लावली ही आग कोणी या वना रे ...

Submitted by बाळ पाटील on 3 May, 2016 - 02:30

लावली ही आग कोणी या वना रे
हे अता बसणार नाही शांत वारे

दाटला अंधार होता सोबतीला
माळले केसात कोणी आज तारे

छेडतो गंधर्व भोळ्या रागिणीला
नाद हा घुमला तसे उठले शहारे

एरवी राखेत होते मौन माझे
फुंकुनी गेलास तू फुलले निखारे

अंबरी निखळून गेला एक तारा
तो इथे नाही कधी दिसणार का रे
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एरवी राखेत होते मौन माझे
फुंकुनी गेलास तू फुलले निखारे>>>>सुरेख!

बाळ पाटील हे डिलीट करण्याचे अ‍ॅडमीनच करु शकतील. त्यांच्या विपु मध्ये लिहा.