संघाच्या गोष्टी भाग २

Submitted by satishb03 on 20 April, 2016 - 03:46

संघाच्या गोष्टी भाग (२)

लहानपणी मला सूर्यनमस्कार विलक्षण आवडत असत . कारण सूर्यनमस्कार ही केवळ मुलांनी करायची गोष्ट नसून ती मुलींनी केली तरी चालते असा सिद्धांत शाळेतल्या जोगळेकर गुरुजींनी मांडल्यापासून कुलकर्णी म्याडमनी त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नसते हे समस्त शाळा शिक्षक जाणून असल्याने मुलामुलींचे सूर्यनमस्कार सत्र नियमित चालू झाले . आमच्या शाळेत आणि शाखेत एक प्रश्न कॉमन होता शाळा भरायची दुपारी साडेबारा वाजता व सुटायची पाच पस्तीसला सबब आम्ही दुपारी धगधगत्या सूर्याला सूर्यनमस्कार करणे टाळून संध्याकाळी मलूल होत असलेल्या सूर्याला सूर्यनमस्कार घालायचो .अपवाद शनिवारचा असायचा ..कारण तेंव्हा शाळा सकाळी भरायची व आम्ही पहिला तास बुडेस्तोर सूर्यनमस्कार घालायचो ..जोगळेकर गुरुजी विज्ञान शिकवायचे तसेच ते प्रचारक असल्याने संध्याकाळची शाखा चालवायचे ..आम्ही शाखेत जाणारी मुले म्हणून त्यांची आम्हावर विशेष माया असायची ..शनिवारचे सूर्यनमस्कार खरेच सूर्याला पावत असतील तर सोमवार ते शुक्रवार घातलेल्या सूर्यनमस्काराचे काय ? हा प्रश्न आम्ही त्यांना एकदा विचारला असता त्यास जोर मारणे म्हणावे हे खाजगी उत्तर त्यांनी आम्हास दिलेले अद्याप आठवते ..आणि पुण्यात समुद्र नसल्याने सूर्यनमस्काराच्या वेळी सूर्यासोबत केलेली तडजोड हीस भिण्याचे कोणतेही कारण नसल्याने आम्ही सुखेनैव सांजच्याला देखील सूर्यनमस्कार घालीत असू ..ते मोठे रम्य दिवस होते ..
जोगळेकर गुरुजी आम्हास सूर्यनमस्कार घालण्याचे ठाशीव कारण म्हणजे बलोपासना हे सांगायचे .मग आम्ही मुलींनी तो का घालायचा असे विचारल्यावर ते आम्हास झाशीवाली राणीचे उदाहरण देऊन गप्प करायचे . वास्तविक मुली सूर्यनमस्कार घालताना विचित्र दिसायच्या व मग आम्ही चावट गोष्टी करून सूर्यनमस्कार घाल्या मुलींचे लक्ष विचलित करायचो ..सबब एखादी काळी कुळी धुमाळी मुलगी (चावट गोष्टी तिच्यावर न केल्याने , चिडून जाऊन ) आमच्या चावट गोष्टीची कल्पना जोगळेकर गुरुजींना द्यायची व लगोलग जोगळेकर गुरुजी आम्हावर संस्कार करण्याची कोशिश करायचे . आम्ही ती कोशिश हाणून पाडायचो ..एकंदर त्या काळी महार जातीविषयी गुरुजींचे मत कलुषित करण्यात माझा सिंहाचा वाटा कायम राहिला होता .. आम्ही शाखाबंधुंनी आपणामध्ये एक करार केला होता वासंती विषयी मी वगळता कुणी भाष्य करायचे नाही , सायली विषयी कल्पेश आकनकर वगळता कुणी भाष्य करायचे नाही. मैथिलीबाबत जाडा पालंडे हाच बोलणार ..असे असल्याने आम्ही एकमेकांच्या सामानाविषयी भाष्य करणे टाळून देखील भाष्यास मुबलक जनता बाकी असायचीच असायची ..
प्रचंड सूर्यनमस्कार घातल्याने माझ्यात बळ आल्याचे जाहीर करून एकदिवस जोगळेकर गुरुजींनी माझे प्रचंड कौतुक केले व मग वर्गातल्या सर्व मुलींनी माझ्याकडे आमीरखानाकडे पाहावे तसे पहिले . मी चेहऱ्यावर महाभारतातील नितीश भारद्वाजचा संयमी कॉन्फिडन्स , प्लस दांभिक हास्य आणून सर्व मुलींचे कौतुकी नजर अभिवादन स्वीकारले व मग खुश होऊन मनोभावे सूर्यनमस्कारास लाख लाख नमस्कार केले ..
