विचित्र वागणूक: उपाय

Submitted by arjun1988 on 29 June, 2016 - 07:24

आमच्या एक नातेवाइकासंदर्भात आपली मदत हवी आहे. अमावस्या व पोर्णिमेला तो फार विचित्र वागतो. कोणालाही शिव्या देतो, मारावयास धावतो. सर्वाशीं भांडण करतो. दोन, तिन दिवसांनी एकदम नॉर्मल होतो. त्याला मानसोपचारही केले. पण तो औषधे नियमित घेत नाही. त्याला त्यामुळेअशा वेळेस कोंडुन ठेवावे लागते. त्याचामूळे सर्व सतत तणावात रहातात त्याचे वय बत्तीस वर्ष आहे. कोणताही कामधंदा करत नाही. लोकांमधे मिसळत नाही. बाहेरची बाधा असल्याचा घरच्यांना संशय आहे. क्रुपया मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका मित्राच्या पत्नीच्या बाबतीतही असेच होते. अमावास्या व पौर्णिमेला ती प्रचंड भांडणे करते. आजूबाजूच्यांना स्वतःच्या सासरच्यांबद्दल वाट्टेल ते सांगते. वस्तू फेकून मारते. तक्रारींचे निबंधाएवढे मेसेजेस टाईप करून मित्रवर्तुळात पाठवते. नंतर शांत असते. तिलाही मानसोपचार सुरू होते पण काही फायदा झाला नाही. एरवी बघितले तर विश्वासच बसणार नाही इतकी हसत खेळत असते.

अहो अमावस्या पोर्णिमा हे सगळे खोटे आहे. अर्थात हे खोटे आहे हे कदाचित त्या व्यक्तीलाही माहित नसणार. ती व्यक्ती अतिशय स्ट्रेसखाली असणार, स्ट्रेसचे कारणही तिच्याशी संबंधित व्यक्तीना माहित असणार पण कधीकधी परिस्थितीच अशी असते की सर्व काही माहित असुनही आपण काही करु शकत नाही.

दुर्दैव म्हणा किण्वा अजुन काही, पण अशा दोन व्यक्तींना अतिशय जवळून पाहतेय गेले दोन वर्षे. ज्या परिस्थितीमुळे त्यांना तिव्र नैराश्य आलेय ती परिस्थिती कोणी मुद्दामुन त्यांच्यावर आणवलेली नव्हती, कुटूंबीयांनी त्यांच्या परिने त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला, अजुनही करताहेत. पण हे लोक असे आडमुठे आहेत की आपल्याकडे काय आहे याच्याकडे पाठ फिरवुन काय हातातुन निसटले याच्या नावाने आक्रोश करत स्वत:बरोबर इतरांच्या आयुष्याचीही वाट लावताहेत. काय करणार अशांना.

विठ्ठल सिरीयसली सांगते. माझ्या चुलतसासरी सेम प्रकार आहे. काल नॉर्मल असलेली व्यक्ती अचानक बायकोशी जुने-पुराणे वाद उकरुन काढुन भांडत असते. यात कुठलाही भूत बाधा, भानामती प्रकार नाही, पण ज्योतिष्य आहे. विश्वास ठेवा अगर नका ठेऊ. पत्रिकेत म्हणजेच आपल्या जन्मकुंडलीत चंद्र हा मनाशी संबंधीत आहे. एकदा प्रयोग करुन बघा, खाली नीट उदाहरण देऊन लिहीते.

समजा एखाद्या बाईची वा माणसाची रास ( खरी रास, नुसती नावाने असलेली नाही ) जर कर्क असेल तर ज्या दिवशी कॅलेंडर मध्ये कुंभ रास लिहीलेले असते तेव्हा त्याला/ तिला, गोचरीने फिरणारा चंद्र आठवा येतो. ( ८ वा ) त्याच दिवशी त्याची/ तिची मानसीक स्थिती विचीत्र होते, आदळ आपट करतात, कोणाचाही उगाच राग येतो. तब्येत बिघडते. मन ताळ्यावर नसते.

दुसर्‍या वा तिसर्‍या दिवशी चंद्र फिरत पुढच्या राशीत म्हणजे मीन राशीत गेला ( राशीला ९ वा आला ) की हे ठिकाणावर येतात. प्रसन्न रहातात. जसा गुरु वा शनी फिरत असतात तसे चंद्र, सुर्य तर फिरतातच. गुरु एका राशीत १३ महिने रहातो, शनी एका राशीत अडीच वर्षे रहातो, रवि म्हणजे सूर्य एका राशीत महिनाभर रहातो. मात्र चंद्र हा अती जलद गतीने फिरत असल्याने तो एका राशीत सव्वा दोन दिवस रहातो. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी कृपया टिंगल टवाळी करत बसु नये. हा विषय सगळ्या जाती-धर्मा साठी समान खुला आहे. आधी नीट अभ्यास करावा मग की बोर्ड बडवावे.

