मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 May, 2016 - 18:29

सुरुवात माझ्यापासून करतो

माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.

*1) जात*

प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?

मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.

तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.

त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.

पण आज अडचण मात्र वाटतेय.

कारण लवकरच ही जात माझ्या लग्नाच्या आड येणार आहे.

जर आमच्या दोघांपैकी कोणी एकाने दुसर्याची जात कागदोपत्री स्विकारली किंवा दोघांनी तिसरीच जात लावली तर ही अडचण सुटण्यास मदत होईल.

समाजमान्यतेनुसार वर असलेल्या जातीतून खाली असलेल्या जातीत जाणे सोपे पडेल की व्हायसे वर्सा सोपे पडेल?

कृपया धर्मांतराचा सल्ला देऊ नका. कारण मी नास्तिक असलो तरी गर्लफ्रेण्ड आस्तिक आहे आणि तिला देव बदलायचा नाहीये.

तळटीप - एखादा सल्ला मस्करीत दिला तर तसे नमूद करा अन्यथा तुमचा एक मजेचा सल्ला आमचा जीव घेऊ शकतो.

*2) पत्रिका*

पत्रिकेत काहीसे 34-36 गुण जुळवायचे असतात. आमचे दहाबाराच की काहीसे बरेचसे कमीच जुळताहेत. याऊपर कसलेसे विघ्नही आहे ज्यानुसार आमचे लग्न झाल्यावर पाच वर्षांच्या आत एकाचा अपघाती मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे तेव्हा समजले जेव्हा आमचे लग्न करायचे नक्की झाल्यावर आम्ही बाहेरच्या बाहेर पत्रिका चेक केली. आमचा दोघांचा यावर विश्वास नसल्याने आम्ही मागे नाही हटणार, पण दोन्ही घरचे लोक पत्रिका बघण्यावर विश्वास ठेवणारे आहेत त्यामुळे ते आम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत.

हा गुंता कसा सोडवावा. नकली पत्रिका बनवून घरच्यांना अंधारात ठेवावे की त्यांना खरे खरे सांगून आपल्या प्रेमाचे भविष्य अंधार्या खाईत लोटावे..

*3) घर (मुंबईत घर)*

सध्या जे मुंबईत घर आहे ते आईवडिलांचे आहे. लग्नानंतर लवकरच स्वत:चे घ्यायचा विचार आहे. किंबहुना ते बूक करून मगच लग्न करायचे आहे.
सध्याच्या आकडेमोडीनुसार दोघांचे पगार आणि बचत जोडून 55-60 लाखापर्यंत घराचे बजेट जातेय. एखाद्या छोट्या शहरात ही रक्कम मोठी वाटू शकली असती. पण मुंबईत वन बीएचके मिळायचे वांधे झाले आहेत. आणि एकीकडे मराठी माणसांनो मुंबईबाहेर पडू नकाचे नारे लावले जात आहेत.
खरे तर मलाही मुंबई सोडायची नाहीयेच. पण आता पन्नास साठ लाख खर्च करून काय मुंबईच्या वन रूम किचन मध्ये लोअर मिडलक्लास बनून राहायचे का? आणि अश्या पोराला आपली पोरगी द्यायला कोणता बाप तयार होईल? माझ्या गर्लफ्रेंडचे वडील तयार होतील का हा प्रश्नच आहे.

____________________________________

असो....

तर या माझ्या प्रेमविवाहात असलेल्या तीन अडचणी आहेत. कमी अधिक प्रमाणात या तीन किंवा ईतर अडचणी (आपापल्या परीने भर टाका) मराठी मुलांच्या प्रेमविवाहात असतात. त्या सर्वांची सांगोपांग चर्चा करायला हा धागा. इथे तुम्ही एका मराठी मुलाचे किंवा मुलीचे पालक म्हणूनही चर्चेत भाग घेऊ शकता. चर्चेचा फायदा सर्वांनाच.

आपला नम्र,
नवतरुण ऋन्मेष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाडाशी लग्न लावायचा उपाय युनिवर्सल दिसतोय. आम्हाला देखील सुचवण्यात आलेला. मी म्हणालो, लहानपणी तुळशीशी लग्न झालेय. पण ते चालणार नाही म्हणाले. कदाचित तेव्हा मी नाबालिक असल्याने असेल. उगाच तक्रार केली तर गोत्यात येऊ म्हणून मी सुद्धा वाद वाढवला नाही. मग त्यांनी 30-35 चे बजेट दिले त्या पिंपळविवाह विधीचे. आम्ही ओके म्हणून उठलो.

