जाॅबर

Submitted by Abhishek Sawant on 8 June, 2016 - 11:37

जॉबर
जॉबर / मेस्त्री- प्रत्येक चाळीत, गल्लीत, मळ्यात किंवा वाडीत आढळणारा हा अवलिया, ज्याला सगळ्यातले सगळं काहि येत असतं. हे लोक व्यवसायाने जॉबर किंवा मेस्त्री नसतात ते फुल्ल टाइम कार्यरत असतात. आमच्या गावात म्हणजे इचलकरंजीमध्ये यंत्रमाग दुरुस्त करणार्‍या माणसाला जॉबर म्हणतात आणि त्यामुळेच कदाचित ज्याच्याकडे सर्वकाही दूरुस्त करण्याची कला असते त्यालापण इथे जॉबर म्हणत असावेत असा माझा समज होता. मला आठवते आम्ही खेळण्यांची किंवा कोणत्याही गोष्टीची मोडामोडी केली की वडिल आम्हाला रागवत असत “केलास जॉबरकाम?” असं म्हणून.
असा हा जॉबर, हा अवलिया मला खुप ठीकाणी आढळला. त्यातला पहिला माझा रूममेट अमोल, शिक्षणाच्या बाबतीत जेमेतेमच पण त्याला अगदी काहीही रिपेअर करता यायचे. ग्रामीण भागातून आला असूनही त्याला एव्हढे सगळे कसं काय येत असावे असा प्रश्न मला नेहमी पडायचा. अगदि इलेक्ट्रिकल्स पासून दरवाजा बिजागर्‍या, नळकाम, सरकारी कोर्ट कचेरीच काम त्याला सगळच माहिती असायचे. कोणत्याही प्रॉब्लेम वर उत्तर नाही मिळाले की आमचा शेवटचा ऊपाय असायचा अमोल आणि तो आम्हाला कधीच निराश करायचा नाही. तो सतत स्क्रु ड्रायवर चा एक सेट घेऊनच फिरायचा असे पण काही नाही पण त्याला ती कला कशी काय अवगत होती देव जाणे. मी पण दोन तीन वेळेला त्याच्या इर्शेवर आमच्या रूमच्या फॅन चे रेग्युलेटर दुरूस्त करायचा प्रयत्न केला पण तो आधि फिरत होता त्या स्पीड वरही फिरायचा बंद झाला, मग मी तो नाद सोडुन दिला.
मग मी पुढे बर्‍याचदा निरिक्षण केलं मला असे लोक आढळले. त्यातलाच एक म्हंजे आमचे चुलत मामा. मामाचे घर खेडेगावात वाडीवस्तीवर असल्याने, साधे कीराणा मालाचे दुकान ही पाच ते सहा किमी लांब होते. आम्ही सुट्टीला मामाच्या घरी जात होतो, चुलत मामचे पण घर समोरच होते. घरची परिस्थिती हलाखीची, शेतावरच त्यांचे पोट भरत असे. एका छोट्याश्या पत्र्याच्या खोलीत ते रहात होते., शिक्षण जेमतेम तिसरी चौथी पर्यंतच पण त्याच्याकडे विलक्षण कला होती. तो काहीही दुरुस्त करू शकत होता.
सकाळी चहा नाष्टा झाल्यानंतर तो त्याच्या घरातील रेडीओ दररोजच दुरुस्त करत असे, आम्ही सगळी मुलं पण दररोज अंगणात त्याचा तो खेळ कुतुहलाने बघत असायचो. त्या रेडीओच्या कुठून कुठून वायरी निघाल्या होत्या, तर स्पीकर कुणा दुसर्‍याचा ऊचलुन आणलेला. तरीपण त्याने एक दिवस तो रेडिओ चालू केलाच. आम्हाला त्याचे खूप कौतुक वाटायचे, त्याने सायकलच्या बाद झालेल्या इन्नर, बाद झालेल्या तारा वैगेरे साठवून ठेवलेल्या. मळ्यातून पाच किमी दळ्णासाठी सायकलवरून जावे लागत असे तेव्हा सायकलच्या कॅरेजला धान्याच पोतं बांधण्यासाठीं आम्ही त्याच्याकडेच जात असो, तेव्हा तो इतक्या परफेक्ट पध्द्तीने बांधायचा की ते पोतं हालायच पण नाही. गावातले लोक त्याला मेस्त्री म्हणत असत मला मात्र त्याच भारी कुतुहुल वाटायच. परवाच मामाच्या गावी गेलो होतो, सकाळी ऊठुन प्रातःविधी आटोपल्यानंतर बाहेर येऊन पाहिलं तर मामा अंगणात दुधाच्या किटलीला तारांच्या मदतीने कडी लावत बसला होता तेव्हा ठरवलं की याच्यावर लिहायला पाहिजे.
अश्या या जॉबर लोकांना माझा सलाम आणि पुढील काळात मी पण त्यांच्या जमातीत सामील होण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या आयुष्यातील जॉबर लोकांविषयी प्रतीसादात नक्की लिहा.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी हुन्नर असणारे बरेच लोक असतात. रोजच्या जगण्यात ते यशस्वी नसतात, म्हणून त्यांच्या या कर्तृत्वाकडं एरवी लोकांचं लक्ष जात नाही. पण गरजेला तेच आधी आठवतात आणि बिचारे उपयोगीही पडतात. अजून लिहायला पाहिजे होतं, या विषयावर.