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, कारण यात सायन्स आहे, भूत-भानामती नाही. जर चंद्राच्या कलेने सागराला भरती ओहोटी येऊ शकते, मग माणसावर परीणाम का नाही होणार?

तुमच्या नातेवाईकाना चांगल्या मानसोपचार तज्ञाला परत दाखवा. आधी डॉक्टरनाच विश्वासात घ्या. त्या व्यक्तीला चार लोकात वेडा-बिडा समजू नका, किंवा तसे दर्शवु पण नका. कदाचीत काही गोष्टींमुळे त्यांचा आत्मविश्वास गेला असेल, यात नोकरी, प्रेम असे पण विषय असतील. एकदा मित्रांमध्ये नीट बाहेर पण चौकशी करा, कदाचीत कारण समजेल.

मी साधनाशी पण सहमत आहे. यात बाधा नसावीच.

ण हे लोक असे आडमुठे आहेत की आपल्याकडे काय आहे याच्याकडे पाठ फिरवुन काय हातातुन निसटले याच्या नावाने आक्रोश करत स्वत:बरोबर इतरांच्या आयुष्याचीही वाट लावताहेत. काय करणार अशांना.>>>>> हे तर खूप महत्वाचे कारण आहे साधना. बरेच लोक अतीशय असमाधानी रहातात, कायम दुसर्‍याच्या परीस्थितीशी तुलना असते.

रश्मी. तुम्ही म्हणता हे जर खरे असेल तर त्यावर उपाय नसेलच नाही का? कारण चंद्र त्या राशीत येतच राहणार.
चंद्राच्या कलेने सागराला भरती येत असेल तर ती प्रत्येक सागराला येते, काही ठराविकच सागराला येत का? मग या प्रकरचा परीणाम जवळपास प्रत्येकावर व्हायला हवा ना?

हो विठ्ठल, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. पण असले प्रकार दुर्बल मनाच्या लोकांमध्ये फार होतात. बाकी गंमत सोडा, पण सहज वेळ जमेल तेव्हा निरीक्षण करा. त्यातल्या त्यात कर्क, वृश्चिक, मीन राशीची माणसे फार हळवी असतात. पटकन मनाला लावुन घेतात. पिक्चरला गेले तरी सगळ्यांसमोर रडतात. चंद्र हा मनाचाच कर्ता असल्याने या राशीवर चंद्राच्या कलेचा फार पटकन परीणाम होतो. गैरसमज करुन घेणे हा स्थायी भाव बनतो. दुसरी बाजूच हे समजून घेत नाहीत, आणी तसे ज्यांची पत्रिका देखील नाहीये असे लोक सुद्धा चटकन आपले मन मोकळे करत नाहीत, त्यामुळे एखाद्याची पत्रिका भलेही नसेल पण निसर्ग त्याचा परीणाम दाखवतोच.

वास्तवीक शरीराप्रमाणे मनाला काही रोग असतात ही गोष्ट आपला समाज पटवुन घेत नाही, आणी त्याच्यावर उपचार करायला गेले तर मी काय वेडा आहे का असे समज हे लोक निर्माण करुन घेतात, मग दुखणे वाढत जाऊन आजूबाजूच्या लोकांना पण त्रास होतो.

यावर उपाय म्हणजे, या व्यक्तीच्या नातेवाईकांनी याच्या बाबतीत बाहेर काही घडले आहे का? नोकरी का करत नाही? काही प्रेम प्रकरण आहे का? किंवा काही अपमानास्पद घटना घडली आहे का हे ही बघावे.

आता एक सांगते. बर्‍याच वेळा काही मुला- मुलींची लग्ने लवकर ठरत नाहीत, तेव्हा मग या देवाची उपासना कर, असे कर तसे सांगीतले जाते. यात खरे नसते, लग्न ज्या वेळी व्हायचे तेव्हा होईलच पण या मुला-मुलींची मने कुठे भरकटली जाऊन यांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये असा या मागचा उद्देश असतो. देवाच्या भितीने का होईना, यांचा पाय कुठे घसरत नाही. नाहीतर पूर्वीच्या काळी जेव्हा मुलीना शिक्षण नव्हते, स्वतःच्या पायावर उभे रहाता येत नव्हते त्या काळात असले काही तारुण्याने घडु नये म्हणून देवाची उपासना करायला सांगायचे. कुठलाच देव असे लग्न लवकर लाऊन देत नाही आणी नोकरी पण लाऊन देत नाही. पण अध्यात्माने मन शांत होणे हाच एकमेव उद्देश असतो.

म्हणून या व्यक्तीला कुठल्ही भूत बाधा झाली नाही असे समजून बाहेर डॉक्टर व घरात आश्वासक मैत्रीचे वातावरण निर्माण करुन प्रयत्न चालू ठेवावेत.

