तू स्वतःलाही जरासे चाचपड़

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 June, 2016 - 04:49

एवढयासाठी न केली लागवड
आजवर पडला कुठे पाऊस धड़ ?

दुःख जखमा वेदना सरसावल्या
बहुमताने जाहली माझी निवड

यायचे असल्यास संततधार ये
या इथे वा त्या तिथे खुश्शाल पड़ !

टाळते हल्ली मला भेटायचे
भासते हल्ली कुठे त्याची निकड़ ?

फार झाले कोरडे दाटून कढ़
एकदाचे काय ते खच्चून रड !

शेवटी मनसोक्त आम्ही भेटलो
पावसाने काढली थोड़ी सवड

मी स्वतःला एकदा चुचकारते
तू स्वतःलाही जरासे चाचपड़

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुःख जखमा वेदना सरसावल्या
बहुमताने जाहली माझी निवड >>> व्वा..!

मी स्वतःला एकदा चुचकारते
तू स्वतःलाही जरासे चाचपड़ >>> सुंदर..!

(चुचकारणे, चाचपडणे बर्‍याच दिवसांनी हे शब्द वाचायला मिळाले)

वा !!!