सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायरसी हा गुनाह आहेच, हे मी माझ्या प्रतिसादातही लिहिले आहेच.. की ते बेकायदेशीर कृत्य आहे..

पण माझी पोस्ट पुन्हा वाचा, त्या प्रकारानेही जर एखाद्या सचिनच्या अश्या चाहत्याकडे ज्याला ते पुस्तक विकत घेऊन वाचणे परवडणारे नसेल तर त्याच्यापर्यंत पोहोचले, तर हे मला मनापासून आवडेलच. उदाहरणार्थ यात एखादा सचिनचा कॉलेजगोईंग फॅनही घेऊ शकता .. ज्याच्या पॉकेटमनी बजेटमध्ये हे नाही जमू शकत..

बाकी सचिनचे सामने बघतच लहानाचे मोठे झालोय, या विधानासाठी तो कारवाई करोच माझ्यावर, मग बघतो त्याला Wink

असो, यावर माझी हि इथली शेवटची पोस्ट, मात्र वर वचन दिल्याप्रमाणे दुसरीकडे हा विषय पुन्हा कधीतरी नक्की Happy

^^^^^^^^^^

वरील विधानाला अनुसरून इथे मांडलेय,
http://www.maayboli.com/node/51663

पायरसी हा गुनाह आहेच, हे मी माझ्या प्रतिसादातही लिहिले आहेच.. की ते बेकायदेशीर कृत्य आहे. >> ह्या वाक्यानंतर त्याला "but" असे फाटे कसे फोडता येतील ? सचिनवर प्रेम असेल तर माणूस धीर धरेल (त्याला पुस्तक परवडेपर्यंत किंवा त्याची स्वस्त आव्रुत्ती उपलब्ध होईतो).

मंजूडी, +१

ऋन्मेऽऽष, लायब्ररी किंवा ग्रंथालय नावाची जागा माहिती आहे का? उगीच सचिनप्रेमाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका प्लीज!

रच्याकाने, कोणाचं पूर्ण झालं का वाचून? रिव्ह्यू लिहिणार का कोणी? काल उगीच पुन्हा एकदा सचिनचे वानखेडे वरचे स्पीच ऐकले..हमखास डोळ्यात पाणी!

मी वाचायला केली सुरुवात …. ते पुस्तक म्हणजे बोरिया माजुमदार ह्यांनी मिडिया मध्ये उपलब्ध असलेली माहिती एकत्र करून लिहून काढलं आणि सचिन ला दाखवल, सचिन ने मधून अधून थोडे किस्से सांगितले, माजुमदार साहेबांनी ते त्यात घातले आणि शेवटी कॉलेज ची पोरं जसा रिपोर्ट बनवतात, तसं कसबसं पूर्ण केलं…मला आत्ता पर्यंत तरी असंच वाटतंय ते पुस्तक…. त्रोटक लिहिलेलं …. "दिल से" केलेलं लिखाण वाटत नाही ते…

घटने पाठोपाठ घटना त्यात डायरी असल्यासारख्या येतात…. बऱ्याच गोष्टी, ज्या वाचायला आवडल्या असत्या त्या त्यात येतच नाहीत, जसं की प्राध्यापक असलेल्या वडिलांनी आपला मुलगा १२ वी पास सुद्धा नाही झाला, ही गोष्ट कशी मान्य केली? कुठल्याही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात असलेला शिक्षणाच्या आग्रहाचा अडथळा त्याने कसा पार केला? खेळ आणि इतर कलांमध्ये उत्कृष्ठ गती असली, तरी कितीतरी मुलांना आज आई-वडिलांच्या आग्रहाखातर शिक्षण पूर्ण करावंच लागतं … त्याच्या वडिलांची काय मानसिकता होती?