वर साती यांनी जो उपाय सांगितला अाहे तो देखील योग्यच आहे.

आपल्याला अमावास्या पोर्णिमेला काहीतरी होतं याची त्या व्यक्तीच्या अंतर्मनाने नोंद घेतलेली असते.
कॅलेंडर पाहताना न जाणते पणी त्यांचे अंतर्मन उद्या परवा अमावास्या अाहे याची नोंद घेते आणि मग आपसूक मन तसे वागते(त्या व्यक्तीला जरी तसे वागायचे नसले तरीही)

घरातले कॅलेंडर लपवून ठेवा. शिवाय त्या व्यक्तीला अमावास्या कधी आहे हे कळू देऊ नका.
घरच्यांचा बोलण्यात तिथीचा उल्लेख होणार नाही याची काळजी घ्या.

{मग या प्रकरचा परीणाम जवळपास प्रत्येकावर व्हायला हवा ना?}

अर्थातच हा परिणाम सगळ्यांवर होतो. पण चंद्राच्या सापेक्ष स्थितीमुळे उत्पन्न होणाऱ्या कॉस्मिक लहरी काहीच लोकांच्या ब्रेन वेव्ज बरोबर रेझोनेट होतात. याला एक साधा उपाय म्हणजे ऍल्युमिनियम फॉईल ची टोपी बनवून डोक्यात घालणे. यामुळे मेंदूचे इलेकट्रोमॅग्नेटिक लहरींपासून संरक्षण होते. थंडीचा जसा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होतो आणि स्वेटर घालून आपण तो कमी करतो तसंच आहे हे शास्त्र. पुरातन काळी धातूची शिरस्त्राणे असत ती याच कारणासाठी.
मी स्वतः लोकांना अशा टोप्या घालायचा धंदा चालू करावा या विचारात आहे. जर कोणी पार्टनर बनण्यासाठी इंट्रेस्टेड असेल तर विपुतुन संपर्क साधावा.

त्यातल्या त्यात कर्क, वृश्चिक, मीन राशीची माणसे फार हळवी असतात. >> वाद घालायचा नाहीये पण माहितीतली कर्क राशीची दोन उदाहरणे आहेत जी अजिबात हळवी वगैरे नाहीत. उलट एक नंबरची लब्बाड , धूर्त म्हणून पूर्ण ग्रुप मध्ये ओळखली जातात . कर्क राशीची माणसं हळवी असतात ही थियरी माबोवरच बरेचदा वाचली आहे . मग हे अनुमान फसवं नाहीये का ? की अजूनही काही फॅक्टर आहेत ?

रश्मीच्या पोस्ट्समुळे कधी पासून विचारायचं होत ते विचारून टाकलं. गैरसमज नसावा

......

तुमच्या नातेवाईकाना चांगल्या मानसोपचार तज्ञाला परत दाखवा. आधी डॉक्टरनाच विश्वासात घ्या. त्या व्यक्तीला चार लोकात वेडा-बिडा समजू नका, किंवा तसे दर्शवु पण नका. >>>>>>>>+१.

१.माझ्या ओळखीतील एकजण असाच विचित्र वागायचा.अतोनात संताप,उलटी उत्तरे देणे यामुळे घरात वातावरण अतिशय खराब झाले होते.३-४ वर्षानंतर ,डॉ.नाडकर्णींच्या औषधोपचाराने तसेच समुपदेशनामुळे त्याला ८०% बरे वाटू लागले आहे.डिप्रेशन हे कारण होते.त्याने तेथील डॉक्टरना नंतर विचारले की तुम्ही मला या गोळ्या का देता? त्यावर उत्तर मिळाले की सुरुवातीला पेशंट ऐकायच्या स्थितीत नसतो,त्यावेळी मेंदू थंड करण्यासाठी आणि कॉन्सेन्ट्रेशन वाढविण्याकरता गोळ्या देतो.तो मुलगात्या शितीत जॅपनीज शिकत होता,एम.ए.(इंग्लिश लिटरेचर) झाला.अजूनही तो डॉ.कडे जातो.

२. पण निसर्ग त्याचा परीणाम दाखवतोच.>>>>>> हे खरं असावे.संध्याकाळची ६.१० -६.४५ पर्यंतच्या वेळेला असंच काहीसं हुरहुरल्यासारखे होते.म्हणून तर त्या वेळेला कातरवेळ म्हणतात.
आण्खी ओळखीचा एकजण मे़कॅनिकल इंजिनियर होता.अतिशय हुशार.त्याने अमावस्येला की पौर्णिमेला आत्महत्या केली.त्यापूर्वी देखील त्याने अशाच तिथीला जीव द्यायचा प्रयत्न केला होता.स्किझोफ्रेनिक असल्यास माहित नाही.पण वागणबोलणे सुसंस्कृत,चांगली नोकरी होती,दिसायलाही सुरेख होता.