हे सर्व झाले त्याला कारण असे घडले , मी सांगितल्याने वर्गातल्या धीरज गुंजाळ या नावच्या माझ्या वडराच्या दोस्ताने मधल्या सुट्टीत ऑफिसमध्ये कुणी नसताना ऑफिसमधली गांधीजींची तसबीर फोडली..वर्गातल्या शुभांगी भाकरे नावाच्या मुलीने ते पाहून सर्वकानी ती बातमी पोचवली . मग धीरजची गांड फाटली . त्यास वर्गशिक्षकाने असे असे का केलेस विचारता त्याने मी सांगितले म्हणून असे केले हे उत्तर दिले ..मग शिक्षकांनी मी शेन खायला सांगितले तर खाणार काय ? वगैरे असली फालतू टिपिकल , आधीच शिक्षकांच्या प्रशिक्षणात लिहून ठेवलेली प्रश्नाची सरबत्ती केली ..मग वर्ग शिक्षकांना बाजूला सारून जोगळेकर गुरुजींनी तू असे का सांगितलेस असे मला विचारले मी त्यांना पुणे करारमुळे आमचे नुकसान झाल्याचे बोललो ..मग त्यांनी प्रचंड मायेने माझ्याकडे पाहत गांधीमुळे केवळ तुमचेच नुकसान झाले नाही बाळ तर संपुर्ण राष्ट्राचे नुकसान झाले आहे हे सांगून ..फाळणी वगैरे गोष्टी सांगितल्या ..तसेच मला तुझ्या मनातील क्षोभाचे कौतुक वाटते असेही सांगितले ..मी अगदी शाखेत व वर्गात उत्सव मूर्ती बनून राहिलो ..गुंजाळ वैतागला ..मला म्हटला तसबीर मी फोडली आईघाल्या मग कौतुक तुझे कसे ? मी त्याला म्हटले तू सैनिकाच्या भूमिकेत होतास ..मी सेनापतीच्या ..सबब कौतुक माझेच होणार ..मग त्याने आईमायीवरून प्रचंड शिवीगाळ करीत स्वतः सेनापती व्हायची इच्छा व्यक्त केली ..तो माझा मित्र असल्याने मी त्याला पुन्हा एक तसबीर फोडण्याचे आवतन दिले ..अधिक शाबासकी साठी तू स्वतः सैनिक व सेनापती हो असे सांगून त्यास राजी केले ..
मग त्याने चार दिवसांनी माझ्या सांगण्यावरून सावरकरांची तसबीर फोडली ..कुणी सांगितले असे विचारता , सेनापतीचे श्रेय देखील हरवावयास नको म्हणून त्याने , मी मनानेच फोडली असे म्हणाला ..सबब त्याला कुत्त्या सारखे धुतले गेले ..नंतर त्याने सेनापतीपदाची माला पुन्हा माझ्या गळ्यात घातली व मग माझी चिक्कार उलटतपासणी झाली ..

..
क्रमशः

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

व्यंकूची शिकवणी लिहीणार्या दमांनी जर हे वाचले तर ते अत्यंत खूष होतील. इरसाल बोलीचा लहजा आहे. ग्रामीण भागातील शब्दांत मजा आली वाचताना...

छान लिहिले आहे.
आमची पण संघ-शाखावाल्यांची शाळा होती मधल्या सुट्टीत ने मजसी ने परत मातृभिमीला गाणे वाजायचे त्याची चाल खुप आवडायची खुप आठवणी आहेत पण इथे लिवायची हिंमत नाही.

kapoche | 22 April, 2016 - 19:00 नवीन
पुढचा भाग टाक लवकर.
>>

+१.

मीही तिसरा भाग वाचयला आज आज आलेलो माबोवर.

मग त्याने चार दिवसांनी माझ्या सांगण्यावरून सावरकरांची तसबीर फोडली ..>> Biggrin

हसुन हसुन मेलो राव... Biggrin

काही संघीष्ट लोकांना मात्र आवडलेले दिसत नाही.. काय करणार.. सत्याला मरण नसते - अगदी गोळ्या घालुन मारले तरीही..!