दागदागिने

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23

दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.

Discussions related to Jewelry

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, एकदम सुंदर!! सध्या मस्त फॉर्मात आहेस, मेटॅलिक ज्वेलरी, अक्रिलिक पेंटींग्स आता हे.. किपिटप! Happy

तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.

..

आजकाल इथे कोण का येत नाही...आज मी खणुन खणुन उकरुन उकरुन सर्व धागे वर काढणार आहे....

हाहा.......सध्या फक्त साड्यांच्या दुकानात चक्कर टाक मायबोली वरच्या..... Wink

माझ्या आईला कधीपासुन मोत्याचा तीन पदरी सर घ्यायची इच्छा आहे.. अनायसे आता तिचा ६५वा वादि येतोय तर तिला गिफ्ट देउ म्हणतेय.
ऑनलाईन ऑर्डर करता येइल का मोतीहार? विश्वासु, इन्डीयन वेबसाईटच नाव सुचवा प्लिज!

पुण्यात reliable आणि variety फंक्शनल ज्वेलरी असलेलं दुकान सुचवा प्लिज. ऑनलाईन बघितल्या साईट्स पण डिलिव्हरी लेट आहे. मला २/३ दिवसात हवंय. लक्ष्मी रोडला चक्कर मारू शकेन.
औंध/पिंपळे सौदागर भागात असेल तर उत्तम.

तुळशीबाग एरिया
निअरबाय लक्ष्मीरोड / शगुन चौक किंवा नारायणी ज्वेलर्स.
चितळेवरुन टुवर्डस कुमठेकर रोड ला गेल्यावर शर्मिली / वालसन्स च्या समोर एक दुकान आहे ज्वेलरीचं!

ओके. बघते. पण ते सराफांचं नाहीये ना. कारण सध्या संप चालू असल्याने सोन्या-चांदीच्या सराफांची दुकाने बंद आहेत असं ऐकून आहे.

वामा ते शर्मिलीचा चौक या रस्त्यावर पण एक राठोड म्हणुन दुकान आहे, तिथे पण मिळेल फंक्शनल ज्वेलरी.

अनु, लागू बंधू आणि तनिष्क बंद असतील ना दोन्ही?
शब्दाली, राठोडमध्ये बघते. लक्ष्मी रोडला चक्कर मारावीच लागेल बहुतेक Sad

सराफांशी खरेदी इंट्रेक्श न कमी येत असल्याने हे संपाचे माहीत नव्हते, पण बंद असेल तर गावातले पण बंद असतील ना? एकदा तनिष्क लागू बंधू समोरुन चक्कर टाका☺

जो नवा त्यांना बोचणारा कायदा आहे तो त्यांना तोट्याचा असला तरी अनफेअर्/इल्लीगल नाही ना?
(यावर जास्त वाचलेले नाही आणि इंग्लिश लिंक वाचण्याची शक्ती नाही सध्या.)

बंद असेल तर गावातले पण बंद असतील ना >> हो. त्यामुळे इमिटेशनवाली दुकानं शोधतेय. खरंतर क्राफ्टव्हिला/ मिराव वर मस्त वरायटी आहे. पण लगेच मिळणार नाही.

सिंहगड रोड चालणार आहे का? मधुलता म्हणून दुकान आहे, संतोष हॉलच्या समोर, थोडं पुढच्या बाजूला. मोतीस्पेशल आहे. बहुतेक करून पारंपारीक प्रकर असतात, ठुशी, वाकी, चिंचपेटी, तन्मणी वगैरे. इमिटेशनमधेच अर्थात. बाकी नव्या पद्धतीचे फॅन्सी असतात का माहिती नाही, पण कलेक्शन सुंदर आहे. महागही नाहिये. मैत्रिणीसाठी मी ठुशी आणि कानातलं असा सेट घेतला, ४०० ला मिळाला आणि एकीसाठी अजून एक डिझाईनचा ५०० ला मिळाला.

अवांतर - तिथे सीझनमधे गौरी (महालक्ष्मी) ची दागिनेही मिळतात.

Pages