चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कमीत कमी २० किलो कमी करायचंय + डिलीवरी नंतर वाढलेला पोटाचा घेर पण.
माझा BMI = ३०.६ आहे.

मला वजन ६८ वरून ४८ वर करावे लागेल.

मला भात खूप आवडतो किती प्रयत्न केला तरी बंद नाही होत.
ताटात घेताना मात्र तो योग्य प्रमाणात घेतला जात नाही. Sad

किती प्रयत्न केला तरी बंद नाही होत << <<<<<म्हणजे काय? भात उडी मारून तोंडात पडतो..? कुणी जबरदस्तीने भरवतं?
Light 1
.
.
.
बंद करायचं ठरलंच असेल, तर भाताकडे बघायचं सुध्दा नाही.. सोप्पं आहे..

भात बंद करण्यासाठी मी वापरलेल्या काही युक्त्या..

फक्त डाळीची खिचडी भाज्या घालून- तूप, कढी बरोबर खावी...ईतकी सुंदर चव येते की भाताची आठवण पण होणार नाही...
फक्त डाळीच्या ईडल्या, डोसे

आता मी फक्त आठवड्यातून एकदा भात खाते....

मुळात बनवायचाच नाही भात. केला नाही की खल्ला जात नाही. मी दोनेक दिवसातून एकदाच बनवते तोही मुलान्पुरत्तच. उरला तरी खूप रहात नाही.
मुळात सुरुवात सूप किन्वा वरण पिऊन करावी, मग चपाती खावी म्हणजे चपती कमी जाते आणि भातासाठी भूक रहात्च नाही.
विद्या.

माझ्या कलीगला तिच्या डायेटिशियन कम डॉक्टरने सांगितले की गहू बंद करून तांदळाच्या भाकर्‍या खा.रात्री डाळतांदळाची खिचडी खा. तिने ते पाळले आणि मस्त वजन कमी झाले आहे.ती मात्र गोड अजिबात खात नाही.तिचे ऐकून मी रात्री फक्त थोडासा भात खायला लागले, मला खूप शांत समाधानी वाटते.वजन आहे तेवढेच आहे.(बरेच कमी व्हायला हवे आहे)

प्रत्येक शरीर वेगळे असते.. त्यामुळे सगळ्याना एकच उपाय चालत नाही. मी भात, चपाती, भाकरी, गोड काहीच खात नाही. वजन तसेच आहे.. Happy

बदामात ओमेगा-६ फक्त आणि अक्रोडात दोन्ही आहेत असं दिसतंय. सहसा गूगल केलं की ओमेगा बोले तो तीन साठी फुड-सोर्सेस दिसतात त्यामुळे त्यात बदाम येत नाहीत. दोन्हीत काय बरं-वाईट थोडं आणखी वाचावं लागेल.

मी ९महीन्यात ७ किलो वजन कमी केलंय. वजन कमी करण्याचा दर जरा कमीच आहे, न वाढता कमी होतय हे मला महत्त्वाचं वाटतंय.
पाळलेले काही नियम:
१. तेलाचा वापर कमी: non-stick भांडी आणली. रोज वापरते. तेलाच्या वापरात प्रचंड फरक पडला.
२. रोज दोन्ही वेळच्या जेवणात salad आणि मोठी वाटीभरुन जरा घट्टसर वरण compulsory.
३. किमान एक फळ. no pulpy fruits.
४. सकाळी कोमट लिंबूपाणी, जवस पावडर घालून.
५. वाटण घालून केलेल्या भाज्या बंद. अगदी चिकन/मटण सुद्धा
६. मासे aluminum foil मधे गुंडाळून वाफवते(मायबोली टिप). आई शपथ tasty लागतात आणि guilt free खाता येतात.
७. आधी रात्रीचा भात बंद केला. मग दुपारचा भात १ आड १ दिवस खायचे, मग एक उपाय सापडला. वरणात पोळी कुसकरुन खायची. सगळी नाही, शेवटची अर्धी किंवा पाऊण. याने पोट भरल्याचं समाधान मिळतं.
८. दर ३ तासाने थोडंसं खायचं, पण तडीस लागे पर्यंत कधीच खायचं नाही.
९. गोडावर नियंत्रण. दिवसाला २-३ टे. स्पू. फक्त.

हे सगळं करताना माझ्या लक्षात आलं की आपण जास्त खातोय, पण चांगलं आणि योग्य आहे. म्हणूनच वजन कमी होतंय Happy

आता तुम्ही म्हणाल की इतकं सगळ पाळल्यावर वेगाने कमी व्हायला हवं, पण अधे मधे अपथ्य होतंच ना (बाहेरगावी गेल्यावर, पाहुणे आल्यावर किंवा घरचं कुणी आजारी पडल्यावर). पण मग त्या वेळी वजन न वाढता स्थिर राहतं.

