भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a2qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सेमि-इंग्लीश घेतले नव्हते. पण सायन्स आणि गणिताची इंग्लीश माध्यमाची पुस्तकेदेखिल आणली होती. ती सुटीत वाचली.

मराठी अभ्यास ताजा होताच. इंग्लीश शब्द समजले तेव्हा पुढे फायदा झाला.

वरील काही वैयक्तिक पातळीवरचे प्रतिसाद आणि निरर्थक आकांडतांडव बघता, त्या मंडळींची वैचारिक पात्रता किती रसातळाला गेलेली आहे ते कळतं. अशा मंडळींना कुणीही काहीही सांगितलेलं पटत नाही कारण त्यांची वैचारिक बैठकच शाबूत नसते. त्यामुळे माझा पास.

हो, पण खालच्या पातळीवर येऊन तुम्ही विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अपेक्षित 'नसलेली' आहेत हे नमूद करतो. याहून जास्त तपशील मांडण्याची तुमची पात्रता नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची फसवणूक खुशाल करत बसावं. अमक्याचे काय हाल झाले अमक्याला कसं कठीण गेलं इत्यादी दौर्बल्यकथा आळवाव्यात. तुम्हाला कदाचित त्यातच समाधान मिळत असावं.

आभार.

Proud

वैचारिक बैठक स्थीर नसणारे लोक स्वतःचे खानदान इंग्रजी माध्यमात घालतात व पब्लिक फोरमवर मातृभ्हाषेतुन शिक्षण घेण्यावर लेख लिहितात.

विषय अतीशय चांगला आहे. आणि लिहिण्यासारखे खूप आहे.
पण हा धागा लोक स्कोर सेटलींगकरताच वापरत आहे असं वाटायला लागलंय.

पण हा धागा लोक स्कोर सेटलींगकरताच वापरत आहे असं वाटायला लागलंय. >>> नेहमीचा झाला आता हा युक्तीवाद. दुसरी बाजू म्हणून आपल्याला गैरसोयीचे काही लिहीले कि स्कोअर सेटलमेंट काय, खालच्या पातळीवरचे काय..

मुद्दे खोडून काढता येत नसले की असे होते. तुम्हाला इग्नोर करायचे असेल तर त्याचेही नियम आहेत. मी अमूक एका कारणासाठी इग्नोर करतो असे सांगणे म्हणजे पळ काढणे होय. अपूर्व कोण आहे ते मला तरी माहीत नाही.

मी स्वतः नर्सरी ते दहावी पुर्ण इंग्लिश मीडियम मधे शिकलो त्यातही प्रॉपर क्रिस्चियन कॉन्वेंट मधे मिशनरीज ऑफ़ चॅरिटी च्या सिस्टर मंडळी ने चालवलेल्या , आमच्या शाळेत वर्षाच्या सुरुवातीला स्कूल कॅलेंडर देत असत म्हणजे विद्यार्थी डायरी त्यात एब्सेंट नोट्स ते पालकांना शिक्षकांनी लिहिलेल्या नोट्स (आमचा हा कॉलम कायम भरीव असे ते एक असो) हे सगळे तर असेच त्याशिवाय मातृभाषेत उत्तम गाणी असत म्हणजे अगदी "राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा" पासुन ते अगदी "श्रावणमासी हर्ष मानसी" पर्यंत प्रसंगोचित गाणे रोज असेंबली (सकाळची प्रार्थना) मधे गावे लागत असे वर्षाच्या शेवटी त्या गाण्याची परीक्षा सुद्धा असे २० मार्क्स ची. माझा अनुभव हा असा आहे, त्यातही फूल मराठीवाल्यांचे न्यूनगंडातुन आलेले वांझोटे आक्रस्ताळेपण सुद्धा मी झेलले आहे! "तू टाय लावतो म्हणून तू क्रिस्चियन आहेस" हे म्हणणाऱ्या एका मराठी माध्यमातील मित्राचा बाप आज पोराने युएसहुन टाय पाठवला आहे फ्यूनरल स्पेशल! म्हणून किमान चार मर्तिकांत टाय लावुन आलेला पाहिला आहे! कोणी कोणाला ग़ुलाम म्हणायचे, फूल मराठी मधुन शिकलेले आमचे राष्ट्रभक्त मित्र आज डॉलर छापत बसले आहेत अन फूल इंग्लिश मधुन शिकुन बाप्या राइफल धरून बसलाय! परत कोणी कोणाला बोलायचे?? अन कश्याला??

