Library management software

Submitted by चंबू on 2 May, 2016 - 00:04

परदेशात वाढणार्‍या मुलांना मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने इथे (ऑस्ट्रेलिया) एक छोटे वाचनालय चालवतो. सर्व पालक आलटून पालटून त्याची जबाबदारी स्विकारतो. पुस्तकांची संख्यापण हळू हळू वाढतेय आणि त्याच बरोबर मुलांचीही. त्यासाठी आम्ही Library management software च्या शोधात आहोत. हा सर्व उपक्रम वर्गणीतून वा पदरमोड करून असल्याने शक्यतो freeware शोधतोय..
याबाबत कुणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

असं सॉफ्टवेअर मला काही माहित नाही पण धागा वर रहावा योग्य त्या माणसांच्या नजरेस पडावा म्हणून
माझ्यातर्फे शुभेच्छा Happy

चंबु,
freeware च्या ऐवजी opensource चालणार असेल तर, हे बघा:
https://koha-community.org/
http://www.koha.org/
पुर्णपणे मुक्तस्त्रोत आहे. पर्यायी सशुल्क सपोर्टही आहे.

त्यात ईबुक ची ही सोय असेलच. तरी, फक्त ईबुकसाठी वेगळे हवे असेल तर हे बघा:
https://calibre-ebook.com/

Slim हे opensource नाही त्यामुळे support साठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यापेक्षा koha हा Option केव्हाही चांगला. तुम्हाला support पण चांगला मिळेल. यासाठी DELNET च्या संगीता कौल ना contact करू शकता. DELNET च्या site वर contact details असतील.

slim हे licensed software आहे. पण त्यामुळे सपोर्टला प्रॉब्लेम कसा काय येतो ते कळाले नाही.
लायसन्स वापरायचे का ओपनसोर्स हे तुम्ही ठरवा.

Slim पुण्यातले असल्यामुळे पुण्याबाहेर support द्यायला प्रोब्लेम येऊ शकतो जितका opensource ला येत नाही.

आम्ही सिंगापुरमधे आमच्या लायब्ररीसाठी एक सॉफ्टवेयर तयार केले आहे. नारायण नेर ह्यांनी ते आम्हाला दरमहा १० $ मधे दिले आहे. खूप सही आहे ते सॉफ्टवेयर. जरा तुम्हाला त्यांची मासिक फी देता येत असेल तर त्यांना विचारुन बघता येईल.

Librarika बघितले, बर्‍यापैकी सोपे वाटले.
कोहा कसे डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे ते नाही समजले..
हर्ट.. इतर पालकांशी नेर यांच्या सॉफ्टवेयर बद्दल बोलतो..