नवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 April, 2016 - 15:11

गुलाबी आठवांना टाळण्यासाठी
नवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी

मनाचा मामला नाजुक तुझ्या-माझ्या
पुरेसा वेळ घे हाताळण्यासाठी

प्रसंगांच्या नदया वाहून जाणाऱ्या
स्मृतींचे बांध ....ते सांभाळण्यासाठी

दिला नाहीच तर कळणार कोठुन हे ?
दिेलेला शब्द असतो पाळण्यासाठी !

खुशालीच्या क्षणांना ने तुझ्यासोबत
उदासी ठेव मागे माळण्यासाठी

अशी आत्मीयता आटून गेली की,
टिपुसही पाझरेना गाळण्यासाठी

निखारे संभ्रमांचे पेटते ठेवू
कलेवर जाणिवांचे जाळण्यासाठी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुराण्या आठवांना टाळण्यासाठी
नवे क्षण दे नव्याने भाळण्यासाठी>>व्वा
प्रसंगांच्या नदया वाहून जाणाऱ्या
स्मृतींचे बांध ....ते सांभाळण्यासाठी >>सुंदर

अशी आत्मीयता आटून गेली की,
टिपुसही पाझरेना गाळण्यासाठी>>व्वा

निखारे संभ्रमांचे पेटते ठेवू
कलेवर जाणिवांचे जाळण्यासाठी>>खूप आवडले!

गजल आवडली,