सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 3

Submitted by Suyog Shilwant on 13 June, 2016 - 17:27

गुरु विश्वेश्वरां बरोबर बोलल्या नंतर त्रिनेत्री आजोबा आता घरची वाट धरतो. पण अजुनहि त्याच्या मनात विचार हे घोळतच असतात. मुख्य म्हणजे 12-13 वर्षाचा सुयुध्द अजुन लहान आहे. पण त्याला आपल्या घराण्याचा इतिहास माहीतच नाही. त्याचावर आलेली अशी पुर्ण जगाची जबाबदारी त्याला पेलता येईल का? का तो ही आपल्या सारखा ती पेलण्यात अपयशी ठरणार होता. गुरु विश्वेश्वर बोलतात त्या प्रमाणे सुयुध्द तो आहे जो कालाशिष्ट ला संपवू शकतो. त्याच्या कडेच ती योग्यता आहे. आज तो दिवस आला आहे जेव्हा त्याला ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागणार आहेत.
आपण त्या लपवून ठेवल्या कारण तो ह्या सर्व जाणण्यास तयार नव्हता. एवढा विचार करे पर्यंत तो आता घराजवळ पोहचला होता. वाड्याचा गेट उघडून तो आत जातो. घरच्या ओट्यावर बसुन तो विचार करु लागतो. काही मनाशी ठरवत तो उठुन घरात जातो. आत जाताच तो आपल्या पत्निस व सुनेस बोलावतो. काया किचनमधे जेवण बनवत असते. हाक ऐकताच ती किचन मधुन बाहेर येते. सुनैना खोलीत ग्रंथ वाचत बसलेली असते तिही ते ठेवुन बाहेर येते. आपल्या पतीस बघुन ती त्याचा जवळ जाते. काया ही किचन मधुन बाहेर त्याचा जवळ येते. म्हातारा आता आपल्या सुनेस विचारतो.
अभिनव (म्हातारा )- ' काया चिरंतर आला कि नाही? '
मंदीरात जाऊन येई पर्यंत बराच वेळ झालेला असतो. दुपार होण्यास येत असते. दोघी उभ्या म्हाताऱ्याकडे पाहत असतात. कारण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव वेगळाच आणि गंभीर वाटत असतो. त्याला पाहिल्यावर कायाला प्रश्न पडतात ती बोलते.
काया -' नाही बाबा…अजुनतरी नाही आले. येतीलच थोड्या वेळात.' सासऱ्याला चिंतेत पाहुन ती पुढे विचारते. ' बाबा… काय झालय तुम्ही चिंतेत दिसता.'
म्हातारा हात चोळत विचारच करत असतो. तो जवळ असलेल्या खुर्चित बसतो. याची पत्नी आता न राहवून त्याला विचारते.
सुनैना -' काय झालय हो सांगा ना.' तिलाही कळ्त नसत नक्की काय झालय. बराच वेळ गप्प राहुन आता म्हातारा बोलतो.
अभिनव - ' अग सुनैना ….मी मंदिरात गेलो पण पुजा करुन झाल्या नंतर माझे गुरुंशी बोलणे झाले. आता जर चिरंतर असता तर लगेच आपण बोललो असतो. पण तो येण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तो आला कि मी सर्व काही सविस्तरपणे सांगतो. बरं…काया तु त्याला फोन लावुन विचार तो निघालाय का नाही ते.'
आता मात्र दोघी शांत राहतात. कायाला समजत नाही कि बाबा मंदिरात जाताना खुश होते. आता परत ते चिंतेत का आहेत मग. ??? पण ती त्यांना उत्तर देते.
काया- ' ठिक आहे. बाबा मी त्याना लगेच फोन करुन विचारते ते निघाले का नाही ते.' एवढे बोलुन काया लगेच तिचा बेडरुम कडे जाते. फोन लावुन ती चिरंतर शी बोलते.
' काय हो. तुम्ही निघालात कि नाही ओफिस मधून..'

चिरंतर - ' हो.. आता निघतोच आहे. काय झाल परत फोन केलास.'
काया - ' अहो मी मगाशी म्हंटले ना कि बाबांना गुरुजींचा संदेश आला आहे. ते आज घरी येणार आहेत. तर बाबा तेव्हा खुश होते. नंतर ते मंदिरात गेले. आता घरी परत आल्यावर खुप चिंतेत दिसले. तुम्ही घरी कधी येताय हे विचारत होते. म्हणाले कि तुम्ही आल्यावरच काय ते सांगतील.