मी अनु, सहमत
असा छुपा छळ होणार असेल तर त्याला स्विकारणे नाही बोलू शकत. बरेचदा जवळच्या नातेवाईकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारली जाते. अश्यावेळी नवरा बायकोला बोलतो की त्याच्या आईवडीलांनी एवढ्या मोठ्या मनाने आपल्या लग्नाला परवानगी दिली हेच आपले नशीब समज.
असे उदाहरण एका जवळच्या मैत्रीणीचे सध्या ऐकतोय. यात आपल्या नवर्याचा नाईलाज(?) आहे हे देखील तिने मोठ्या मनाने स्विकारले आहे. प्रेम लाचार करते तेव्हा खरेच वाईट वाटते..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जातीअंतासाठी राज्यात आंतरजातीय विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाईल. अशा दांपत्यांना अडीच लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यांच्या अपत्यालाही नोकरीसाठी आरक्षण देण्याचा विचार सुरु असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. 

_>>>>>>

कापोचे छान बातमी दिलीत.
अडीज लाखाची सोय झाली.
आता घरून हाकलले तर तडक हे अडीज लाख उचलेन आणि घराचे डिपॉजिट, आणि सोफा-बेड, खुर्ची-फर्निचर, टीवी-फ्रिज वगैरे जमवून टाकेन.
जर घरच्यांनी हाकलले नाही तर या योजनेचा लाभ न घेता गरजूंसाठी राहू देईन.

भटजी, मेकॅनिक, विमा एजंट यांचे काम तुम्हाला घाबरविणे आणि तुम्हाला खर्चात पाडणे. Happy ( दुसरीकडे कुठे बोलत असलो कि मी यात डॉक्टर आणि वकील पण गोवतो, पण माबोवर अशी रिस्क घेऊ शकत नाही :डोमा:)

देवाने सद्सदविवेक बुद्धी दिली आहे त्याचा जमल्यास वापर करावा.

'तडक' हे अडीज लाख उचलेन >>>>>>
तडक???? गमतीत लिहिले आहेस मान्य आहे पण तरीही....

बाळ आधी त्याला काय काय कागदपत्र लागतात ते पाहिले आहेस का ? तिथं तडक काही मिळत नाही. शिवाय नुसता आंतरजातीय विवाह असून चालत नाही. सवर्ण-मागासवर्गीय असावा लागतो. दोघेही सवर्ण असतील तर चालत नाही. असे ऐकून आहे.

ऋन्म्या, लेका ईतकं टेंशन होतं दोन्ही घरून तर गोत्र पाहून गर्लफ्रेंड पटवायची ना Proud

एक धागा काढायचास ना आधी...... तुमचे गोत्र काय????
अजूनही काढ..... पुढच्यास ठेच मागचे (वाचून) शहाणे होतील Wink

मानस्मी यांनी लिहिल्याप्रमाणे आधी प्रत्येक व्यक्तिगत गॊष्टीसाठी धागा काढणे थांबव.
जरी इथले लोक प्रेमाने सल्ला देत असले तरी कुठे थांबावं हे कळायला पाहिजे.
चौकात उभे राहून येनाऱ्या जाणार्याला रुमाल कुठला घेऊ, बनियन कुठला घेऊ इथपर्यंत विचारणे ठीक पण अति पर्सनल प्रश्न ओळखीतल्या लोकांनाच विचारावेत.

तूझ्र तिन्ही मुद्दे गौण आहे ( घरच्यांची मते गौण आहे किंवा ते आहेत असे नाही ) अडचणी येतातच. दोघांनी एकमेकांच्या साथीने त्यातून मार्ग काढायचा असतो. तूम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा.. आता माघार नाही !!

तूम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा.. आता माघार नाही !! >>> अहो दिनेशदा, रोखा त्याला ! नाहीतर त्याची बायको आपल्याला जिवंत सोडणार नाही....

मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी......

ते मराठी आहेत हीच खरी अडचण.....बाकी काय नाय !!!!!!!!

भुंगाजी आता हे गोत्र नि काय भानगड असते? जात आणि पत्रिकेच्या पलीकडचे आणखी काही असते का?

या जात, पात, प्रांत, धर्म, गोत्र, टंगळ, मंगळ वगैरे गोष्टी एका कार्डावर लिहून अविवाहीतांनी ते कार्ड गळ्यात टांगायचा हेल्मेट सक्तीप्रमाणे सरकारी नियम का नाही बनवत? कित्येक अपघात टळतील..

