ऑथेंटिक चिली ऑईल - होम मेड!!

Submitted by वर्षू. on 21 March, 2016 - 14:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

थायलँड, चीन या देशांत प्रत्येक डिश बरोबर हे तिखट्टं चिली ऑईल सर्व करण्यात येते. कोणताही नवीन पदार्थ तोंडात टाकल्याबरोबर ,'हे घरी कसं करता येईल' असे विचार डोक्यात सुरु होतात.. (genetic problem है.. कान्ट हेल्पिट Wink )
मग थाय मैत्रीणीं बरोबर डिसक्शन्स.. त्यांच्या आई वडिलांना.. (होय!! ते सर्व कुटुंबच या बिझिनेस मधे बरोबरीने कामे करतात.. ) पिडणे असे सर्व प्रकार करून झाले कि मग हाताला छान शी रेसिपी लागते.. थोडं आपलीपण कलाकारी अ‍ॅड करायची.. कि झालं!!..
अती तिखटप्रिय लोकांकरता..
१) दीड कप खाण्याचे तेल - ऑलिव ऑईल सोडून
२) पाच star anise
३) १ दालचिनी स्टिक. मी cassia दालचिनी वापरलीये.
४) २ तेजपाने ( बे लीव्ज)
५) १ कप थाय रेडचिली फ्लेक्स ( नाम प्रिक चिलीज)
६) मीठ- चवी नुसार
७) चार सहा लसणाच्या कळ्या- ठेचून
८) काळे मिरे एक टी स्पून

क्रमवार पाककृती: 

१) सॉस पॅन मधे तेल गरम करा. थोडे गरम केले कि चिली फ्लेक्स आणी मीठ वगळून, इतर सर्व मसाले त्यात टाका. तेल अजिबात जास्त गरम नको नाहीतर सर्व मसाले जळून जायची भीती आहे.
२) आता गॅस अगदी मंद करून हे सर्व जिन्नस तेलाबरोबर उकळू द्या. तेलात बुडबुडे येणं बंद झाले तर गॅस थोडा मोठा करून . बुडबुडे आल्यावर लगेच पुन्हा मंद करा.
३) ३०,३५ मिनिटे हे सर्व जिन्नस न जळता, उकळले गेले कि गॅस बंद करा.

४) एका काचेच्या हीट प्रूफ बोल मधे चिली फ्लेक्स , मीठ मिक्स करून ठेवा. त्यांवर गाळणे धरून हे गरम तेल
ओता. थंड झाल्यावर काचेच्या स्वच्छ बरणीत भरून फ्रिज मधे ठेवा. सहा महिने टिकते.

अधिक टिपा: 

हे चिली ऑईल, नूडल्स, सूप्स, फ्राईड राईस, डंपलिंग्स या सर्वांची लज्जत वाढवते.. Happy
चीन मधे या चिली ऑईल मधे सछुवान पेप्पर नावाच्या कातील मिरच्यांची फुले वापरतात . ती फुलं भयानक तिखट आणी जीभ नंब करणारी असतात. मला खूप आवडतात आणी चालतातही.. पण घरातील इतरांना नाही.. म्हणून थाय चिली फ्लेक चा ऑप्शन वापरलाय. याही भरपूर जहा>>ल आहेत!!

माहितीचा स्रोत: 
थाय मैत्रीणी ची आई!!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच .. Happy

>> सछुवान

असा उच्चार आहे होय? भारतात शेझवान आणि इकडे सिशुवान ऐकलंय .. हे सगळं एकच का?

होय.. तोच sichuan .. साऊथ वेस्ट चीन चा एक प्रॉविंस .. Happy सछुआन.. मँडरिन उच्चार

थाई हिरव्या मिरच्या पण कसल्या तिखट जाळ असतात, एक्दा इन्डियन स्टोअर मधे जायला वेळ नव्हता म्हणुन या आणल्या..दोन मिरच्यानीच जो तिखटपणा आला की ज्याच नाव ते...

वॉव मस्त रेसिपी! मला माझ्या चायनीज मैत्रिणीने मधे ती सिचुआन मिर्च्यांची ती फुलं दिली होती. ती कशी वापरायची हेच माहित नव्हतं! आता हा प्रकार करून बघेन. ती सिचुआन मिर्ची वापरायची तर क्वांटीटी या चिली फ्लेक्स च्याच प्रमाणात घ्यायची का ? जास्त होतील असे उगीच वाटतेय त्यांच्या ऐकलेल्या लौकिकावरून !! Happy

सिशुवान पेपर म्हणजे आपल्याकडच्या तिर्फळांसारखा प्रकार आहे ना? मंगोलिअन हॉट-पॉट्च्या सुपात असतात.
मला हे तिखट तेल खुप आवडतं, मुरलं कि अजून छान लागत असेल. दुसर्‍या एका प्रकारात या तेलात बीन्स प्युरे पण घालतात.

३०,३५ मिनिटे हे सर्व जिन्नस न जळता, उकळले गेले >>>>>>> एवढ्ञा वेळात मसाले करपत नाही का? तसेच लसूणही ५ मिनिटात लाल होते.

मैत्रेयी.. १ टेबल स्पून चिली फ्लॉवर्स मधे ३/४ कप थाय चिली फ्लेक्स मिसळून घे हवे तर..नुस्ते ,' ह्वा च्याओ'.. टू मच टू बेअर Happy

मनी.. खूप प्रकारचे चिली ऑईल असतात.. तिरफळा सारखे ??हो बहुतेक.. चिली फ्लावर्स खूपच नंबिंग इफेक्ट आणतात..

देवकी.. खूप गरम नाही करायचेय तेल.. लसूण हळू हळू सोनेरी रंगावर येतो.. ब्राऊन किंवा काळा होत नाही.

दिनेश.. Lol तू काश्मीरी चिली फ्लेक्सच वापर बाबा.. ये नही झेपेगा तुमको..

मेधा.. सछुआन पेपर ची चव माहीत आहे मला.. आता तिरफळं घेऊन, चव पाहावीच लागेल.. दिसायला तर सेम आहे पण स पे ची चव लक्षात घेता इंडिअन कुकिंग करता सूटेबल नाहीये .

मस्त वाटतयं चिली ऑईल .
जर कॅरोलायना रिपर किंवा त्रिनिदाद स्कोर्पियन मिरची वापरली तर काय बहार येईल ना ? Proud

आत्ताच गूगलली Carolina Reaper....... ऑसम...

श्री , माहितीत भर टाकण्याबद्दल धन्यवाद Happy