चिरंतर - ' ठिक आहे. मी निघतोच अस सांग त्यांना. मी लगेच घरी येतो.' एवढ बोलुन तो फोन ठेवतो. त्याला कळत नव्हत कि बाबा गुरुंशी बोलायला आतुर होते मग जर ते घरी येणार आहेत तर चिंतेत का आहेत. काय झाल असेल? सुयुध्द बाबतीत तर काही नसेल ना ? एवढा विचार करुन तो घरी निघायची तयारी करतो. इथे घरी त्याची वाट पाहत असलेले त्याचे वडिल अजुन विचारातच मग्न होते. काया अन आई त्याची घरी येण्याची वाट पाहत होत्या. काया आपल्या सासूला अशी चिंतेत बघुन त्यांचाशी बोलायचे ठरवते.

काया -' आई… असं काय घडलय हो कि बाबा एवढी चिंता करत आहेत?'

सुनैना - ' अगं… मला ही काही कळत नाही. पण एवढे नक्की सांगते ते चिंता करतायेत तर नक्कीच काही गंभीर असाव. बरं… तु एक काम कर. बाई आपला स्वयंपाक तयार करुन ठेव. तेवढ्यात चिरंतर ही येईल.' हे ऐकुन काया काही न बोलता किचनमधे जाते. इकडे सुयुध्द टिव्ही पाहण्यात मग्न ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी पासुन अनभिज्ञ असतो. त्या घराला आता शांतता पसरली होती.

चिरंतर आता ओफिस मधून निघाला होता. बसमध्ये बसून तो घरी परतत असतो. त्याचाही डोक्यात विचारांचा गोधळ उठलेला असतो. आपल्या भुतकाळाच्या काही गोष्टीत तोही गुंग झालेला. आतापर्यंत बस गावा पर्यतं पोहचलेली होती. गावाच्या चौकात बस थांबते. बसचा कंडक्टर त्याला आवाज देऊन कळवतो कि त्याचा स्टॉप आला आहे. इतका वेळ कसा विचारात निघुन गेला त्यालाही कळले नाही. चिरंतर बसमधून लगेच उतरतो. त्याची काठी काढून तो रस्त्याच्या अंदाज घेत चालू लागतो. तशी त्याच्या मागोमाग अजुन एक व्यक्ती उतरते. काळे कपडे घातलेला केस वाढवलेला तो उंचसा माणुस ह्या गावातला नसावाच. चिरंतरच्या मागोमाग तो चालु लागतो. चिरंतर घरी जाण्याच्या घाईत आपली बॅग गाडीतच विसरलेला असतो. पण त्याची बॅग हा माणुस आपल्या हातात घेऊन त्याचा मागे चालत असतो. इतक्यात तो माणुस आवाज देतो.

माणुस - ' अहो भाऊ.' यावर चिरंतर थांबतो कानोसा घेतो कि कोण आवाज देतय आपल्याला. तो माणुस त्याचा जवळ जाऊन म्हणतो. ' तुमची बॅग राहीली होती बसमधे.' चिरंतर ला आठवत कि आपण बॅग खरचं विसरलोय. तो माणूस त्याची बॅग समोर धरतो. चिरंतर डोळ्यांना लावलेला काळा चष्मा काढतो. त्याचे डोळे पांढरट असतात. हे पाहील्यावर लगेच त्या माणसला कळाल की चिरंतर आंधळा आहे. तो पटकन त्याच्या हातातली बॅग चिरंतरच्या हातात पकडवतो.

चिरंतर - ' थॅंक यु. तुम्ही बॅग घेतलेलीत. मी विसरलोच होतो घाई गडबडीत. '