आशूचॅम्प,
रुमाल धागा गंमतीचा होता.

अश्या प्रश्नांबाबत मात्र काहीवेळा जवळच्या सर्वांनाच सांगायची सोय नसते. तसेच काही लोकांची मते आणि सल्ले पार्शिअल वा विशिष्ट हेतूतून आले असण्याची शक्यता असते.
सोशल प्लॅटफॉर्मवर जिथे कोणी आपल्या वैयक्तिक ओळखीचा नसतो तिथे लपवाछपवीची भिती नसते तसेच विविध अनुभवांतून आलेले सल्ले मिळतात.
शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे लक्षात राहू द्यायचे. रोचक प्रतिसाद तेवढे वेचणे आणि खोचक प्रतिसादांचा आपल्या निर्णयावर परीणाम होऊ न देणे एचढे जमले की झाले Happy

@ दिनेशदा, धन्यवाद.
आणि हो, प्रेम आणि आयुष्यभराचा जोडीदार एके बाजूला ठेवल्यास त्यासमोर हे मुद्दे गौण आहेत. पण हेच मुद्दे प्रत्येक प्रेम विवाहात कमीअधिक प्रमाणात अडता घालतात. बाकी माघार घ्यायची नाहीयेच हा विश्वास आहे आणि त्यातूनच हा धागा काढायची हिंमत आलीय Happy

प्रेमविवाह करण्याची खूपच इचछा आहे. मुलगी मिळत नाही.
ही एक मोठी अडचण आहे.
मराठी मुलांना मुली भाव देत नाहीत. (ए भावा मात्र म्हणतात...

ऋन्मेश, तु ऐसेच सवाल पुछकर सबके दिमाग का दहि बना डाल लेकिन आखिरमे तेरेको जो सहि लगता है वोइच कर, भिडु; बाकि सब जानेदे, तेल लगानेको...

ऋन्मेषः इतक्या सगळ्यांशी बोलणं झालं की एकदा आपल्या आईवडिलांशी सुद्धा बोल. इतके वाईट नसतात रे ते. शांत पणे समजाऊन सांगितलंस तर ते सुद्धा तयार होतील. कदाचित लगेच नाही, पण होतील तयार.
कोणत्याही परिस्थितीत त्यांना किंवा सासू-सासर्‍यांना दुखावू नकोस.

तुझ्या जात, धर्म, पत्रिका या सगळ्यांमुळे त्यांना पटवणं कठिण आहे, पण अशक्य नाही. शेवटी कितीही झालं तरी ते तुझे आई-वडिल आहेत. तुटेपर्यंत ताणणार नाहीत.

बघ पटतय का.

पण ऋन्माला खरी काळजी त्याचा जिवाची पडली आहे, पत्रिकेत दाखवलेला दोषाची...

त्याची लेखनशैली बघता तो त्याचा आईवडिलांना आणि होणार्या सासुसासराना लगेच गुंडाळू शकतो..
म्हणजे होकार मिळवू शकतो.. Wink

ऋन्मा.. हे जग अजून भविष्य आपल्याला माहिती नाही म्हणूनच चाललं आहे.. इतका जीवाला घाबरु नको..
लग्न कर नाहीतर आयुष्यभर दुखी राहिल..निर्णय चुकीच घेत्ला म्हणून... जे होणार आहे ते होणारच.आपण फक्त निमित्त आहोत...त्यामुळे जिकडे तुला निर्णय घेण्याची मुभा आहे तिकडे निर्णय घे..नियतीवर अवलंबून राहू नको..

मी यावर सल्ला देणे किंवा काही सुचवणे म्हणजे फार हास्यास्पद होईल. कारण मी आणि माझा नवरा म्हणजे अक्षरशः ठरवुन प्रेमात पडुन लग्न केलय, लव कम अ‍ॅरेंज्ड वगैरे वगैरे.
तरी काही गोष्टी सांगते.
१) जात आणि पत्रिका या गोष्टी बदलु नका आणि आई-वडिलांना अंधारात ठेवु नका. साधारण तुम्हाला तुमचे लग्न व्हावे असे वाटत असेल त्याच्या किमान १ वर्ष आधी तरी घरी कल्पना द्या. कारण तेवढा वेळ आई-वडील घेउ शकतात.
स्वतःच्या मतावर ठाम रहा. शांतपणे आणि प्रेमाने, आणि महत्वाचे म्हणजे संयमाने आपले म्हणणे पटवुन देणे हेच तुमच्या हातात आहे. तुमचे सुख कशात आहे, अर्थातचं जो जोडीदार निवडला आहे त्याच्यांतले इतर गुणविशेष पटवुन देणे हेच करत रहा.
आम्ही दोघही इतर कोणाशीही लग्न करणार नाही आणि पळुनही जाणार नाही हे एकचं वाक्य ठेवा.
काही घरांमध्ये अगदी सुरुवातीला, आई वडीलांनी आत्महत्या करण्याच्या धमक्या देणे, आयुष्यभर बिनलग्नाचे रहा असे सांगणे, असे खुप टोकाचे विरोध मी पाहिलेले आहेत. जे हळु-हळु मवाळ होतात.बाकीच्या गोष्टी जसे लग्नानंतर नातेवाईकांचे टोमणे वगैरे हे केवळ दुर्लक्ष करण्यासाठी असतात, आणि चांगले सासु-सासरे ( दोन्ही घरचे ) होणे हे माणसाच्या मुळ स्वभावनुसार घडणारचं.

