काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे अजुन पन्च इन्/पन्च आउट नसेल. सकाळी एकदा सही केली मस्टरवर की दुपारी कोण बघतय किति वाजता गेलं ते Sad

ते शिकवण्या आणि त्या मुलांसमोर रोज भांडण आता पुढचे काही एपिसोडस दाखवू नयेत.

आता मुलांच्या शिकवण्यांबरोबर मोजोंची शिकवणी अस असेल पुढचे काही एपिसोड्स. मग त्यात मुल काकांना काही येत नाही म्हणुन फिस्स्कन हसणार, त्यांना आळीपाळीने शुगो, शिव, आजी गप्प बसवणार अस चालु राहील.

खुप छान सिरियल... मी कधी न वळणारी मराठी सिरियल कडे आता हि पाहु लागलेय.. पण गौरी नुसता ठोकळा आहे.. चेहर्‍यावर काहिच हावभाव नसतात तिच्या.

आजच्या एपिसोड मधे मोजो मस्त हिंदी मधे निबंध कम भाषण देणार आहेत आपल्या मुलीवर..

सेंटी एपिसोड आहे.. रडताना दाखवले सगळे

गुरु शिवजी पण होते सिन मधे.. Wink

प्रोमोजमध्ये बघून गौरी एवढी ठोकळा असेल असं वाटलं नव्हतं मात्र. पार पचका केला तिने. शिवचा अभिनय सहज-सुंदर त्यामुळे अजूनच जाणवतं तिचं.

काय बिघडलं वहिनीने नणंदेला काॅफी करायची ऑर्डर सोडली आणि नणंदेने ती निमूट ऐकली तर? नणंदेला धाकटी बहीण मानायची शिकवण वहिनीने तिचे सगळे लाड पुरवावेत, हौसेने लग्न करून द्यावं म्हणूनच का फक्त? नणंदेनेही वागावं मग तसं. आणि सासू सासरे आजेसासू यांच्यावर हुकूम न सोडता तिने गौरीला सांगणं बरोबरच आहे. निशाला क्रूरकर्मा दाखवायच्या नादात चुकून बरोबर गोष्टी दिसतायत.

नायिकेला अतिचांगल दाखवायच्या नादात किती त्या सामान्य चुका कराव्यात सिरियल वाल्यांनी??? >>>> ही नायिका अती चान्गली? शिव शी बघा कशी वागते ती.

चहात मीठ टाकून तसाच तो द्यायचा प्रसंग फालतु.... हि एक थंड डोळ्याची नायिका बघवत नाही.>>> एकदम बरोबर. पण तो चहा पितानाची शिवची कातिल नजर :डोळ्यात बदाम असलेली बाहुली :>>>> सहमत.

लहानपणी मी जिथे जायची त्या टिचर कडे पण असेच तमाशे असत त्यांच्या मुलांचे व नवर्‍याचे.>>>> मग काय सोडली का ती टयुशन?

काय बिघडलं वहिनीने नणंदेला काॅफी करायची ऑर्डर सोडली आणि नणंदेने ती निमूट ऐकली तर? >>>> नाही त्या त वाईट काहीच नाही, पण ती ते ज्या प्रकारे तीला सान्गते ना ते अयोग्य होते. खरतर ती निशा office मध्ये काहीच काम करत नसेल तरीही ति घरी येऊन कान्गावा करते की बघा मी office मध्ये किती राब-राब-राबते.

मीठ घातलेला चहा का बरं देते ती त्याला.>>>> तिला शिवला हाकलायचे असते तिच्या घरातून. एकदा का तो चहा त्याने प्यायला कि तो परत मोजोला शिकवायला येणार नाही असा तिचा plan होता. वडिलान्नी हेच संस्कार केले वाटते गौरीवर.

ही शिवच्या आणि शिव हिच्या प्रेमात नाही पडली तरच बरं.>>>> मग सिरीयल चालणार कशी? अख्खी सिरीयल तर ह्यान्च्या लव- स्टोरी वर आहे ना.:P Proud Proud

शिव माझ्या बाबान्चा गुरु आहे, त्याने बाबान्चा जीव वाचवला इ.इ. निशाला गौरी सान्गत होती. ती शिवची वकीली करत नव्हती तर ती जे काही बोलत होती ते तिच्या बाबान्साठी, शिवसाठी नाही.

मागच्या वेळी पण तसच , जेव्हा शिव सोसायटी सोडून जात होता तेव्हा तीने त्याला वाचवल होत,तेव्हा ती शिवला हेच म्हणाली की, मी हे माझ्या बाबान्साठी केल, तुझ्यासाठी नाही. Angry

म्हणजे उद्या काय ती मोजो च्या सान्गण्यावरुन शिव च्या प्रेमात पडणार का? तीला स्वत:चे मन नाही का?

रच्याकने, मितू आज जरा काहीतरी sensible बोलली, वागली. Happy Happy Happy

ताई , माई , अक्क्का . खुर्चीचा दांडा धरा पक्का. नेटाने पचवा धक्का Wink

एका अतिशय कंटाळवाण्या कॉन-कॉल मध्ये हे पुण्ण्याचे काम केले .

hi.jpg

काल मोजो छान बोलले हिंदीतुन लेकीबद्दल. हळवा प्रसंग अगदी. पण निशाला काही ते आवडलेलं दिसत नाहिये तिच्या पेपर वाचनात व्यत्यय आला त्याने (पेपरच वाचत होती ना ती?) सॉरी मी तिला फणकार्‍याने निघुन जाताना पाहिल फक्त.
बाकी ती निशा छान काम करतेय अगदी तिचा प्रेक्षकांना राग यावा इतकी म्हणजे अभिनय चांगला आहे. गौरी तर किती सालस वगैरे निमुटपणे ऐकते सगळे सांगतील तस.
शुगो तर मुर्तीमंत प्रतिमा आहे प्रेमळ आईची जस लेकीशी वागते अगदी तसच प्रेमाने सुनेशी देखिल वागते, सकाळच्या नवर्‍याच्या शिकवणीच्या नादात सुनेचा चहा नाष्टा नको राहायला म्हणुन किती प्रेमाने समजावला जाते ती निशामागोमाग.
खूप छान सिरीयल आहे अशी सासू खरतर प्रत्येकीला मिळावी.