एका डॉक्टरांचे वेड्यांबाबत मत आहे की कॅन्सर पेशंट आणि ही माणसे ही सेम असतात.कारण दोन्ही आजार पेशंटला
त्रास देतात.कॅ.पे.ना सहानुभूती तरी मिळते,यांना तीही नाही.यांच्या वागणुकीमुळे घरदार त्रस्त असते.मानसिक आजार हा आपण आजार धरतच नाही.त्यामुळे त्यांच्याशी वागताना आपण खूप चुका करतो.

रश्मे छान पोस्टी. आणि माझं तुला अनुमोदन.
ज्या लोकांच्या राशीचा स्वामी चंद्र असतो त्यांच्यात असे बदल बर्‍याचदा अनुभवता येतात.
मि स्वतःवरून सांगते कारण माझी रास कर्क आहे.

जाई - तुझं पण बरोबर आहे/असेल नक्किच, कारण कर्क रास ही सर्वसाधारणपणे हळवी म्हणून प्रसिद्ध असली तरिही सगळीच कर्क राशिची माणसं तशी असतील असं नाही. तु ज्या प्रमाणे कर्क हळवे पाहिले नाहिस तसे मी कर्क रासवाले धुर्त फसवे पाहिलेले नाहित.

पण असले प्रकार दुर्बल मनाच्या लोकांमध्ये फार होतात
वास्तवीक शरीराप्रमाणे मनाला काही रोग असतात ही गोष्ट आपला समाज पटवुन घेत नाही,

दुबळे शरीर, शरीराचे रोग त्या मानाने लवकर लक्षात येतात, अगदी परक्यांना सुद्धा. नि बोलून दाखवले नाही तरी.

त्यावर बरेच उपायहि बर्‍याच ठिकाणी उपलब्ध आहेत व केले जातात. शिवाय शरीर दुबळे होऊ नये, रोग होउ नयेत यासाठी बरेच उपाय पुष्कळांना माहित आहेत. नि लहानपणा पासून बरेच पालक अल्पवयीन पाल्यांची काळजी घेतात.
मनाचे रोग पटकन लक्षात येत नाहीत, जवळच्या, नेहेमी संपर्कात असणार्‍या लोकांना कदाचित शंका तरी येते, पण कधी कधी पालकांची पाल्याबद्दलची कौतुकाची कल्पना - आमचा बाब्या किनई, बारीक सारीक गोष्टींवरून एकदा रागावला की सगळ्यांना मारतो, खेळण्यांची वाट लावतो. मांजराला, कुत्र्याला छळतो, नाहीतर हट्ट करतो.

उपाय करणे कठिण, कारण मुळात ज्याला मनाचा रोग आहे तोच जास्तीत जास्त विरोध करतो,

नि मनाच्या दुर्बलतेबद्दल काय म्हणणार? कसे कळणार? कुणाला कसे कळणार?
मग दुर्बल मनाची बिचारी माणसे - लायकी असूनहि हवे ते काम करणे कठिण होते त्यांना. शक्य असूनहि हवे ते यश मिळत नाही. कारण जो तो, अगदी जवळचे सुद्धा, स्वतःचा स्वार्थ साधणार. नि त्यांच्यावर मात करणे किती कठिण - कल्पना करा अति दुबळा मनुष्य - अगदी सर्व सामान्य अश्या मुलाकडूनहि अन्याय सहन करतो - करावाच लागतो.
मग बिचार्‍या दुबळ्या मनाच्या लोकांना मनाचे रोग होतात - अति क्रोध, नैराश्य, कशाचाहि आनंद, दु:ख न होणे, जिव्हाळ्याचा अभाव. इ.

पहिला भाग बरेचदा पाहिला आहे - दुसरा भाग आयुष्यभर स्वतःच्या बाबतीत अनुभवला.

देवकी +१
अर्जुन आपण सायकियाट्रिस्ट ची मदत घ्या व गरज पडल्यास ते पेशंटला अ‍ॅडमिट करतील. औषधे नियमित घेणे आवश्यक आहे.
अमावस्या पौर्णिमा ला होते हे मानसिक वा संस्काराचा भाग असल्याने आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही.

ओ नताशा तै, उगाच हसु नका मी मस्करी करत नैय्ये. हे वाचा. जळ्ळं मेलं कोणाला विज्ञानात आवडच राहीली नाही आज काल. सगळे सो कॉल्ड संशोधक आपली पातळी सोडुन राजकारणाचा उहापोह करतात.

https://en.wikipedia.org/wiki/Tin_foil_hat#Scientific_basis

A well-constructed aluminum foil enclosure would approximate a Faraday cage, reducing the amount of radiofrequency electromagnetic radiation passing through to the interior of the structure.