त्याच्या बहिणीने लिहिलेला एक लेख मागे एकदा सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये आला होता …त्यांचा छोटासाच लेख अगदी मनापसून लिहिल्यासारखा वाटत होता… पण सचिन च्या पुस्तकात बहिणीचा अगदीच पासिंग रेफ़रन्स आहे…

अशा खूप गोष्टी आहेत…अर्थात सुरुवातीच्या ५०-६० पानांवरून हे मत झालंय …. बाकी काही किस्से सोडले, तर त्याच्या क्रिकेट चा प्रवास आपल्या सारख्या भक्तांनी अगदी मनापासून फॉलो केलाय…. त्यामुळे त्यात नवीन काहीच वाटत नाही … पण कसं आहे, सचिन चे आत्मचरित्र आहे, म्हणजे ते कसेही असले तरी वाचणे हा आपला धर्म आहे … आणि तो आपण निभावणारच Happy

अर्थात सुरुवातीच्या ५०-६० पानांवरून हे मत झालंय ….

माझी २५० पाने झाली आहेत आणि मी देखील अजूनही याच मताचा आहे...


पुस्तक म्हणजे बोरिया माजुमदार ह्यांनी मिडिया मध्ये उपलब्ध असलेली माहिती एकत्र करून लिहून काढलं आणि सचिन ला दाखवल, सचिन ने मधून अधून थोडे किस्से सांगितले, माजुमदार साहेबांनी ते त्यात घातले आणि शेवटी कॉलेज ची पोरं जसा रिपोर्ट बनवतात, तसं कसबसं पूर्ण केलं…

यासाठी जोरदार अनुमोदन...एक्झॅटली हीच भावना आली पुस्तक वाचताना....हे पुस्तक सचिनचे म्हणून जोरदार खपेलही पण ते दर्जेदार नाही एवढेच खेदाने म्हणावेसे वाटत आहे. यापेक्षा मग सनी डेज खूपच ऊजवे वाटले होते.

I have ordered this book today. How I wish the last two responses were posted just two hours earlier, before I placed the order. Sad

मयेकर अहो इतके वाईट नका वाटून घेऊ...इतकेही फालतू नाहीये पुस्तक...फक्त अपेक्षा खूप जास्त असल्याने त्याला उतरले नाही एवढेच. शतकाची अपेक्षा करावी आणि नेहमीप्रमाणे ९०च आऊट व्हावा असे काहीतरी झाले आहे. शतक न झाल्याचे दुख आहे. पण त्या ९० धावा तर आहेतच.
त्यामुळे निश्चिंत मनाने वाचा..कदाचित तुम्हाला आवडेलही.

But you can't call it an autobiography, even if ghost written. The title now sounds so ironic. I know my disappointment is only momentary and an account of his life will always be worth reading again and again, it will mean Re-living parts of our own lives.

सचिनच्या काही भन्नाट शतकांबद्दल बर्‍याच दिवसांपासून लिहायचे आहे. जमेल तसे लिहीन. इतरांनीही लिहा.

ही एक २००१ ची द आफ्रिकेतील - 'बॅकफुट सेंचुरी' किंवा 'थर्ड मॅन सेंचुरी' असेही म्हणता येइल Happy

या सिरीज मधे डोनाल्ड नव्हता (वो भी एक लंबी कहानी है. दादा व पोलॉक च्या खुन्नसची. पण ती वन डेज मधे). पण तरीही पोलॉक, क्लुजनर, कालिस, एन्टिनी व हेवर्ड हे सगळे होते. चांगला बाउन्स व कॅरी असलेल्या ब्लोएमफाँतेन च्या पिचवर पहिल्या टेस्ट च्या रिच्युअल प्रमाणे आपली नेहमीची त्या काळची रडकथा सुरू झाली होती. पहिली बॅटिंग व ४३ ला २. तेव्हा सचिन आला, नंतर ६८/४. इथे त्याच्याबरोबर कसोटी पदार्पण करत असलेला वीरू आला.