तसं मला अजून बराच मोठ पल्ला गाठायचा आहे. अजून १० किलो कमी करयचं आहे आणि हे कमी केलेले ७ किलो खूप हुरुप देतात.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सगळ्यांना शुभेच्छा! तुमचे नि माझे प्रयत्न यशस्वी होवो!!

वजन कमी करण्यासाठी इथे व्यायाम ह्या प्रकाराबद्दल कुणिच बोलत नाही. फक्त खाणे कमी करुन वजन कमी होत नाही. चांगल्या प्रकारचा व्यायामही आवश्यक आहे. रोज ६ सुर्यनमस्कार घातले की फरक पडेल असे मला वाटेल. माझ्या बहिणीचे वजन ७० किलो आहे. तिला मी सुर्यनमस्कार शिकवले. महिन्याभरात तोच आहार ठेवून ६ किलो कमी झाले. तिने सकाळी बाहेर फिरणे सुरु केले. शिवाय ग्रीन टी सुरु केला. दालचिनीचा वापर वाढवला. वजन कमी होत आहे. सुर्यनमस्कारामुळे शरिराला एक टोन येतो. तोही दिसतो आहे म्हणे. परवा फोटो पाठवले. पोट एकदम फ्लॅट झाले तिचे. दंड निमुळते दिसते आहे. अजून चार पाच किलो कमी झाले की पुर्ववत दिसेल. पुढील देशवारीत तिला योगामधील प्राणायाम आणि कपालभाती शिकवायची आहे. दोन्हीचा भरपुर फायदा होईल.

तेंव्हा महिनाभरात वजन कमी करायचे असल्यास मला संपर्क करा Happy विनाशुल्क फक्त देशात आलो म्हणजे जेवायला बोलवा Happy

मासे aluminum foil मधे गुंडाळून वाफवते(मायबोली टिप). आई शपथ tasty लागतात आणि guilt free खाता येतात. >>>> हे कसे करायचे, फ्राय करण्या ऐवजी वाफाळायचे का?

मासे aluminum foil मधे गुंडाळून वाफवते(मायबोली टिप)>>

अजून किती स्पष्ट लिहाव Happy

वजन कमी करण्यासाठी इथे व्यायाम ह्या प्रकाराबद्दल कुणिच बोलत नाही.>>
हो मी जिमला जाते. महीन्यातून 20 दिवस तरी जाते.

मासे aluminum foil मधे गुंडाळून वाफवते(मायबोली टिप)>>

अजून किती स्पष्ट लिहाव स्मित>>
मासे साफ करून त्यांना कोकम वाटून, आलं लसूण पेस्ट, तिखट मीठ लावून किमान अर्धा तास ठेवते. aluminum foil चे pockets करते आणि तव्यावर ठेवते. fry करायला जेवढा वेळ लागतो तितकाच वेळ लागतो. aluminum foil मुळे मासा तव्याला चिकटत नाही आणि foil लाही चिकटत नाही. बिन तेलाचे पण त्याच चवीचे बनतात. फक्त तेलात केल्याने येणारा खमंगपणा/कुरकुरीत texture येत नाही.

मासे aluminum foil मधे गुंडाळून वाफवते(मायबोली टिप)>>

अजून किती स्पष्ट लिहाव स्मित >>>

मी वर विचारल्याप्रमाणे जसे फ्राय करतो तसे करायचे का म्हणजे मसाला व. लावुन त्यांना फॉईल मध्ये wrap करायचे का?

तसेच तव्यावर पॅन मध्ये वाफवायचे की ओवन मध्ये, सविस्तर महिती हवी होती

व्यायाम तर हवाच, पण माझा अनुभव असा आहे की व्यायाम (जीम्/धावणे इ.) केला की भूक फार लागते आणि मग जास्त खाल्लं जातं.

सूर्यनमस्कार / योगा करुन पाहतो.

ते घट्ट वरण मूगाचच् हवं की तूर/मसूर पण चालेल.

वरण खाण्यामागे protein खाल्ले जावे हे कारण आहे. मी मुग आणि तुर निम्मे निम्मे घेते. तुरीमुळे पित्त होते आणि नुसत्या मुगाचं वरण फारसं नाही आवडत. मी कधी कधी तुरडाळी बरोबर मटकीची डाळ किंवा मसुरीची डाळ पण घालते. मुगडाळीने येणारा घट्ट पणा येत नाही आणि चवही बदलते.

वरणा बद्दल धन्यवाद. Happy
माझा दररोज १२ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प आहे. सुरुवात अर्थात कमी संख्येने करेन.

