ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2009 - 14:45

मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
IMG_1125.jpg
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh

मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai

काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?

प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत.. Happy

तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा, लेका सि डी पाठव की लवकर? >>>
३-४ जीबीच्या फाईल्स आहेत त्या सारे शुटिंग्ज मिळून. (तरी बरं, संयोजकांचा ग्रुप मुकाभिनय करत असताना कुणी केले नाही शुटिंग. Proud ) त्यांची साईझ कमी कशी करता येईल, याबद्दल आहे का कुणाला माहिती?
नाहीतर डीव्हीडी करून बघतो. मग ज्या वविकरांना पाहिजे त्यांना देता / सर्क्युलेट करता येईल.

अरे, आता लक्षात आलं, ते krishnag क्रमशः वृत्तांत टाकणार होते, त्याचं काय झालं? Uhoh सुरूवात तर सहीच केली होती त्यांनी.

---
$

कृष्णाजींच कमशः पुढल्या ववि करता होतं बहुदा. Proud

मला माबो च्या पानाची लिक द्यायची अस्ल्य्य्सा क्सी ग्याअवय्य्ची ते सान्गाल का कुनी???????????????????????????????????????????????????????

Pages