पुढच्या सुमारे ३५-४० ओव्हर्स आफ्रिकेने सतत फास्ट बोलर्स वापरले व सर्वांनी ऑफ साईड ची लाईन व शॉर्ट पिच बोलिंग हे पूर्ण वेळ सतत वापरले. त्याला प्रत्युत्तर म्हणून सचिन ने स्लिप्स किंवा शॉर्ट थर्ड मॅन च्या डोक्यावरून किंवा मधल्या जागेतून तेथे कट्स मारले. मध्यंतरी त्याने ते बाउन्स होत वर जाणार्‍या बॉल ला बॅट ने दिशा देउन थर्ड मॅन च्या वरून सिक्स कधी मारायला सुरूवात केली याबद्दल चर्चा झाली होती. इथेही ते प्रयत्न दिसतात. एक मारलीही आहे.

तोपर्यंत असे शॉट्स फारसे बघायला मिळत नसत. त्यामुळे इथे प्रत्येक बोलर ला असे वाटलेले दिसते तेव्हा की ते शॉट म्ह्णजे सचिन 'बीट' झाला आहे किंवा मटक्याने गेले आहेत. पण क्लिप मधे बघून व सचिन ने नंतर सतत मारलेले असे शॉट्स बघून हे लक्षात येते की यातील एकही 'मिस' झालेला फटका नाही. सगळे मुद्दाम मारलेले आहेत. काही वेळा पोलॉक वगैरेंना लेट कट किंवा चॉप्स जे मारले आहेत ते तर एकदम खतरनाक आहेत.

अपवाद म्हणजे चार पाच वेळा बॉल पिच अप केल्यावर मारलेले खणखणीत स्ट्रेट ड्राइव्ज. ते सुरूवातीला सचिन ने व नंतर सेहवागनेही मारले आहेत. आणि हे सगळे अगदी आक्रमक खेळाने. ६८/४ असताना तेथून ४५ ओव्हर्स मधे २२० ची भागीदारी केली या दोघांनी. सेहवाग सुरूवातीला स्थिर होत होता तेव्हा सचिन ने धुलाई केली व नंतर सेहवागही पेटला. त्याचेही ड्राइव्ज व कट्स जबरी आहे. अनेक शॉट्स मधे तुम्हाला दिसेल की जबरदस्त टायमिंग असलेले फटके मारताना त्याचे पाय होते तेथेच आहेत व बॅट व पाय यामधे फुटाफुटाच्या गॅप्स आहेत. पण शॉट चे टायमिंग तरीही इतके जबरी आहे की विश्वास बसत नाही.

सचिन ने हे शतक ११४ बॉल्स मधे मारले, व एकूण स्कोअर १७८ बॉल्स मधे १५५. शतक मारल्यावर बॉयकॉट ची प्रतिक्रिया:
"If you don't clap for this innings, you are just a big mean spirited" Happy

मात्र हे दोघे गेल्यावर रडकथा मागील पानावरून पुढे सुरू झाली. ३५१/५ वरून ऑल आउट ३७९. मॅच हरली.

या मॅच चा स्कोअर बघायला क्रिकइन्फो वर त्या दिवशी गेल्यावर 'Dazzling Tendulkar turns the tables on South Africa' हे शीर्षक बघितल्याचे इतक्या वर्षांंतरही लक्षात आहे.
http://www.espncricinfo.com/ci/content/story/107601.html

क्लिप येथे आहे.
https://www.youtube.com/watch?v=3eczMKzBL-A

फारेण्ड, तुझ्या नावाने आणि या धाग्याची लिंक देत आमच्या व्हॉटसप क्रिकेट ग्रूपवर वरची पोस्ट शेअर करू का..

मस्त इनिंग होती ती. त्या थर्ड मॅन शॉटसाठीच गाजली होती. आणि तू म्हटले तसेच आपण धुतले जातोय याची जाणीव होईस्तोवर सचिन् आपले काम करून गेलेला. लाइव्ह बघता नाही आली ती इनिंग पण रात्री हायलाइटसनध्ये पाहिली. वीरूचे पहिले दमदार शतक मात्र त्यात किंचित झाकोळले गेले हे. अर्थात वीरूला फरक नाही, त्याने पुढे बरेच ईतिहास रचलेत.
दादा सुद्धा आफ्रिकन वनडेत बाऊन्सचा फायदा उचलत पोलोक एनतिनी वगैरे दिग्गजांना मस्त षटकार मारायचा.

