आर्ट फ्युजन शो २००८

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

शनिवारी नेहरू सेंटरला आर्ट फ्युजन २००८ ला भेट देण्याचा योग आला. बंगाल आणि महाराष्ट्राच्या १०० हुन अधिक कलाकारांचे प्रर्दशन अगदी देखणे होते. वासुदेव कामत, सुहास बहुलकर, प्रफुल्ला डहाणुकर ते अलिकडच्या पिढीतील मिलिंद मुळिक,गोपाळ नांदुरकर, राहुल देशपांडे येकाच छता खाली बघायचा योग क्वचीतच येतो. महाराष्ट्राप्रमाणेच बंगाललाही थोर कला परंपरा. तारे जमीन पर ने अनेकाना परीचीत झालेले समिर मोंडलांचे चित्र लक्ष वेधुन घेते . अनंता मोंडल यांचे कलकत्त्याचे चित्र ही खासच.
वासुदेव कामत यांचे हती, लक्ष्मी आणि सरस्वतीचे चीत्र म्हणजे जलरंगाचा नमुनाच.
यात खास लक्ष वेधी चित्रकार म्हणजे रामचंद्र खरट्मल, ऍक्रेलिक मधले या कलाकाराचे चित्र मस्तच होते.
प्रर्दशन संपले मात्र या प्रर्दशनाची लिंक अजुन ही नेहरु सेंटरच्या साईटवर आहे.
http://www.nehru-centre.org/artfusion2008/artist.htm

प्रकार: 

मिलिंद मुळिक चे untitled 1 भारी आवडले .....

ऍक्रेलिक ऑन कॅनव्हास आहे . ऑपेक कलर त्याच्या चित्रात येक सहजता असते, बघताना खुप सोप्पे वाटते पण कॉपी करायच म्हटले तर महा कठीण

छे रे copy etc च्या वाट्यालाही नाही जात. पण चित्रामधे जि सहजता आहेना ती खिळवून ठेवते. john fernandese पाहताना असे व्हायचे माझे.

अगदी खास लिंक दिलीस. धन्यवाद. फेवरीट मधे ऍड केली

अगदी खास लिंक दिलीस. धन्यवाद. फेवरीट मधे ऍड केली

अगदी छान
laxmi & saraswati painting aflatun aahe concept & water colouring ग्रेट
तसे सगलेच पेन्टीg Chan aahet