भारतीय आणि नग्नता

Submitted by अनाहुत on 23 May, 2016 - 01:18

आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच जन्माला येताना बिना कपड्यांचाच जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही .

बाकी या बाबतीत कपडे नक्की का घालावे आणि का नाही हाही एक मुद्दा असू शकतो अगदी लज्जा रक्षण , injury पासून बचाव , ऊन थंडी यापासून बचाव आणि अशी अनेक कारणे दिली जाऊ शकतात . हि कारणे मान्य पण खरच अस आहे का कि आपण शरीर रक्षणासाठी कपडे घालतो असे तर वाटत नाही . आपण भारतीय उपमहाद्विपीय प्रदेशातील वातावरण आणि इथला पोशाख पहिला तर अस नक्कीच नाही वाटत कि हे शरीरसाठी केल जातंय पूर्वीचे पोशाख म्हणजे धोतर किंवा स्रीयांमध्ये साडी हे पोशाख असे होते अस एकवेळ आपण म्हणू शकतो पण टाईट जीन्स आणि तसाच टाईट शर्ट हे कसे शरीर रक्षण करणार आहेत ? त्या टाईट जीन्समुळेतर genitals ला कोणत्याही प्रकारे हवा पोहोचत नाही . या उलट धोतर किंवा साडी यामधून काही प्रमाणात का होईना वायुविजन नक्की होत . बाकी genitals च तापमान इतर शरीरापेक्षा काहीस जास्त असत आणि त्यांचे तापमान नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते . याच कारणासाठी पुरुषांचे वृषण शरीरापासून काही अंतरावर असतात . काही जीन्स ज्या टाईट फिट किंवा टच स्कीन असतात त्यात वृषणचकाय पण पेनिससाठीही पुरेशी जागा असते किंवा नाही हे सांगणे अवघड आहे . बाकी आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी कोणत्याही वयात सार्वजनिक ठिकाणीही ज्याचे कधीही erection झाले नाही असा पुरुष सापडणे अवघड आहे . आता ज्या जीन्समध्ये normal penis लाही जागा नसते तिथे अशा position मध्ये या महत्वाच्या भागाची काय हालत होत असेल हे सांगायलाच नको . या प्रायवेट पार्टसला इतक तुच्छ का लेखल जात हे खरच न कळणार आहे . हे भागच स्त्री पुरुषांना त्यांच्या उमेदीच्या काळात सर्वोच्च सुख आणि आयुष्यभर आणखी एक महत्वाचे काम करतात . ते किती महत्वाचे आहे हे ज्यांना कधी लघवी अडली गेली आहे व ती होत नाही तेंव्हा कळते . कोणी म्हणेल याचा संबंध आतील भागाशी आणि या पार्टस आधी असलेल्या पार्टसशी संबंधित आहे पण त्या पार्टसमध्ये काही बिघाड नसताना हे काम हा भाग इमाने-इतबारे करत असतो . आणि इथली infections तर काय त्रास देतात ते सांगायलाही नको पण असे असूनही या भागाची काहीही काळजी घेतली जात नाही . अजिबात जागा नसलेल्या कोंदट ठिकाणी एव्हढ्या जास्त तापमानात हे private part शिजून निघत असतात पण आपल्याला आपल्या स्टाईलच पडलेलं असत . या उलट धोतर साडी हे तस पाहायला गेले तर खालून उघडेच असतात आपल सेमी-नग्नतेशी नात सांगत आपल्या शरीराची मदतच करत असतात . आता कोणी म्हणेल कि कोर्पोरेट ऑफिसमध्ये धोतर घालून जावे काय ? आणि आपण गेलो तरी त्याला परवानगी मिळेल का ? यावर उपाय आपल्यालाच शोधायला हवा . अगदी साडीही परिधान करताना पोट आणि पाठ काही प्रमाणात उघडे राहतात आणि हेच काम करतात .

