Submitted by बाळ पाटील on 9 April, 2016 - 05:03
कुंकवाने घे भरूनी भांग आता
स्वप्न सारे वळचणीला टांग आता
मैफली सजल्या निमाल्या काल जेथे
ती हवेली भासते विकलांग आता
अजुनही भासे मला कावीळ झाला
माखले हळदीत तू सर्वांग आता
मानले आपण तनाने दोन होतो
जायबंदी जाहले अर्धांग आता
घे जरा हातात माझा हात साकी
गोंदले, खोडू कसे ते सांग आता
-- बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान ! मतला,दुसरा व शेवटचा शेर
छान ! मतला,दुसरा व शेवटचा शेर आवडले !
मस्त गजल!!
मस्त गजल!!
व्वाह,व्वाह्,व्वा...सुरेख
व्वाह,व्वाह्,व्वा...सुरेख गजल! आवडली!!
मैफली सजल्या निमाल्या काल
मैफली सजल्या निमाल्या काल जेथे
ती हवेली भासते विकलांग आता...... आवड्ले . खुप छान.
सर्वाना धन्यवाद !
सर्वाना धन्यवाद !