रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निलिमा जेवणावरून उठून गेली (सर्वात आधी); तर आता तिला चांगलं उपाशी ठेवायला पाहिजे ! वाट्टेल ती अरेरावी चालली आहे. सर्वांबरोबर जेवायला छाया नसते कधीच.

कालचो एपिसोड सरितान गाजवल्यान ! पण बॅग भरून तरातरा निघाली तरी घर सोडून जावची नाय ह्येची खात्री होतीच; सिरीयलचां दोन-तीन वर्सांचां तरी काँट्रॅक्ट असतलां तां असां मधींच थोडांच तोडूक गावता !! Wink
'तें जोडपं माझ्याकडे कशाला आलं होतं व आमचं काय बोलणं झालं हें नंतर; आधी, गाडीला आग कशी लागली , हें शोधणं महत्वाचं ' , हें निलीमाचं कसलं लॉजिक ? आधीं तूं त्या जोडप्याला आपण ओळखतच नाही, असं खोटं बोलतेस. मग नवर्‍याला तिथून घालवून गुपचूप त्यांच्याशी खलबतं करतेस. वर हें ? यावर माधवचा एकच लॉजिकल प्रतिसाद असूं शकतो -" ती गाडी गेली खड्ड्यात. आत्तांच्या आत्तां मला सांग त्या जोडप्याचं आणि तुझं काय प्रकरण आहे तें ?"
पण काय म्हणून आपण लॉजिकची अपेक्षा ठेवून हें सारं बघायचं , हें आहेच !!

निलीमा त्या जोडप्याशी जमिनीसंदर्भात बोलत होती. तिला जर जमिन विकायचीच असेल तर तिने दत्तांशी जमिनीची अदलाबदल करावी. सुपीक जमिनीऐवजी मांगरावरची जमिन कारखान्याकरिता विकावी.

मला वाटते निलिमा तिथे कारखाना काढणार आणि दत्तासाठी काही उद्योग धंद्याची सोय करणार.

म्हणजे ती आता खलनायिका वाटली तरी अचानक चांगली निघणार

<< तिला जर जमिन विकायचीच असेल तर..... सुपीक जमिनीऐवजी मांगरावरची जमिन कारखान्याकरिता विकावी.>> माझ्या कामाच्या निमित्ताने मीं अनेक प्रकल्पांची 'साईट सिलेक्शन व अ‍ॅक्विसिझन' प्रक्रिया जवळून पाहिली आहे. खूपच क्लिष्ट असते ही प्रक्रिया व अनेक तांत्रिक बाबी देखील काळजीपूर्वक लक्षात घ्याव्या लागतात. जमीनीच्या मालकीहक्काबद्दल खोल चौकशी तर अगदी प्राथमिक पण अग्रक्रमाची बाब असते. स्वतःच्या बंगल्यासाठी जागा घेतात तसं एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी जागा घ्यायला उद्योजक बायकोला घेवून असे फिरताना मीं तरी कधीही पाहिलेलं नाहीं. कधींही गांवाला न आलेल्या, जमीनींच्या व्यवहारांची कल्पना नसणार्‍या एका सायंटीस्ट बाईवर केवळ तिच्या बॉसच्या सांगण्यावरून जमीनीसाठी पूर्ण विसंबून रहाणारा हा उद्योजक अजबच म्हणायचा !!!

कालचो एपिसोड सरितान गाजवल्यान ! पण बॅग भरून तरातरा निघाली तरी घर सोडून जावची नाय ह्येची खात्री होतीच; सिरीयलचां दोन-तीन वर्सांचां तरी काँट्रॅक्ट असतलां तां असां मधींच थोडांच तोडूक गावता, आय्यो काकानु काय हा, दोन-तीन वर्ष. Sad

ह्या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले, हि मालिका अजून १०० भाग चालणार आणि मग संपणार Sad .

एनीवे मालिकेवर जे प्रेम करतात त्यांचं अभिनंदन. २०० भागानंतर मालिका संपणार हि बातमी आत्ताच मी दिव्य मराठीवर 'मराठी सिनेकट्टा' आहे तिथे वाचली, मला लिंक देता येत नाही. सो एन्जॉय.

