आंतरजातीय विवाह

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 08:12

आंतरजातीय विवाह
शिक्षण झाल , नोकरी लागली ,
आणि घरात माझ्या लग्नाविषयी चर्चा सुरु झाली .
आई बाबा मला ओढत घेवून गेले विवाह मंडळात ,
गेल्या गेल्या फोर्म भरून घेतला ,आणि
काय अपेक्षा लिहू हा मला प्रश्न पडला .
ढीगभर फायली मी बसलो चाळत,
सुंदर सुंदर मुली बघून मी हरखूनच गेलो .
बर्याच मुली बघितल्यावर कंटाळा आला मला,
इथून तिथून सगळ्या सौन्दार्यावती दिसू लागल्या सारख्याच .
म्हणून हळूच नजर टाकली मुलांच्या स्थळांच्या फायलीत ,
डोळ्यावरची धुंदी उतरली एका अवधीत .
काय एक एक अपेक्षा ठेवली होती त्यांनी ,
आधी आपली लायकी टेस्ट केली होती का त्यांनी?
बघाव तर एकापेक्षा एक बाद सोंग होती,
पण मुलगी मात्र लाखात एक हवी होती.
गोरीपान , उच्चशिक्षित , श्रीमंत स्थळ हव होत सर्वांना ,
पण तिच्या गरजा पुरवायला होता का दम त्यांच्यात ?
उच्च जातीवले म्हणे खालच्या जातीची नको ,
अंतर धर्मीय स्थळ तर नकोच नको.
भारताचीच भावी पिढी जर असा विचार करू लागली,
तर उद्याचा भारत सुद्धा जुन्या जातीपातीच्याच राजकारणात अडकून राहील .
मित्रांनो आपल्याला तर शाळेत जातपात शिकवत नाहीत ,
मग ह्या विषाला आत्ताच तुम्ही का दूर करत नाही ?
हुशार असाल तर स्वतःचा आतला आवाज ऐका ,
देशाच्या भवितव्याचा आत्ताच विचार करा .
डोळे झाकून आईबाबांच्या मागे लपून राहण्यात कुठला आलाय पुरुषार्थ ?.
हटवा जातपात स्वतः पुढाकार घेवून.
आंतरधर्मीय , आंतरजातीय लग्नाचा हट्ट धरा आत्ताच,
हजारो स्थळ असतात उच्च विचारांच्या मुलांच्या शोधात.
डबक्यातून बाहेर पडा डोळे उघडे ठेवून ,
मनासारखी सहचारिणी नक्की सापडेल सर्च करून .
थोडे दिवस लागतील आईवडिलांचा रोष जायला ,
पण आंतर जातीय चवीला इथूनच सुरुवात करूयात .
वेगवेगळ्या संस्कृतीची सरमिसळ करू या ,
नव्या चालीरीतींची मजा तर चाखू या.
कशाला भाव देता बाह्य देखाव्याला ?
एकमेकांचे मन जाणा व जपा एकमेकांना .
चला तर मग , उठा, संकल्प करा, तोडा जातीपाती ,
आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सोहळ्यात होऊन जाऊ सामील.
तिलोत्तमा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup chan vichar ahet ani kharach as khup hotay aajkal, mulga kasahi ka asena mulagi matra 52khani son hav Sad , tarihi antarjatiy vivahache v4 ruchayala ankhi kahi varsh javi lagtil, ithe ekach jatit premvivah karanahi avghad ahe kahi thikani. karan ky tr apapsatil kadvatpana Uhoh

matra 52khani son hav अरेरे

<<

डू यू मीन "५२खणी सोनं" हवं?

तसं असल्यास बरंय. तुम्ही इंग्रजीतूनच मराठी टायपत जावा. व्ही-४ करीत जाऊ नका. Uhoh Sad :आदरमोद:

हल्ली तरी मुलं मुलींचे फोटो बघून न भेटताच डीक्लाईन करतात. १००० एक मुलांना संपर्क करुन काही पदरात पडत नाही. इतकी वाईट स्थिती आहे भारतात. प्रत्येक मुलाला आधी एक सुंदर मुलगी हवी असते मग बाकीचे पॅरॅमीटर. मला नेहमी वाटत की फोटोत व्यक्ती कळत नाही. प्रत्यक्षात एकदा तरी भेटा आणि मग ठरवा. त्यापेक्षा जुन्या चालीरिती जास्त छान होत्या असे म्हणायची वेळ आली. निदान घरातील मोठी अनुभवी माणसे मुलासोबत घरी येऊन मुलीला बघून जातात तर त्यांच्या प्रतिक्रिया तरी कळतात. इथे तर मुलं पुढे जाऊच देतं नाही. हे मुल शोधण हे काम फार वाईट आहे. कदाचित हीच गोष्ट मुली शोधण ह्याबाबतीतही असेल. माझी बहिण म्हणते मुली मिळत नाहीत आणि मी म्हणतो मुलगे ऐकत नाहीत. सुंदर देखणे आणि शिकलेले मुल मुली खूप भाव खाऊन असतात.