वरचे माझे विचार थोड़े टोकदार वाटणे शक्य आहे किंबहुना ते टोकदार आहेतच पण ती एक पूर्वपीठिका आहे मुळ मुद्दा आता मांडतो (हा ही टोकदारच असेल / वाटेल कदाचित) , तो मुद्दा म्हणजे शाळा अन तिचे माध्यम खरेच इतके महत्वाचे आहे? अहो कार्टी ५ तास असतात हो शाळेत फ़क्त उरलेले एकोणीस तास आपल्या सोबत असतात, तेव्हा त्यांचे इंग्रजी/मातृभाषा पक्के न होणे ह्यात आपल्याला सुद्धा कमीपणा नको का यायला? मला कोणाला स्टीरियोटाइप करायचे नाहीये मुळीच तरीही स्वतः जर आपल्याच मुलाच्या विकासाला हातभार लावु शकत नसलो तर व्यर्थ आहे सगळे अन ह्या अक्षम्य हलगर्जीपणाला आपण अन फ़क्त आपणच जबाबदार असू उगाच शाळेच्या नावाने खड़े फोडून अर्थ नाही, मी केंद्र सरकारी नोकर आहे उद्या मी माय मराठी कवटाळुन बसलो तर माझे पोरगे/पोरगी आयुष्यातुन उठतील मी काय करावे मग?? पण माझे ऑप्शन सुस्पष्ट आहेत पोरगे इंग्लिश मीडियम मधे घालणे माझी गरज अन पोराला मातृभाषा शिकवणे ही आवड़ असेल एकोणीस तासातला एक तास तरी मी पोटच्या गोळ्या करता नक्कीच काढेल.

असो! उणे अधिक माफ़ी बाकी सगळे सुज्ञ आहेतच

जय हिंद
बाप्या

सोन्याबापू, खुप छान लिहिलेत.

माझी एक मराठी उच्च शिक्षित मैत्रिण तिच्या लहान मुलांना घरात पण विग्रंजी बोलायची कारण का तर त्यांना मोठे होऊन अमेरिकेला शिकायला जायचे पाठवायचे आहे म्हणुन
एवढेच नाही तर कट्टर सनातनी असुन त्यांना अंडी-बिन्डी पण खायला घालायची का तर तिकडे गेल्यावर खाण्यापिण्याचे हाल व्हायला नको सवय व्हावी म्हणुन....
माझ्या मते अशिच लोकं मातृभाषेचे डोज पाजायला पुढे असतात.

हर्पेन,
प्रार्थमिक नव्हे, प्राथमिक
निदान मातृभाषेतून शिक्षणाच्या धाग्यावर तरी काळजीपूर्वक टंकत जा, लोकहो! Happy

आगावा, अनुमोदन
सोन्याबापू, पोस्ट आवडली.

बरं, आंतरभाषीय लग्न केलेल्या लोकांच्या मुलांनी कुठल्या भाषेतून शिक्षण घ्यावं बरं?

वरदा, मला वाटतच होते मी काहीतरी चूक करतोय म्हणून ! Proud

हा तर मी काय म्हणत होतो

प्राथमिक शिक्षण आपापल्या मातृभाषेतून घेतले जावे हे सुयोग्य Happy

आंतरभाषीय लग्न केलेल्या लोकांच्या मुलांनी कुठल्या भाषेतून शिक्षण घ्यावं बरं? <<<

जिथे रहतात तिथले. उदा. पंजाबी मुलगी आणि मराठी मुलाने लग्न करून तामिळनाडूत रहायला गेले तर पंजाबी आणि मराठी दोन्ही शाळा तिथे मिळणार नाही मग एक तर तामिळ शाळेत अथवा इंग्लिश शाळेत घालावे लागेल.

आर्ची पर्शाचे पोरं तेलगू भाषेतल्या शाळेत गेले असते

आमची मिशीश हाय मराठीच पर बॉर्न एंड ब्रॉटप इन राजस्थान! तिचं मराठी दिव्य आहे कारण शिक्षण बालवाडी ते एमकॉम पुर्ण हिंदी माध्यामातुन झालेले आहे, अजुन अपत्य नाही पण भाषेमुळे राजाराणीचं काही अडत नाही, माझी भाषेसाठी तिच्यावर जबरदस्ती सुद्धा नाही ! जबरदस्ती करायला तो काही माझा कॅम्प नाहीये , ती स्वतः म्हणते की मी मराठी शिकेल कारण ती आपली भाषा आहे मला तितकेच भरपुर आहे अन इतका विश्वास बायडी वर न दाखवलेस घरी रोज भाजीत मीठ जास्त घालेल आमचा गनीम! तिला इंटरेस्ट यावा म्हणून मी तिच्या रेसिपीज वगैरे इतर काही मराठी संस्थळांवर स्वतःच मराठीत टंकुन टाकल्या आलेल्या प्रतिक्रिया तिला दाखवल्या तेव्हा हरकली फार! मित्रहो हसरी बायको म्हणजेच खरे सुख अन आयुष्यभारतातले शांतिपर्व हाय असं आमचं पक्क मत झालेलं आहे, तिला सांगितले की बघ तुझी फूल तुपातली बाजरीची खिचड़ी अन लाल मांस लोकांना आवडेल तेव्हा हळूच म्हणाली मला पण एक आयडी काढून दे. जिंकलो न राव मी! अजुन तितकीशी तयारीची नाही ती पण म्हणाली हे काय कमी आहे हळूहळू लिहायला टंकायला पण शिकेल , केस पांढरे होइस्तोवर बोलल अन लिहिल फाड़फाड़ घाई कोणाला हाय तिच्यायला ७ जन्मांचा करार आहे एक जन्म भाषा खाती घातला तर बिघडले कुठे!!

