रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो अजय नक्कीच निर्माते / दिग्दर्शक यांच्या पैकी कुणाच्यातरी नात्यातला असावा.
असली ओढुन ताणुन अ‍ॅक्टिंग करतो , की बस !
कथानकाची गरज म्हणून सुध्दा कोणाला आंघोळ करताना दाखवू नये. बघताना डोळे दुखतात.>>>> Biggrin
... कालच्या तो विहीरीवरचा सीन पाहताना उगाचच कणेकरांच्या 'माझी फिल्लमबाजी 'तला.. ' मालासिन्हाची चमचाभर आंघोळ' आठवत होतं Wink

स्वप्ना Lol अभिराम तर विसरतोच पण स्वतः कथालेखक पांडुच इतका विसराळु आहे त्यामुळे सगळे घोळ होतायत.:फिदी:

कालचा सीन मी बघायचा मुद्दाम टाळला आणी बाकी काम करत बसले, मग शेवटी येऊन पाहीले. साबांना विचारले तर त्यांनी सांगीतले गणेशने काय केले ते. मुळात पाल, अजगर, मगर असले प्राणी पाहीले की मला वाटते या प्राण्यांना स्पेस मध्ये भिरकावुन यांचा त्रिशंकू करावा.:फिदी:

तो अजय खरच बद्दड टाईप कॅरेक्टर आहे, बोलतांना सुद्धा जीवावर बेतल्यागत बोलतो. गंमत म्हणजे त्याच्या कपाळावर व छायाच्याही कपाळावर खोकेची खूण आहे. जणू एकमेकांकरताच बनलेत. खरे तर नाथाला घेऊन ठोकळ्याने भुयारात जायला पाहीजे. काल बेरीनाना गणेशला भुयारात जाऊ नको म्हणत होते. पण गणेश कसला ऐकायचा, तो तर महा उपद्व्यापी आहे.

स्वप्ना राज इज बॅक. Happy Rofl
फार मिस केलं स्वप्ना तुम्हाला.

अभिराम कधीचा निघालाय बॅग खांद्याला लावून तालुक्याला जायला अजून ती बॅग लावूनच फिरतोय. घरातल्या घरात चकवा लागलाय की काय त्याला. Uhoh

गणेश क्लोजअप मधे कसला बधिर दिसतो>> +१. आणि बोलायला लागला की त्याच्या एक मुस्काटीत द्यावीशी वाटते.. अरे बाबा तुझं वय काय तु बोलतोस काय... Angry सायको आहे एक नंबर. ती लिंब, गहू, तांदुळ, काड्या, खिळे खिशात घेऊन फिरतो परवाच्या भागात तर तो झोपला होता तर हे सगळं सामान उशाशी मांडून ठेवलेलं. Uhoh

येणार्‍या भागाची झलक. छाया, दत्ताबरोबर भांडते की ती अजयचे लग्न सुसल्याबरोबर होऊ देणार नाही, दत्ता तिला घरातुन घालवणार असतो तेवढ्यात गणेश येऊन दत्ताला रोखतो. मग................मग..........मग...........................

समोरुन व्हाईट्ट व्हाईट्ट कार येते, त्यातुन बॉबकटवाली निलीमा हसत खाली उतरते.Cute Manga Girl Waving

बेरीनाना सगळे राज उलगडत का नाहीत? आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी निम्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे त्यांना माहित असावीत.

बेरीनाना, अण्णांचे सारे कारनामे पाहुन हादरले असतील, त्यामुळे त्यांनी राज हे राजच ठेवले असेल. किंवा त्यांचा शेवंतावर जीव असेल पण ती अण्णांच्या गळाला ( नादाला ) लागल्याने बेरीनानांनी हाय खाऊन अंथरुण धरले असेल.:अओ::खोखो:

Happy

<< शेवंताचा पण सेम टू सेम असाच आहे डबा. छानच आहेे प्रज्ञा >> प्रज्ञानुं, तुमचो पानाचो डबो इतक्यांतच परत केल्यानी म्हणजे सिरीयलचां शूटींग आवरतां घेतहत कीं काय !!! Wink
<< मला वाटत ते गुजराथी जोडप म्हणजे निलिमाचे डिटेक्टिव असतील >> कदाचित, ते डिटेक्टीव्ह निलीमाच्याच मागावरय असतीत; ह्या सिरीयलीत कोण काय असात सांगूक येवचां नाय !! Wink

