स्वता:च्या घरी जो तिर्‍हाईत होता ...

Submitted by बाळ पाटील on 10 April, 2016 - 08:19

स्वता:च्या घरी जो तिर्‍हाईत होता
जगाच्या गळी तोच ताईत होता

अता हाल त्याचे कुणी खात नाही
कधी तो तटावर लढाईत होता

कुणी घाम गाळो कुणी काम टाळो
खरा 'अर्थ ' वरच्या कमाईत होता'

कसा पोचला तोच आधी तळाला'
उभा जन्म तो नित्य घाईत होता'

भला अक्षरांचा जरी ग्रंथ झाला
खरा सार एका रुबाईत होता

किती आवरावे, रडे आवरेना
असा कोणता स्वर्ग आईत होता
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात,क्या ब्बात...प्रत्येक शेर सुंदर!

खूप आवडली गझल!

अभिनंदन,शुभेच्छा!

भला अक्षरांचा जरी ग्रंथ झाला
खरा सार एका रुबाईत होता << छान !

तेवढं शुध्दलेखनाचं बघा. >>>>>>>

.................. A M I T जी मला वाटते ...सार होता ... याविषयी आपली शंका असावी. माझ्या मते ते योग्य आहे. तरीही नेमके कळवाल. चूक असेल तर जरूर सुधारू ! .... धन्यवाद !

भला अक्षरांचा जरी ग्रंथ झाला
खरा सार एका रुबाईत होता

किती आवरावे, रडे आवरेना
असा कोणता स्वर्ग आईत होता>>>>> काय सुरेख लिहीता हो!