हे विचार भिन्नभाषिक जोडपी उल्लेख वाचुन सुचले आहेत ते संदर्भाच्या तासात बसतील असा माझा दावा नाही

आगाऊ, सोन्याबापू, प्रतिसाद आवडले..
शिक्षणाचं माध्यम वगैरे अलीकडे बाजाराच्या ताकदीवर ठरतं. जरा जरी बर्‍या भविष्याची आशा किंवा चाहूल दिसली तरी वंचितांचे (डिप्राइव्ड) लोंढे तिकडे धावतील. म्हणून या विषयावर कुणाचं प्रबोधन करू जाणं व्यर्थ आहे. आणि मराठी भाषेची काळजी तर अगदी व्यर्थ आहे. पुस्तकी प्रमाण भाषा कधीच सर्वत्र बोलली जात नसते. आणि ती सतत बदलतही असते. बदलली नाही तर ती कुंठित (स्टॅग्नन्ट) होते. आजूबाजूचं वास्तव बदलतं तशी भाषाही बदलते. कृषिसंस्कृतीतली भाषा आज नाही. भाषा सतत विकास पावणारी असते. जसं, संस्कृत विकास पावली आणि संस्कृत-प्राकृताच्या संगमाने आजच्या मराठी, गुजराती, हिंदी वगैरे भाषा उदयास आल्या. ब्राह्मी लिपीच्या विकासातून नागरी आणि इतर लिप्या अस्तित्वात आल्या. अगदी पन्नास-शंभर वर्षांपूर्वीचीसुद्धा मराठी आज नाही. तेव्हा मराठी बिघडतेय वगैरे हाकाटी व्यर्थ आहे. आणि इंग्लिश माध्यमातल्या मुलांनासुद्धा जसं इंग्लिश नीटसं येत नसतं, तसंच मराठीत एम. ए. केलेल्यांचं मराठीही दिव्य असतं. पुल. सुद्धा आजच्या मुलांना आवडत नाहीत, वाचले जात नाहीत. उलट मेहता किंवा तत्सम प्रकाशनसंस्थांनी प्रसिद्ध केलेले चेतन भगत वगैरेंचे ओबडधोबड अनुवाद मात्र आवडीने वाचले जातात. आणि हेही काही आजचं नाही. पूर्वीही 'आवाज'सारख्या अंकांचा खप लाखाहून अधिक होता, उलट मौज सत्यकथा रडतखडत चालले होते.
तस्मात, काळजी नसावी आणि हाकाटी तर नसावीच.

अरे वा बऱ्याच प्रतिक्रिया आवडल्या. लेख फारसा पटला नाही.
मी पूर्ण मराठी माध्यमातून शिकलो. ११ वि ला सायन्स मधल्या टर्मस साठी फार लक्षात राहील असा त्रास झालेला आठवत नाही. पण नक्कीच होऊ शकतो. गणित शास्त्र जर पुढे जाऊन इंग्रजीतूनच शिकायचं आहे तर तसच शाळेत असतं तर नक्की जास्त सोपं पडलं असतं असं आत्ता वाटतं. ज्या विषयांत भाषा हा गौण मुद्दा आहे ते विषय पुढे जाऊन ज्या भाषेत शिकायचेत. ज्या भाषेतून वापरायचेत त्या भाषेत शिकवावे.

मुलाची मातृभाषा मराठी आहे त्याला भारताबाहेर आहे म्हणून (आणि भारतात असतो तरीही) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं (असतं). तो सध्यातरी उत्तम बायलिंग्वल आहे. त्याला जे वाटतं ते त्यावेळी समोर असलेल्या माणसांना जी भाषा समजते त्यातून सांगतो. कधीमधी सरमिसळ होते, पण या शब्दाला इंग्रजीत/ मराठीत काय म्हणतात विचारलं की व्यवस्थित सांगतो. गम्मत म्हणजे मराठी न समजणाऱ्या लोकांत तो मला 'माय ड्याडी' म्हणतो आणि एरवी बाबा. केजी मध्ये कॅनडात फ्रेंच शिकवायचे तर ते पण बोलत असतो. तिकडे असता तर ट्राय लीन्ग्वल झाला असता कदाचित.

माझ्या (स्याम्पल साईझ वन) अनुभवावरून तरी मातृभाषेत शिकवावं/ त्यात आपण विचार करतो इ. मुद्यांवर विश्वास नाही. जी भाषा आजूबाजूला बोलतात ती भाषा आणि अशा जास्तीत जास्त भाषा मुल खरंच फार पटकन शिकतात.
राहिला मुद्दा मराठी भाषेचा. तर ती जगायची तर जगेल नाहीतर मरेल.

सोन्याबापू मस्त लिहिलत...

बाकी हा विषय म्हणजे कोळसा उगाळावा तितका काळा असाच आहे. आणि आजच्या युगात ह्या विषयावर बोलण्याला अर्थही नाही कमीत कमी भारतातल्या शहरात तरी. ह्यात बर्‍याच गोष्टींचा अंतर्भाव होतो. इथे मायबओलीवर लिहुन वाचुन चर्चा करुन काही फारसो हाती लागणार नाही तेव्हा तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे.

एकंदरित पॉपकॉर्न विषय...

‘भाजप, भाषा व भाकडकथा’ शीर्षकाचा ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते यांचा लेख ‘एक रेघ’ अनुदिनीवर प्रसिद्ध झाला होता. त्यावरची प्रतिक्रिया इथं.