कालची अभिरामची जायची घाई बघून 'आज फिर मिलनेका वादा है' असणार हे लक्षात आलं. देविका तिथे येऊन आधीच कशी उभी? रिक्षा केलीन काय? अभिराम तर कधीच लाडू पाहिले नाहीत असा वागत होता. निदान 'किती ते प्रेम' वगैरे मुक्ताफळं उधळण्याआधी ते देविकाने केलेत की तिच्या ढालगज भवानी आईने ते तरी विचारायचं. केवढासा तो डबा. फार तर ५-६ लाडू असतील त्यात. तरी बरंय देविकाने खाऊन पाहिला म्हणजे त्यात काही असंतसं घातलेलं नसणार.

अभिराम म्हणतो 'गोड लाडू'. मला पुलं.चा 'लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात' आणि बायकोचा 'साखरेशिवाय लाडू आमच्या घराण्यात कोणी नाही केले' हा संवाद आठवला.

काल लाईट गेले तेव्हा माधवने मिस्टर बिन टाईप नाच खोलीभर केला. तो एक पिक्चर होता ना त्यात तो त्या पेंटींगवर शिंकतो आणि ते खराब होतं. त्यात तो बिन असाच नाचत असतो. मला तर त्याला सुशल्या गायब झाल्याचा भास झाला असं वाटतंय. त्या सुशल्याने एक बरं केलं म्हण़जे माधवला छाया आणि अजय समोर उभं केलं. निदान ह्या सगळ्याची चर्चा तरी होईल आता. नाहीतर नाईकांचा अ‍ॅटीट्युड शहामृगाचाच होता आजवर.

कैच्या कै प्रश्न विचारण्यात प्रोफेसर माधवांची पी. एच.डी. आहे. काल सुशल्याला विचारतो 'तू इथे एकटीच रहातेस का?'.

आता इथे भगवती लिहित नाहीत का? मागच्या शनिवारी सुपरनॅचरलचा सिझन फिनाले होता म्हणून राखेचा मधून मधून पाहिलं. त्याचा रिपिट टेलिकास्ट रविवारी रात्री १ ला असतो म्हणून इथे वाचू म्हणुन येऊन पाहिलं तर वृत्तांत नव्हता.

>>गणेश क्लोजअप मधे कसला बधिर दिसतो>>
+१. तो सगळ्या अँगलने बधिर दिसतो. लोकांनी अ‍ॅक्सेप्ट न केलेला आणि परिस्थितीने भणंग झालेला शायर हा त्याच्यासाठी एकच योग्य रोल आहे.

>> आणि बोलायला लागला की त्याच्या एक मुस्काटीत द्यावीशी वाटते.. अरे बाबा तुझं वय काय तु बोलतोस काय.

+१०००० ढोंगी आहे तो. काहीही येत नाही त्याला. उगाच बोलतो. त्याच्यावर त्याची मूर्ख आई आणि आत्याच विश्वास ठेवतात.

>>मला वाटत ते गुजराथी जोडप म्हणजे निलिमाचे डिटेक्टिव असतील
मला आधी ते निलिमाच्या दुसर्‍या पर्सनॅलिटीचा भाग वाटत होते. पण ते तिला निलिमा म्हणूनच ओळखतात. स्प्लिट पर्सेनॅलिटीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांना वेगळी नावं असतात ना? परत काल ती मी त्यांना ओळखत नाही म्हणाली आणि माधवनेही त्यांनी तुझ्या बॉसची ओळख सांगितली होती असं म्हटलं नाही. वर मला तो माणूस आवडत नाहि म्हणाला. हे आधी त्याच्या वागणुकीतून दिसलं नव्हतं. काल निलिमा बोलताना नुसती कार इथे तिथे जाताना दाखवली. आणि म्हणे कॉन्फरन्सला चाललेय. ही नक्की काय करतेय? बहुतेक आयएसाआय ची छुपी हस्तक असावी.