काही हॉलीवूड अभिनेत्री बेअर चेस्ट सीन करतात त्या उलट भारतीय अभिनेत्री कधी असे सीन करताना दिसत नाही (काही अपवाद वगळता ) . याला काय कारण असावे ? काही अभिनेत्री या डाएट आणि झिरो फिगरच्या अशा मागे लागतात कि त्यांच्या ब्रेस्टची पुरेशी वाढही होत नाही ( काही सन्माननीय अपवाद वगळून ) . मग ब्रेस्टला बाहेरून सपोर्ट वापरले जातात जेणेकरून ते योग्य प्रमाणात दिसावेत . आता बेअर सीनमध्ये या गोष्टीतर वापरता येणार नाहीत त्यामुळे सत्य समोर येऊ शकते . इथे कुणी असे सीन द्यावे अशी अपेक्षा नाही पण या कारणासाठी त्यांना हे करायला लागू नये असे वाटते . बाकी सस्तन प्राण्यांमध्ये स्री बाळाला स्तनपान करवते आणि पुरुषाला असे काही काम नसले तरीही त्याचे चेस्ट सपाट पोट आणि बरगड्याचा भाग या पेक्षा बरेच डेवलप असतात याला काही कारण नक्कीच असेल ना . कारण शरीर संबंधामध्ये जर स्रीचे स्तन आणि पुरुषाची काही प्रमाणात का असेन आपण मेद असलेली छाती कुशनसारखे काम करते . जर ते नसते तर एकमेकांच्या वजनाने आणि आवेगाच्या आलिंगनाने गुदमरण्याची स्थिती होऊ शकते .

इकडे सनी लिओनि आणि तत्सम नट्या आपले सुडौल शरीर दाखवत असतात . इथे म्हणण्याचा उद्देश हा नाही कि कोणी शरीर प्रदर्शन करावे किंवा कोणी ते करू नये . हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते त्यानेच ठरवावे . त्याचा तो हक्क आहे . बाकी याचा कोणावर काही आणि कसा परिणाम होईल याबाबत असे आहे कि बरेचसे किशोरवयीन याच मार्गाने आपले कुतूहल याच मार्गे शमवत आहेत . हा मार्ग चूक किंवा बरोबर हे ठरवण्याआधी याला दुसरा काही पर्याय आहे का हेही सुचवावे . अनेक ठिकाणी लैंगिक शिक्षणाला सरळ सरळ विरोध केला जातो आणि मग अशा मार्गे हे लोक आपल्याला आवश्यक माहिती मिळवतात . असे किती लोक आहेत जे समुपदेशनाच्या मार्गाने जाऊ शकतात .

बाकी अंघोळ करताना सगळे कपडे काढून ( दुर्दैवाने अनेकांना हे सुख मिळत नाही . बर्याच लोकांना एकतर उघड्यावरच अंघोळ करावी लागते किंवा इतकी चांगली सोय नसते कि सर्व कपडे काढावे , त्यांना अंतर्वस्त्रांसोबत अंघोळ करावी लागते आणि जमेल तसे private पार्टस clean करावे लागतात ) जेव्हा आपण नैसर्गिक अवस्थेत असतो तेंव्हा वाटणारी मोकळीक , relax वाटणे याला काय कारण असू शकते ? एका अभिनेत्रीने मला घरात नैसर्गिक अवस्थेत राहायला आवडते असे म्हटले होते . अगदी हे जाहीर करावेच असे नाही पण किमान काही प्रमाणात तसे राहून आनंद मिळवणे चांगलेच . तुम्हालाही असा आनंद जाणवतो का ? हा असाच आनंद इतरही बाबतीत नग्नता ( मोकळीक ) ठेवली तर नक्की मिळेल .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्ह चा धागा आठवला शिर्षक पाहून.

पुर्वीपासुन भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या भागात वस्त्रे तयार केली गेली, पण नंतर जागतिकीकरणाच्या रेट्यात वस्त्रांचे अगतिकीकरण झाले Sad

बरंच काही एकात एक झालंय खरं पण मी मात्र लो वेस्ट अघळ पघळ जीन्स घालतो आणि बंद बाथरूममध्ये नैसर्गिक अवस्थेत आंघोळ करतो. दोन्ही गोष्टी आनंद आणि कम्फर्ट देतात हे मात्र खरे. या लेखातील मुद्दा क्रमांक १ नैसर्गिक अवस्थेच्या जास्तीत जास्त जवळ जात जगणे हे मात्र पटले. बंद बेडरूममध्ये झोपत असल्याने तिथेही हा प्रयोग करता येऊ शकतो.

बाकी या बाबतीत कपडे नक्की का घालावे आणि का नाही हाही एक मुद्दा असू शकतो..

इथे कुणी असे सीन द्यावे अशी अपेक्षा नाही पण....

