'बुधवारा'तल्या 'रेडलाईट'मधली झुबेदा ......

Submitted by अजातशत्रू on 28 May, 2016 - 05:48

झुबेदा .....
रेडलाईटमधली अर्धीकच्ची झुबेदा एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून उभी असते तेंव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि पोपडे उडालेल्या भिंतीचा लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट, मोडकळीला आलेली कवाडे अन त्यावर खिळे बाहेर आलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात अधाशी पुरुषी चेहरयांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरी पासून ते सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे तिथे घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात..
झुबेदाला आता सारं सवयीचे झालेय,

फाटक्या वासाच्या गादीत सकाळी दहाएक वाजेपर्यंत झोपून देखील तिच्या बरगड्या ठणकत असतात,
रक्ताळलेल्या गालावर उमटलेले दात तिच्या गावीही नसतात,
गुंता झालेल्या केसांचा बुरखंडा तोंडाशी आला तरी तिला जाग कसली ती येत नाही.
शेजारच्या फळकुटातल्या पुनाम्माचा यार सकाळीच कुत्र्यागत तुडवत असतो तेंव्हाच्या
किंकाळ्यानी जाग येते.

कानतुटक्या कपातून चॉकलेटी वाफाळतं पाणी ती शून्यात नजर लावून पिते.
सकाळीच टीव्हीवर लागलेला एखादा जुनाट सिनेमा टक लावून बघत बसते.
नाश्तावाला अज्जू उप्पीट आणून तिच्यापाशी ठेवतो अन तिच्या हाताला हळूच शिवून जातो
तिचा सकाळचा हा पहिला अन एकच अलगद स्पर्श असतो.

शबनमदिदीच्या त्या खोलीत लटकणारया ढीगभर देवांच्या हार लागलेल्या तस्बिरींकडे
शून्यवत बघत ती न्हाणीत जाते,
कवाड पूर्ण न लावताच उघडी होते,
झाकायचं काय आणि कशासाठी असा तिचा यावर रोकडा सवाल असतो !

अंगाला हाती लागेल ते गुंडाळून ती पुन्हा त्या फाटक्या गादीवर येऊन पडते,
रंग विटून गेलेल्या छताकडे बघता बघता तिच्या डोळ्यांचा बर्फ होतो,
“अरी ओ झुबी, बैरी हो गई क्या तेरा गिऱ्हाक आया है” ही हाक,
तिची जेंव्हा तंद्री लागते तेंव्हाच तिला 'हाक' येते अन ती यंत्रवत आरशापुढे उभी राहते, नटमोगरी होते.

दुपारचे अन्न खाण्याआधी कोणीतरी येऊन तिला कुस्करून जातो
अन ती तशीच ओशट अंगाने बसल्या जागी जेवते,
कांताबाईने बनवलेल्या कसल्यातरी टमाटयाच्या रश्शात बोट बुडवत बसते.

चुन्नी तिला दुपारी तिच्या मोकळ्या पाठीवरून मायेने हात फिरवत सांगत असते,
“साईडवाली मरीनाला तिचा नवरा पुन्हा इथंच सोडून गेला
अन पुलिस येऊन मायाला घेऊन पेशगी म्हणून घेऊन गेलेत !
देख झुबी मर्दका भरोसा ना कर, दुनियाका सबसे कमीना जानवर मर्द है ! ” चुन्नीचं लॉजिक सुरूच असतं ...

आस्ते कदम पडक्या तोंडाने संध्याकाळ मयताचं सामान घेऊन यावं
तशी झुबेदाच्या पुढ्यात येऊन व्याकुळ होऊन उमलत जाते,
पुन्हा एकदा तिची अंघोळ होते, आरसा होतो,
चरबटलेल्या केसांवर अधाशी मोगरा नागवेटोळे घालून बसतो !

भकासलेल्या गल्ल्यांमध्ये आता पिवळे लाईट धगाटून गेलेले असतात,
ओघळलेल्या डोळ्यांनी वखवखल्या नजरा इकडून तिकडे फिरू लागतात.
सिगारेटी पिऊन डांबरागत राट ओठ झालेलेही कोवळ्या पाकळ्या शोधत फिरत असतात
अवजड,वेडावाकडा, खडबडीत देह कपड्यात लपवून लुसलुशीत मऊ मांसल देह हुडकत असतात
लूत भरलेले लेंडाचे गाडगे तोंडात धरावे तसे आपलाच माव्याचा थुंका गिळत फिरत असतात !