वेगवेगळ्या धातुंच्या टोप्या आणि त्यांचे वेगवेगळ्या राशींच्या माणसांवर होणारे परीणाम यावर रीसर्च चालु करणार आहे मी आता. जसं नवग्रहांचे खडे शास्त्रिय पुराव्यासकट विकले जातात तसंच मी शास्त्रिय टोप्या घालेन लोकांना.

अमावस्या आणि पौर्णिमा या शास्त्रीय कारणांमुळे होतात. सोमवार मंगळवार या सारखे आपण रचलेले दिवस नाहीत ते. मग त्यामुळे काही परीणाम होतात असा कोण दावा करत असेल तर ते अशास्त्रीय किंवा शास्त्रीय आधार नसलेले कसे?

या घटनांशी अमावस्या पौर्णिमेचा संबंध आहे च असे मला म्हणायचे नाहीये पण अमावस्या पौर्णिमा नुसत्या येतात आणि जातात, कुठेच काहीच ईफेक्ट न करता हे आपण ठामपणे कसे म्हणू शकतो.

आपण चंद्राला झाकून ठेऊ शकत नाही. आपण कीतीही प्रयत्न केला तरी पौर्णिमा/अमावस्या लपवणे शक्य होत नाही, कारण ज्याला त्रास आहे तो पौर्णिमा/अमावस्येकडे लक्क्ष ठेऊन असते.मानसोपचार तज्ञांना दाखवले होते. उपचार चालू केल्यानंतर तो औषधे नियमित घेत होत, पण त्याला इतके शाररिक त्रास होऊ लागले की, लोकमान्य हॉस्पिटल[पुणे]मधे दाखल करावे लागले होते. तेव्हापासुन तो औषधे नियमित घेत नाही.कामधंदा नाही कारण जो माणूस दर पौर्णिमा/अमावस्येला, व पुढील दोन, तीन दिवस काम करु शकत नाही,अश्या व्यक्तीस कोण कामास ठेवेल, घरातील कामे तो नॉर्मल असतांना व्यवस्तीत करतो. हा त्रास चालू होण्याआधी नौकरीपण करत होता.

अगदी बरोबर शंका ऋन्मेष. ही अशी ठाम विधाने करणारे येडे अस्तात.
कर्क राशीचा ना तु? आणि मोठ्ठ्या MNC मधे काम करतोस ना? मग तुला ऍल्युमिनियम फॉईल नाही चालणार. सिल्वर फॉईलची टोपी घालावी लागेल. खरंतर २०००० रुपये किंमत आहे या टोपीची, पण तु सईचा फॅन म्हणुन तुला ५०% डिस्काउंट. येत्या अमावस्येला गोवंडी(वेस्ट) ला भेट.

रश्मी, छान चर्चा. कुठल्याही विचित्र वागणूकीमागे काहितरी घटना असतेच. त्याने मनावर खोल परिणाम झालेला असतो. कधी कधी ती घटना विसरली जाते पण मनावरचा ओरखडा तसाच राहतो. त्यामूळे त्या व्यक्तीला पण ती घटना आठवत नाही. पण मनाने आणखी कुठल्यातरी गोष्टीशी त्या घटनेचा संबंध लावून ठेवलेला असतो. आणि मग ती गोष्ट घडली, कि वागणूक बदलते.

या बाबतीत अत्यंत प्रेमाने वागणारी, समजून घेणारी व्यक्ती जवळ असेल तर खुप फरक पडतो. पण सहसा तसे नसतेच.

पण मनाने आणखी कुठल्यातरी गोष्टीशी त्या घटनेचा संबंध लावून ठेवलेला असतो. आणि मग ती गोष्ट घडली, कि वागणूक बदलते.>>> + १०
या बाबतीत अत्यंत प्रेमाने वागणारी, समजून घेणारी व्यक्ती जवळ असेल तर खुप फरक पडतो. पण सहसा तसे नसतेच.>>>>> खरंच दिनेशदा.असेल ही एखादी व्यक्ती अशी तर किती कमालीची सहनशक्ती असेल तिच्यामधे अश्या माणसांना हँड्ल करण्यासाठी.स्वतःचा वेळ ,शक्ती आनि डोक खितपत घालणारे किती लोक असतात असे आजुबाजुला.किमान घरात तरी.बर्याच वेळा नसतातच. Sad
मला स्टॉरंगली एवढच वाटत की आपण फक्त आपल डोक सांभाळाव.स्वःतच स्वतःला मदत करावी.समोरच्याच डोक सांभाळायला गेलो की काही खरं नाही.

चंद्र आणि हे वाचून Sad आणि पाहणीतले वृश्चिक अगदी तापट, कुसकट आहेत.

गंमत करायची म्हणून नाही. पण हे जे लिहिलेय त्याला प्रामाण काय आणि काय म्हणून ते बरोबर हे समजावे? नाहितर चंद्रालाच लपवावे लागेल. (जर वरची थिअरी खरी मानली तर).

