सर्वस्व तू…

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 8 March, 2016 - 06:47

सर्वस्व तू…

पहाटे ४.३०-५ चा गजर वाजला मोबाईलमध्ये आणि रोहिणीने स्नूझ असल्यामुळे कट केला.. १०-१५ मिनिटे झाली आणि पुन्हा तो वाजला.. ती उठली.. घाईघाईतच. पण मागून नवऱ्याने हात पकडला, "झोप थोडा वेळ आणखीन. मी क्यानटीन मध्ये लंच करेन हव तर" तिने मागे चमकून बघितलं, नवरा झोपेत बडबडत असावा असच वाटल तिला पण तो खरच जागा होता. "नाही नको, कालचा उपवास सोडायचा आहे ना.. उठते मी, झोपा तुम्ही आणखीन एक-दोन तास." तो हसला पण झोपला पुन्हा. तिने सकाळचं सगळ आवरलं आणि कुकर चढवला. चपातीच पीठ मळून ठेवलं आणि भाजी चिरायला घेतली. स्वयंपाक होईपर्यंत ७ वाजत आले होते, नाश्त्यासाठी तिने पोहे भिजवले आणि वामन ला उठवण्यासाठी बेडरूम कडे धावली. पण तो उठून बसला होता. आश्चर्याचा दुसरा धक्का, "मी आवरतो, अगदी शर्ट पण घेतो स्वतः कपाटातून काढून." तो म्हणाला आणि ती देवघरात गेली. पूजा आटपली. नैवेद्याच ताट दाखवलं. आज सकाळी सकाळी घरात वातावरण तापणार ह्याचा तिला अंदाज होता.. दुध भात किंवा दही भात वामंनना अजिबात आवडत नाही आणि उपवास तर त्यावरच सोडावा लागतो हे तिच्या आईचे आणि नंतर सासूचे तिच्यावरचे संस्कार, त्यामुळे थोडा वाद घालत ती त्याला मनवायची दरवर्षी. मागच्या वर्षी त्याने "कर्ड राइस दे न मग बनवून" असा ऑप्शन सुचवला होता हे तिला आठवल आणि ती हसली, "काय पण ऑप्शन सुचवतात, यावर्षी काय सांगतील ते त्या महादेवालाच माहित" म्हणत ती पोहे करायला गेली. तो आवरून बाहेर आला.. तसं तिने दही भात समोर आणून ठेवला. पाणी दिल.. आणि त्याने काहीच कुरकुर न करता ते खाल्लही. तिच्या चेहर्यावरच प्रश्नचिन्ह पाहून "शेवटी हेच खाव लागत विदौट एनी अदर ऑप्शन,मग कशाला उगाच वाद करू? " तू स्वतःचच खर करणार अस म्हणण्याऐवजी वाद नको? अस म्हणाले हे ? पुन्हा धक्का. ती समाधानाने हसली. त्याला पोहे आणून दिले आणि लंचचा डबा घेऊन तो निघून गेला.

