मी मारलेल्या एकूण माश्या

Submitted by जव्हेरगंज on 20 May, 2016 - 12:01

मी मारलेल्या एकूण माश्या
सत्तावीस
मोजण्यात खूप वेळ जातो

खिडकीचा एक ग्रील तुटला आहे
त्याच्या जरासं खाली
एक झुरळ फिरते आहे
बघण्यात खूप वेळ जातो

कंटाळा आल्यावर मी
एखादी कविता लिहायला घेतो
शब्द?
शोधण्यात खूप वेळ जातो

आरसा फुटलाय माझ्याकडचा
रोज उठून कोण बघणार त्यात?
साला,
जगण्यात खूप वेळ जातो

आयुष्य !
ही तर एक शिक्षाच आहे
भोगण्यात खरंच खूप वेळ जातो

-जव्हेरगंज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्चं!
कुठल्या राज्यात रहाता?
कर्नाटकात अश्या माश्या मारण्याचे पैसे मिळतात हे मायबोलीवरच्या अर्ध्या लोकांना माहित आहे.
Wink

मी काढलेले एकूण धागे
एकशे सत्तावीस ?

असतील कदाचित.. कोण बसलंय इथे मोजायला
मी एकशे अठ्ठावीसावा काढला

चष्म्याची एक काडी तुटली आहे
त्यामागच्या डोक्यात एक किडा वळवळतो आहे

तोच कागदावर उतरवत
मी आणखी एक धागा काढला

कंटाळा आला म्हणून लोकांनाही बोर करायला
एक विडंबन घेतले लिहायला

नवीन धागा?
लोकं मारतील म्हणून मंग यातच लिव्हला

तात्पर्य:
लईच फालतूचा टाईम Wink

जव्हेरगंज, उत्तम!! बाय द वे, माश्या मारायच्या कंटाळा आला तर साहित्य प्रसवणे सोडुन सद्यः परीस्थितीवर एखादा धागा पाडा. Wink

ऋन्मेष, तू तर भारीच लिहिलंयस. Lol

जव्हेरगंज आणि ऋन्मेऽऽष दोन्हीही मस्त...+१

कविता थोडीशी बदलली आहे..
पण कोण वाचणार
विचार करण्यात वेळ जातो Light 1

जव्हेरगंज

मि तुमच्या लेखनाचि खुप मोठि फ्यान आहे, तुमचे सगळे लेखन मला खुप आवडते हि कविता पन खुप आवडेश.
असेच लिहित रहा, ओफिस मधिल थोडा वेळ छान जातो.