धुरकटलेल्या खिन्न पिवळ्या उजेडात झुबेदा रोज अशीच दाराशी उभी असते,
चटावलेल्या जिभा आत येत राहतात बाहेर जात राहतात,
उंबऱ्यावरच्या लाकडावर हागीमुतीने भरलेल्या चपला घासत जात येत राहतात.

त्या रात्री खिशातल्या पाकीटातील देवांच्या तसबिरीनाही ते आपल्याबरोबर घेऊन आत येतात,
नागवे होतात अन त्यांच्यातला दैत्य उफाळत राहतो,
चिंधाडलेल्या काटकुळ्या अंगावर आपलं बरबटलेलं शरीर घुसळत राहतात ...

झुबेदाच्या कातळलेल्या कमनीय देहाच्या प्रत्येक परिच्छेदावर तर
गीता, कुराण अन बायबल अशा सर्व धर्मग्रंथाच्या शब्दांचे अगणित वळ उठलेले असतात.

विस्कटलेली रात्र फुटक्या चंद्राला भगभग्त्या बल्बमध्ये असंच रोज बंदिस्त करून जात असते,
तेंव्हाच काळ्याकभिन्न आभाळातल्या चांदण्याचं बेट
तिच्या लुगड्यात उजेड शोधायला येतं अन कोनाड्यात बसून कण्हत राहतं !

झुबेदाला देवांचीही शिसारी आहे पण तिला दानवांचा रागही नाही, तिचे लॉजिकच वेगळे आहे !
तिला कुणाचा राग येत नाही, लोभ नाही, प्रेम नाही. काही नाही.
तिच्या कानातलं शिसं आतां काहीही ऐकलं तरी तापत नाही,
तिच्या डोळ्याला पाणीही येत नाही

मुडद्याचे आयुष्य जगता जगता कधी कधी ती जुन्या बचपनच्या गोष्टी सांगते,
अब्बू कसा इथं सोडून गेला अन दाल्ला पैसे घेऊन कसे पळून गेला ते सारं सारं सांगत राहते,

इथली घरे म्हणजे जिवंत स्त्रियांची चिरे निखळलेली भडक रंगातली थडगीच !
यातल्याच एका थडग्यात राहणारी झुबेदा जास्तीची पिल्यावर जे सांगते
ते एखाद्या फिलॉंसॉंफरपेक्षा भारी वाटते,
तिच्या मेंदूतल्या मुंग्या माझ्या शब्दशाईत कधी उतरतात काही समजत नाही !

मात्र माझ्याही पुरुषत्वाची तेंव्हा मला लाज वाटत राहते .... !

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2016/01/blog-post_10.html

 झुबेदा.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाला भिडणार लेखन. हाच आपला सुसंकृत समाज आहे का, असा प्रश्न पडतो.
"हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय"
एकाच्या सुरक्षिततेसाठी दुसर्याचा बळी देणे , हि काही माणुसकी नाही. असा दृष्टीकोन ठेऊन मुळ प्रश्नाकडे डोळेझाक करून, आपल्याला काय मिळणार आहे? मनाची शांती तर नक्कीच नाही. अश्या एखादीला थोडा आधार, थोडी माणुसकी दाखऊ शकलो तर अर्थ आहे.

मनाला भिडणार लेखन. हाच आपला सुसंकृत समाज आहे का, असा प्रश्न पडतो.
"हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय"
एकाच्या सुरक्षिततेसाठी दुसर्याचा बळी देणे , हि काही माणुसकी नाही. असा दृष्टीकोन ठेऊन मुळ प्रश्नाकडे डोळेझाक करून, आपल्याला काय मिळणार आहे? मनाची शांती तर नक्कीच नाही. अश्या एखादीला थोडा आधार, थोडी माणुसकी दाखऊ शकलो तर अर्थ आहे.

हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.>>>>

अगदी अमानुष विधान आहे हे दिनेशजी. त्याही कुणाच्या तरी आयाबहिणी आहेत ना. आपण असली बेजबाबदार
विधाने कशी करू शकतात...

आपण असली बेजबाबदार विधाने कशी करू शकतात...>>>>>>>>> बेजबाबदार पेक्षा विचार न करता केलेलं किंवा असमंजस (?) विधान आहे ते. बरं आता लोकांनी दाखवून दिलं आहे तर येऊन त्याची दखल घेऊन विचारात बदल करायला काय हरकत आहे? त्यानी काय बिघडतं?
ऋन्मेष सारख्या लोकांकडून थोडं शिकता येइल खरं. कमीत कमी तो आपली विचारसरणी बदलायला तरी तयार असतो.

छान लिहीलय कसं म्हणू? अतिशय भयाण पण वास्तव असलेल्या या गोष्टी अस्तित्वात असतातच... पण आपल्या डोळ्यांआड घडत असल्याने त्याची दाहकता जाणवत नाही कधीच आपल्या एसीच्या उबदार खुराड्यांमध्ये... अतिशय सुन्न करणारे लेखन हे..... --/\--

हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.≥>>>>>>>> प्रचंड असहमत..काहीतरी पुस्तकी वाक्य वाटते. हे वास्तव आहे; किंबहूना वास्तव यापेक्षाही दाहक आहे. दुर्दैवाने भारतात आणि इतरही कैक देशात वेश्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्या असल्याने 'त्याची' भुक तात्पुरती शमत असेनही, म्हणुन 'तो' इतर स्त्रीयांकडे सात्विक नजरेने बघेल ही खूळी समजूत आहे, पळवाट आहे.

ऋन्मेष सारख्या लोकांकडून थोडं शिकता येइल खरं. कमीत कमी तो आपली विचारसरणी बदलायला तरी तयार असतो.>>

!!!!

वैद्यबुवा, तुला असे नाही वाटत की तू ऋन्मेषच्या नावाचा इथे गैरवापर करतो आहे मुद्दाम दिनेशजींना खजिल करण्यासाठी? कित्येकदा ऋन्मेषवर अटॅक होतो आणि तो एकटाच हसतमुख चेहर्‍यानी आपली बाजी लढतो. त्याला डिवचताना होणार्‍या आनंदात तू सुद्धा कधीकधी सामिल असतो. तेंव्हा नाही का लक्षात येत की ऋन्मेष खूप फ्लेग्झिबल आहे. तो आपल्या चुकांची दुरुस्ती करतो. पण असे तो करतो तेंव्हा त्यांचे कौतुक करायला मात्र आपण धजत नाही की बाबा ह्या मुलात चांगले गुणही आहे.

बघ हा तुझा दंभ तुझ्या ध्यानात येतो का!!!

Sad

हर्ट, एक मिनिटा करता खजिलचा मुद्दा बाजूला ठेवून दिनेशजींनी केलेल्या विधानाबाबत तुझं काय मत आहे?
हे ह्या करता विचारलं कारण काहीही कारण नसताना मी त्यांना फक्त खजिल करायच्या हेतूनी ती पोस्ट लिहिलेली नाहीये.

ऋनमेषनी ह्या आधी (माझ्या पाहण्यात) २-३वेळा स्वतःची विचारसरणी बदलण्याची तयारी दाखवलेली आहे म्हणून उदाहरण म्हणून मी इथे ते दिलं. बाकी ऋन्मेषवर अटॅक वगैरे होतो, त्याला लोकं डिवचतात अन मी पण आनंदात सामिल होतो वगैरे हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत. काय बोललं जातय त्या पेक्षा कोण बोलतय ह्यावर भर देऊन बळच कोणाचं कैवार घेऊन काय उपयोग आहे?