रंगासेठ.. बारा पर्यंत पोहोचायला कमी संख्येने सुरूवात? मला वाटलं १०० वगैरेचा संकल्प असेल तर ठिक आहे..
जरा कमिशयोक्ती वाटली.. Light 1

हा हा! खरं आहे परदेसाई साहेब.
पण सध्यातरी माझ्या मर्यादेनुसार मी दररोज १२ नमस्कार घालू शकतो, कंटाळा येणार नाही आणि व्यायाम पण पुढे ढकलणार नाही हा विचार आहे.
अर्थातच जास्त संख्या म्हणजे फायदा अधिक हे पण खरं आहे.

माझही वजन कधी नव्हे त वाढलय.. ५ - ७ कि. कमी करायचे आहे. गुडघेदुखीमुळे सु.न. घालू शकत नाही.

४ वेळा खाल्ले जाणे हे वाईट नाही आहे. काय खाल्ले जाते आहे या कडे लक्ष द्या. low fat, high fiber and high protein असेल आणि तडीस लागे पर्यंत खात नसाल तर चालेल.

सुर्यनमस्कारची तीन प्रकार आहेतः
१) १० स्टेपमधील सुर्यनमस्कार
२) १२ स्टेपमधील सुर्यनमस्कार
३) १४ स्टेपमधील सुर्यनमस्कार

पैकी, तिसरा १४ स्टेपमधील सुर्यनमस्कार सुर्वाधिक उत्तम.

सुर्यनमस्कार किती घालावे ह्यापेक्षा ते आधी अचूक शिकावे, मग आपल्या क्षमतेनुसार एक दोन तीन असे अचूक सुर्यनमस्कार घालून मग कुठे २ चे ४ .. ४ चे ८ ..८ चे १२ करावे. आपण सुर्यनमस्कार कसे घालतो ह्याला फार महत्त्व आहे. किती घालतो ह्याला महत्त्व नाही.

माझी बहिण मला मोठी तोर्‍याने म्हणाली. मला येतात की सुर्यनमस्कार. म्हंटले, चल घालून दाखव. हसून वाट लागली होती. किती चुकीचे सुर्यनमस्कार कुणाकडून १०० रुपये देऊन शिकली होती. काल अभय देवोलचे सुर्यनमस्कार पाहिले. किती चुकीची पद्धत त्याची. अरारा!!

अचूक योगाभ्यास शिकवणारे हल्ली फार दुर्मिळ झाले आहेत. शिवाय हीच लोक पैसे घेऊन शिकवतात. आता पुढील वेळी मी भाततात येईल तेंव्हा आधी इथे एक धागा काढेळ - "बावधनला माझ्या घरी या आणि सुर्यनमस्कार शिका". ज्यांना गरज आहे, वजन कमी करायचे आहे ते येतीलच.

असो.

वर, खाण्याबद्दलही लोक बोलत आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ थोडे जेवन करुन मधे न खाणे जास्त उत्तम. खायच्या गप्पा भलत्या रंगतात मायबोलिवर. जेंव्हा पाहव तेंव्हा लोक खायच्या गप्पा मारायला उत्सुकच असतात.

PracheeS , वजन कमी केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

४ वेळा खाल्ले जाणे हे वाईट नाही आहे. काय खाल्ले जाते आहे या कडे लक्ष द्या. low fat, high fiber and high protein असेल आणि तडीस लागे पर्यंत खात नसाल तर चालेल.>>> मी अगदी ह्यच्याविरुद्ध आहार घेऊन वजन आणि इंचेस कमी केले. enough fiber, moderate protein, low carb and high fat

तसे बाहेरचे जास्त काही खात नाही. सकाळी नाष्टा पोळी+भाजी अन सध्या रस.. दुपारचे भोजन भा.पो. केला असल्यास अर्धी वाटी भात=+ एक वाटी दाल. रात्री पोळी किंवा भात सोबत वरण आणि भाजी अथवा कोशिंबीर. सं. आलयावर प्रचंड भुक लागते त्या वेळी ७- ७:३० ला जे हातात सापडेल ते खाल्ले जात.. खाकरा,चिवडा(घरचा), बिस्कीटे,खारी काहीही.. Sad अन पूर्वी सकाळी ३० मि. चालायला जायचे.. हल्ली जमत नाहीये. Sad रात्री बघते प्रयत्न करून चालायला जायचा.. अन सं. चा नाष्टा बंद केला पाहिजे..

मागे डॉ. दिक्षित यांचा म.टा.त लेख वाचला होता. दोनच वेळा जेवून वजन कंट्रोल राहाते म्हणे. तो प्रयोग ८ दिवस केला होता. पण अती अवघड वाटले करायला ते Sad

दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे दोनच जेवण मला माहिती होते. आणि सकाळी चहा दुपरी चहा हे दोन चहा माहिती होते. इथे येऊन रोज चार पाच वेळा जेवावे लागते हे नवीनच माहिती पडले. आणि वर वजन कमी करण्याच्या गप्पा. केवढा तो विरोधाभास Happy

Pages