माणुस -' इट्स ओके..मला माहीत नव्हत कि तुम्हाला दिसत नाही. साॅरी.. हं मी समजलो कि तुम्हाला दिसत असेल.' या माणसने त्याचा डोळ्यांसमोर हात फिरवला. खात्री करण्यासाठि पण खात्री काय करायची होती. हातातल्या काठीने व डोळ्यांकडे पाहुन कळतच होते त्याला कि चिरंतर आंधळा आहे. तरी का केल असाव त्याने असं...?
चिरंतर बॅग घेऊन वळतो आणि घरी जाण्याची घाई करतो. पण तो माणुस तिथेच उभा राहुन पाहत राहतो. चिरंतर विचार करतो ( किती विसरभोळा आहे मी. घरी जाण्याचा घाईत बॅग ही विसरलो. बरं आता पटकन घरी जायला हवं.) चौकात उभा माणुस आता थोड अंतर ठेवून त्याचा पाठलाग करु लागतो. घरापर्यंत तो त्याचा माग घेतो आणि मागे वळुन निघुन जातो.
चिरंतर घराजवळ पोहचुन गेट खोलतो आत बसलेला सुयुध्द आपल्या बापाला बघुन लगेच त्याचा जवळ धावतच येतो आणि त्याला लिपटुन म्हणतो.
सुयुध्द -' पप्पा आले तुम्ही… माझासाठी काय खाऊ आणलाय. काल मी तुम्हाला सांगितलं होती ती मिठाई आणलीत का?'
चिरंतर त्याला बाजुला सारुन म्हणतो.
' नाही रे बाळा नाही आणली.'
चिरंतर आलेल्याचा आवाज घरातील सर्वांनाच येतो. तशी त्याची पत्नी काया किचन मधुन बाहेर येते. आई देवघरात ग्रंथ वाचत असते. बाबा हाॅल मधे खुर्चीवर विचार करत बसलेले असतात. काया त्याच्या जवळ जाऊन त्याच्या हातातील बॅग घेते आणि म्हणते.
' आलात. जा लवकर हात पाय धुवुन घ्या. बाबा कधीची तुमची वाट बघत आहेत.' ती लगेच त्याची बॅग घेउन बेडरुम मधे जाते. सूयुध्द मात्र त्याला हात धरुन खुर्चीत बसवतो. टिव्ही लावलेला असतो. तसा चिरंतर त्याला टिव्ही बघायला सांगातो. तो उठतो आणि बाथरुम कडे जातो. तो आल्यापासुन गप्प बसलेला अभिनव उठतो आणि आपल्या खोलीकडे जाताना त्याला म्हणतो.
' चिरंतर आलास बेटा. तुझं झाल कि खोलीत ये मला बोलायच आहे तुझाशी. ' म्हातारा आपल्या खोलीत जाऊन बसतो. थोड्या वेळाने चिरंतर आटपून खोलीत जातो.

चिरंतर - ' बाबा काय झाल मला इतक्या लवकर बोलावलत. गुरुजी तर संध्याकाळी येणार आहेत ना.' विचारात असलेला म्हातारा गप्पच असतो. थोड्या वेळाने उठतो आणि आपली पत्नी व सुनेला हाक मारुन खोलीत बोलावतो.

अभिनव -' सुनैना…काया..तुम्ही दोघीही या इकडे.' आवाज ऐकताच दोघी आपल काम सोडून खोलीत जातात. आता खोलीत सर्व जण उभे असतात. म्हातारा खोलीच दार बंद करुन घेतो. वळून आपल्या पोराला बोलतो.
' चिरंतर अरे. मी आज सकाळी नदिवर गेलो होतो तेव्हा आपला सुयुध्द मागे राहीला होता. पण नंतर जेव्हा मी नदिवर अर्घ्य अर्पण करत होतो. तेव्हा त्याने प्रश्न विचारला कि बाबा तुम्ही हे का करता ह्याने तुमचे डोळे परत येणार का? आज त्याने असा प्रश्न विचारला होता कि मला कळतच नव्हते त्याला काय उत्तर देऊ. पण कस तरी निभावल मी. ह्याचा अर्थ असा आहे कि आता तो सर्व काही समजण्या एवढा मोठा झाला आहे. ती वेळ आता आलीय जेव्हा आपल्याला त्याला सर्व काही सांगव लागणार आणि तेही आजच. घरी परत आल्यानंतर मी बसलो असताना गुरुजींचा संदेश घेऊन चैतन्य आला. त्यानेच सांगितले कि गुरुजी आज आपल्याला भेटायला येणार आहेत. हे ऐकुन मी खुश झालो पण मंदिरात गेल्यावर मला परत ते दृश्य दिसलं ज्यात माझे डोळे गेले. आजही त्याचं उत्तर मला कळल नाही. ना तुला कळलय चिरंतर. पुजा झाल्यावर गुरु माझाशी बोलले. आज ते इथे येण्या अगोदर त्यांच अस म्हणण आहे कि आपण सुयुध्द ला आपला सर्व भुतकाळ सांगवा. ते म्हणाले योग्य वेळ आता आली आहे. हे सांगण्यासाठी तुम्हा सर्वांना मी खोलीत बोलावल आहे. जा आणि सुयुध्दला इकडे घेऊन ये.'
इतक बोलुन म्हातारा जवळच असलेल्या संदुक खोलू लागला. चिरंतर खोली बाहेर जाऊन सुयुध्दला बोलावतो.
' बाळा… जरा बाबांचा खोलीत ये.'
टिव्ही पाहत बसलेला सुयुध्द लगेच उठला आणि पप्पां जवळ येऊन उभा राहीला. ' हे बघ बाळा….आज तुला आम्ही एक खरी गोष्ट सांगणार आहोत. तुला ऐकायची आहे का?.