२) घर हा खुप मोठा विषय आहे. उद्या लिहीते.

कदाचित मी लिहिलेला प्रतिसाद अगदीचं निरुपयोगी वाटेल पण सुचलं ते सांगितलं.

बा ऋण्मेशा, बरे केलेस स्वतः चे स्वतःच जुळवून आणलेस. आता एवढ्या-तेवढ्या वरून वेळ वाया घालवू नका. नाहीतर लग्नाच्या घोडेबाजारात असे हाल होतात.

माझ्या वैयक्तिक उदहरणावरून सांगतेय
तुला /तुम्हाला बहिण किंवा भाऊ नाहिये का?माझ्या भावाचाहि असाच प्रोब्लेम आहे.मुलगी स्वभाव,दिसणे,नोकरी व स्वयंपाक यात छान वाटत आहे(आईला पटवण्यासाठी इतके तरी गुण must आहेत).भावाने आईला पटवण्याची जबाबदारी मला दिली आहे.पण मी शॉर्टकट मारत आधी बाबाना पाटवलेय.
आई परधर्मातली मुलगी चालणार नहिएच यावर ठाम आहे पण मी हळू हळू बाबां थ्रू खिंडार पाडतीये.नवर्याला पण हाताशी घेतले आहे
so बघ/बघा असा काही भुयारी मार्ग काढून..

मी आदि, आज पहिल्यांदा मला मी एकुलता एक असल्याचा एवढा त्रास झाला Happy
पण माझ्याकडे एखादा वयाने लहान मामा, काका, वा माझ्याच वयाचा चुलत मावसभाऊ कोणीही या कॅटेगरीतील नाही जो ही कामगिरी बजावू शकेल .. बेटर लक पुढच्या जन्मात ऋन्मेष ..
पण सल्याबद्दल धन्यवाद, उपाय कामाचा होता. ईथे पडला फुकट नाही जाणार, दुसरा कोणीतरी वापरेल Happy

मुग्धा केदार,
<<< आम्ही दोघही इतर कोणाशीही लग्न करणार नाही आणि पळुनही जाणार नाही हे एकचं वाक्य ठेवा. >>>
हे वाक्य नक्कीच निरुपयोगी नाहीये Happy

पळून जायला तसेही ना मला जमणार, ना घरातून मला हाकलायला माझ्या आईवडिलांना जमणार .. सारा भावनिक गुंता आहे ईथे

@ विलभ, तुमची लिंक नंतर वाचून त्यावर बोलतो .. आता थोडी उघडायला गंडतेय

ठीक आहे
रच्याकने 'एकुलत्या एक मुलांचे प्रॉब्लेम' हा देखील एक चर्चेचा मुद्दा होउ शकतो :D:D
ह.घ्या.पण मला मात्र तुमचे लेख कम विषय आवडतात हं

अरे अख्ख्या मायबोलीला माहीत आहे की त्याचं लग्न झालंय, त्याला एक मुलगी आहे... तिकडे दुसर्‍या धाग्यावर तिच्या बाललिलांचं कौतुकही करताय आणि तरीही इथे लग्न कसं करावं याचे सल्ले देताय
Lol
जय मायबोली Rofl

मी आदि,
एकुलत्या एक मुलाचे प्रॉब्लेम यावर लिहायचे माझ्याही डोक्यात घोळत होते बरेच दिवसात. आपली पोस्ट वाचून आता इथे रिप्लाय न देता लिहूनच काढूया ठरवले. काल मुहुर्तही काढलेला. पण सुरुवातीच्या दोनचार ओळींतच सेंटी व्हायला झाले. माझ्या नेहमीच्या शैलीच्या काहीतरी विपरीतच लिहू लागलो.. मग थांबलो !
पण पुन्हा कधीतरी नक्की.. हा शब्द देतो.