Yesterday went to watch Mangala khadilkar' programme ..she told many sweet memories of Sachin.
When Sachin was 19 yrs old ,Mangalatai took his mother's interview in Sahitya Sahvas...His mother told her that Sachin has 2 snails as a pet and every day he calls from abroad and enquirers about his pets..Ask his mother to feed them carrot ..as he was absent at the time of interview Sachins mother told Mangalatai that he wil call you when he gets free time at airport. And next day Sachin called her and told ki Aai ne tumhala ph karayala sangitlay..so sweet..
He used to play with all children of Sahitya Sahwas where he was living with his parents..
Farend avantar vatat asel tar udavate but couldn't control to share

हॅपी बर्थडे सचिन!!
मी माझ्या लेखनाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत जेवढं सचिन तेंडुलकरवर लिहिलंय तेवढं कुणावरही लिहिलेलं नाही.
त्याला अनेक कारणं आहेत.
एक म्हणजे, सचिनची कारकीर्द म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातीलच नाही तर कदाचित खेळांच्या इतिहासातलं एक महाकाव्य आहे. असंख्य कडव्यांचं महाकाव्य!
सचिन जेव्हा त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या इम्रान, अक्रम, वकार या त्रिकूटाच्या वणव्याशी झुंजत होता तेव्हा दिएगो मॅराडोना अर्जेंटिनाच्या फुटबाॅल संघाचा कर्णधारही नव्हता. पीट सॅम्प्रसने तोपर्यंत एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली नव्हती. राॅजर फेडरर हे नावसुद्धा कानावरून गेलेलं नव्हतं. मेसी त्यावेळी बाबागाडीतून फिरत होता. उसेन बोल्ट जास्तीत जास्त त्याच्या घरात किंवा गल्लीत धावत होता. बर्लिनची भिंत अभेद्य होती. सोविएत युनियन अबाधित होतं. आज मॅराडोना निवृत्त झालाय, मेसी आजचा मॅराडोना आहे. सॅम्प्रसच्या विक्रमांना गवसणी घालून राॅजर फेडरर नावाचा सूर्य मावळतीकडे निघालाय, उसेन बोल्टने शंभर मीटर्स शर्यतींचा पालापाचोळा करून टाकलाय. बर्लिनच्या भिंतीचा दगड पण तिथे आठवण म्हणून मिळत नाही. सोविएत युनियनचे तुकडे तुकडे झाले.
पण सचिन तेंडुलकरसमोर काळच थिजलाय. तो चँपियन होता, आहे आणि राहील. तिथे जणू काळाचं घड्याळ बंद पडलंय.
त्याने नुसतं काळाला रोखलं नाही तर प्रचंड आनंद आपल्याला दिला. त्याची खेळी ही अशी काडी होती, जी माणसाच्या मनाची विझलेली ज्योत पेटवू शकायची. सामान्य माणसाला रोजचे कष्ट विसरायला लाऊन त्याच्या चेहऱ्यावर स्मित फुलवायची क्षमता सचिनमध्ये आजही आहे, ती त्याच्या नव्या सामाजिक खेळीतून दिसून येते. अशी क्षमता असणाऱ्या लतादीदी, अमिताभ बच्चन अशा मोजक्या मंडळींमध्ये तो खांद्याला खांदा लाऊन उभा आहे.
या सर्व गोष्टींमुळेच सचिन बद्दल माझ्याकडून सर्वाधिक लिहिलं गेलं. मी जे लिहिलं ते मेंदूपेक्षाही हृदयापासून अधिक लिहिलं गेलं आहे. आणि ते वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचत राहिलं, म्हणूनच अजून लिहायची स्फूर्ती मला मिळत राहिली. सचिनवर मी लिहीत राहिलो, यापुढेही लिहीत राहीन!
द्वारकानाथ संझगिरी

साहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
क्रिकेटप्रेमींसाठीं सचिन हा एक 'आयकॉन' तर आहेच. पण, घरच्यांच्या क्रिकेटवेडाला कंटाळलेली इतर मंडळीही सचिनच्या कौतुकात मात्र त्यांच्या एक पाऊल पुढेच असते, ही सचिनच्या व्यक्तीमत्वाची खासियत असावी !

मीं आजचं एकच व्रत पाळते; माझा उपास आहे व मीं देवळात जातेय , खास
सचिनसाठीं ! त्याचा वाढदिवस आहे . वाढून घ्या स्वतः काय हवं तें !!
hatta.JPG

गावसकर जेंव्हा वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाच्या बोलर्सची पिसं काढत होता, तेंव्हा संझगिरी बहुतेक हाफ पॅंट मध्ये होता. असो, सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा...

अलंकारीक भाषेत लिहायच्या अट्टाहासापोटी संझगिरी बर्‍याचदा वाहत जातात. तरीही एक सचिन फॅनक्लब मेंमर म्हणून त्यांचं वरचं लेखन आवडलं. शेअर केल्याबद्दल धन्यवाद मायबाप.
आणि सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

फारेन्डा, त्याच इनिंगमध्ये सेहवागने पण असे स्लीपवरूउन थर्डमॅन बाउन्ड्रीला चॉप / अप्पर कट मारले आहेत. हे तो पठ्ठ्या तिथल्या तिथे तेन्डुलकरचे शॉट बघून मारू लागला की आधी नेटमध्ये दोघांनी सराव केला कोण जाणे. हा सेहवागचा पहिला सामना म्हणजे तो संघात अगदीच ज्युनिअर असणार. तेव्हा मला नाही वाटत तेन्डुलकरने त्याच्या बरोबर असे ठरवले असेल. सेहवाग ग्रेटच म्हणायचा म्हणजे!

गावसकर जेंव्हा वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाच्या बोलर्सची पिसं काढत होता, तेंव्हा संझगिरी बहुतेक हाफ पॅंट मध्ये होता. >> काहिही राज, संघगिरी षटकारसाठी लिहित असत. ते लेख मी हाफ पॅंट मध्ये असल्यापासून वाचले आहे. Lol

साहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! >> +११११११११११११

(एकच) षटकार पाटिलने सुरु केलेला, साधारण ८० च्या दशकात. त्यावेळेस तु हाफ पॅंटमध्ये तर ७० च्या दशकात संझगिरी हाफपॅंट मध्ये धरायला हरकत नाहि... Happy

सचिन च्या वाढदिवसाच्या दिवशी सचिन रिपीट झाला

मुंबई इंडियन्स तर्फे सचिन ने शतक मारले होते परंतू मॅक्युलम च्या धुवांधार खेळीमुळे ती मॅच मुंबई हारली.

आज ही कोहली ने शतक केले आणि मॅक्युलम ने धावांचा पाउस पाडला Happy

संझगिरी भयंकर उपमाबंबाळ लिहीतात अनेकदा. तरी या वरच्या परिच्छेदातील मुद्दा योग्य आहे. खेळात नवीन खेळाडू येउन आधीचे विक्रम तोडून जातात. भारताकडून तोपर्यंत २० वर्षे खेळल्यावर, मधे दुखापत, अपयश पचवल्यावर २००७ ते २०११ सचिन पुन्हा भारताचा प्रमुख फलंदाज होता. हे कमी दिसते. या काळापर्यंत १९८९-९० मधले बरेचसे तेव्हाचे भारी लोक मैदानावरून अस्तंगत झालेले होते.

टण्या - सेहवाग बद्दल सहमत.

Pages