अभ्यासक नसलो, तरी भाषा थोड्या-फार जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या ब्लॉगवर अलीकडेच याबाबत डॉ. सुलभा ब्रह्मे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. माझं इंग्रजी तेवढं चांगलं नसल्यामुळे थेट इंग्रजीविरुद्ध भूमिका घेणं योग्य नाही. तरीही लिहावं वाटतं. सर्व समाजात सर्व काळ उच्चभ्रूंचं अनुकरण करण्याची (आणि आपणही त्या वर्गात जाऊन बसावं अशी) दांडगी इच्छा मनात असते. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या वर्गाकडं असणारी आर्थिक सुबत्ता आणि प्रतिष्ठा. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर ब्राह्मणांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकायला सुरुवात केली आणि मग त्याचं अनुकरण होत गेलं. याच महत्त्वाचं कारण सगळ्यांच्या मनात असलेली `ब्राह्मण बनण्याची` सुप्त इच्छा. नव्वदीच्या दशकानंतर तर इंग्रजी माध्यमाच्या आणि `यस-फ्यस` बोलायला शिकविणाऱ्या शाळांची लाटच आली.

महाराष्ट्र सरकारनं नव्या शतकात (तेच ते प्रसिद्ध, ऐतिहासिक वगैरे एकविसावे शतक!) पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं. त्याला जो विरोध झाला, तो प्रामुख्यानं साडेतीन टक्केवाले म्हणविल्या जाणाऱ्या वर्गाचा. त्यांना समर्थकांकडून जे प्रत्युत्तर मिळालं, ते योग्य म्हणावं लागेल. त्यांचं म्हणणं होतं की, यांची पोरं-बाळं इंग्रजीतून शिकली, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्या बळावर मिळविल्या. आणि आता आमची पोरं इंग्रजी शिकणार म्हटल्यावर यांना मराठीचा कढ आला! या युक्तिवादात काही प्रमाणात तथ्य नक्कीच होतं. पण एकूणच सरकारी धोरणाचा ज्या प्रमाणे बट्ट्याबोळ होतो, तसंच याचंही झालं. पहिली चार वर्षे इंग्रजी लिहायला-वाचायला शिकवण्याऐवजी संभाषणावर आणि भाषेची ओळख करून देण्यावर भर असं धोरण होतं. (म्हणजे असावं, असं वाटतंय. नेमकं माहीत नाही.) पण संस्थांनी, अधिकाऱ्यांनी आणि आमच्या गुरुजनांनी सरधोपट पद्धतीनं परीक्षा, चाचणी वगैरे सुरू केलं.

माझ्या मुलाला पहिलीपासून इंग्रजी होतं. मला नव्हतं. पण त्याच्या तुलनेत आजपर्यंत माझं इंग्रजी बरं आहे, असं मला वाटतं. कारण त्याला उपलब्ध असलेली अन्य माध्यमं मला तेव्हा माहीतही नव्हती. त्यामुळे त्यांचं इंग्रजी (माझ्याहून) चांगलं असावं, अशी स्वाभाविकच अपेक्षा होती. त्याला अट्टहासानं मराठी माध्यमात घातलं. पण आठवीपासून `सेमी इंग्रजी`ची टूम आली. म्हणजे विज्ञान, गणित असे मूलभूत विषय त्यानं मराठीत शिकावेत, ही इच्छाच फोल ठरली. त्याला ते घेऊ नको, असं म्हटलं तर मग तुकडीचा प्रश्न आला. त्या पेक्षा त्याला इंग्रजी माध्यमातूनच शिकवलं असतं तर.., असा प्रश्न असा पडतो.

अरुण साधू यांनी काही वर्षांपूर्वी `लोकसत्ता`मध्ये असाच एक लेख लिहिला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की, ग्रामीण भागात बहुतेकांना इंग्रजी शब्द कळतात. मला असं वाटतं की, त्यांच्या बोलण्यातले हे अर्धवट इंग्रजी शब्द म्हणजे अभिजनांची नक्कल करण्याचा प्रयत्नच होय. त्यातील अनेक शब्द केवळ सरावामुळे तोंडी येतात. त्याचा अर्थ काय, हे अनेकांना सांगता येणार नसतो. कारण तो त्यांनी शिकलेलाच नसतो.