ती बच्चे कंपनीकडे वळली. "उठा आता .. ८.३० झाले" अशा ४-५ हाका देऊन झाल्यावर तिने चादर ओढली त्यांच्या अंगावरची.. ते काही हलेनात.. मग पंखा बंद करून पाहिला.. थोडा वेळ आरडाओरड झाली, पण काम फत्ते झाल. डोळे चोळत दोघे उठले.. तोपर्यंत केर आणि लादी झाली होती.. ९ वाजले. दोघांचा ब्रश, अंघोळ.. १० वाजेपर्यंत नाश्ता झाला. मग दोघ एका तासासाठी खाली खेळायला गेले. आता थोडी उसंत तिला मिळाली. मोबाईल हातात घेतला..आणि "ह्यापी वुमन्स डे" चे कितीतरी मेसेज आलेले पाहिले .. मग त्यातलेच जे सेम नाहीत असे मेसेज एक दोघांना फोरवर्ड करून झाले. वामन ने सुद्धा मेसेज केला होता.. आणि सोबत "थ्यांक यु, लव्ह यु स्वीटी " असही लिहील होत.. काय गोड लाजली ती. सकाळपासून मिळणाऱ्या धक्क्यांच कारण तिच्या लक्षात आल होत. तितक्यात मुलांची आठवण आली आणि ग्यालरीत त्यांना बघायला धावली. खेळत होते दोघे.. आजच्या जगात लक्ष ठेवावच लागत, मग तिनेही नाश्ता करून घेतला.. बाकी भांडी-कपडे धुवून झाले, वाळत घालून झाले आणि तिने मुलांना ,"वर या" अशी हाक मारली. तिला आठवल काहीतरी.. आणि सगळी मोठीची पुस्तकं शोधायला लागली. शाळेत फळांची चित्र मागवली आहेत जी ती विसरून गेली होती, कितीही शोधल तरी नेमकी हवी ती चित्र मिळेचना, इतक्यात दोघे घरी परतले. आईला पार घाम फुटलेला पाहून मोठीने चौकशी केली आणि "ती तर आहेत माझ्या ब्यागेत, मघाशीच ब्याग आवरताना दिसली मला ...हि बघ " “अरे व्वा.. ह्यांनी ठेवली बहुतेक”. नवऱ्याच एवढ सहकार्य पाहून ती भारावून गेली. पुढचा १२ वाजेपर्यंतचा तिचा वेळ मुलांचं जेवण, त्यांची भांडणं सोडवण, शाळेची तयारी यातच निघून गेला. १२.१५ ला मुलांना शाळेच्या बसमध्ये चढवल आणि तिने थोडा मोकळा श्वास घेतला. त्यातही गावी गेलेल्या सासू सासर्यांना फोन करून औषध वेळेवर घेण्याची आठवण करून दिली नंतर स्वतःच्या आई बाबांची फोनवरून चौकशी केली. नवऱ्याला, "भाजीत थोड मीठ जास्त झालंय तेवढ अड्जस्ट करा. सॉरी " म्हणून कळवून झाल.

१-१.३० च्या दरम्यान जेवली आणि दारावरची बेल वाजली. वामन हाल्फ डे ने घरी आला होता. ती काही बोलणार इतक्यात, "पटकन तयार हो.. फक्त तुझ्यासाठी आजचा वेळ काढलाय.." "स्वप्न नाहीये हे.. तुझा नवरा खरच लवकर घरी आलाय फक्त तुझ्यासाठी" हे कळायला तिला काही क्षण लागलेच. कपाट आवरायचं ठरवलं होत तिने आज दुपारी.. पण ते आत्ता बोलायची वेळ नव्हती.. ती तयार होऊन बाहेर आली आणि तो गायला लागला चक्क..."चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिलकुल वैसी हो, जैसा मैंने सोचा था" अहाहा .. काय मस्त दिवस आहे आजचा.. रोहिणी हवेतच होती.. दोघ नाटकाला जाऊन आले, मुलांना शाळेतून संध्याकाळी पिक अप केल आणि पुन्हा सगळे बाहेर फिरायला गेले.. त्याने मोबाईल स्विच ऑफ केला. मुल गार्डन मध्ये खूप खेळली आणि ह्या दोघांनी खूप गप्पा मारल्या. अगदी सख्ख्या मित्रांप्रमाणे. " रोहिणी.. काहीतरी सांगायचं आहे..फक्त आजचा एक दिवस म्हणून नाही..पण खरच असंही राहता येऊ शकत ग.. तुझ्या चेहर्यावरच हसू, समाधान..खूप काही देऊन गेलय आज. तू माझी तर अर्धांगिनी आहेसच पण तुझ्या आई बाबांची लाडकी लेक, भावाची -बहिणीची छोटी आई, तुझ्या सासू सासर्यांची दुसरी मुलगी, एक चांगली मैत्रीण आणि माझ्या मुलांची जिजाऊ आहेस.. तुझ्याशिवाय आम्ही सगळेच अपूर्ण आहोत. भले तू इतिहासातल्या राण्यान्सारखी प्रसिद्ध नाहीस पण माझ्या कुटुंबासाठी तू खूप काही आहेस. सर्वस्व तू… मला तुझा खरच अभिमान वाटतो. आय लव्ह यु." डोळ्यांत उभे राहिलेले अश्रू त्यामुळे उत्तर द्यायची गरजच नाही वाटली तिला. रात्रीच जेवणही बाहेर केल त्यानी..तिला आराम म्हणून. कुल्फी खात ते घरी परतले.. तेव्हा मुल पेंगुळली होती. त्यांना झोपवल आणि त्याच्या शेजारी येउन बसली तेव्हा त्याने तिला ३२ GB च मेमरी कार्ड दिल आणि म्हणाला, "गाणी आवडतात ना तुला ? ह्यात चिक्कार गाणी राहतील.. आणखीन एक.. तुझा आवाज खूप गोड आहे.. एक गाण म्हणशील?.." ती म्हणाली, " आत्ता ? रात्रीचे १०.३० झालेत .. मुल उठतील.." " आवाज गोड आहे तुझा.. भेसूर नाही.. गा ना .." त्याच्या केसातून हात फिरवत ती हळू आवाजात गायला लागली, " दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ..." ती गुणगुणत राहिली आणि तो झोपूनही गेला...