<< हि मालिका अजून १०० भाग चालणार आणि मग संपणार >> नानांची शताब्दी असतली साजरी करूंची !! Wink
आत्तां माझी ट्यूब पेटली ! नाना हयात असताना अण्णा कसां काय मृत्युपत्र करूंन वांटप करूं शकतत ? आणि नाना जो बोलण्याचो प्रयत्न करतहत , त्येंका ह्यां तर सांगूचां नसात - ' मेल्यानुं, माझां मृत्युपत्र शोधून काढा आणि बघा; अण्णाच्ये भलते उद्योग बघान मींच त्येकां आधींच वाटपातून वगळून टाकलहंय !' Wink

Happy

आतां अशी येळ येतली, ही सिरीयल बघता त्येच्याकडेच 'हो खुळो कीं काय' ह्या नजरेन बघतले सगळे !! Wink =

aboat_0.JPGअचानक, 'नाय सोडणंय जा तुमकां पलिकडे' म्हणजे काय ? कोकणातले म्हणून
मीं सहजच विचारलं," काय, 'रात्रीस खेळ...' बघतां ना ?" असं !!

Lol भाऊकाका.

मी तर जाम निराश झाले. अजून ४ महिने हि सिरीयल म्हणजे डी 3 ला वाटाण्याच्या अक्षता Sad .

सांगल्याबरोबर नाईकांसारखे २५० तोळे सोनां धाडतलो तुझो झिल ! पेपर वाच जरा.
मुंबैक त्येकां अडीचशे तोळे भाजी घेणां आतां मुश्कील झालांहा !
ahfhh.JPG

नवीन प्रोमोवरुन एक गोष्ट कळली की, पान्डू वेडा नाहीये. ह्या सगळ्यामागे तोच असावा.>> तरी मी म्हणालेच होते मागे.

आता परत बघायला सुरुवात करायला हवी. Happy

काका... खरां असा. Happy

कालच्या एपिसोड मधे नीलिमा पण किती स्वार्थी दाखवलेय, माधवाला झोपेतुन उठवून एकट्याला पाठवते, आणि माधव पण वेडाच, त्याने कशाला जायचे तिलाच जा म्हणायचे ना !

हो नं आणि बेरीनाना एवढं सांगत होते तिथे जाऊ नको तरी हा ठोकळा गेलाच.. बेरीनानांनी सांगितल्यावर तो घाबरुन तिथे जाणार नाही असं वाटलेलं पण हा बावळट गेलाच. आता त्याचा पत्ता कट झालाय बहुतेक.

निलिमाचं पण एवढ्या रात्रीच त्या पेपर्स वर काय अडलं होतं... वर गुपचूप घेऊन यायचे पेपर्स. स्वार्थी कुठची. Angry

त्या कपाटाची चावी फक्त माईकडे असते ना मग ती काल ठोकळ्याकडे कुठुन आली??

हाश्श.... आज जवळजवळ महिनाभराने आले ह्या धाग्यावर आणि सगळे प्रतिसाद वाचले... काय एकेक भयंकर दाखवत आहेत हे लोक मालिकेत. (मी तर महिनाभरापुर्वीच सोडली ही मालिका बघायची.)

<< मग ती काल ठोकळ्याकडे कुठुन आली?? >> -

कधीच न सुटणार्‍या प्रश्नांवरच इचार करूंचां खूळ आसा तुमकां, तर
देशाच्ये इतके प्रश्न आसत, त्या सिरीयतलेच प्रश्न कित्याक ?
khuL.JPG

भाऊ एकसे एक चित्रं आहेत.:हाहा: निलीमा फार्र म्हणजे फार्रच स्वार्थी आणी आतल्या गाठीची बाई दाखवलीय.:राग: एवढ्या रात्री काय अडलं हिचं त्या पेपर्स वाचुन? आणी अभिराम माईकडे पेपर्स देतो का? कारण त्या कपाटाची चावी माई सोडुन कुणाकडेच नसते. ठोकळ्योला कशी गावली?

त्या गुजराथी माणसाचा फोन येतो ना जामिनिसाठी, मग हिला लगेच आठवण होते त्या कागदपत्रांची. ह्या दोन्ही जावा नावर्याचा काहीच विचार करीत नाहीत. आणि आता तीसरी काय करते बघायचे, पण कालचा सीन जरा भयानाकच होता, अण्णा त्या माईच्या पाठोपाठ येत असतात तो सीन .
अण्णा मागे एकदा म्हणले होते ना, की अजून एक बळी पाहिजे, बहुतेक माईंकडून ते हे काम पूर्ण करुंन घेतात ऐसे वाटते.

अगं कशी दिलीस लिंक भगवती. तो लिंक शेअर प्रकार मला काही कुठे दिसलाच नाही.>>अगं ती लिंक (address bar वर) double click करून select करायची आणि मग copy pest करायची.

Pages