न्यू जर्सी मध्ये अपार्टमेंट रेंट करायची आहे

Submitted by अरूण on 25 March, 2016 - 08:36

नमस्कार मंडळी,

मी नुकताच भारतातून अमेरिकेला शिफ्ट झालो आहे. ऑफिस मॅनहॅटन मध्ये (२३ स्ट्रीट) ला आहे. राहण्यासाठी न्यू जर्सी मध्ये २ बीएचके अपार्ट्मेंट शोधतो आहे.

मुलांच्या शाळेच्या द्रुष्टीने कुठले ठिकाण सोईचे राहील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरूण, कम्युट कसं करणार? म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून आहात का? साधारण महिन्याला किती रेंट द्यायची तयारी आहे? आजूबाजूला भारतीय हवे आहेत का? वगैरे सांगितलंत तर ठिकाणं सुचवता येतील.

Hi Sayo,

1. Commute - ready to commute by public transport. I heard that from Edison, there is direct train till 33rd street (around 1 hour travel). From 33rd, I will come to 23rd. I am ok with this.
2. Monthly rent - Approx. $1500 - $2000
3. expecting 2 BHK, since my wife and 2 daughters will join me in next 3-4 months
4. Looking for the apartment, nearby to Highschool, since my younger daughter will be in Jr. High school (9th grade, right?)

These are the main considerations for me.

इकडे ६-८ वी मिडल स्कूल, ९-१२ वी हायस्कूल.
एक सुलेखा.कॉम म्हणून साईट आहे तिकडे अपार्ट्मेंट रेंटलची माहिती मिळू शकेल. आणखी काही हवं असल्यास विचारा.

एडिसनहून कम्युट करायचं ठरवण्याआधी स्कूल डिस्ट्रिक्ट कसे आहेत ते विचारून घ्या. तुम्हाला देशी कम्युनिटी भरभरून नसलेली चालणार असेल तर व्हाइटप्लेन्स, राइ (न्युयॉर्क), विल्टन, ग्रीनिच डिस्ट्रिक्ट, वेस्टपोर्ट , स्टॅमफर्ड (वेस्टोवर एरिया फक्त), डेरियन (कनेटिकट) ही ठिकाणं पण विचारात घ्या. तसं स्टॅमफर्ड मिनि-एडिसन होण्याच्या मार्गावर आहे.

ग्रिनीच/स्टॅमफर्ड एरियाबद्दल काही माहिती हवी असल्यास मी देउ शकते. ग्रीनिच एकुणात महाग म्हणून प्रसिद्ध आहे पण रेंट करणार असाल तर सगळ्या रेंजमध्ये अतिशय चांगल्या स्थितीतली अपार्टमेंट्स किंवा सिंगल फॅमिली हाउसेस मिळतात. हायस्कुल चांगलं आहे. नेबरहुड्स सगळेच चांगले आहेत. सिटीपासून जवळ आहे. फक्त गॅस या गावात घ्यायचा नाही Happy

रच्याकने, तुम्ही व्हइवाले अरुण का?

अरुण, आम्ही राहायचो ते मॅडिसन म्हणून गाव पण तुम्हाला सोयिस्कर पडेल मॅनहॅटनला कम्युट करायला.
Madison, Chatham, Summit, Maplewood, Morris Plains, Morristown, Denville हे टाऊन्स पण चेक करा.
मॉरिस प्लेन्स, डेन्विल जरा लांब आहेत म्हणजे ट्रेन एक तासाच्या वर घेते तिथे पोहोचायला. समिट, मेपलवुडला तर ४५-५० मिनिटाच्या आत ट्रेन पोहोचते पेन स्टेशन हून.
मॅडिसन मध्ये ट्रेन स्टेशन वॉकिंग डिस्टनसवर असलेले २-३ अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस आहेत. आमचं त्यातलं एक होतं.
भाडं १६००-१८००. Check out
WedgeWood manor Apartments and Towne garden apartments.

वेलकम टु बारा अरुण!!

एडिसन मधून ट्रेन आहे. पण तिथे स्कूल डिस्ट्रिक्ट चे २ भाग आहेत. साउथ एडिसन - जिथे ट्रेन स्टेशन जवळ चांगली अपार्ट्मेन्ट्स मिळतात तिथल्या स्कूल्स नेमक्या तेवढ्या चांगल्या नाहीत. नॉर्थ एडिसन मधे शाळा बेटर आहे. तिथे अपार्ट्मेन्ट्स पहा सुलेखा वर. तिथेही ट्रेन स्टेशन आहे, पण अति क्राउडेड एरिया असल्याने स्टेशन हून घर आणि घर टु स्टेशन कम्युट बराच वेळ लागतो.
मला साउथ- सेन्ट्रल जर्सी एरियात रहात असल्याने इथली जास्त माहिती आहे. नॉर्थ मधली चांगली टाउन्स बुवा किंवा सायो सांगू शकेल.
मी इथल्या भागतली साउथ ब्रन्स्विक, प्लेन्स्बरो, वेस्ट विंडसर/ प्रिन्स्टन जन्क्शन रेकमेन्ड करेन. पण तुला कम्युट जरा वाढेल. पण प्रिन्स्टन जन्क्शन मधे ट्रेन स्टेशन आहे आणि अपार्ट्मेन्टस पण चांगली आहेत. देसी ग्रोसरी, दुकाने, देसी शेजार इ. पण भरपूर. स्कूल डिस्ट्रिक्ट वन ऑफ द बेस्ट.
स्कूल्स रेटिंग्स इथे पहा -https://www.greatschools.org/
अजून काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर ईमेल कर संपर्कातून. गुड लक लवकर सेटल होण्यासाठी.

अरूण, बुवा म्हणतायत त्या टाऊन्समध्येही शाळा चांगल्या आहेत प्लस ट्रेन स्टेशन आहे. दुसरी कम्युटला सोयीची टाऊन्स म्हणजे बर्कली हाईट्स किंवा न्यू प्रॉव्हिडन्स. तिथेही पहा वाटल्यास. मला तिथल्या रेंटलचा अंदाज नाही.

एडिसन मध्ये राहाणार असाल तर वॉकिंग डिस्टन्स वर अपार्ट्मॅट बघा. ट्रेन स्टेशन वर कार सिझन पार्किंग ला बहुतेक ६ महिन्याचा वेट आहे. ( 2 वर्षापुर्वी तरी होता) )

जिटिजिला अजून एक मेंबर अ‍ॅड झाला म्हणावा का? Happy अरुण, बाफं कडे लक्ष ठेवा जिटिजिच्या. पुढच्या महिन्यात निघेलच.

विपू बघ बरं .. Happy

मायबोलीची संपर्क सुविधा माझ्याकरता बरेच महिने चालत नाहे .. त्यामुळे इकडे टाईम प्लीज आणि डायग्रेशन .. सॉरी बरं का!