तिची विचारचक्र फिरत होती, नवऱ्याला आपल्या सगळ्या गोष्टीचं कौतुक आहे.. पण खरच हेच कौतुक तो दररोज करत राहिला असता तर आजचा दिवस एवढा स्पेशल ठरलाच नसता.. उद्यापासून एक वर्षांनतर येईल हा वुमन्स डे पण.. इतक कौतुक आपल्याला हे पूर्ण वर्ष जगायला पुरेपूर उरेल.. प्रेमाचे, आपुलकीचे, प्रशंसेचे दोन शब्दच पुरे असतात कि प्रत्येक गृहिणीला... मी हि त्यातलीच एक.. आणि माझ्या सारख्या कितीतरी जणी... सलाम त्या सगळ्या स्त्रियांना. अर्ध्या तासात तिचाही डोळा लागला.

दुसर्या दिवशी पहाटे ४.३०-५ चा गजर वाजला मोबाईलमध्ये ...................

मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच गोग्गोड लिहता बाई तुम्ही.

भांडणाची स्फुर्ती मिळाली या लेखातुन Proud माझ्यासाठी हे सगळं नाही केले म्हणुन आज नवरोबाशी भांडणच करते आज Wink

गोग्गोड नाही ओ..सकारात्मक म्हणता येईल .. निदान कल्पनेत तरी सुख मानता येईल म्हणून..

बाकी भांडणाची जबाबदारी तुमची... आम्ही त्यास जबाबदार नाही

बॅड बॅड मॅनेजमेंट.
घरात र्हानर्या बाईना फक्त नवर्‍याचा नास्ता आणि डबा करासाडेपाच वाजता उठायाला लागते?
मुल तर बारानंतर शाळेत जातायत. बाइ तर कामाला पण जात नाहियेत.

माय्बोलि जॉइन करायला साम्गा. नव्या नव्या युक्ती शिकतिल टाइममॅनेजमेंटच्या.

मस्त!

शेवटच्या तीन-चार ओ़ळी वाचताना खुप छान वाटल.
मस्त लिहिलय Happy

माय्बोलि जॉइन करायला साम्गा. नव्या नव्या युक्ती शिकतिल टाइममॅनेजमेंटच्या. >>>> हे बाकी खर आहे.

धन्यवाद.

संजना.. तुम्ही अजून लेखन केले नाहीत... करून पहा न.. वाचायला नक्की आवडेल. (अर्थात शुद्धलेखनाच्या चुका नसतील तर)

अंकु.. क्षमस्व.. पुढच्या वेळेस आणखीन चांगला प्रयत्न करेन.