"मदीर"

Submitted by -शाम on 31 May, 2016 - 03:16

मन मदीर एकांताचे
सांजेस गीत आळवते
केशरी ऊन म्हातारे
मेघात रंग कालवते

स्पर्शतो तरल ओठांनी
थांबता वाहता वारा
सांडतो वेचतो तैसा
स्मरणांचा जुन्या पसारा

माझ्याच जणू स्वत्वाची
क्षितिजास पेटती प्रेते
हळुवार उतरतो आत्मा
शोधात कुणाच्या येथे

या किर्र तिमिर वाटेने
रांगते रोज ही पृथ्वी
माझ्यापरि थांबत नाही
माझ्यापरि पोचत नाही

---------------------------------------------------- शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पर्शतो तरल ओठांनी
थांबता वाहता वारा
सांडतो वेचतो तैसा
स्मरणांचा जुन्या पसारा >>>>> क्या बात है .... Happy

सुंदर !