Submitted by सुप्रिया जाधव. on 29 February, 2016 - 09:57
जाणिवांचे लख्ख ताजे ऊन यावे
संभ्रमांच्या सावल्यांनी गुदमरावे
घेतला हातात त्याने हात माझा
वाटले की त्याक्षणी अदृश्य व्हावे
स्पंदनांचा वाढतो एकेक ठोका
वेगळे याहूनही का आठवावे ?
लावला बुक्का कपाळावर विठूचा
फ़क्त त्याचे फ़क्त त्याचे गीत गावे
वेदना कळणार नाही अंतराहुन
तेवढ़यासाठी तिच्या गावीच जावे
जर तिचे माझ्याविना कोणीच नाही
यातनेने बोट कोणाचे धरावे ?
दुःख कुंतीचे मिळाले भाग्य माझे
श्रेय हे कुंतीस की कृष्णास दयावे ?
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला,वेदना,यातना...छान शेर!
मतला,वेदना,यातना...छान शेर! छान गझल!
घेतला हातात त्याने हात
घेतला हातात त्याने हात माझा
वाटले की त्याक्षणी अदृश्य व्हावे>>> uff yumma.....
..............