माझा दंभ Lol एखाद्या माणसाचा एखादा गुण आवडला म्हणजे बाकी त्याला कुठल्याही इतर बाबतीत काहीच म्हणायचं नाही असं काही असतं का? हे म्हणजे तुझे फुलके खुप सुंदर होतात म्हणून तू कधी कधी लिहित असतोस त्या कॉमनसेन्सविरहित पोस्टींचा विरोधच करायला नाही पाहिजे असं म्हणण्यासारखं आहे. Lol

अस्वस्थ वास्तव
आयबहीणी सुरक्षित वगैरे निव्वळ अपमानस्पद वाक्य
मध्यन्तरी कामाठीपुरा बराच बदललेला दिसला बरं वाटल पण लगेच विचार आला मग इतक्या कुठे गेल्या असतिल

सुन्न!

दिनेशदांकडून त्या प्रतिसादाची अपेक्शा नव्हती! आपल्या महान देशात कोणी आया बहिणी सुरक्शित नाहीयेत.

गंमत आहे. इतक्या प्रभावी लेखनावर आलेल्या सत्तेचाळीस प्रतिसादांपैकी तीस पस्तीस प्रतिसादांमध्ये हटकून दिनेश ह्यांचे ते वाक्य कोट करून ते कसे चुकीचे आहे ह्यावर आवर्जून लिहिले गेले आहे. एका-दोघांनी ते वाक्य चुकीचे आहे असे म्हंटले की बास होत नाही का? येणार्‍या प्रत्येक नव्या प्रतिसाददात्याने ही 'री' ओढून दाखवलीच पाहिजे, तरच तो प्रतिसाददाता सूज्ञ आहे असे काही सिद्ध होते का? Lol

वेश्याव्यवसाय हा देखील आपल्याकडे एक बलात्कारच असतो. कारण त्या स्वताच्या मर्जीने हे करत नसतात.
---
आपल्या महान देशात कोणी आया बहिणी सुरक्शित नाहीयेत.

>> हम्म.

1. भारतात लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नाहीय हे कितीजणांना माहीत असतं?
2. माहीत असलं तरी त्याबद्दल कुठेच काहीच चर्चा का दिसत नाही?
3. आगीभोवती फेर्या मारल्या/ आयडू / कबुलहै म्हणलं की 'नाऊ यू क्यान ऑफिशिअली, लिगली रेप इच अदर' असे लायसन्स देणार्या संस्थेचा भाग असणारे, त्याला मूक संमती देणारे यांचं काय करायचं?
4. उच्चमध्यमवर्गातल्या हाऊसवाइफना 'सोशली एक्सेप्टेड फॉर्म ऑफ मोनोगमस वेश्या' म्हणावे का?
5. 'आमच्या स्त्रिया सुरक्षीत राहील्या पाहिजेत मग तू तुझ्यातुझ्या निम्न वर्गा/जातीतल्या एकाच बाईवर तुला हवा तितका बलात्कार केला तरी आम्ही तिकडे कानाडोळा करु' असे कायदे बनवणार्या उच्चवर्गिय पुरुषांचे म्हणणे आहे का?
---
अजून काही
6. मुलाचा पगार किती, त्याच्या+वाडवडिलांच्या प्रॉपर्टी किती, असा सगळा हिशोब मांडून मग आपल्या मुलीच अॅरेंज मेरेज करून देणारे आईबाप आणि झुबीच्या अब्बुमधे नक्की काय फरकय?
7. वरील पद्धतीने लग्न करणार्या मुली म्हणजे व्हर्जीनीटी, लाईफटाइम सेक्शुअल सर्विस, झालंच तर गर्भाशय असे सगळे बाजारात विकायला/ऑक्शनला मांडलेल्या बायकाच ना?
8. मेरेज ब्युरो म्हणजे 'सोशली एक्सेप्टेड फॉर्म ऑफ पिंपींग' का?
9. संमती नसताना स्वतःच्या बायकोवर बलात्कार करणारे आणि संमतीने वेश्येशी संबंध ठेवणारे यातले जास्त वाईट कोण?

अच्छा म्हणजे फुलके आणि परिणामी कुठलीही पाककृती यशस्वीरित्या करायला कॉमन-सेन्स लागत नाही! बीटवीन्स दी लाईन अर्थ कळला. आता, इथे हा कुणाचा अपमान वगैरे नाही वाटत का?!. बघू आता तू चुकीची दुरुस्ती करतोस की नाही करत. ते हे आपले ते नाहीत का चुकत कधीमधी? त्यांना नाही कधी तू विरोध करत!!!