लवकरच लिहा ऋन्मेष
माझ्या मुलीचेही 'एकुलती लेक असण्याचे प्रोब्लेम 'मला तिने सांगायच्या आधीच कळतील

{{{ साती | 22 May, 2016 - 14:48

मराठी मुलाशी लग्न करण्याचा अनुभव नसल्याने स्वानुभवाचा सल्ला देण्यास असमर्थ आहे रे ऋन्मेष. }}}

त्याला तसेही (इथे या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे) मराठी मुलाशी नसून मुलीशी लग्न करायचे आहे.

{{{ वर फक्त मला एवढीच शंका आहे की प्रेमविवाहात पत्रिका का बघू नये? तेव्हा ती का निष्क्रिय वा निरुपयोगी होते? यामागे काय लॉजिक आहे? प्रेमात खरेच एवढी ताकद असते की ग्रह तार्यांची दिशा बदलावी }}}

कालच्या एका घटनेने ऋन्मेषच्या या धाग्याची आणि त्यातही विशेषतः या प्रतिसादाची आठवण झाली.

काल आम्ही सारे कुटुंबीय बाहेर फिरायला गेलो असता माझ्या धाकट्या नातवाला भूक लागली. तो हातगाडीवरील वडापाव खायचा हट्ट करू लागला. त्याची आई (म्हणजे माझी लेक) जंक फूड खाऊ घालायच्या विरोधात असल्याने तिने त्याला वडापाव ऐवजी एक मोठा द्रोण भरून जांभूळ घेऊन दिले. घरी जांभूळ, अंजीर, द्राक्षे अशी फळे आणली की ती चांगली तासभर एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तास भिजवून, स्वच्छ धूवून मगच आई खायला देते हे आठवून "आता हे जांभूळ धुतल्याशिवाय कसे खाऊ?" असा प्रश्न नातवाने विचारला. त्यावर "आता आपण बाहेर आहोत ना? इथे पाणी मिळत नाहीये तर मग हे असेच खा." असे उत्तर त्याच्या आईने दिले. तेव्हा मग "घरी जांभूळ आपण धुवून खातो, न धूता तू एकही जांभूळ खाऊ देत नाहीस मग बाहेर असं कसं? पाणी नसल्याने जांभूळ धूता येत नसतील तर मग त्यापेक्षा वडापावच खातो ना" हा त्याचा युक्तिवाद. त्यावर "आता खरंच भूक लागली असेल तर पटकन जांभळं खा नाहीतर माझ्या हातचे दोन रट्टे खा पण वडापाव मिळणार नाही." ह्या अंतिम निर्णयानंतर तोंड वाकडे करीत त्याने ती जांभळे संपविली.

घरी जरी आपण फळे धुवून खात असलो तरी आणिबाणीच्या क्षणी बाहेर मोठे भांडे, पाणी याची उपलब्धता नसताना फळे न धुता खावी लागणे ही अगतिकता असते. ती तशीच खाल्ल्याने होणार्‍या नुकसानीपेक्षाही जंक फूड खाल्याने होणारे नुकसान जास्त असते हे समजण्याइतक्या वयात अजून माझा नातू नाहीये.

अ‍ॅरेंज मॅरेजमधे तसेही मुलगा व मुलगी यांचे मन एकमेकांत गुंतलेले नसल्याने आधी पत्रिका पाहिली जाणे हा सोपस्कार पार पाडला गेला आणि त्यात नकारार्थी उत्तर आले तरी काही बिघडत नाही. परंतू प्रेमविवाहात आधीच मुलामुलींचे मन एकमेकांत गुंतले असल्याने पत्रिका पाहता न येणे ही अगतिकता असते कारण नकारार्थी उत्तर आल्याने विवाह होऊ न दिल्यास होणार नुकसान पत्रिका न जुळल्याने होणार्‍या तथाकथित संभाव्य नुकसानीपेक्षा जास्त धोकादायक असते.

हे ऋन्मेषला लवकरात लवकर समजून घ्यावे लागेल कारण ऋन्मेषचे वय दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत जाते आहे (जे मी मागेच एका धाग्यावर सिद्ध करून दाखविले होते) एकदा का ते माझ्या नातवाच्या आजच्या वयाइतके झाले की त्यालाही ही अगतिकता समजून घेणे अशक्य होईल.

Pages