आपल्या मुलीवर लेख लिहिताना मुकुंद टाकसाळे यांनी म्हटलं आहे,`आम्ही तिला जाणीवपूर्वक इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच टाकलं. लेखक, मराठीचं प्रेम वगैरे ठीक आहे. पण इंग्रजीवाचून आमचे कॉलेजमध्ये कसे हाल झाले, ते आमचे आम्हालाच माहीत.` (अर्थात हा त्यांच्या म्हणण्याचा आशय आहे. त्यांचं थेट उद््धृत नाही) कविवर्य वसंत बापट यांनीही आपली नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते आणि तिला आपल्या कवितेतलं काही कळत नाही, अशा अर्थाची जाहीर कबुली एकदा दिली होती. याउलट जयंत नारळीकर यांचं उदाहरण. हा एवढा मोठा शास्त्रज्ञ किती सोपं मराठी (इंग्रजी शब्दांविना) बोलतो. हिंदीभाषक प्रदेशात वाढलेला, ज्याचं शिक्षण प्रामुख्यानं इंग्रजीत झालेलं, तो माणूस किती सहज मराठी लिहितो, हे पाहायचं असेल तर त्यांचं आत्मचरित्र वाचायलाच हवं. मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांनी एका लेखात म्हटलं आहे की, या देशात संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या कधीच दोन टक्क्यांहून अधिक नव्हती. संस्कृतचं प्रेम भाषेपोटी असेल, तर ते स्वागतार्ह आहे. पण अभिनिवेषापोटी असेल, तर ते योग्य नाही. कारण मागच्या जनगणनेच्या वेळी `संस्कृत आपली मातृभाषा नोंदवा` असं आवाहन करण्याची लाट `फेसबुक`वर आली होती. ज्यांना (शक्य आहे नव्हे) आवड आहे, त्यांनी इंग्रजी अवश्य शिकावं. पण खरं शिक्षण मातृभाषेतूनच मिळायला हवं. जी भाषा घरी-दारी ऐकायला मिळते, त्या भाषेतून शिकण्यासारखं सुख नाही. पण मुळात आता भाषा विषयच किस झाड की पत्ती ठरला आहे. फक्त उपयोजित शास्त्रे शिका. असो.

(याच अनुषंगाने ‘रेघे’वरच्या लेखातील एक उतारा -
ना. गो. कालेलकर म्हणतात :
शास्त्रीय संशोधनात अग्रेसर अशा ज्या समाजांतून विश्व पादाक्रांत करण्याचे हे प्रयत्न होत आहेत त्या समाजांची भाषा त्या दिशेने समृद्ध होत चालली आहे. ज्या समाजांजवळ ही झेप नाही त्यांना या आघाडीवर असलेल्या समाजांच्या भाषा आत्मसात केल्यावाचून गत्यंतरच नाही. कारण केवळ आपल्या संस्कृतीच्या साधनांवर अवलंबून राहून आजच्या क्रांतियुगात आपला निभाव लागणार नाही. एक नवी विश्वसंस्कृती आपणा सर्वांना एकत्र आणू पाहत आहे. तिचे योग्य ज्ञान होण्यासाठी तिला प्रभावी रितीने व्यक्त करणारी एखादी तरी भाषा आपल्याला शिकावीच लागेल, कारण जीवनाचे नवे अनुभव स्वतःमध्ये साठवून ते व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि ज्ञानमार्गावर मानवाची ज्या वेगाने प्रगती होत आहे तिच्या तुलनेने आज कोणतीही भारतीय भाषा समर्थ आहे असे वाटत नाही.)

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग परवाच्या १८ जुलैला म्हणाले की, 'इंग्रजी भाषेने देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. संस्कृत बोलणारी खूप कमी माणसं आता उरली असल्याने आपण आपली भाषा आणि संस्कृती गमावतोय'.

इंग्रजीने संस्कृतचे नुकसान कसे झाले म्हणे ?

इंग्रजी सत्ता आली १८५८ .... संस्कृत भाषेने त्याच्या कैक शतके पुर्वीच आचके दिले होते.

ऋग्वेदाचे पहिले भाशांतर झाले .. लॅटिन.... फ्रेडरिच रोझेन १८३० .

नंतर १८५० मध्ये इंग्रजी .. कोल्ब्रुक विल्सन.

त्यानंतर भारतीय भाषात भाशांतरे झाली. उदा . स्वामी द यानंद सर्स्वती ( हिंदी ). , चित्राव शास्त्री ( मराठी )

इंग्रजीने मृतप्राय संस्कृतातील ज्ञान स र्वत्र पोहोचवण्यास हातभार लावला.
https://en.m.wikipedia.org/wiki/Rigveda