हर्ट Lol पाहिलस का? माझा तसा काहीही उद्देश नसताना तू वाट्टेल ते अर्थ काढत आहेस?

अच्छा म्हणजे फुलके आणि परिणामी कुठलीही पाककृती यशस्वीरित्या करायला कॉमन-सेन्स लागत नाही! बीटवीन्स दी लाईन अर्थ कळला.>>>>>>>>>>> फुलके करायला कॉमन सेन्स आणि स्किल दोन्ही लागतं. ते तुझ्यात आहेत म्हणूनच अर्थात ते चांगले होतात. पण ते करताना तू कॉमन सेन्स वापरलास म्हणून इतर ठिकाणी कधीतरी तू कॉमन सेन्स न वापरता बोललास हे मला जाणवले तर ते बोलू नये का? हा मुद्दा होता. Happy
दर वेळेस कोणी काही सजेस्ट केलं की तुला तो तुझा अपमान आहे हा समज करुन घ्यायची गरज नाही. ओपन फोरम मध्ये तुम्ही जेव्हा लेख लिहिता, मत मांडता तेव्हा इतर लोकांना त्या विषयी मतं असतात आणि ती मांडायचं स्वातंत्र्य देखिल असतं. फक्त ती मतं मांडल्यावर आपण ती कशी स्विकारावीत हा आपला प्रश्न असतो. हे मान्य आहे काही लोकांची भाषा फार गोडी गुलाबीची नसेल पण खरं कधी कधी रोखठोक उत्तरच बरी असतात. तू अशा रोखठोक मतांना अपमान अन अटॅक अन अवहेलना वगैरे स्वरुप देणार असशील तर त्याला कोणी काही करु शकत नाही. सरतेशेवटी, काही लोकं मुद्दाम तुला पीडायला, त्रास द्यायलाही काही बोलत असतील पण सगळीच नाही हे कृपया लक्षात घे.
Happy

विषय काय, त्याचं गांभीर्य काय, आणि या हर्टच्या असंबद्ध बालिश पोस्ट्स काय!
मजा म्हणजे ज्या पोस्टबद्दल इतक्या प्रतिसाददात्यांनी आक्षेप नोंदवला ती लिहिणाऱ्याला काही सोयरसुतक नाही आणि हर्टसारखे लोक आपलेच फुलके भाजून घ्यायला पुढे! धन्य!!

असो.
लेख अतिशय परिणामकारक आहे.

स्वाती: इथे माझ्या इन मीन फक्त दोनच पोस्टी आहेत. पैकी, दुसरे बुवांना उत्तर दिले आहे. फुलके भाजून घेण्याची आणि वाहत्या गंगेत हात धुवायची सवय तर तुला आहे!!! आत्ताही तू तेच करत आहे. इथे लिहून मन भारत नाही तर तोच विषय पुन्हा टिपापा वर सुद्धा आहेच! तू लिही न विषयाला धरून साजेसे. आम्ही वाचू आनंदाने. पण नाही.. बाकी इतर आनंदाला चुकूनही तू मुक्त नाहीस!!

हा लेख नाही प्रवाही काव्य आहे हेही विसरलीस!!!

दिनेशदा तुम्ही तत्काळ इथे या आणि जाहीर माफी मागा सत्वांना फार भयानक आहे तुमचा अभिप्राय!!!! देहदंडाची शिक्षाही कमीच पडेल.!!!

To err is human -- such a simple thing people don't keep in mind. If somebody is not turning back doesn't it mean he is feeling mistaken ..guilty for what he has written!! Why explicit remark is expected!!