कुणी कुणाला कसलीही ऑर्डर दिली तरी बिघडत कधीच काही नाही पण ते नातं देखिल तितकच हेल्दी असायला हव. इथे ती निशा वाट्टेल तस बोलतेय घरातल्यांना, सारखी चिडचीड, आक्रस्ताळेपणा. कुठलाही सारासार विचार न करता केलेल्या चुकांच खापर दुसर्‍यांवर फोडुन दुसर्‍यांना जबाबदार धरणे.
तिच्याच बरोबरीची मुलगी जी स्वतःही नोकरी करतेय तिलाच आल्याआल्या कॉफी आणि खायला आण म्हणुन स्वतःच्या रुममधे निघुन जाणे. या अश्या वागण्याच समर्थन होत असेल तर कमाल आहे.
ती वेगळ्याही पद्धतीने सांगु शकली असतीच की. असो मी हे सहज लिहिले होते इथे आणि फक्त या सिरियलच्याच अनुशंगाने जे दाखवल त्यावर. कुणाच्याही आणि कुठल्याही नात्यावर बोट ठेवायचा हेतू नव्हता. तरीही माझ्या पोस्टमधुन तसा अर्थ निघत असेल तर माझ्या लेखनाचा दोष समजावा.

कुणी कुणाला कसलीही ऑर्डर दिली तरी बिघडत कधीच काही नाही पण ते नातं देखिल तितकच हेल्दी असायला हव. इथे ती निशा वाट्टेल तस बोलतेय घरातल्यांना, सारखी चिडचीड, आक्रस्ताळेपणा. कुठलाही सारासार विचार न करता केलेल्या चुकांच खापर दुसर्‍यांवर फोडुन दुसर्‍यांना जबाबदार धरणे.
तिच्याच बरोबरीची मुलगी जी स्वतःही नोकरी करतेय तिलाच आल्याआल्या कॉफी आणि खायला आण म्हणुन स्वतःच्या रुममधे निघुन जाणे. या अश्या वागण्याच समर्थन होत असेल तर कमाल आहे.
ती वेगळ्याही पद्धतीने सांगु शकली असतीच की.>>>>>>>>> शुभांगी अगदी अगदी हेच आलं मनात.

माझी वहीनी, मी आणि माझी मोठी ताई, आम्ही जिला जसा वेळ असेल तसं कुणीही ऑफिसला जायचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज वैगेरे एकमेकींसाठी काढुन ठेवणे, नास्ता - चहा काढुढु/ वाढुन ठेवणे वैगेरे करत असु. कारण कुठल्याही नात्यात कुणासाठी काही करताना ते नातं हेल्दी असावं लागत. दोन्ही कडुन तेवढीच जबाबदारी, प्रेम आपुलकी असावी लागते. अशी वसवशी, हेकडी वहिनी असती तर मी तरी गवरी इतकं किंवा शुगो इतकं केलं नसतं. कारण मी एक राग लोभ असणारी सामान्य माणुस आहे. झी ची हिरोइन नाही.

काल काय काय झाल? Uhoh

कुणी कुणाला कसलीही ऑर्डर दिली तरी बिघडत कधीच काही नाही पण ते नातं देखिल तितकच हेल्दी असायला हव. >>>> करेक्टे आणि ते नात तसच हेल्दी राहील याची काळजी त्या दोन व्यक्तींबरोबर घरातल्यांनीही घ्यायला हवी, नैतर अशी हेल्दी नाती डोळ्यात खुपणारी मंडळी घरात असतील तर कठीण आहे.

जबरदस्त कातिल..नवा फॅन क्लब काढुन हे सगळे फोटो तिथे टकावे आणि सगळे कातिल फोटो जतन करावे ही नम्र विनंती...

गौरीची शिववर रोजची चिड्चिड पाहता टायटल साँग मधे दिसणारी केमिस्ट्रि अचिव्ह व्हायला जन्म लागेल...

आणि चिड चिड केली एकमेकांवर की प्रेम असत असा सगळे जण निष्कर्ष का काढत आहेत?

काल वेणु पण म्हणाला की तुम्ही दोघ येवढ भांडताय लोकांना वाटेल की तुमच चक्कर चल रहा है

एकमेकांशी गोड बोललं तर प्रेम नसतय का?
कधी नीट बोलायचे काय माहित

आणि तिची चिडचिड पण प्रेमात पडतानाची, पडण्याआधीची किंवा प्रेमात पडल्यानंतरची आजिबात वाटत नाहीये. जेनुइन चिडतेय ती. Happy

काल शिवच्या अम्माच्या रुपात एका हिंदी अभिनेत्रीचं दर्शन झालं . नाव माहित नाही, पण फार चांगली अभिनेत्री आहे ती. एवढंच नमूद करायला आलो..
बाकी ही सिरीयल माझ्या नादाला लागत नाही Wink

Pages