स्क्रिझोफेनिक, बाय्पोलार , एसीडी, क्रोनिक स्ट्रेस मुळे हॉर्मोनल बदल किंवा क्रोनिक डीप्रेशन, मध्ये होतं काहींना... हेच असावं असे नाही. पण डॉक्टरांकडून शहानिशा करावी.
काही टेस्ट्स असतात ; माझ्या चुलत वहीनीच्या भावाला नोकरी गेल्याने असे व्हायचे. अगदी मध्येच दर साठ आठ दिवसांनी (अगदी पंधरव्ड्याला वगैरे नाहीच) तो दोन दिवस बेजार करून सोडायचा सर्वांना.
ते दोन दिवस सोडले की बरा. परत सुरु.... आता अगदी नॉर्मल नसला तरी प्रकार आटोक्यात आहेत. आधी डोकं शांत करायला गोळी दिलेली. त्याने झोप लागायची. अगदी दहा तास वगैरे झोपायचा एकलेले वहिनीकडून. मग जरा चिडचिड कमी झाली. आता घरून काम करायचा जॉब करतोय. स्वतःहून लोकांशी बोलत नाही पण बराच बरा आहे.
न्युट्रीशन डेफीशियन्सी सुद्धा होती त्याला. झोप कमी, अपचन , अ‍ॅसीडिटी, जेवायचा कमी ह्याचे प्रताप होते ; त्यात घरीच. नोकरी गेलेली. सर्व क्युमुलेटीव ईफेक्ट होता.

जाई, तसे पहायला गेले तर कर्क

जाई, तसे पहायला गेले तर कर्क ही हळवी आणी जास्त संवेदनशील रास मानली जाते. तुझे म्हणणे बरोबर आहे की रा राशीतही काही लबाड व्यक्ती आहेत. कर्केत २ मुख्य नक्षत्र आहेत, ( १ -पुष्य्- नक्षत्र मालक-शनी-देवगण आणी २ रे- आश्लेषा- नक्षत्र मालक-बुध-राक्षस गण) शनी हा प्रमाणीक आणी कठोर मानला जातो. त्यामुळे पुष्य नक्षत्र असेल तर अशी माणसे शिस्तप्रिय व प्रमाणीक असतात, या उलट आश्लेषा चे लबाड असु शकतात. असे जनरल विधान करता येत नाही, पण परिस्थितीने का असेना पण आश्लेषावाले दुसर्‍याला फसवु शकतात, तसे मनामधून ते स्वतःला अपराधी मानतीलही, पण अशी उदाहरणे मी पण पाहिलीत.

जाई तू विचारलेस म्हणून मी इथे लिहीले, नाहीतर या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणून इथेच आटोपते घेते.

आजकाल सत्यनारायणाची पूजा घालणारे लोक पण पत्रिका पाहु लागल्याने या विषयाची पुरती बदनामी झालीय, नाहीतर गाढा अभ्यास करणारे लोक पण आहेत.

चंद्र म्हणजे ल्युनर. या वर पाश्चिमात्य लोकांमध्ये जास्त संशोधन झालेय.

वर एक प्रतिसाद तारांकीत केला आहे म्हणून आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटला,
मी स्वतः कर्क रास पुष्य नक्षत्राची आहे, आश्लेषावाले लबाड असतात इतरांना फसवू शकतात या विधानाशी अगदीच असहमत
माझ्या पाहण्यासाठी किमान सहा व्यक्ती आश्लेषा नक्षत्राच्या आहेत जे अतिशय प्रामाणिक आणि शांत आहेत, पैकी नवरा आणि जिवलग मैत्रीण, दोघेही अति जास्त प्रामाणिक, हळवे, काळजीवाहू, अर्ध्या रात्रीही मदतीसाठी तत्पर आणि प्रेमळ आहेत.

सारीका, म्हणूनच मी वर लिहीले होते की असे जनरल विधान करता येत नाही. वृश्चिक वाले झालेल्या अपमानाचा सूड घेतात, डुक धरतात असे बघीतले पण आहे. पण माझी दुसरी वृश्चिक मैत्रिण उच्च शिक्षीत, चांगले संस्कार असलेली आणी वेल मॅनर्स असलेली आहे. पहिलीने मात्र किरकोळ कारणावरुन रंग दाखवले.

मला ज्योतिष्य आवडले तरी मी फार खोलात जात नाही, त्यावरच अवलंबुन रहात नाही. ज्योतिष्य फक्त मार्ग दाखवते, उपाय नाही. असल्या असाध्य रोगांवर उपाय हे तज्ञ डॉक्टरच करु शकतात.