सनी लिओनि आणि तत्सम नट्या आपले सुडौल शरीर दाखवत असतात . इथे म्हणण्याचा उद्देश हा नाही कि कोणी शरीर प्रदर्शन करावे किंवा कोणी ते करू नये . हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते त्यानेच ठरवावे... >>>>

एक काही तरी नक्की करा. त्याप्रमाणे ठराव पास करा, आम्ही त्वरित अंमलात आणू. ही चळवळ यशस्वी होण्यासाठी आंदोलन उभारणार असाल तर सांगाल त्या चौकात, म्हणाल तसे येऊ. राष्ट्रीय कार्य आहे, आधी केलेचि पाहीजे.

<< आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे >> मला वाटतं जगातल्या जवळ जवळ सर्वच देशांत नग्नतेच्या
सार्वजनिक प्रदर्शनाबाबत पूर्वापार याच नजरेने पाहिलं जात असे. आतां जरी कांहीं देशात ही नजर बदलली /सुधारली /बोथट झाली असली, तरीही बर्‍याच देशात तसं झालेलं नसावं. त्यामुळे, हें कांहीं तरी आपलंच वेगळेपण आहे अशा दृष्टीने विचार न करतां, याबाबत वैश्विक विचारसरणी अशी कां घडली असावी, असा विचार करणं अधिक औचित्यपूर्ण व्हावं.

इथे अनेक विषयांची फक्त सुरूवात आहे यातील प्रत्येक विषयावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते

एक काही तरी नक्की करा >>> याला एकच एक उत्तर नक्कीच नसेल , इथ एखादी गोष्ट एखाद्याला फारच कॉमन वाटेल तेच दुस-याला अगदी अती वाटू शकते .
बाकी सार्वजनिक ठिकाणी आंदोलन फार पुढची गोष्ट आहे आधी वैयक्तिक आयुष्याततरी ब-याच जणांना स्वतःला कम्फर्ट वाटेल अस रहाता याव .

वैश्विक विचारसरणी अशी कां घडली
असावी, असा विचार करणं अधिक औचित्यपूर्ण
व्हावं.>>> भाऊ बरोबर आहे तुमच . आणि त्यापुढे बदलत्या काळानुसार या विचारसरणीत कसा बदल करावा याचाही विचार व्हावा

कुठल्याही यंत्राप्रमाणेच मानवी शरीर हे देखील [ इनपूट => प्रोसेसिंग => आऊटपूट ] या तत्त्वावर चालते. अर्थात यातले मेन डिजायर्ड आऊटपूट हे एनर्जी असते तर इतर पदार्थ हे वेस्ट मटेरियल असतात. थोडक्यात शरीरातून उत्सर्जित होणारे पदार्थ हे टाकाऊ आणि हानिकारक असतात. ह्या पदार्थांना दूर्गंधी इतरही नकोसे गुणधर्म असतात. शरीर प्रामुख्याने मल आणि मूत्र विसर्जित करते त्यामुळे आधी हे पदार्थ विसर्जित करणारे अवयव झाकणे याला संस्कृती समजले जाऊ लागले. पुढे महिलांकरिता दूधाचा उत्सर्ग करणारे म्हणून स्तनही झाकणे आले. यानंतर संपूर्ण त्वचाच (केस व नखे वगळता) घाम विसर्जित करते म्हणून सारे शरीरच झाकणे आले. तरी त्यातल्या त्यात काही किमान अवयवांना झाकण्यापासून सूट मिळाली ज्यात प्रामुख्याने दृष्टीज्ञान देणार म्हणून डोळे हे जगभर उघडे ठेवण्यास अनुमती मिळाली. त्यामुळे संपूर्ण शरीर बुरख्यात असणार्‍या महिलाही डोळ्यांच्या जागी एक फट ठेवू लागल्या. इतर प्रांतात त्या त्या संस्कृतीप्रमाणे चेहरा, तळहात, तळपाय इत्यादी अवयव झाकण्यापासून सूट मिळाली. भारतीय संस्कृतीत कदाचित उष्ण हवामानामुळे गळा, मान, पोटाचा बेंबीजवळील भाग व हाताचा कोपरापासून पुढील भाग इत्यादी अवयव उघडे ठेवण्यास मान्यता मिळाली.