काल लाईट गेले तेव्हा माधवने मिस्टर बिन टाईप नाच खोलीभर केला.>>>>:हहगलो: ठोकळ्याची कधी कधी खरच दया येते.:फिदी:

बहुतेक आयएसाआय ची छुपी हस्तक असावी.>>>>:हाहा:

आता ही अफवा कोणी पसरवली की गणेशाने जमिनीत लिंबू पुरला आणि गुरवाने नेहेमीप्रमाणेच 'हे भयंकर आसा. ह्यात मी काय पण करुचो नाय. तुम्ही आणि तो बघून घ्या' असं म्हटल्याने ब्रिटन युरोपियन युनियन बाहेर गेला? Happy

हॅहॅहॅ.....माधवभाऊ, माधवभाऊ, निलिमावैनी खय गेल्या?
अरे सायेबा, तिला कामं असतात मुंबैत. म्हणून गेली.
माका माहित असा त्या खय गेल्या ता. पण मी सांगूचो नाय
तुला माहित आहे? मग सांग बघू.
काय ता?
अरे, आत्ता म्हणालास ना निलिमा कुठे गेली ते तुला माहित आहे
ता माका काय माहित??
घ्या. विसरलास?
हॅहॅहॅ.....इसरलंय........हां....हां....आठवला, माधवभाऊ आठवला
आठवलं? सांग बघू आता
त्या ना, त्या ना, मुंबैला नाय काय गेल्या.
मग?
त्या लंडनला गेल्या
लंडनला? तुला काय माहित लंडन कुठे आहे?
माका सगळा माहित असा. लंडन इंग्लंडात आहे ना?
वा सायेबा! तुला बरीच माहिती आहे. आता ती तिथे कशाला गेलेय ते सांग
त्या ना, त्या ते इंग्लीश लोक इयूतून बाहेर पडायच्या घाईक आले ना त्यांना थांबवायक गेल्या.
अरे सायेबा, पण ते बाहेर पडले इयूतून.
हा, त्येचा काय झाला ना, त्या थय गेल्या आणि त्यांच्या अंगात शेवंता इली. मग शेवंता काय म्हणाली, काय म्हणाली.....
काय म्हणाली?
'माझ्या चेडवाक माझे दागिने देत नाही तोवर आम्ही इयूत येवचो नाय'

Rofl धम्माल पोस्टी!
डबा मस्तच

गणेश क्लोजअप मधे कसला बधिर दिसतो>> +१. आणि बोलायला लागला की त्याच्या एक मुस्काटीत द्यावीशी वाटते.. > Rofl मला ही !! प्रत्येक शिरेलीत आहेत असे काही नमुने Biggrin

मग शेवंता काय म्हणाली, काय म्हणाली.....
काय म्हणाली?>>>> मला ते शशी कपूर आणि नन्दा चे जब जब फुल खिले चे "एक था गुल और एक थी बुलबुल" गाणे आठवले. त्यात नाही का,शशी कपूर म्हणतो,"बुलबुल ऐसे गाती थी, ऐसे गाती थी,ऐसे गाती थी, त्यावर नन्दा त्याला विचारते," कैसी गाती थी?" असेच काहीतरी वाटते वरचे dialogues वाचून. Lol

....आता कळलं. निलीमा मुंबईला तातडीने गेली कारण तिला पार्लर मधे जाऊन हेअरकट करून घ्यायचा होता आणि नवीन ड्रेसेस पण घ्यायचे होते !!! Wink

कालच्या एपिसोडचा अगदीं शेवटचाच भाग बघितला. 'ऑस्कर' सोहळ्याला डिझायनर ड्रेस घालून आलेल्या हॉलिवूडच्या नट्या गाडीतून उतरल्यावर चाहत्यांकडे कौतुकाच्या अपेक्षेने पहातात, तशी निलीमाची 'एंट्री' वाटली !! माकां वाटलां दत्ता, सरिता, सुसल्या , छाया सगळे आता धांवतले ऑटोग्राफ बुकांत निलीमाची सही घेंवक !!! Wink

;

आणि बोलायला लागला की त्याच्या एक मुस्काटीत द्यावीशी वाटते.. अरे बाबा तुझं वय काय तु बोलतोस काय>>> +१११

एवढ्या लांब मुंबैला फक्त हेअरकट साठी गेली नीलिमा... ..ह्यांच्या गावात साधा एक न्हावी पण नायSSSSS ??? Uhoh

Pages