंधी अजूनही शाबूत आहे. साधारण 3 Km अंतराची ही माची आहे आणि ह्याच माचीवर वैशिष्ट्यपूर्ण असे नेढे आहे. नेढे म्हणजे डोळा, डोळ्याच्या आकाराचा खडकाला पडलेला ह्या छिद्रात 5-6 माणसे आरामात बसू शकतो. नेढ्यात बसल्यानंतर दिसते ती दोनी बाजूची खोल दारी. माचीवर चिलखती बुरुंज आहे ज्यावर इथल्या शिवप्रेमींनी ध्वज फडकत ठेवला आहे. सुवेळा माचीवर थोडा वेळ विश्रन्ती घेतली पाऊस अजूनही चालूच होता.
सुवेळा माचीवरून परत येताना लागतो तो गुंजवणे दरवाजा परंतु दरवाज्यामध्ये बघितले तर गुढग्याइतके पाणी भरलेले होते. चोर दरवाजाने उतरण्या शिवाय आता दुसरा मार्ग नव्हता. सुवेळा माचीवरून परत पद्मावती माचीवर पोहचलो आणि रस्त्यात रामेश्वर मंदिराजवळ चहा मिळाला.
चोर दरवाजाने आम्ही उतरण्यास सुरवात केली आता पाऊस थोडा कमी झाला होता पण पडलेल्या पावसाने रस्ता खूपच घसरणारा झाला होता. त्यामुळं गड उतरण्यास तब्बल 2.5 तास लागले. येणाऱ्या वाटेवरून आता परत एकदा नेढ्याचे दर्शन झाले. उतरताना थोडी शेवटच्या पठारावर परत एकदा फोटोग्राफी झाली आणि एक निखळ आनंद देणारा ट्रेक संपत आला आहे ह्याचे खल मनात रुंजायला लागले. गुंजवणे गाव गाठले तेंव्हा संद्याकाळचे 5 वाजले होते. गावातल्या मंदिराच्या बाजूला ओले कपडे बदलले आणि मग गाड्या रस्त्याला लावल्या. येताना परत एकदा मजबूत नाश्ता झाला तो आवडत्या कैलास भेळ मध्ये आणि तिथूनच दोन गाड्या पुण्याच्या दोन बाजूला रवाना झाल्या.

आयुष्यभर स्मरेल असा हा सुंदर ट्रेक, त्याच्या काही आठवणी प्रकाशचित्रांचा माध्यमातून तुमच्यासाठी

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

खूप दिवसानंतर काही तरी पोस्ट करत आहे त्यामुळे लिखाणातील चुका माफ कराव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मज्जाय नी काय! काही लोक लोक सरळ धोपट मार्गाने जातात तर काही चोर दरवाजाने घुसतात.:दिवा: ( कृपया लाईटली घेणे)

छान आलेत फोटो, वर्णन पण मस्त!

मस्तच! असा मार्ग आहे हे माहितच नव्हते.
लिखाण आणि फोटो छान आहेत.

जायला हवं चोर दरवाजाने एकदा.

वाह... मस्तंच लिहिलंय ....

फोटोतून साक्षात गडच उभा केलात की .....

राजगडचा बालेकिल्ला - कसे काय त्याकाळी ही मंडळी चढत असतील त्यांचे तेच जाणे !!!

अनेकानेक धन्यवाद ... Happy

सलाम. इथल्या सार्‍याच भटक्या मावळ्याना !!
असा निखळ निसर्गही बघणं, अन तेंहीं पावसाळ्यात, आतां दुर्मिळ झालंय !

छान

छान वर्णन, तेव्हडा "रोड" हा शब्द पुन्हा पुन्हा खटकला.... रस्ता/वाट/पायवाट काहीही चालले असते. असो.
इथे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

सुंदर.

@ limbutimbu
रोड ला रस्ता केले आहे.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार

महेश, धन्यवाद. Happy
हे पावसाळी हिरवाईने दाटलेले फोटो बघणे म्हणजे पर्वणीच आहे. परत परत बघितले तरी समाधान होत नाही.