सुयुध्द - ' हो मला ऐकायची आहे. '
चिरंतर त्याचा हात पकडून त्याला खोलीत नेतो. एवढा वेळ गप्प बसलेली काया बाबांना म्हणते.
काया - ' बाबा… पण सुयुध्द अजुन लहानच आहे त्याला कळेल का सगळं. ' कायाला आपल्या लहान मुलाची खुप काळजी वाटत होती म्हणुन तीने प्रश्न विचारला होता. अस बघितलं तर घरातील ही साधी माणस आज खुपच गंभीर झाली होती. काय असाव हे रहस्य ? का घरातील सर्व आता छोट्या सुयुध्द बद्दल एवढे गंभीर झाले होते? घरातील सर्वांचे चेहरे बघून सुयुध्दला जरा विचित्रच वाटल. चिरंतरने त्याला बेडवर जाऊन बसायला सांगितल तसा पट्कन तो जाऊन बसला .
सगळं काही सांगायची सुरुवात आजोबाने केली. काया आणि सुनैना खुर्च्या घेऊन बसल्या. चिरंतर मात्र उभा राहीला.

अभिनव - ' बाळ सुयुध्द आज मी एक खरी गोष्ट सांगणार आहे. ती खुप वर्षांपुर्वीची आपल्या घराण्याची गोष्ट आहे.
सुयुध्द आपल्या आजोबांकडे अगदी उत्सुकतेने पाहु लागला. त्याचा निरागस चेहरा निळे गडद डोळे आता आपल्या आजोबांच्या बोलण्याकडे स्थिर झाले होते. त्याला उत्सुकता झाली होती गोष्ट ऐकायची एरव्ही सुयुध्द खुप खोडकर पण गोष्ट म्हंटले कि त्याला खुप आवडायचे. त्याची आज्जी त्याला खुप गोष्टी सांगत असे पण आज आजोबा सांगणार होते. आतां आपल्या पुर्वंजांची गोष्ट ऐकायला तयार होता. बाकी सर्वही त्याच खोलीत अगदि लक्ष देऊन ऐकण्यास तयार बसले होते. म्हातारा खोलीत असलेल्या आराम खुर्चीत जाऊन बसला आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली.

जवळ जवळ 300 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा सुमन्यू त्रिनेत्री ह्याच्या आणि आपल्या घराण्याबद्दल. त्यावेळी आपण इथे ह्या गावात राहत नव्हतो. इथुन दुर दक्षिण दिशेला सौशस्त्रपुरम हे गाव आहे. त्या ठिकाणी आपलं ' त्रिनेत्री ' घराण राहत होत. अगदी समृध्द आणि शांत अस ते
ठिकाण होत. गावाच्या भोवताली डोंगरांच्या रांगा होत्या. त्या मधोमध आपल गाव होत. खुप घनदाट जंगल आणि पशु, पक्षी , शेती, निसर्गाने समृध्द अस ते गाव होत. त्या वेळी माझे आजोबा ' सुमन्यू ' म्हणजेच तुझे खापर पंजोबा हे त्या गावचे एक शूर व धाडसी व्यक्ती होते. अति प्रतिष्ठित पण स्वाभिमानी त्यांनी त्यांच्या स्वभावाने व धाडसाने जे मिळवलं होत. ते आजपर्यंतच्या आपल्या घराण्याला लाभल नव्हत. त्यावेळी सुध्दा त्यांचा नावाचा दरारा व प्रसिद्धि चहू दिशांमधे होती.

