अशीच रात्र राहूदे...

Submitted by मुग्धमानसी on 25 March, 2016 - 08:13

अशीच रात्र राहूदे, तुझ्यात खोल वाहूदे
तुझ्या लिपीत बोलूदे, तुझ्या सुरांत गाऊदे..

जरा सकाळ होऊदे नी उतरू दे जरा धुके
तोवरी मला तुझ्या मिठीत चिंब नाहूदे...

कशामुळे सख्या असा उगाच सैरभैर तू
उषा अजून कोवळी... तिला वयात येऊदे!

कुणी न आज यायचे इथे अश्या खुळ्या क्षणी
तु टाक सर्व वंचना, मला तुला सुखावू दे...

ही रात्र संपता सख्या उरेल काय ते पहा
नकोस वेळ घालवू, जे जायचे ते जाऊदे...

पुन्हा मिळायची कधी, ही स्वस्थता नी रात्र ही...
तुझ्या मिठीत ही अशीच कैद रात्र राहूदे!

जायचे तुला तुझ्या घरी... मलाही ठाउके...
मी जन्म जाळला सख्या.. तिलाही वाट पाहूदे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जायचे तुला तुझ्या घरी... मलाही ठाउके...
मी जन्म जाळला सख्या.. तिलाही वाट पाहूदे!>>>>

याचा अर्थ लागला नाही. बहुतेक राधाने कृष्णाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत असे वाटते.

कविता आवडलीच !!!