अ टेल ऑफ थ्री सीटीज : जिगसॉ पझल्स

Submitted by rar on 27 June, 2016 - 13:26

जिगसॉ पझल्सच्या माझ्या वेडाबद्दल पूर्वी मी मायबोलीवर लिखाणं करत असे. आता त्याबद्दल लिहित नसले तरी हे वेड अजून आहेच.
नुकतीच मी ' अ टेल ऑफ थ्री सीटीज' ही तीन जिगसॉ पझल्सची सीरीज पूर्ण केली. ही पझल्स मी फारच वेगाने म्हणजे सरासरी २.५ तासात पूर्ण केली. ब्रेन मस्त स्टिम्यूलेट झालेला अनुभवला.
ग्रीस, पॅरीस आणि व्हेनीस. ह्यातल्या ग्रीसला अजून गेले नाहीये, पण जायची इच्छा आहे. पॅरीस आणि व्हेनीस दोन्ही माझी आवडती ठिकाणं. पझल्स लावताना ती शहरं, तिथला प्रवास, त्या गल्ल्या, तिथलं वातावरण आठवत होतं. ह्या आठवणींची देखील आपलीच एक वेगळी मजा. वेगळा प्लेवर. एकूणच धमाल अनुभव आला ही पझल्स सोडवताना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अजून एका मैत्रिणीला पण पझल्सची खूप आवड आहे. तिच्या घरी पण भिंतीवर एक एक नवीन पीस दिसतो प्रत्येक भेटीत. ती हे Mod Podge वापरून फ्रेम करते.

अवांतर - हा Mod Podge ग्लु प्रकार खूप काळजीपूर्वक वापरावा लागतो नाहीतर चुकुन फर्निचर्/जमीन असा कुठे लागला तर निघत नाही. इंडस्ट्रिअल लेवलचा पेंट थिनर आणून स्वच्छ करावे लागते. इति ती मैत्रिण. Happy

मृण्मयी रार धन्यवाद. आता हा ग्लु आणतो आणि कामाला लागतो.

मी आजवर फक्त रॅवन्सबर्गरचे पझल्स आणले आहेत. इतर कुठल्या कंपन्यांचे पझल्स तुम्ही वापरले आहेत? क्वालिटी चांगली असते का?

जाई, अ‍ॅपच नावच jigsaw puzzle aahe. iPhone var jigsaw puzzle search kelela aani pahila free app download kelela Happy tyat daily ek free puzzle asata. kaahee samples aahet baakee paid aahet. mala roj ek purata Happy

टण्या, मी सगळ्या रेंजमधली पझल्स केली आहेत. युरोपमधली, अमेरीकेतली आणि भारतात मिळणारीही. भारतातल्या पझल्सचं कटींग थोडं कमी क्वालीटीचं वाटलं मला. शिवाय इथे अमेरीकेत १ डॉलर पासून हायर रेंजमधली पझल्स केली आहेत. स्वस्त पझल्सचं कटींग कमी क्वालीटीचं वाटलं, कधीकधी एकादा पीस नसतो, किंवा परवाच्या एका पझल मधे २ पीसेस जास्त होते Proud

मी केलेल्या पझल्सच्या काही कंपन्या (आठवताहेत तशा ) - रॅवन्सबर्गर, बफेलो, इस्फेरा आणि भारतातील फ्रँक, कार्डीनल इंडस्ट्रीज.
अजून आठवले तर लिहीन Happy

Pages