मला ज्योतिष्य आवडले तरी मी फार खोलात जात नाही, त्यावरच अवलंबुन रहात नाही. ज्योतिष्य फक्त मार्ग दाखवते, उपाय नाही. असल्या असाध्य रोगांवर उपाय हे तज्ञ डॉक्टरच करु शकतात
>> +1

अाणि लाखमोलाची बात
>> ज्योतिष्य फक्त मार्ग दाखवते, उपाय नाही. <<

मी कर्क- पुष्य नक्षत्र. माझी मुलगी वृश्चिक-अनुराधा नक्षत्र. स्वभावाने ती खुप दयाळू, स्वतःहुन मदत करणारी वगैरे असली तरी काही बाबतीत अतिशय कठोर आहे. सुड घेणे हे जरी ती मुद्दाम करत नसली तरी तिच्याशी पंगा घेणा-यांबाबत "तिच्या मते" तिच्या हातुन अशी परिस्थिती निर्माण केली जाते की आपोआप हिच्यावर झालेल्या अन्यायाचे निवारण होते. Happy इतर बाबतीत वृश्चिक रासवाल्या व्यक्ती अतिशय चांगल्या असल्या तरी या बाबतीत खुप वाईट आहेत. डंख मारल्याशिवाय राहायच्या नाहितच, मग भले तो डंख अजाणतेपणे मारला गेला असेल. मला खुप चांगल्या त-हेने माहित आहे कारण माझ्या घरात वृश्चिक भरलेत Happy Happy योगायोग - माझ्यासकट माझ्या सगळ्या भावंडांची मुले वृश्चिक आहेत.

साधना Happy शरद उपाध्येंच्या राशीख्यान्यात त्यांनी म्हणले होते. एका वृश्चिक आजीबाईंनी उखाणा घेतला होता.

देवापुढे लावली उदबत्ती, हे गेले वरती अन मी राहीले खालती.

This look like a case of schizophrenia.
1. Why it happens only on full moon or dark moon day. - Actually there is no co-relation on why schizophrenic attach comes only on these specific days. However, this may happens in India since childhood our brain has programmed to assume that bad / strange things happen on full moon or dark moon day.
2. Why happens to particular person only - Some people don’t open their mind with others and they keep struggling with their issues within themselves. If the mental suffocation goes beyond tolerance level, it impacts on their brain and someday it outburst.
3. Treatment - This look like early stage of schizophrenia and can be treated under good psychiatrist treatment. Schizophrenia cannot be cured completely but it can be controlled using regular medicines.
You have given star rating to one answer which talk about horoscope. Horoscope has nothing to do with this problem. Now its up to you whether to believe meaningless theories of horoscope or to believe medical science and cure the patient.

>> ज्योतिष्य फक्त मार्ग दाखवते, उपाय नाही. << एकदम बरोबर...

प्रत्येक व्यक्तीच्या राशीत हा चंद्र असतो... तो कुठे आहे आणि इतर ग्रह कसे आहेत या वर सुद्धा त्या व्यक्तीच स्वभाव अवलंबून असतो..

सगळेच कर्क काही हळवे नास्ता :::: सहमत

समजा एखाद्या बाईची वा माणसाची रास ( खरी रास, नुसती नावाने असलेली नाही ) जर कर्क असेल तर ज्या दिवशी कॅलेंडर मध्ये कुंभ रास लिहीलेले असते तेव्हा त्याला/ तिला, गोचरीने फिरणारा चंद्र आठवा येतो. ( ८ वा ) त्याच दिवशी त्याची/ तिची मानसीक स्थिती विचीत्र होते, आदळ आपट करतात, कोणाचाही उगाच राग येतो. तब्येत बिघडते. मन ताळ्यावर नसते.::::::: हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण माझी स्वतःची कर्क रास आहे.

त्याबाबतीत देवकी यांची पोस्ट उत्तम आहे... ज्योतिष याचा वापर हा आपण फक्त एक सेकंड ओपिनिअन करावा... सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून राहू नये..

@झंपी यांच्या मताशी सहमत. bipolar disorder depression किंवा schizophrenia ची सुरवात असण्याची शक्यता जास्त आहे. याचा मेंदूतील रासायनिक समतोलपणाशी घनिष्ट संबंध असतो. त्वरित एखाद्या अनुभवी मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या. यावर उपचार उपलब्ध आहेत. गोळ्यांनी अनेकांना गुण आला आहे.

ज्यांना विशिष्ट तिथीला काही त्रास होतो त्यांनी डॉक्टरची ट्रीटमेंट तर घ्यावीच. त्या बरोबरच एक हार्मलेस उपाय म्हणून दररोज नवग्रहांचं स्तोत्र म्हणावे आणि दर सोमवारी चंद्राच्या स्तोत्राचा जप करावा. कमीतकमी ११ वेळा, ज्यास्ती कितीही. अनेक संतांनी नामस्मरणाचा फायदा सांगितलेला आहेच. त्यातलाच हा प्रकार.