त्या गावात एक पुरातन काळातलं आपल्या कुळ देवाच व वंशाच देऊळ आहे. जे पिढयांन पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार आपल्या संरक्षणा खाली सुरक्षित ठेवायचे काम आपल्या घराण्याचे शुर योध्दा करत आले आहेत. ते मंदिर आपले कुळदैवत महादेव शिवशंकराचे आहे. त्या मंदिराची खासीयत ही आहे कि , जेव्हा महादेव माता सति च्या गेल्यानंतर त्यांचा शोधात या ठिकाणी आले तेव्हा तिथे त्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी ध्यान धारण केले होते. त्या वेळी ते तिथे पिंडित अवतरीत झाले. त्यावेळचे आपले पुर्वज ज्यांनी हे पाहीले ते त्यांची नित्यनियमाने पुजा करुन तिथेच राहू लागले. ज्यावेळी भगवान शंकरांनी ध्यान सोडले तेव्हा आपले पुर्वज श्रीपती तिथे निर्मळ भक्तीभावाने नामस्मरण करत होते. हे पाहुन भगवान प्रसन्न झाले व वरदान दिले कि आजपासुन तुमच्या कुळाचा मी दैवत आहे. तुमच्या घराण्याला ह्या स्थानाचे व पिंडीचे रक्षण करावे लागेल. त्यासाठी मी तुम्हाला निवडत आहे. तुझ्या भक्ती वर मी खुप प्रसन्न झालो. तुमच्या कुळातील जो कोणी निर्मळ मनोभावे माझी भक्ती करुन मला प्रसन्न करेल. त्याला मी अस्सीम शक्ती प्रदान करेन. ज्याने तो जगाचे योग्यवेळी रक्षण व भलं करु शकेल. तेव्हापासुन आपल्या पुर्वजांनी त्या पिंडीची रक्षा करुन व भक्ती करुन एक अद्-भूत शक्ती प्राप्त केली. अनेक वर्षे पिढ्यान पिढ्या आपण ते करत आलो.
पण….एके दिवशी माझे आजोबा म्हणजेच सुमन्यू ह्यांना समझल कि पाताळातील एक राक्षस ह्या पिंडीला नष्ट करण्यासाठी येत आहे. त्याचे नाव होते ' कालाशिष्ट '. एक भयानक आणि क्रुर राक्षस जो ह्या पवित्र ठिकाणाला नष्ट करु पाहत होता. तो आला व सगळी कडे हैदोस माजवू लागला. सुमन्यू आजोबांनी त्याच्या बरोबर युध्द केले पण तो खुप ताकदवर होता. त्याचे आगिने भरलेले डोळे सगळीकडे आग ओतत होते. आजोबा सुमन्यूंनी महादेवाचे स्मरण करुन त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला आणि कसंबसं करुन पुन्हा त्याला पाताळात पाठवले. आजोबा सुमन्यूकडे फार अस्सीम दैवी शक्ती होती. जोवर ते होते तोवर तो आपल्या व मंदिराच्या जवळ किती प्रयत्न करुन सुद्धा येऊ शकला नाही. जेव्हा ते म्हातारे झाले व मरणाच्या दारात होते. तेव्हा त्यांनी त्यांचा पुत्र अंशुमन म्हणजे माझे वडिल ह्यांना ह्या मंदिराच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. आजोबा सुमन्यू गेले पण आता त्या पिंडीच्या रक्षणाची जबाबादारी माझ्या वडिलांना सांभाळायची होती. त्यावेळी माझा जन्म झाला नव्हता. असेच काही दिवस ते जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होते.