मराठी मराठी करण्यार्यानी आधी अकरावी बारावीमध्ये मराठी माध्यमात शिकलेल्या विज्ञान शाखेतल्या मुलांचे काय हाल होतात ते बघावं >>>>> माझ्या आणि माझ्या वर्गातल्या इतर मुलांच्या अनुभवानुसार तरी असं काहीही होत नाही Happy ह्याचं एक कारण असू शकेल की आमच्या विज्ञान आणि गणित शिकवणार्‍या बाई आठवी पासून शिकवताना अधेमधे इंग्रजी शब्द सांगत असायच्या त्यामुळे ते कानावर पडले होते. असं ऐकलं आहे की पुण्यातल्या काही शाळांमध्ये आठवी / नववीच्या सुट्टीत अश्याप्रकारची तयारी करून घेतात.
माझा मोठा भाऊ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होता. पुढे मला अर्थातच त्या शाळेत घातलं. पण तिथे मी रूळलो नाही असं घरचे सांगतात. मग वर्षभराने काढून पहिलीपासून मराठी शाळेत घातलं. त्यामुळे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण (गणित, शास्त्रासकट) मराठीतून झालं. पुढे इंग्रजी माध्यमातून (;)) इंजिनियरींग करून काही वर्‍षे भारताबाहेर आहे पण आजपर्यंततरी काही अडल्यासारखं वाटलं नाही. इंग्रजी शाळांमध्ये शिकलेल्या मित्र मैत्रिणींना मराठी पेपर / पुस्तकं वाचणे आणि "काही काही मराठी वर्डस रिमेंबर करायला डीफिक्ल्ट जाणे" हे सोडून रोजच्या आयुष्यावर मराठी माध्यम नसल्याने फार काही फरक पडला असेल असं वाटत नाही. Happy त्यामुळे कुठल्याही माध्यमात शिकलं तरी काही फरक पडणार नाही अश्या मतापर्यंत मी आलेलो आहे.
कॉर्पोरेट जगात सफाईदार इंग्रजीला पर्याय नाही हे खरच आहे. मात्र दहावी पर्यंतचं शिक्षण ते कॉर्पोरेट वर्ल्ड ह्यामध्ये बरीच वर्ष असतात. थोडेसे प्रयत्न केले तर फार अवघड जात नाही. माझ्या टीममधल्या इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अनेक लोकांचे अत्यंत महान पद्धतीने लिहिलेले इमेल आणि साध्या चार लोकांच्या मिटींगमध्ये होणारी त त प प पाहिलेली असल्यामुळे इंग्रजी शाळेचा आणि कॉर्पोरेट जगातल्या इंग्रजीचा थेट संबंध आज तरी मी जोडणार नाही. माझ्यामते माध्यम कोणतही असलं तरी थोडसं ग्रुमिंग, आत्मविश्वास ह्यावर कम्युनिकेशन निभावतं. (आमच्यासारखा लहानपाणापसूनच सुपिरीयारीटी कॉंप्लेक्स असेल तर अजूनच सोपं. Proud )
पण तुम्ही काम करत असलेल्या विषयाचे ज्ञान हेच सगळ्यात महत्त्वाचं, ते नसेल तर शाळेतल्या माध्यमाला अर्थ नाही. भंबेरी उडायची ती उडतेच.

आता वैयक्तिक प्रश्न विचारले जाण्याआधी उत्तर. Happy आम्ही भारतात परतलो तर आम्ही मुलीला कॉन्व्हेंटमध्ये किंवा सिम्बी, कर्नाटक अश्या पद्धतीचे वातावरण असलेल्या शाळेत घालणार नाही. अभिनव (इंग्रजी किंवा मराठी) , बालशिक्षण मंदिर, परांजपे, (पौड रोडवरची ती कुठली शाळा.. नाव विसरलो!) ज्ञानप्रबोधिनी, सेवासदन ह्यासारख्या मराठी वातावरण असलेल्या इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या शाळेचा विचार करू (अ‍ॅडमिशन मिळणे हा पुढचा प्रश्न!)

बाकी हल्ली विषय कुठलाही असो प्रत्येक धाग्यावर मोदी सरकार आणल्याशिवाय काही लोकांना चैनच पडत नाही बहुतेक Wink

बाकी हल्ली विषय कुठलाही असो प्रत्येक धाग्यावर मोदी सरकार आणल्याशिवाय काही लोकांना चैनच पडत नाही बहुतेक >>>>> Proud

हल्ली एक वेडसर मुलगा त्याची आजारी आई, गूंगा गुलाम यांचे सरकार असे म्हटले तर पचणार नाही या भीतीने काही लोक निष्क्रीय झाल्याच परिणाम असावा.

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर ब्राह्मणांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकायला सुरुवात केली आणि मग त्याचं अनुकरण होत गेलं.
>>>

हे ठोकून दिलेलं विधान आहे की याला काही आधार आहे? ९०च्या दशकापर्यंत मी मिरज-सांगली भागात ब्राह्मण समाजातील मुले मोठ्या प्रमाणावर मराठी माध्यमाच्या शाळेत जात होती हे पाहिले आहे. माझ्या इंजिनीअरींग कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमात शिकलेली मुले ही सर्व जातींमधली होती - ब्राह्मणेतर जास्तच होती.
इंग्रजी माध्यमात जाणारे दोन गट दिसत. एक बरेच श्रीमंत (व्यापारी वर्गातील बहुतकरुन गुजराती/मारवाडी वगैरे) व दुसरा ज्यांच्या पालकांना मुलांना शिकवायचे आहे, स्वतःचे शिक्षण जुजबी झाले आहे, बरेचदा शिकलेली पहिलीच पिढी आहे पण इंग्रजी शिकल्याने कल्याण होईल असा विश्वास आहे असे.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घरात जर मुलगा व मुलगी असेल तर मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व मुलगी मराठी/उर्दू शाळेत.

या उलट मी उच्चमहाविद्यालयीन शिक्षण घेतले त्यात मी व अजून एक-दोन मराठी होते, बाकी १००-१२५ इतर राज्यातले. ते सर्व इंग्रजी माध्यमात शिकलेले होते एखाद-दुसरा अपवाद वगळता. यात पुर्वोत्तर राज्ये सोडली तर अगदी सगळीकडचे होते - अंदमानचा सुद्धा एक मुलगा होता. त्या सर्वांना मी वर्नाकुलर मध्ये शिकलोय ह्याचे आश्चर्य वाटे. त्यांच्या मते सरकारी शाळाच फक्त वर्नाकुलर असतात व तिथे अगदीच आर्थिक निम्न वर्ग जातो.