If somebody is not turning back doesn't it mean he is feeling mistaken ..guilty for what he has written!! Why explicit remark is expected!!>>>>> परत येऊन काहीही न लिहिणं हे फक्त आणि फक्त आडमुठेपणाचं लक्षण आहे. मनमिळावू, सौम्य वावर असणे वगैरे हे तो पर्यंतच खरं असतं जो पर्यंत त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाहीये किंवा त्यांच्या मुद्द्यांवर कोणी आक्षेप घेत नसेल तो पर्यंत.
हे का लिहिलं ते ही सांगतो. इतर लोकं जे बिनकामाचे (इन्क्लुडिंग यु) दिनेशदांचं कैवार घेऊन असतात, दावे करत की त्यांना लोक टारगेट करतात, त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून हे लिहिलेलं आहे.
त्यांच्या विरोधात बोलणारे लोकं मुर्ख नाहीयेत.
माझ्या एका मायबोलीकर फ्रेंडनीच मला एक वाक्य सांगितलं होतं.
Your principles are tested when its the most inconvenient for you to follow them. Happy

दिनेश ह्यांचे ते विधान आता अधिकच चर्चेत आले आहे म्हणून त्या निमित्ताने:

एकुण समाजात होणार्‍या स्त्रीच्या शोषणासारख्या घटना जेव्हा सर्व प्रकारच्या माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोचून आपल्याला धक्के देतात तेव्हा दिनेश ह्यांचे ते वाक्य अगदीच बाळबोध ठरते. म्हणजे असे म्हणायचे आहे की वर्तमानपत्रे, टीव्ही, विविध वाहिन्यांचे एपिसोड्स, चित्रपट, समोर घडत असलेल्या घटना असे सगळे एकदम पाहून कोणीही हेच म्हणेल की स्त्री अजिबात सुरक्षित नाही, जी ती नाहीच आहे. ह्याबाबत अजिबात दुमत नाही.

मात्र, उदाहरणार्थ, पुण्यासारख्या शहरात बुधवार पेठीय व्यवसाय जर अचानक बंद झाला तर एका दिवसात तेथे उपस्थिती लावणारे शेकडो किंवा हजारो लोक काय करू लागतील असा एकदा विचार करून पाहिला तर त्या विधानात (अगदी किंचित का होईना) तथ्य आहे असे जाणवते. हे लोक क्षणिक सुखासाठी वाट्टेल त्या पातळीला जाणारे लोक असतात आणि (उदाहरणार्थ) बुधवार पेठ त्यांच्या अश्या क्षणिक अनावर भावनांचा निचरा करण्यास सहाय्य करत असते. बघा पटते का! हे लोक अनावर होऊन तेथे जातात कारण त्यांना माहीत असते की रुपडे फेकले हवे ते मिळणारच आहे. रुपडे फेकूनही मिळत नाही अशी अवस्था झाली तर हे पशू कोणत्या थराला जातील हे सांगणे किंवा त्याचा अंदाज बांधणे आपल्याला नीटसे जमणार नाही.

'स्त्री कोठेही सुरक्षित नाही' हे विधान पूर्णपणे मान्य करूनही बुधवार पेठेतल्या सेक्स वर्कर्सनी नकळतपणे केलेला पशूत्वाचा निचरा हा स्त्रियांना इतर भागांमध्ये निर्विघ्नपणे फिरण्याची मुभा काही प्रमाणात तरी देतो हे अगदीच नाकारता येणार नाही.

टीप १ - वैद्यबुवा व बी ह्यांच्या वादाशी / चर्चेशी ह्या प्रतिसादाचा संबंध नाही.
टीप २ - दिनेश ह्यांची बाजू घेणे वगैरे ह्या प्रतिसादाचा हेतू नाही. हे एक स्वतंत्र मत आहे.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

बेफिकिर वरच्या पोस्टशी सहमत, अगदि तळटिपे सकट...

आणि भले दिनेश यांच वाक्य तुमच्या दृष्टिने चुकिचं असेल तरी दिनेश यांनी इथे येउन खुलासा केलाच पाहिजे हे सांगणारे हे कोण टिक्कोजीराव?

आणि भले दिनेश यांच वाक्य तुमच्या दृष्टिने चुकिचं असेल तरी दिनेश यांनी इथे येउन खुलासा केलाच पाहिजे हे सांगणारे हे कोण टिक्कोजीराव?>>>>> त्यांनी यावे किंवा येऊ नये हा त्यांचा प्रश्न. त्यांनी न येणं म्हणजे काय दर्शवतं ते लिहिलं फक्त, एस्पशली हर्ट करता, कारण त्यांना मी किंवा इतर लोकांनी दिनेशदांना अकारण टारगेट वगैरे केलय असा गोड गैरसमज करुन घेतलाय.

Pages