एके दिवशी रात्री त्यांना आजोबा सुमन्यू स्वप्नात आले व सांगितले कि, मी ज्या राक्षसाला पाताळात पाठवले आहे. तो परत येईल त्याचे दैत्य परत मंदिरावर हल्ला करतील. तु सावध रहा. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांच्या परीने खुप प्रयत्न केला पण आजोबा सुमन्यु सारखी शक्ती प्राप्त करु शकले नाहीत. अनेक दिवस असेच गेले त्यांनी लग्न केले. मी झालो पण त्यांना आजोबा सुमन्युंनी सांगितलेल्या गोष्टी अजुनही होताना दिसत नव्हत्या. असेच त्यांनी गाफिल राहून अनेक वर्षे काढली. नंतर एक दिवस त्यांना एक ऋषी भेटायला आले. त्यांनी माझ्या वडिलांना सागितले कि, त्यांचे वडिल सुमन्यू पुन्हा जन्म घेणार आहेत. ह्याच कुटुंबात आणि ज्या राक्षसाला त्यांनी पाताळात पाठवले होते तो ही परत येणार आहे. हे ऐकुन माझ्या वडिलांना धक्काच बसला. अचानक कोणी ऋषी असं कस काय सांगु शकतात. त्यांनी ऋषींना विनम्रतेने सर्व गोष्ट सांगितली कि जशी शक्ती सुमन्यू आजोबांकडे होती तशी त्यांच्यात नाही. ते कसे रक्षण करणार ह्या पिंडीचे? त्यावर त्या ऋषींनी हे ऐकुन त्यांना उपासना करुन शक्ती अर्जित करण्याचा मार्ग सांगितला. तो मार्ग स्विकारुन त्यांनी लवकरच शक्ती प्राप्त केली. आता ते रक्षण करण्यासाठी पुर्ण सक्षम होते.

एक दिवस माझ्या वडिलांना कालाशिष्टच्या दैत्यांनी गाठले व त्यांना पकडून घेऊन गेले. माझ्या वडिलांनी त्यांच्याशी लढा देऊन आपले प्राण वाचवले ते कसेतरी त्यांच्या तावडीतून सुटका करुन परत आले. ही गोष्ट त्यांनी लगेच ऋषींना सांगितली. ते म्हणाले आता वेळ आली आहे लढा देण्याची कारण कालाशिष्टचे दैत्य ह्या जागेस तुझ्या वंशास व ह्या पिंडीस नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. मी तेव्हा लहान होतो म्हणुन ह्या गोष्टी मला कळत नव्हत्या. बरीच वर्ष ते दैत्यांशी व भयानक राक्षसांशी लढा देत होते. जेव्हा मी मोठा झालो मी ही उपासना करुन गुरु ऋषींनी सांगितल्या प्रमाणे शक्ती प्राप्त केली. माझ्या वडिलांची मदत करु लागलो. बरीच वर्ष मी आणि माझे वडिल त्यांचा सामना करत होतो. पण एक दिवस असा आला कि त्या राक्षसांनी मोठ्या संख्येने आमच्यावर हल्ला केला. आम्ही चारही बाजुंनी घेरलो गेलो होतो. पण लढा देताना ना मी मागे हटलो ना माझे वडिल. त्यातल्या एका राक्षसाने माझ्यावर अचानक हल्ला केला, पण तो वार माझा बाबांनी स्वतःवर घेतला. त्यांना घायाळ बघुन माझा राग अनावर झाला. मी महादेवाचे स्मरण करुन सर्व राक्षसांचा मात केला. पण... त्या हल्ल्यानंतर माझे वडिल वारले. त्यांनी माझ्यावरचा वार झेलुन मला जिवनदान दिलं. मी ऋषींना खुप विनंती केली कि त्यांचे प्राण वाचवा पण फार उशीर झाला होता. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. वडिल गेले मी अगदी पोरका झालो होतो. ऋषींनी मला समजवल कि बेटा हताश होऊ नकोस तुझे वडिल ह्या पवित्र पिंडीची रक्षा करत होते. त्यांना नक्कीच स्वर्ग लाभेल.
पण मी खुप दुःखी होतो. गुरुंनी मला ह्या पिंडीच्या रक्षणाची व पुर्वजांची पुर्ण गोष्ट सांगितली. तेव्हा कळले कि आपले कुळदैवत शिवशंकर आपल्या कुळाला मिळलेल्या मानाने व शौर्याने खुप प्रसन्न आहेत. मी निसदिन त्यांच्या भक्तीत लीन झालो. गुरुंनी मला सांगितले कि माझे आजोबा सुमन्यू हे फार थोर पुरुष होते. ते परत ह्या वंशात माझ्या पुत्राच्या पोटी जन्म घेतील. तो सांगितलेला उपदेश आज खरा ठरला आहे. काही काळ मी असाच त्या पिंडीच्या रक्षणात मग्न राहिलो. काही काळाने मी लग्न केले. मला चिरंतर सारखा गुणी पुत्र ही झाला. आमचा संसार अगदी सुखात चालला होता पण….'

