Submitted by बाळ पाटील on 3 May, 2016 - 02:30
लावली ही आग कोणी या वना रे
हे अता बसणार नाही शांत वारे
दाटला अंधार होता सोबतीला
माळले केसात कोणी आज तारे
छेडतो गंधर्व भोळ्या रागिणीला
नाद हा घुमला तसे उठले शहारे
एरवी राखेत होते मौन माझे
फुंकुनी गेलास तू फुलले निखारे
अंबरी निखळून गेला एक तारा
तो इथे नाही कधी दिसणार का रे
-- बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त आग लागली बरे, आगीचा
जबरदस्त आग लागली बरे,
आगीचा वणवा मायबोलीच्या पहिल्या पानावरुन दुसर्या पानापर्यंत भडकलाय.
नेमके कसे झाले मलाही कळाले
नेमके कसे झाले मलाही कळाले नाही . कृपया इतर कशा डिलिट करायच्या हे सुचवाल कोणी !
बाळासाहेब, फारच ज्वलंत कविता
बाळासाहेब, फारच ज्वलंत कविता लिहीलीय तुम्ही !
मेनबोर्ड जाळून टाकला तिनं !
एरवी राखेत होते मौन
एरवी राखेत होते मौन माझे
फुंकुनी गेलास तू फुलले निखारे>>>>सुरेख!
बाळ पाटील हे डिलीट करण्याचे अॅडमीनच करु शकतील. त्यांच्या विपु मध्ये लिहा.
कृपया इतर कशा डिलिट करायच्या
कृपया इतर कशा डिलिट करायच्या हे सुचवाल कोणी !
<<
प्रशासकांच्या विपूत विनंती करु शकता.
प्रसादजी, रश्मीजी आपल्या
प्रसादजी, रश्मीजी आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद ! करतो प्रयत्न !!