हे ठोकून दिलेलं विधान आहे की याला काही आधार आहे? ९०च्या दशकापर्यंत मी मिरज-सांगली भागात ब्राह्मण समाजातील मुले मोठ्या प्रमाणावर मराठी माध्यमाच्या शाळेत जात होती हे पाहिले आहे

माझ्या आकलनानुसार हे वाक्य समकालीन संदर्भात नसुन जेव्हा भारतात इंग्रजी शिक्षण व्यवस्था उर्फ़ मेकॉलियन एजुकेशन सिस्टम सुरु झाली त्या १८३५ नंतरच्या संक्रमण काळाच्या संदर्भात असावे, अन हो त्याकाळी इंग्रजी शिक्षण आत्मसात करुन ब्रिटिश नोकरशाही मधे लोअर पदं अर्थात लोअर डिवीज़न क्लर्क, अपर डिवीज़न क्लर्क, सुपरवाइजर किंवा स्टोर कीपर वगैरे पदांवर नोकऱ्या करण्यात महाराष्ट्रियन ब्राह्मण समाज अग्रणी होता. महाराष्ट्रात ब्राह्मण, उत्तरप्रदेश बिहार अन बंगाल कड़े कायस्थ अन ब्राह्मण, दक्षिणेकड़े चेट्टियार,ऐय्यंगार ब्राह्मण, नंबुद्री ब्राह्मण हे अग्रणी होते, पूर्वापर चालत आलेल्या बुद्धिजीवी उपजीविकेमुळे ह्या जाती नव्या सिस्टम मधे लवकर ढळल्या, त्याच एजुकेशन सिस्टम मधुन शिक्षण "ट्रिकल डाउन" होऊ शकत नाही अन तळागाळातल्या लोकांना त्याचा लाभ पोचू शकत नाही हे जाणवल्यामुळे ज्योतिबा फुले ह्यांना त्यांची प्रख्यात हंटर कमीशन समोरील साक्ष द्यावी वाटली असावी असे एक माझे इंटरप्रिटेशन आहे ईतिहासाचे.

कायम विद्यार्थी
बाप्या

अहो कार्टी ५ तास असतात हो शाळेत फ़क्त उरलेले एकोणीस तास आपल्या सोबत असतात, तेव्हा त्यांचे इंग्रजी/मातृभाषा पक्के न होणे ह्यात आपल्याला सुद्धा कमीपणा नको का यायला?>> ज्जे ब्बात! सगळे काही शाळांवर ढकलून देण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही घरात एकही पुस्तक वाचत नसाल तर पोरांना काय सवय लागणार?

@सोन्याबापू, त्याच परिच्छेदात पुढे नव्वदीच्या दशकानंतर हा उल्लेख आल्याने गोंधळ होतोय. तुम्ही म्हणत असाल तसे असेल तर बरोबर आहे.
इंग्रजी आमदानीत माझ्या माहितीप्रमाणे व्हफा (७वी पर्यंत) सर्व शिक्षण मराठीत आणि ८वी पासून सगळेच विषय (इतिहास भुगोल शास्त्र गणित वगैरे वगैरे) इंग्रजीत असे होते. त्यामुळे व्हफानंतर गळणार्‍यांचे प्रमाण खूप मोठे होते आणि मॅट्रिक फेलला पण महत्त्व होते कारण किमान मॅट्रिकला तरी पोचला. व्हफावर प्राथम्मिक शाळेत शिक्षक व इतर छोट्या नोकर्‍या लागत. तुम्ही लिहिलेल्या कारकुनी/ व वरच्या नोकर्‍यांना मॅट्रिक व्हावे लागत असे, असे वाचल्याचे आठवते.

त्याकाळी ज्या कॉन्वेन्ट शाळा (मिशनर्‍यांनी चालवलेल्या) होत्या त्यात पहिली ते सातवी पण इंग्रजीच होती का शिक्षणाची भाषा? की इंग्रजी माध्यम ही नंतर आलेली गोष्ट आहे?

>> हंटर कमिशन साक्ष >> फुल्यांच्या एका लेखात बहुतेक याबद्दल सविस्तर विवेचन आहे. उद्यापर्यंत शोधून ठेवतो. मध्यंतरी समग्र फुले वाङ्मय ऑनलाइन उपलब्ध झाले त्यामुळे सोपे आहे शोधणे.

तुम्ही लिहिलेल्या कारकुनी/ व वरच्या नोकर्‍यांना मॅट्रिक व्हावे लागत असे >>> पूर्वी चौथी पास हे क्वालिफिकेशन पुरेसे होते, त्यानंतर सातवी पास हे क्वालिफिकेशन बरेच काळ होते. मॅट्रिक्युलेशन (अकरावी) अनिर्वाय त्यानंतर झाली. आणि काहीच वर्षात पदवीची अट आली.