अशी हुन्नर असणारे बरेच लोक असतात. रोजच्या जगण्यात ते यशस्वी नसतात, म्हणून त्यांच्या या कर्तृत्वाकडं एरवी लोकांचं लक्ष जात नाही. पण गरजेला तेच आधी आठवतात आणि बिचारे उपयोगीही पडतात. अजून लिहायला पाहिजे होतं, या विषयावर.

मी पाहिले आहेत असे लोक. विशेषतः इलेक्ट्रीक्/इलेक्ट्रॉनिक बाबतीत. त्यातले रितसर कसलेही शिक्षण घेतलेले नसताना एकदम एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस / सर्व्हीस. खरे तर ते त्याच्याकडे सर्व्हीस म्हणून बघतच नाहीत. केवळ हौस. एखादे नवीन प्रकारचे मॉडेल खोलायला मिळाले तर त्यांच्या चेहर्‍यावर कोण आनंद दिसतो.

या निमित्ताने एका आत्याच्या भावकीतला एक वृद्ध बर्‍याचदा त्याच्याकडचा जुना रेडिओ उघडून त्यातल्या रंगीबेरंगी केशवाहिन्यांमध्ये (वायरींमध्ये) हरवून गेलेला आढळायचा, ते आठवलं.

माझा नवरा असा उत्कृष्ट जॉबर आहे. अगदी चप्पलदुरूस्तीपासून ते लाकडी सोफासेटची दुरूस्ती इथपर्यंतची सर्व घरगुती कामं ९०% तोच करतो. त्यासाठीची सर्व प्रकारची अवजारं, यंत्रं त्याने जमवलेली आहेत. अगदी रंधासुद्धा आहे त्याच्याकडे, आणि त्याला तो उत्तमरीत्या चालवता येतो. यातल्या कशाचंच त्याने शिक्षण-प्रशिक्षण घेतलेलं नाही.. केवळ आवड आणि नैसर्गिक कल !!

केदार -प्रशांत धन्यवाद ..इचलकरंजीमध्ये कुठे?..मी गावभाग मध्ये राहतो..
मी पण इचलकरंजी जवळ्चाच आहे. आणि मला हि असली कामे करण्याची खुप आवड आहे.>>>>भारीच आहे की प्रशांत

मस्त लेख! माझ्या काकांची आठवण झाली.
माझे मोठे काका होते असे हरहुन्नरी! कमी शिकलेले होते... पण कुठलेही यंत्र म्हटले की हातचा खेळ. गॅरेजमधे दुचाकी, चारचाकी दुरुस्त करायचे.
जुन्या बाजारातुन रेडीओ, टेपरेकॉर्डर, स्पिकर, इन्व्हर्टर, टेबल फॅन वै. आणुन ते दुरुस्त करुन विकायचे. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल, लाकडी, यांत्रिकी कुठलेही काम ते लिलया करायचे.
त्यांच्या घरात मात्र स्क्रुड्रायव्हर, पाना, खिळे, या सर्वाचा पसाराच असायचा.
रॉकेलच्या स्टोव्ह ला गॅसचा पाईप लावून गॅसस्टोव्ह करणे अश्या इनोव्हेटीव्ह आयडीया लढवुन अनेक वस्तु आम्हाला बनवुन दिल्या होत्या.मोटारीच्या पाट्यापासुन त्यांनी आम्हाला विळी बनवुन दिली होती. अजुनही घरात ती वापरतो आम्ही. तिला धार लावावी लागत नाही. आंबट काही चिरले की तिला धार चढते.

माझ्या आईच्या आत्याचे पति, असेच हुनरबाज होते.
सुतारकाम, लोहारकाम, गवंडीकाम, सोनाराचे काम, लग्नाचे जेवण, बागकाम कश्यातही त्यांना गति नाही असे नव्हतेच.

आणि विशेष म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने त्यांनी भिक्षुकिचे कामही शिकून घेतले होते. राजवाड्यातील अंबाबाईचे ते पुजारीही होते.

आर्या - दिनेश..अश्या हूनरबाज लोकांनाच हा लेख समर्पित आहे...ते खरच कौतुक करण्याजोगं काम करत असतात...
इचलकरंजी पासून वीस कि. मी. अंतरावर हुपरी (चांदीसाठी प्रसिध्द) या गावचा आहे मी.>>>> अरे वा !!!!विपु केलीये पहा

माझा नवरा असा उत्कृष्ट जॉबर आहे.++++++++ १, पण( अगदी चप्पलदुरूस्तीपासून ते लाकडी सोफासेटची दुरूस्ती इथपर्यंतची सर्व घरगुती कामं ९०% तोच करतो. त्यासाठीची सर्व प्रकारची अवजारं, यंत्रं त्याने जमवलेली आहेत. अगदी रंधासुद्धा आहे त्याच्याकडे, आणि त्याला तो उत्तमरीत्या चालवता येतो. यातल्या कशाचंच त्याने शिक्षण-प्रशिक्षण घेतलेलं नाही.. केवळ आवड आणि नैसर्गिक कल !!) हे माझ्या पप्पाना जास्त जमत.त्यासाठीची सर्व प्रकारची अवजारं, यंत्रं जमवलेली आहेत आणि ती नीट सांभाळून ठेवणे हे माझ काम.... आठवणी जाग्या झाल्या.