Submitted by बाळ पाटील on 25 April, 2016 - 03:17
मागुनी केला जरी तो वार होता
नेमका माझ्या घरी अंधार होता
आजही अंदाज चुकला त्या यमाचा
राख समजुन छेंडला अंगार होता
लावला त्यांनी गळ्याला फास ऐसा
भेटला मजला फुलांचा हार होता
तू जरी नव्हतीस माझ्या सोबतीला
आठवांचा रांगडा सरदार होता
मोडलो पण सोडली नाही इमानी
तेवढा रकतातला संस्कार होता
माझिया तत्वास माती चारणारा
अजुनही जन्मायचा अवतार होता
-- बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मागुनी केला जरी तो वार
मागुनी केला जरी तो वार होता
नेमका माझ्या घरी अंधार होता
>>> बापरे , भलताच अर्थ लागतोय कि हो ह्यातुन =))))
>>> बापरे , भलताच अर्थ लागतोय
>>> बापरे , भलताच अर्थ लागतोय कि हो ह्यातुन =)))) ..>>>>>>
तुम्हाला जो अर्थ लागू पडतो तो घ्या !
(No subject)
सही जवाब पाटील'जी !
सही जवाब पाटील'जी !