दळणवळण व संपर्क वाढल्यावर जगातल्या एका भागातली संस्कृती दुसर्‍या भागात पोचली आणि संस्कृतींची सरमिसळ झाली. त्यामुळे सर्वच प्रांतात जवळपास प्रत्येक प्रकारच्या संस्कृतीचे लोक आणि लोण पोचले. यात ड्रेसकोडही आलेच. त्यामुळे कोणी किती आणि काय झाकावे हा ज्याचा त्याचा किंवा जिचा तिचा वैयक्तिक प्रश्न झाला. समस्या आता इतकीच की आपण ज्या प्रांतात आहोत तिथल्या बहुसंख्यांपेक्षा आपला वेश वेगळा असेल तर इतरांकडून भुवया उंचावल्या जातात (किंवा याहूनही गंभीर प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकतात). आपल्या ड्रेसिंगसह आपण कंफर्टेबल आणि इतरांच्या प्रतिक्रियांना झेलण्याइतके बलवान असल्यास फिकीर नाही. तसे नसेल तर मात्र ड्रेसिंगविषयी पुनश्च विचार गरजेचा ठरतो.

तस मला म्हणायचं खूप काही असत पण माझ्या मते वाचकांनी त्यांच्या आयुष्याच्या संदर्भातून या लिखाणाचा अर्थ घेतला तर तो त्यांना फार रीलेट होईल .
इथे काही विषय एकत्र घेतले आहेत ज्यावर स्वतंत्रपणे विचार करता येऊ शकतो .
मी या विषयांवर लिहीणार आहे स्वतंत्रपणे पण आधी थोडीशी पूर्वकल्पना किंवा टिजर म्हणा हवतर .

सकुरा फोटोवर नाही कमेंट करू शकत . फोटोमधे बरेच विषय आलेले आहेत आणि त्यांचा आवाकाही फार मोठा आहे . त्यांची स्वतंत्र चर्चा होऊ शकते .

1.त्यामुळे कोणी किती आणि काय झाकावे हा ज्याचा त्याचा किंवा जिचा तिचा वैयक्तिक प्रश्न झाला

2. आपल्या ड्रेसिंगसह आपण कंफर्टेबल आणि इतरांच्या प्रतिक्रियांना झेलण्याइतके बलवान असल्यास
फिकीर नाही. तसे नसेल तर मात्र ड्रेसिंगविषयी
पुनश्च विचार गरजेचा ठरतो.>>>

या दोन गोष्टींमधील फरकामुळेच तर हे सगळे प्रश्न उभे राहीले आहेत .

सुरूवात कुठून करावी
तसा काही फार फरक पडत नाही मराठी मनाला.
वाट्टेल तो विषय असला तरी, स्वतःला कशाहिबद्दल काहीहि वाटत असेल तरी ते लिहायचे - मग आपोआप वादविवाद (ज्याला काही लोक "चर्चा" म्हणतात) होतातच. मग सुरुवात कुठून नि शेवट काय हा प्रश्न उरतच नाही.
एकदम अध्यात्मिक अनुभव - एकदा नामस्मरणाची गोडी लागली की बाकी सर्व निरर्थक वाटू लागते तसे.
एकदा चर्चा असे म्हणा - की लग्गेच सुरुवात. शेवट, विषय वगैरे गोष्टी महत्वाच्या नाहीत,
केवळ बोलणे, लिहिणे.
काय कसे केंव्हा, कशाबद्दल याला महत्व नाही.
Happy

A naked and drunken woman boards a taxi in New York one night.

Mr. Africa, the driver keeps staring, and does not start the taxi.

Woman: “Haven't you ever seen a naked woman before?”

Driver: No Madame.....“I’m not staring at you lady…..................

I'm just wondering where have you kept your money to pay me"

तात्पर्यः- नग्न असणे म्हणजे कफल्लक असणे. थोडक्यात सार्वजनिक ठिकाणी नग्नता ही प्रतिष्ठेला मारकच.

पहाटे उठून नामस्मरण करावे. स्नानादि कर्मे उरकून अर्ध्य द्यावे. यथायोग्य दानकर्म करावे. मोह, माया आदि षडरिपूंवर विजय प्राप्त करण्यासाठी ध्यान करावे. मनःशांतीसाठी ध्यान उत्तम असते. मनावर आणि विकारांवर विजय मिळवावा. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करतो त्याप्रमाणे विकारांना दूर सारून विचार कमवावे.

.

विषय नविन आहे
निदान कुणितरी तरी
अश्याविषयावर
लिखाण केलयं

ट्रेलर होता ना

मग बनवा की मुव्ही
आम्हीही सहभाग घेऊच

""पुलेशु""
या शब्दाचा अर्थ काय सांगाल का कुणीतरी

Pages