एवढ बोलुन म्हातारा थांबतो. सगळे जण एकटक त्याच्याकडे पाहत असतात. मग्न झालेले असतात. सुयुध्द हे सर्व ऐकुन चकित झालेला असतो. कायाला विश्वासच बसत नसतो ह्या सर्व गोष्टींवर ती अक्षरश: थक्क झालेली असते. आज्जी मात्र शांत बसलेली असते. सुयुध्दला खुप प्रश्न पडलेले असतात पण त्याला ते विचारण्यापेक्षा पुढे काय झाले ते ऐकण्याची जास्त उत्सुकता असते.
म्हातारा एक लांब उसासा घेऊन खुर्चीतुन उठतो आणि खोलीत एका कोपऱ्यात असलेल्या पेटी कडे जातो. पेटी खोलतो सुयुध्द हे सर्व अगदी उत्सुकतेने बघत असतो. कायाला ह्या बद्द्ल काहीच माहीत नसत. हे सगळं खुप विचित्र आणि अविश्वसनीय असत तिच्यासाठी. तिला कळतच नसते काय बोलावे? खुप विचारांचा गोंधळ उडालेला असतो तिच्या मनात. म्हातारा पेटीत असलेला एक संदुक बाहेर काढतो. तो घेऊन तो परत आपल्या खुर्चीत जाऊन बसतो. तो संदुक उघडणार आणि काही बोलणार इतक्यात अचानक त्यांना बाहेरुन जोरात काही पडल्याचा आवाज येतो. सर्वांचे लक्ष त्याकडे जाते. बाहेर हॉल मधे कोणीतरी असत. परत त्यांना घरातील वस्तु इकडे तिकडे पडल्याचा आवाज येतो. सगळेच घाबरतात. तसा म्हातारा सावध होतो. आता घरावरील छतावर सुध्द्दा कोणी चढले आहे असे त्यांना जाणवते. काया पटकन उठते आणि अलगद दरवाजाच्या फटीतुन पाहते.

पाहते तर काय ? बाहेर आक्राळ विक्राळ खुप उंच काळे दैत्य हातात हत्यारं घेऊन घरभर वस्तु इथे तिथे फेकत असतात. हे बघुन ती घाबरते पटकन दरवाजा पासुन लांब होते. तिला आता भितीने थरकाप सुटतो. पाय लडखडू लागतात. तिला घाम सुटू लागतो. ह्रदयाची धडधडी वाढू लागते. जस काय आता तिचे ह्रदय तिचा तोंडाशी यावे. भितीने दोन क्षण तिचा आवाजच निघे ना. पटकन ती स्वतः ला सावरत सुयुध्दकडे धाव घेते. त्याला जवळ घेउन बिलगते. त्या राक्षसांना बघुन तिला आता सासऱ्याने सांगितलेल्या गोष्टीची साक्षच मिळालेली असते. त्यावर चिरंतर तिला विचारतो.

चिरंतर -' काय ग….काय झाल ? सांग तरी कोण आहे बाहेर….

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही शब्द खटकले उदा. भाग २ मध्ये 'फुसलवले' (बेहेला फुसलाके' या अर्थी)

या भागात 'पकडवतो' हा शब्द खटकला
बंबईया हिंदी मिक्स वाटतंय हे

कथाबीज चांगले वाटतेय पण कृपया व्याकरण सुधारा .
एक मुलगा असतो . , म्हातारा हात चोळत विचारच करत असतो. . अशी वाक्यरचना रसभंग करते.

आपल्या सर्वांच्या प्रतिसादा बद्दल खुप धन्यवाद. काही गोष्टी मला ही खटकतात. पण मुंबईचा असल्यामुळे माझा शब्दकोश अपुरा पडत असावा. झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी. सार समजुन पोटी घ्यावा ही विनंती. वाचत रहा. प्रतिसादामध्ये टिका जास्त व भाव कमी दिसत आहे. कदाचित पुणेकर असावेत. माझे वयक्तिक मत कोणाला जुमानून नाही. लोभ असावा.
कळावे.
आपला विनम्र
डाॅ. सुयोग शिलवंत.

धन्यवाद anilchembur..आणि मोठ्या पेटीत एक छोटा संदूक ठेवला होता. चूक लक्ष्यात आणून दिल्या बद्दल आभार. वाचत रहा.