माझ्या आणि माझ्या वर्गातल्या इतर मुलांच्या अनुभवानुसार तरी असं काहीही होत नाही स्मित ह्याचं एक कारण असू शकेल की आमच्या विज्ञान आणि गणित शिकवणार्‍या बाई आठवी पासून शिकवताना अधेमधे इंग्रजी शब्द सांगत असायच्या त्यामुळे ते कानावर पडले होते. असं ऐकलं आहे की पुण्यातल्या काही शाळांमध्ये आठवी / नववीच्या सुट्टीत अश्याप्रकारची तयारी करून घेतात.>>>>> अस काहीही होत नाही हा तुझा अनुभव आहे. माझ्या वर्गातल्या मुलांचा अनुभव वेगळा आहे . तुला किंवा तुझ्या वर्गातल्या मुलांना अनुभव आला नाही म्हणजे ते घडतच नाही अस आहे का ? वर भ्रमरने त्यांनाही ही अडचण आलीये हे नमूद केलेय..

काही सिलेक्टिव्ह शाळा इंग्लिश साठी प्रयत्न करत असतीलही . पण अश्या किती शाळा ? परत त्यात हुशार आणि ढ अशी प्रतवारी . सगळ्या विध्यार्थाना होतो का फायदा ?

पण तुम्ही काम करत असलेल्या विषयाचे ज्ञान हेच सगळ्यात महत्त्वाचं, ते नसेल तर शाळेतल्या माध्यमाला अर्थ नाही. भंबेरी उडायची ती उडतेच.>>> हे वाक्य म्हणून फार चांगलं आहे . पण कॉर्पोरेटस मध्ये फक्त नॉलेज असून चालत नाही. इतरही अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. इंग्लिश भाषेवरच प्रभुत्व ही त्यातली एक गोष्ट.

< इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अनेक लोकांचे अत्यंत महान पद्धतीने लिहिलेले इमेल आणि साध्या चार लोकांच्या मिटींगमध्ये होणारी त त प प पाहिलेली असल्यामुळे इंग्रजी शाळेचा आणि कॉर्पोरेट जगातल्या इंग्रजीचा थेट संबंध आज तरी मी जोडणार नाही. माझ्यामते माध्यम कोणतही असलं तरी थोडसं ग्रुमिंग, आत्मविश्वास ह्यावर कम्युनिकेशन निभावतं>+१

माझा व माझ्या सहाध्यायींचा दहावी ते अकरावी या स्थित्यंतरातला अनुभव : आधी इंग्रजी भाषा या विषयाबद्दल. दहावीपर्यंत ती तिसरी भाषा. स्कोरिंग सब्जेक्ट. व्याकरणही घोटून घेतलं गेलेलं. अकरावीत बहुतेकांचे गुण पन्नासच्या आसपास लटकले. अर्थात बारावी बोर्डापर्यंत बहुतेकांनी त्यावर मार्ग काढला. बारावी बोर्डातही बहुतेकांना मराठीपेक्षा इंग्रजीत किमान १० गुण अधिक होते.
बाकीच्य विषयांच्या बाबत : इथे इंग्रजीतून समजून घ्यायची आणि विचार करायची सवय शिक्षकांनीच लावली. बहुतेक सगळे शिक्षक मराठी भाषक. नव्वद टक्के विद्यार्थीहे मराठी भाषक. मराठी माध्यमातून आलेले. तरीही विषय समजावून सांगताना किंवा अगदी जनरल संभाषणातही कोण्या शिक्षकाने मराठी शब्दांचा वापर केल्याचे आठवत नाही.
------
अन्य प्रांत : एकाच प्रांताबद्दलचा अनुभव आहे. त्यामुळे जनरलायकझेशन करणं योग्य आहे का माहीत नाही. पण माझे इंदूरमधले सगळे सहकर्मी हिंदीमाध्यमातून स्नातक झाले होते. त्यामुळे इंग्रजीतून बोलायची पंचाईत. प्रयत्नच करायचे नाहीत. ऑफिसच्या कामकाजात त्यांचं अडायचं नाही. पण प्रमोशनच्या वेळी नक्की अडायचं. त्यातल्या एकाने इंग्रजी संभाषणाचा कोर्स केल्याचा त्याला लगेच फायदा मिळाला. अर्थात हा आता तसा जुना काळ झाला.
--------
केवळ आपल्या मुलांचं इंग्रजीशिवाय अडू नये म्हणून, आजूबाजूला थोरामोठ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात म्हणून आपल्या मुलांनाही त्याच फॅक्टरीत ढकलणार्‍या अर्धशिक्षित पालकांच्या मुलांचे मात्र खूप हाल होतात.

म्हणजे शाळेत इंग्रजी माध्यम असून पुरेसं नाही, त्याला घरूनही सपोर्ट हवा.
तसंच इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या पालकांची पुढली पिढी इंग्रजी माध्यमात जाते तेव्हा वाक्यातली क्रियापदे सोडून बाकीचे शब्द इंग्रजी वापरून त्यांचं मुलांसोबतचं संभाषण कानावर पडतं.
-----
लहान मुलं वेगवेग़ळ्या भाषा सहज शिकताना दिसतात.अगदी केजी/पहिलीतली वेगवेगळ्या माध्यमांतली मुलं एकमेकांशी हिंदीत संवाद साधताना दिसतात. तर आपण घरात प्रॉपर मराठीत बोलल्याने मुलांच्या इंग्रजीप्रवणतेत अडथळा येईल असं पालकांना का वाटतं ते कळत नाही.

Pages