Submitted by वैभव फाटक on 17 May, 2016 - 06:37
पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला
पुन्हा हृदयात हाहाकार ठरलेला
करावी तू स्तुती माझी, तुझी मीही
तुझ्यामाझ्यात हा व्यवहार ठरलेला
किती साच्यात आयुष्यास ओतावे
तरी घेईच ते आकार ठरलेला
निघाला दूर लाचारी कराया तो
बिचारा एकटा लाचार ठरलेला
दिसू शकणार नाही सर्व डोळ्यांनी
दिव्याखाली सुधा अंधार ठरलेला
कितीवेळा पुढे मी ठेवले पेढे
विसरला देव भ्रष्टाचार ठरलेला
वैभव फाटक (१६-०५-२०१६)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा देवाचा शेर नीट समजला नाही
वा
देवाचा शेर नीट समजला नाही पहिल्या वाचनात पण गझल छान आहे अगदी
मतला, आकार...लाजवाब ! गझलही
मतला, आकार...लाजवाब !
गझलही !!
धन्यवाद !
अनेक शेर आवडले..
अनेक शेर आवडले..
किती साच्यात आयुष्यास
किती साच्यात आयुष्यास ओतावे
तरी घेईच ते आकार ठरलेला
निघाला दूर लाचारी कराया तो
बिचारा एकटा लाचार ठरलेला<<< सुरेख शेर! (सुलभतेसाठी घेईच ऐवजी घेतेच वगैरे सुचले)
वैभव जी गझल खुप आवडली . आणि
वैभव जी गझल खुप आवडली . आणि हा शेर तर खुप छान ।।।म वाँ।।।
किती साच्यात आयुष्यास ओतावेतरी घेईच ते आकार ठरलेला
मस्त मस्त वैभव आवडलीच....
मस्त मस्त वैभव आवडलीच....
सर्वांचे मनापासून आभार. बेफि
सर्वांचे मनापासून आभार.
बेफि जी, होय घेतेच शब्द जास्त सुलभ वाटतोय.
वा छान गझल आकार मस्त शेर
वा
छान गझल
आकार मस्त शेर
वा, सुरेख गजल .....
वा, सुरेख गजल .....
किती साच्यात आयुष्यास
किती साच्यात आयुष्यास ओतावे
तरी घेईच ते आकार ठरलेला
निघाला दूर लाचारी कराया तो
बिचारा एकटा लाचार ठरलेला
>>> सुरेख शेर...
किती साच्यात आयुष्यास
किती साच्यात आयुष्यास ओतावे
तरी घेईच ते आकार ठरलेला ................ वा !
अनेक धन्यवाद.
अनेक धन्यवाद.
सर्वच आवडले शेर...! शेवटचा तर
सर्वच आवडले शेर...! शेवटचा तर स्पेशल वाटला.
-दिलीप बिरुटे
मस्त गजल...!
मस्त गजल...!