Submitted by सुप्रिया जाधव. on 28 June, 2016 - 04:49
एवढयासाठी न केली लागवड
आजवर पडला कुठे पाऊस धड़ ?
दुःख जखमा वेदना सरसावल्या
बहुमताने जाहली माझी निवड
यायचे असल्यास संततधार ये
या इथे वा त्या तिथे खुश्शाल पड़ !
टाळते हल्ली मला भेटायचे
भासते हल्ली कुठे त्याची निकड़ ?
फार झाले कोरडे दाटून कढ़
एकदाचे काय ते खच्चून रड !
शेवटी मनसोक्त आम्ही भेटलो
पावसाने काढली थोड़ी सवड
मी स्वतःला एकदा चुचकारते
तू स्वतःलाही जरासे चाचपड़
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुःख जखमा वेदना सरसावल्या
दुःख जखमा वेदना सरसावल्या
बहुमताने जाहली माझी निवड >>> व्वा..!
मी स्वतःला एकदा चुचकारते
तू स्वतःलाही जरासे चाचपड़ >>> सुंदर..!
(चुचकारणे, चाचपडणे बर्याच दिवसांनी हे शब्द वाचायला मिळाले)
चांगली गझल !
चांगली गझल !
अनेक शेर आवडले. मतला, निकड,
अनेक शेर आवडले. मतला, निकड, रड आणि चाचपड हे चढत्या क्रमाने आवडले.
वा !!!
वा !!!