हे पोल सिस्टीम कशी काढतात?

>>>>

नवीन लेखनाचा धागा काढतात ना त्या ऐवजी नवीन प्रश्न म्हणून उघडायचा.
नवीन गप्पांचे पान केलेत तर धागा वाहता होतो.

आणि प्रतिसाद तारांकीत करायचा मान मायबोलीने प्रश्नकर्त्याला म्हणजे धगाकर्त्यालाच दिला आहे
पण त्याला किंवा कोणालाच त्याचा स्वताचाच प्रतिसाद तारांकित करता येत नाही..

माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय उपाय गेले दोन वर्ष चालु आहेत [अनियमित्]. इतरही पर्याय तपासत आहे. माझ्या प्र्श्णाला काही अध्यामिक किंवा तांत्रिक उपाय आहेत का ? कोणी मार्गदर्शन करु शकेल का?

माझ्या प्र्श्णाला काही अध्यामिक किंवा तांत्रिक उपाय आहेत का ?>>>>>>> मला कल्पना नाही.तुमचे नातलग, नामशरण करतील की नाही.पण औषधोपचारांबरोबरच नामस्मरण करायला सांगा.हेका/हट्ट धरू नका.पण सहज सुचवल्यासारखे सांगा.याने बाकी काही नाही तरी मनाची शक्ती (विलपॉवर) वाढू शकते.तसेच लक्ष डायव्हर्ट व्हायला मदत होते.
फक्त इतकेच लक्षात ठेवा की मानसिक आजार हा प्रदीर्घ कालावधीचा असतो.घेतली गोळी,गेला ताप असं इथे नाही.त्यामुळे आपल्या डोक्यावर बर्फाची बॅग ठेवणे गरजेचे आहे.तुम्हाला शुभेच्छा!

मलाही खूप मानसिक त्रास होतो अमावस्या पौर्णिमाला, पुष्कळदा माहितही नसते आहे आज अमावस्या पौर्णिमा आहे.
मानसिक त्रास नकारात्मक विचार, जीव घाबरने सुरू झाले की वाटते आज नक्की अमावस्या पौर्णिमा असेल,
आणि खरोखर निघते, हा त्रास मला साधारण एका दशकापासुन आहे, २,३ दिवसांनी सगळे सुरळीत होते.

मा़झ्या आजीला असा त्रास होता त्यामुळे विश्वास बसला. ती दिवसभर प्रचंड बडबड करत राही. फरक इतकाच कि तिला फक्त अमावस्येला त्रास व्हायचा. इतर वेळी ती नॉर्मल असायची.

"नकारात्मक विचार, जीव घाबरने" वेगळे आणि "अमावस्या व पोर्णिमेला फार विचित्र वागतो. कोणालाही शिव्या देतो, मारावयास धावतो. सर्वाशीं भांडण करतो. त्यामुळेअशा वेळेस कोंडुन ठेवावे लागते." वेगळे.
अशी सांगड घालत बसल्याने लेखात लिहिलेला मानसीक आजार नसून अमावस्या पौर्णिमेचा आजार आहे या कडे कल जातो.
निदान तो मानसीक आजार आहे आणि अमावस्या पौर्णिमा हे ट्रिगर्स आहेत असे जरी समजले तरी त्याला मानसोपचार हवेत हे उघड व्हावे.
अनेक मानसीक आजार हे ट्रिगर्समुळे उफाळुन येतात. ठराविक दृष्य, आवाज, वास, स्पर्श, चव इत्यादि हे ट्रिगर ठरु शकतात.
अमावस्या / पौर्णिमेला आपल्या कडे महत्व आहे. काही विपरीत झाले की अमावस्या / पौर्णिमा आहे असे आपल्याला वाटणे हे सुद्धा दर्शवते की आपल्याला मनात त्याचे महत्व अगोदरच बिंबलेले आहे. या दिवशी घरात, शेजारी पाजारी केलेल्या जाणार्‍या ठराविक गोष्टी या दृष्य / आवाज / वास यातून कदाचित ट्रिगर बनू शकतात.

पेशंटने मानसोपचार तज्ज्ञाची औषधे न घेणे, घेतो आहे असे भासवून ती थुंकून टाकणे हे खूप कॉमन आहे. त्यामुळे त्यांच्या योग्य डोस पर्यंत कित्येक पोचतच नाहीत, रिलॅप्स होत रहातात. वाढवलेला डोस एकदम बंद करणे यामुळे किंवा पेशन्ट औषध नियमीत घेतो आहे असे समजून (वास्तविक त्याने बंद केलेले असते) वाढवलेला डोस एखाद्या वेळे पासून अचानक सुरु करणे यामुळे गंभीर शारिरीक / मानसीक परिणाम होउन हॉस्पिटलकडे धाव घेण्याची गरज पडते.

Pages