GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

Submitted by राहुल on 11 August, 2009 - 15:24
ठिकाण/पत्ता: 
स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...

Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868

चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.

खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.

अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्‍यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440

शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

एकूण : १६ मोठे + ५ छोटे

===============================

शनिवारचा कार्यक्रम -

१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.

२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.

३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.

४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.

५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.

रविवारचा कार्यक्रम -

१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.

===============================
मेन्यू -

शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================

कामाची वाटणी -

सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुक्रवार रात्र डिनर - रेडी टू ईट, फ्रोजन पराठे किंवा तत्सम काहितरी.. कारण बर्‍याच जणांना तो वर्किंग डे आहे.. आणि शिवाय प्रवास पण आहे.. येता येता रस्त्यात क्रॅकर बॅरल मधे जेवणे हा पण एक पर्याय होऊ शकतो. तो माझ्या मते जास्त चांगला आहे.. Happy

शनिवार ब्रेफा : ब्रेड ऑमलेट. तवा तिथे असेल एखादा पण आपण अजून एक दोन घेऊन जाऊ. कारण इतक्या लोकांना ऑमलेट बनवता बनवता सुरुवातीला खाल्लेल्यांना परत भूक लागते सगळ्यांचं संपेपर्यंत.. Proud त्यामुळे डबल ईंजिन मस्ट... ह्यासाठी अंडी, कांदे, टमेटो, आलं, ग्रीन पेपर

शनिवार डिनर : ग्रील (चिकन, व्हेज), करी वालं चिकन आणि करी वाली भाजी (मे बी बटाटा, फ्लॉवर रस्सा विथ परंपरा मसाला), भात, ब्रेड/फ्रोजन पराठे.

रविवार ब्रेफा : पोहे आणि बाकीचं टिपी म्हणजे चिवडा वगैरे.. त्यासाठी पोहे, फोडणींच सामान, कांदे, आलं, मटार.

इतर: चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स

ह्या लिस्ट मधे अ‍ॅड्/अपडेट करत रहा.

अरेच्चा मला तर वाटले डेट्रॉइटकर स्पॉन्सर करणार आहेत केबिन Proud

मला चहाच्या ऐवजी कॉफी चालेल. तिथे नेट कनेक्शन मिळेल का ? रोज दिवस संपला की लागोलाग लॉग इन करुन मायबोलीकरांच्या इंस्टंट कुचाळक्या करेन म्हंते Proud

मुलांसाठी दूध, एखादा फळाचा प्रकार (केळं सोप्पय) लागेलच. डाळ/तांदूळ खिचडीसाठी किंवा मॅक न चीझ किंवा पास्ता + सॉस किंवा उपम्याचा रवा (भाजून/फोडणी देऊन म्हणजे तिथे पाणी घालुन मायक्रोवेव उपमा वगैरे करता येइल.)

मंडळी, आत्ताच कळाले की ४ ऑक्टो. ला कोजागिरी आहे. काय पण मुहुर्त साधलाय Happy कोजागिरी साजरी केलीच पाहिजे (असे माझे मत हो). काय म्हणता ?

>>> मंडळी, आत्ताच कळाले की ४ ऑक्टो. ला कोजागिरी आहे. काय पण मुहुर्त साधलाय कोजागिरी साजरी केलीच पाहिजे (असे माझे मत हो). काय म्हणता ?

सिंडी पुन्हा आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद. तारखा ठरवताना कोजागिरी बद्दल माहित होतं. नंतर पूर्णपणे विसरलो.
कोजागिरी साजरी केलीच पाहिजे हे माझं सुद्धा मत.

हो हो कोजागिरी "साजरी" केलीच पाहीजे.....म्हणजे आपलं घरगुती पद्धतीने हो.....मसाला दुध आणि गाण्याच्या भेन्ड्या....

कोपो ३ ला आहे आणि ४ ला अश्विनी आहे. तुम्ही कोणी मुलांची अश्विनी करता का ?

जबर्‍याच.. .तिथेच डॅमही आहे चांगला.. पण केबिन मध्ये बसून गप्पा हाणण्यात वेगळीच मज्जा.. छ्या फारच नॉस्टेल्जिक वाटतय Uhoh
बरं पण तुम्हाला गटग साठी शुभेच्छा!

आमच्या आदीची आहे अश्विनी....
>> Happy आता अश्विनी आदीची आहे असे तुम्ही डिक्लेअर केल्यामुळे ती अर्हनची होऊ शकत नाही ;).

मी घरात लहान असल्याने कोजागिरीला मला सगळे फार्फार चिडवतात... पण आदी, र्हन, इशान पेक्षा मी नक्कीच मोठा आहे.. Wink
त्यामुळे तुम्हीच करा आता माझीपण अश्विनी Proud
बरं इथे मुद्याचं बोला.. हा काय "त्या" गटग चा बाफं वाटला ????????? Proud

आता अश्विनी तुझी कशी होईल?? मग तुझी होणारी अश्विनी आमचे काय करेल!! Wink
आणि त्यावर हवीच असेल तर - आप कतर में है कॄपया प्रतिक्षा किजिये! Happy

मो, Lol

अ‍ॅडमा, शहाणाच आहेस...कधी शिल्पा माझी म्हणतोस आता अश्विनी.... Lol (खजिनदार काकांना सांगु का Proud )

रच्याकने, येह अश्विनी कौन है भाय ? Wink

अश्विनीची सगळ्यांना आठवण आहे पण गांधीजींचं काय??त्यांच्या बर्थडेचा काय प्लॅन?? केक कोण आणणार आहे??
चला,ड्रेस कोड ठेऊयात्....खादी Happy

मुलींनो, बस झाला दंगा! कामाला लागा पाहू आता. Happy
अडम, तू सांगितलेला मेन्यू चांगलाय, फक्त एक सवाल - ग्रिल साठी चिकन, पनीर, भाज्या इथून मॅरिनेट करुन न्यायच्या म्हणतोयस का? सगळे नोकरीवाले, लेकुरवाळे किंवा बाहेरुन येणारे. शुक्रवारी तयारी करायला जमेल का?

नाही मॅरीनेट करून नाही... मॅरीनेट कराण्यासाठी जे काय सामान लागेल ते घ्यायचं इथून आणि भाज्या मुख्य म्हणजे... चिकन लोकल ग्रोसरी शॉप मधे घायचं.. शक्य असेल तर शनिवारी सकाळी ते मॅरीनेट करायला ठेऊन द्यायचं म्हणजे आपण फॉल बघून परत येईपर्यंत ते मुरलेलं असेल नीट..

आम्ही आत्ताच long weekend ला ग्रिल party केली. भाज्या मॅरीनेट करायला फारसा वेळ नाही लागत. चिकनला कमित क्मी ५-६ तास तरी हवेतच. भाज्या काय काय घ्यायच्या याची यादी करता येइल.

भाज्यांमध्ये aspargous, pepper, corn, mashrooms, tommatos, red potatos, paneer छान लागतं ग्रिल केलेलं.

Pages