Submitted by नानुभाऊ on 13 May, 2016 - 00:51
...की गझल होते!
जीवनाशी सूत जुळले की गझल होते
अंतरी या दुःख रुळले की गझल होते!
नेमका माझ्या घरा आधी तिचा रस्ता
पाय आपोआप वळले की गझल होते!
वेगळा मिसराच असते ओळ कुठलीही
जे नको ते शब्द गिळले की गझल होते!
धावणे तर शिकवले जातेच सर्वांना
थांबण्याचे तंत्र कळले की गझल होते!
हे सुखाचे धूत वस्त्रासारखे जीवन
वेदनांनी खूप मळले की गझल होते!
घाट देहाचा तिच्या, घसरी नजर माझी
देखणे अपघात टळले की गझल होते!
मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते!
- केतन पटवर्धन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा सुरेख! अनेक शेरांमधील
वा वा सुरेख! अनेक शेरांमधील खयाल छान! अलामतीतील सूटही नियमाप्रमाणेच! माझ्या 'शब्द आले की गझल होते असे नाही' ह्या गझलेची आठवण झाली हे सांगायचा मोह आवरला नाही. अर्थात, दोन्ही गझलांचा अर्थाअर्थी संबंध नाहीच.
वाह वा! सुरेख! कित्येक
वाह वा!
सुरेख!
कित्येक दिवसांनी प्रत्येक द्विपदी आवडली अशी गझल वाचली.
बहोत बढ़िया !!
बहोत बढ़िया !!
सुरेख गझल !!
सुरेख गझल !!
माझ्या 'शब्द आले की गझल होते
माझ्या 'शब्द आले की गझल होते असे नाही' ह्या गझलेची आठवण झाली हे सांगायचा मोह आवरला नाही. >>>
बेफी जी.. तेच आमच प्रेरणास्थान! _/\_
साती, सुप्रिया जी आभार!
अतिशय सुंदर गजल ...... मी
अतिशय सुंदर गजल ......
मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते! >>>>>>>>> विशेष आवडले ....
सुरेख…जवळ जवळ सगळेच शेर मस्त…
सुरेख…जवळ जवळ सगळेच शेर मस्त…
मस्त केतनजी. तुमच्याकडून ही
मस्त केतनजी. तुमच्याकडून ही गझल प्रत्यक्षात ऎकायला ही मिळाली आहे .
धन्यवाद
खुप च आवडली. सुरेख !
खुप च आवडली. सुरेख !
वा नानुभौ वा
वा नानुभौ वा
अतिशय सुंदर .........
अतिशय सुंदर .........
धन्य! आज माझ्या जीवनाची गझल
धन्य! आज माझ्या जीवनाची गझल झाली.
नेमका माझ्या घरा आधी तिचा
नेमका माझ्या घरा आधी तिचा रस्ता
पाय आपोआप वळले की गझल होत
घाट देहाचा तिच्या, घसरी नजर माझी
देखणे अपघात टळले की गझल होते!
मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते!
>>>
आहाहा! जियो मेरे दोस्त
ही गझल ऐकायला आवडेल मला तुझ्या आवाजात
धावणे थांबणे .... सुंदर
धावणे थांबणे .... सुंदर
सुरेख
सुरेख
वाचायला मिळाले जर छानसे असे
वाचायला मिळाले जर छानसे असे की गझल होते
मी स्वतःवर शेर केले की गझल
मी स्वतःवर शेर केले की गझल रूसते
मी मला पुरते वगळले की गझल होते! ....... नानूभावू आपने तो कमाल कर दिखाया ..............
Thanks Everyone!
Thanks Everyone!
वा
वा
धावणे तर शिकवले जातेच
धावणे तर शिकवले जातेच सर्वांना
थांबण्याचे तंत्र कळले की गझल होते! >>+१